उद्यापासून नवरात्रोत्सव अर्थात दुर्गेचा महोत्सव सुरू होतोय. महिषासुरमर्दिनी दुर्गा ही कायमच शक्तीची प्रतीक मानली गेलेली आहे. म्हणून या नवरात्रीच्या निमित्ताने जागर सुरू करूया स्त्रीशक्तीचा, पुन्हा एकदा. स्त्रियांच्या गेल्या कित्येक पिढ्या पुरुषसत्ताक बंधनांचा, विनयभंग-बलात्कारांसारख्या अत्याचारांचा सामना करत, त्याविरोधात आवाज उठवत आलेल्या आहेतच, तोच अन्यायाविरुद्धचा नकार झिरपत जाऊन ‘मिलेनियल्स’ वा ‘जेन झी’ युवतींच्या मनात रागाचा उद्गार बनला आहे. ‘नारी अपने आप की- नहीं किसी के बाप की।’ किंवा ‘क्युटी नही, क्रांती हू।’ सारख्या घोषणा त्यांच्या याच मानसिकतेतून आल्या आहेत. अत्याचार करणार्या राक्षसांचा वध व्हायलाच हवा, आता थांबणे नाही… हेच त्या दाखवत आहेत, त्यातली चांगली गोष्ट ही की त्यासाठी त्यांना समविचारी युवकाची साथ मोठ्या संख्येने मिळते आहे.
एक कचौड़ी, दो समोसा – इन मर्दों का क्या भरोसा।
एक सुट्टा, दो चाय – मर्द जात हाय-हाय।
मेरे सिर में दर्द है, इसका कारण मर्द है।
एक जीरा, दो अजवाइन – मर्द जात दो रिज़ाइन।
शर्म नहीं है मर्दों में – औरत क्यों है पर्दों में।
नारी अपने आप की- नहीं किसी के बाप की।
बिहार येथील जमुई येथे नुकत्याच घडलेल्या अत्यंत बीभत्स विनयभंग प्रकरणानंतर आणि दिल्लीतील ‘आस्था कुंज पार्क’ येथे एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर अनेक विद्यार्थिनी, ‘जेन झी’ मुली दिल्ली विद्यापीठात एकत्र आल्या आणि त्यांनी आपल्या रागाला अशा प्रकारच्या घोषणांनी वाचा फोडली. यातल्या शब्दरचनेकडे न बघता त्यामागच्या भावनांचा विचार केला तर या घोषणा म्हणजे कित्येक वर्षांची साचलेली मळमळ आहे. जी बाहेर पडते आहे. एकूणच त्यांचं व्यक्त होणं पाहाता या मुलींना त्यांच्या स्वातंत्र्यासाठीचा सूर गवसल्याची खात्री पटते.
उद्यापासून (रविवार) नवरात्र महोत्सव सुरू होतोय. अशी कथा सांगितली जाते की, नऊ दिवस देवी दुर्गा आणि महिषासुरात युद्ध सुरू होतं. दहाव्या म्हणजेच दसर्याच्या दिवशी तिने या राक्षसाचा वध केला. उद्यापासून जागर सुरू होतोय तो याच शक्तीच्या पुनरुच्चाराचा. आताची ‘मिलेनियल्स’ आणि ‘जेन झी’ पिढी आपल्यावरील अन्यायाकडे वेगळ्या नजरेने पाहते, त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे, त्यांचे शब्द वेगळे आहेत, व्यक्त होणं वेगळं आहे (जे मागच्या पिढ्यांना खटकणारं असू शकतं) हे जून- जुलैमध्ये घडलेल्या ‘जंतर-मंतर’ आंदोलनानेही दाखवून दिलं आहेच. त्याचाच हा एक वेगळा आविष्कार दिल्लीच्या रस्त्यावर दिलेल्या घोषणांमधून दिसून आलाच. पण यातली सकारात्मक बाब म्हणजे अनेक युवकही त्यांच्याबरोबर आहेत. ‘इन्स्टाग्राम’सारख्या समाज- माध्यमावरून ते मिम्सच्या, गाण्यांच्या, विनोदी स्कीटच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. त्रागा नाही, चिडचिड नाही पण शब्द, वागणं असं की समोरच्याने विचारात पडावं.
खरं तर ्त्रिरयांच्या बाबतीत समाजाचं काही तरी चुकत आलेलं आहे, हे कित्येक वर्षांपासून लक्षात येत होतंच… अगदी जगभरात. एकूण लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या ्त्रिरयांची असूनही त्यांनी उरलेल्या लोकसंख्येला सतत घाबरायचं, त्यांच्या मागे मागे राहायचं, वर्चस्व सहन करायचं? का? अशासारखे कित्येक प्रश्न ्त्रिरयांना पडायला लागले होतेच. स्त्रीवादाची सुरुवात आणि त्यानंतरची गेली ५० वर्षं त्या प्रश्नांच्या शोधातच तर गेली. आपल्या देशात, राज्यात तर समाजसुधारकांची फळीच होती, बदल झाला. अजूनही होत आहे, परंतु अपेक्षेप्रमाणे नाही. कारण समाजाच्या मुळाशी घट्ट रुजलेली पुरुषसत्ताक प्रवृत्ती. त्याचं गारुड इतकं आहे की, आजही अनेक पुरुषच नाहीत तर ्त्रिरयांही मुलींनाच दोष देत आहेत. ‘‘तुमचं शिक्षण, तुमचं स्वातंत्र्य, तुमचे विचार याचमुळे कुटुंबं विस्कटायला लागली आहेत, अधोगती होते आहे. तुम्हीच आहात सगळ्या संकटांना कारणीभूत. तुम्हीच आहात दोषी…’’
या पार्श्वभूमीवर आजच्या या मुलींचा आविष्कार सुखद वाटतो आहे. मुलींचं वर्तन कदाचित आधीच्या पिढीला पटणारं नसेलही, परंतु ही सामाजिक घुसळण आहे. त्यातून जाताना चांगल्या-वाईट गोष्टी घडणार आहेतच. परंतु मुली मुक्तपणे, वेगळेपणाने बोलायला लागल्या आहेत. यापूर्वीही आंदोलने झाली, मोर्चे निघाले, परंतु पुरुषांमध्ये तेवढी मोठी मानसिक उलथापालथ करण्यात ती आंदोलने कमी पडली का? ‘आमचंही काही तरी चुकतंय,’ ही जाणीव सामान्य पुरुषांमध्ये व्हायला लागली नव्हती, असं म्हणणं धाडसाचं आहे, परंतु ते जाहीरपणे मान्य करण्यात अनेक पुरुष कमी पडत होते. जे बोलत होते त्यांना इतर पुरुष हसत होते, टोमणे मारत होते. याचं कारण बहुधा त्यांच्यातला अहंकार आड येत असावा. आताच्या या मुलींनी याच पुरुषी अहंकाराला प्रश्न विचारायला सुरुवात केलीय आणि म्हणूनच आज या ‘मुलीं’च्या आंदोलनात मुलगेही तितक्याच ताकदीने दिसायला लागले आहेत. हे तरुण स्वत:लाच प्रश्न विचारायला लागले आहेत, ‘आपण कोणत्याही मुलीला आत्तापर्यंत ‘तसा’ स्पर्श केलेला नाही, तरीही या मुलींना आपली भीती का वाटते. केवळ आपण पुरुष आहोत म्हणून?’ या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ‘होय’ हेच आहे. ही भीती व्यक्तिपरत्वे नसून पुरुषी मानसिकतेची आहे. सरसकट पुरुषांबद्दल राग, चिड, भीती असण्याचं कारण नाहीच, पण तरीही ती असेल तर सगळ्याच पुरुषांना ते भान स्वत:मध्ये आणायला लागेल. अर्थात आताची ही युवकांमध्ये होऊ लागलेली जाणीव जागृती पाहाता, लक्षात येतंय की समाजाची योग्य नस दाबली जातेय, योग्य जागी हातोडा पडतो आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपकेची २७ सप्टेंबरची इन्स्टा पोस्ट हीच ‘ओनरशिप’ घेणं सांगणारी आहे. त्याची ही पूर्ण पोस्ट फक्त तरुणांसाठी आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, आपल्या देशात मुली सुरक्षित नाहीत याची जबाबदारी सरकार, पोलिसांची आहेच; परंतु त्याआधी प्रत्येक पुुरुषाची आहे. ्त्रिरयांप्रति आपली मानसिकता, विचार कसे आहेत हे प्रत्येक पुरुषाने पडताळून पाहायला हवं. अर्थात अभिजितने दोषांचं खापर पितृसत्ताक पद्धतीवर फोडतानाच, स्त्रीद्वेष्टेपण, स्त्रीविरोध अशासारख्या वर्षानुवर्षं चालत आलेल्या गोष्टी ‘अनलर्न’ करण्याचा सल्लाही तरुणांना दिला आहे. आज २०२६ मध्ये मुलींना त्यांच्या सुरक्षिततेची, रात्री एकट्याने बाहेर पडायची भीती वाटत असेल तर पुरुषांना, आपल्याला लाज वाटली पाहिजे, असं तो बिनदिक्कत म्हणतोय. त्याच्या म्हणण्यानुसार, लहानपणापासून आपण आपल्या आजूबाजूला, घरात मुलांना आणि मुलींना असमानतेने वागवलेलं पाहिलेलं असतं. तोच ‘संस्कार’ मनावर घट्ट बसल्याने काही वेळा नकळत आपणही तसं वागायला लागतो, मान्य आहे. मात्र शिक्षणाने, घराबाहेर पडण्याने, अनेकांच्या संपर्कात येण्याने आपण काही गोष्टी नव्याने शिकतो, शिकायला हव्यात. त्यासाठी आधी जे चुकीचं शिकलो आहोत ते पुसून काढायला हवं ना. त्याचं एक वाक्य महत्वाचं आहे, ‘मित्रांनो, तुम्ही तुमची असमानतेची विचारसरणी कधी तपासलीय? समस्या आपल्यात आहे, हे जोपर्यंत आपण मान्य करणार नाही तोपर्यंत ्त्रिरयांच्या सुरक्षेविषयी आपण कसं काय बोलणार? यासाठी गरज आहे ती काही चुकीच्या गोष्टी मनातून पूर्णपणे काढून टाकण्याची. अनलर्न, हाऊ टू बी अ मॅन. तरच बदल घडू शकतो.’’ एका पुरुषाने इतर पुरुषांचे असे ‘इन्स्टाग्राम’ पोस्टवरून जाहीरपणे टोचलेले कान खूप काही सांगणारे आहे.
आपल्या समाजात स्त्रियांना दोन गोष्टींचा प्रामुख्याने सामना करावा लागतो- एक पितृ वा पुरुषसत्ताक विचारसरणीतून आलेल्या असमानतेच्या मानसिकतेचा. आणि त्यातून आलेल्या लैंगिक अत्याचाराचा. पहिल्या असमानतेमुळे होणारे दुष्परिणाम कुटुंबांतच पाहायला मिळतात. हे वाक्य वापरून वापरून गुळगुळीत झालेलं असलं तरी, ‘संसार आणि नोकरी-करिअर यातील तारेवरची कसरत’ आजही स्त्रीला करावी लागतेय. त्याचा आता तिला कंटाळा आला आहे. घर दोघांचं आहे तर मग दोघांनी सावरायला, आवरायला हवं हे वाक्य फक्त कवितेतच नको राहायला. अलीकडेच एक ‘रील’ पाहिली. एक तरुण मुलींना विचारतोय, ‘तुम्हाला फक्त ्त्रिरया असलेल्या ठिकाणी राहायला आवडेल का?’ त्यातल्या प्रत्येकीने अत्यंत आनंदानं होकार दिला. एक तर म्हणाली, ‘‘१००० टक्के आवडेल. त्यामुळे आम्ही हवं तसं जगू, हवं ते खाऊ-पिऊ, हवे ते कपडे घालू, कसलीही भीती राहाणार नाही, मोकळेपणानं श्वास घेऊ.’’ त्याने काही तरुणांना हाच प्रश्न विचारला, ‘‘फक्त पुरुष असलेल्या ठिकाणी तुम्हाला राहायला आवडेल का?’’ एक जात सगळ्यांनी नकार दिला. छे छे ्त्रिरयांशिवाय राहायचं? नकोच. हे सगळं गमतीगमतीत चाललं होतं, पण त्यातून आलेला निष्कर्ष गंभीरपणे विचार करायला लावणारा आहे. असाच आणखी एक व्हिडीओ पाहिला, सुप्रसिद्ध अलख पांडे सरांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भरगच्च असलेल्या सभागृहात मुलग्यांना एक प्रश्न विचारला, ‘‘समजा पुढचा जन्म आहे असं गृहीत धरू, तुमच्यापैकी किती जणांना स्त्रीचा जन्म घ्यायला आवडेल?’’ आणि तोच प्रश्न त्यांनी मुलींनाही विचारला, कुणीही ‘हो’ म्हणायला हात वर केला नाही. यावरून बाईच्या जन्माविषयी, या ‘जेन अल्फा’ पिढीच्याही मनात काय विचार आहेत, हे लक्षात येतं. अर्थात माझ्यासारख्या अनेक जणी स्त्री जन्मच हवा, असं म्हणतील, ते वेगळ्या कारणांसाठी.
मात्र आपल्या समाजात स्त्रीची अवस्था आजही आनंददायी नाहीच. शिक्षणामुळे म्हणा, प्रगतिशील विचारवंतांमुळे म्हणा किंवा आंदोलन चळवळींमुळे मुलींना, स्त्रियांना आपल्यावरच्या अन्यायाची जाणीव हळूहळू होत गेली. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दिसू लागला. त्यातलं सर्वात महत्त्वाचं, मुलींचं शिक्षण घेणं, त्यात यश मिळवून, चांगल्या पदांवरच्या नोकर्या मिळवणं, ‘प्रोफेशनल करिअर’ करणं त्यातून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणं. मात्र काही जणी आजही पारंपरिक विचारांच्या चौकटीत बंदिस्त आहेत. त्यांना काळाच्या हाती सोपवून देऊ. अर्थात बदल अटळ आहेच.
या सगळ्या पार्श्वभूमीमुळेच सध्याचा सर्वात गहन प्रश्न झाला आहे तो स्त्रीवर होणार्या लैंगिक अत्याचाराचा. पितृसत्ताकता, सत्ताबळ, अहंकार, पुरुषीपण यामुळे निर्माण झालेल्या या समस्येला पायबंद घालता येणं हेच सध्याचं सर्वात मोठं आव्हान आहे. सगळे पुरुष ‘तसे’ नसतातच, अन्यथा ्त्रिरयांना श्वास घेणं, जगणंच मुश्कील झालं असतं, तरीही कळतनकळत या पुरुषांचं पुरुषपण भीतीदायक का वाटतं, जरी हे पुरुष प्रत्यक्षात ‘तसं’ काहीही करत नसले तरीही… समजा एखादी बाई चुकून किंवा कुणाबरोबर तरी रेल्वेच्या पुरुषांच्या डब्यात शिरली. सहानुभूती दाखवत एखाद्या पुरुषाने तिला बसायला जागाही दिली तरी आजूबाजूच्या असंख्य नजरा तिला प्रचंड अस्वस्थ करत राहतात. भर डब्यात तिला कुणीही काहीही करणार नसतं, तरीही पुरुषांची चोरटी नजर कधी इथून बाहेर पडतोय हेच तिला विचारत राहते. याचा अर्थ डब्यातल्या प्रत्येक पुरुषाने तिला त्या नजरेने किंवा चोरट्या नजरेने पाहिलेलं असतं का? तर अजिबात नाही. काहींच्या मनात तिला पाहताना वेगळेच विचार असतील परंतु तरीही… तरीही… त्यांचं तिच्याकडे पाहत राहणं तिला कानकोंडं करतंच. हे कदाचित तिचंही ‘कंडिशनिंग’ असेल, ‘सातच्या आत घरात’ हे पालुपद सतत ऐकत आलेल्या तिच्या मनात, सगळे पुरुष या बाबतीत वाईटच असतात, हेच घट्ट रुतलेलं असतं. आणि ते अधिकाधिक घट्ट करत असतात आजूबाजूला घडणार्या बलात्काराच्या घटना. पुढे जाऊन हेही मान्य करावंच लागतं की, घराबाहेर पडणार्या ९८-९९ टक्के ्त्रिरयांनी आयुष्यात एकदा तरी विनयभंगाचा, किळसवाण्या स्पर्शाचा, नजरेचा अनुभव घेतलेला असतोच. विनयभंगाच्या काही घटना तर काही सेकंदांच्या असतात. अशा वेळी विचार येतो की, ‘असं काय घडतं, त्या काही सेकंदांमध्ये की त्या पुुरुषाला एखादी स्त्री पाहिली की तिच्या विशिष्ट अवयवांना स्पर्श करावासा वाटतो?’ या प्रश्नांच्या उत्तरासाठी थेट गाठलं ते लैंगिक विषयांचे अभ्यासक, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजन भोसले यांना. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष कृती काही सेकंदांची असली तरी त्याच्या शरीरातली खळबळ आधीपासूनच असते. विशिष्ट वयात शरीरातल्या संप्रेरकांमुळे लैंगिकतेची तीव्र गरज तयार होतच असते. अशा वेळी नेमकं त्यांच्या आयुष्यात स्त्री नसणं, आजूबाजूचं उत्तेजित करणारं वातावरण, दृश्यं, चित्रपट, समाजमाध्यमांवरच्या रील्स, उन्मादक फोटो यामुळे तयार झालेलं लैंगिक आकर्षण त्याच्या शरीरात उसळ्या मारत राहतं. स्त्रीला स्पर्श करण्याची त्याची इच्छा तीव्र होत राहते. अशा वेळी गर्दीच्या ठिकाणी किंवा जिथं आपण पकडले जाऊ याची शक्यता कमी वाटते, तिथं अशा तरुणांमधला ‘पुरुष’ जागा होतो. आणि काही सेकंदांत ते समाधान मिळवतो. आपली लोकसंख्या पाहता प्रचंड गर्दीत संधी शोधणारे २०-३० टक्के पुरुष असतातच, पण दोष मात्र सगळ्या पुरुषांवर जातो.
हे थांबवता येईल का? तर नक्की. डॉ. भोसले यांच्या मते, ‘‘मुलग्यांना Consequential Thinking, म्हणजे एखादे कृत्य करण्यापूर्वी त्या कृत्याचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात, याचा विचार आधी करणं आणि त्या परिणामांचा विचार करून ते कृत्य करावं की करू नये, याचा निर्णय घेणं, शिकवायला हवं. एखाद्या व्यक्तीच्या मनात एखादा विचार येऊ शकतो, एखादी इच्छा निर्माण होऊ शकते किंवा एखादी गोष्ट करून पाहावी, असं वाटू शकतं. परंतु मनात येणं आणि प्रत्यक्ष कृती करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर त्या कृतीचे संभाव्य परिणाम त्या व्यक्तीने आधीच विचारात घेतले असतील, तर प्रत्यक्ष कृती करण्याच्या क्षणी ती व्यक्ती स्वत:ला थांबवू शकते. या शिवाय वयाबरोबर येणारी परिपक्वता या बाबतीत अधिक कशी वाढवता येईल हे पाहायला हवं. अनेकांना समाजमनाची भीती असते. असं करताना आपल्याला कोणी पाहिलं तर? कोणी ओळखलं तर? पकडून मारलं तर? याची भीती या गोष्टी करण्यापासून प्रवृत्त करते. म्हणूनच समाजानेही बघेपणाची भूमिका न घेता अशा घटना थांबवल्या तर जरब बसू शकते. थोडक्यात, प्रत्येकाने शारीरिक वा लैंगिक गरज ओळखून ती ताब्यात ठेवणं, त्यासाठी जाणीवपूर्वक ‘सुशिक्षित होणं’ हाच त्यावरचा जालीम उपाय आहे. अर्थात डॉ. मोहन देस, हरीश सदानी (मावा) यांच्यासारखे अनेक जण आपल्या ‘पुरुषभान’ उपक्रमातून सातत्याने आणि गेली कित्येक वर्षं युवकांबरोबर हे काम करत आहेतच. त्याचमुळे अशा उपक्रमाची संख्याही वाढली पाहिजे. कारण या बाबतीतला आपला भूतकाळ काळाच आहे.
सरकारी आकड्यांनुसार आपल्या देशात दर अध्र्या तासाला एका स्त्रीवर बलात्कार होतो, तोही पोलिसांकडे नोंदलेला (म्हणजे खरा आकडा किती असावा?). हा आकडा इतका भयावह पद्धतीने का वाढत गेला आहे? त्यासाठी आत्तापर्यंत युद्धपातळीवर कुणीच प्रयत्न केले नाहीत का? की इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात असं होणारच हे सर्वांनीच गृहीत धरलंय? की ्त्रिरयांवर बलात्कार होतात, त्यात काय एवढं, अशी मानसिकता त्यामागे आहे? ‘निर्भया बलात्कार प्रकरण’ घडलं तेव्हा खरं तर लोकांना ‘जाग’ आली होती. त्या वेळच्या आंदोलनांनी कायद्यात बदल घडवला, शिक्षा कठोर झाल्या. अनेकांना त्यामुळे शिक्षाही झाल्या. पण नंतर परिस्थितीत किती बदल घडला? याचा समाज म्हणून आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का?
मध्यंतरी ‘यूट्यूब’वर एक लघुपट पाहिला होता. एका कुटुंबाची गोष्ट. मुलगी रात्री मैत्रिणीच्या वाढदिवसाला जायला निघते. सोबत तिचे मित्र असतात. आई काळजीत पडते. पण तिचे मित्र तिला आश्वस्त करतात, ‘तुम्ही काळजी करू नका. आम्ही तिला सुखरूप घरी आणून सोडतो.’ मुलगीही सांगते, ‘रात्री १२ वाजता केक कापला की मी लगेच येते.’ खूप आग्रहामुळे आणि मित्र नेहमीचे असल्याने घाबरत का होईना आई परवानगी देते. मुलीचे वडील रात्रपाळीला गेलेले असतात.
१२ वाजून जातात. आईचं लक्ष घड्याळाकडे. ती मुलीचा मोबाइल फोन लावते तो बंद येतो. त्यामुळे तिच्या भीतीत अधिकच भर पडते. शेवटी न राहवून ती मुलीच्या शोधासाठी बाहेर पडते. रात्रीच्या अंधारातील सुनसान रस्ते अधिकच अंगावर येत असतात. मुलीच्या मैत्रिणीचं घर शोधता शोधता ती रस्ता चुकते आणि भलत्याच रस्त्यावर पोहोचते. कुणीच नाही रस्त्याला, पण मुलीची काळजी तिला पुढे जायला भाग पाडत राहते. दरम्यान, घरी मुलगी सुखरूप परत आलेली असते. तिचे वडीलही परतलेले असतात. आता आईच्या शोधात बाबा बाहेर पडतात. बरंच अंतर गेल्यावर त्यांना दूरवर एक बाई पडलेली दिसते. ते जवळ जाऊन बघतात तर तीच, त्यांची बायकोच असते… आता बलात्कारित बायको. एक तासाचा हा लघुपट. त्यात कुणी काम केलंय, कोण लेखक, दिग्दर्शक लक्षात नाही; परंतु त्या आईचा आक्रोश आणि नंतरचा बाईचा आक्रोश… कित्येक वर्षं होऊन गेली तरी मनावरून पुसला गेलेला नाही, उलट रात्र… सुनसान रस्ते कोणत्याही वयाच्या बायकांसाठी सुरक्षित नाहीत हे दुर्दैवी सत्य अधिक घट्ट करत गेला.
मध्यंतरी ‘रात्र आमची, रस्ते आमचे’ यावरूनही काही ्त्रिरयांनी आंदोलन छेडलं होतं. अनेक जणी त्या वेळी गठ्ठ्याने एकत्र येऊन रात्रीची मजा लुटत. धमाल करत. रात्रीवर आपला हक्क सांगत. पण एकटी स्त्री किती काळ मोकळेपणाने फिरेल? अर्थात माझ्या काही पत्रकार मैत्रिणी रात्री अगदी दीड-दोन वाजताही कामासाठी एकटीने प्रवास करतात, हे मला माहीत आहे, अगदी रोज. इतरही अनेक जणी रात्री-बेरात्री प्रवासात असतातच, कोणतीही अप्रिय घटना त्यांच्या बाबतीत घडलेली नाही. काही शहरे आजही सुरक्षित वाटतात स्त्रियांना. तरीही, आपल्या बाबतीत काही होणारच नाही याची खात्री सगळ्यांना असते?
पुरुषांमध्ये स्त्री सुरक्षित नसते किंवा तिला सुरक्षित वाटत नाही, असा सरसकट सर्व स्त्रियांचा अनुभव नसला तरी त्याची घनघोर छाया मात्र तिला वेढून असते. त्यासाठी आजच्या आईिपढीने आणि पुढे आई होणार्या पिढीने समानतेची बिजं आपल्या घरातच रोवायला हवीत. आताच्या मुलींना आपल्या स्वातंत्र्याचा सूर सापडतो आहेच, त्यासाठी स्वत:ला मानसिक, शारीरिकदृष्ट्या कणखर करत, पुढच्या पिढीमध्ये नवी विचार जागवत, आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेत ही ‘सशस्त्र’ होईलच, कारण तिच्यासमोर आदर्श आहे तो महिषासुरमर्दिनी दुर्गेचा. परंतु प्रश्न आहे तो अन्याय करणार्या पुरुषांचा.
त्यांनी तिला साथ दिली तर ‘दुर्गावतार’ घ्यायची वेळच तिच्यावर येणार नाही. तेव्हा आपण असुर व्हायचं की तिच्या सुरात सूर मिळवत पितृसत्तेला लाथाडत आनंदगाणं गायचं हे आता ‘त्या’ पुरुषांच्या हातात आहे.
arati.kadam@expressindia.com
