२५ फेब्रुवारीच्या अंकातील ‘ग्रासरूट फेमिनिझम’ या सदरातील ‘उपजीविकेशी जोडलेलं आत्मभान’ हा शिशिर सावंत यांचा लेख मेंदूला झिणझिण्या आणणारा आहे. एकंदरीतच या सदरातील सर्व लेख बाई काय काय करू शकते, या विषयीचे आहेत. माझ्यासारख्या अनेक स्त्रियांचं आयुष्य खूप संरक्षक चौकटीत गेलंय. परंतु त्याबाहेरचं जग किती भयानक असतं ते या लेखांवरून समजतं आहे. टी.व्ही., सिनेमा यातील सेलिब्रेटींपेक्षा याच स्त्रिया खऱ्या सेलिब्रिटी वाटतात. या सर्व स्त्रियांचं खूप कौतुक. अशा स्त्रियांना शोधून त्यांचा शून्यातून झालेला प्रवास लेखक व ‘चतुरंग’ आमच्यासमोर मांडतात म्हणून त्यांचेही आभार!‘कलावंतांचे आनंद पर्यटन’ हेही सदर वाचनीय आहे. पर्यटन या विषयाला बरेच आयाम आहेत. प्रत्येक जण आपल्याला भावेल तसं पर्यटन करतो आणि आपली मतं मांडतो. एकूणच ही पुरवणी नुसतीच वाचनीय नाही, तर संग्रही ठेवावी अशीच. – अंजली भातखंडे, अलिबाग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुन्या पिढीने बदलावे!
‘आईवडील येती घरा’ (११ मार्च) हा डॉ. अंजली जोशी यांचा ‘वळणिबदू’ सदरातील लेख आजच्या वास्तवावर अचूक बोट ठेवणारा आहे. जुनी व नवी पिढी यांच्या राहणीमानात झालेला बदल हा वळणिबदू नसून, समुद्रासारखा विशाल झाला आहे. जुन्या पिढीनं आपलं उर्वरित आयुष्य आनंदात घालवण्यासाठी आता आपली जुनी दृष्टी बदलून, नव्या पिढीशी आनंदानं समरस होणं, ही काळाची गरज आहे. जुनी पिढी अधिक समजूतदार, जास्त पावसाळे पाहिलेली असल्यामुळे त्यांनीच हा बदल दु:खानं नव्हे, तर आनंदानं स्वीकारल्यास, दोन्ही पिढय़ांत आनंद निर्माण होईल. जुन्या पिढीची मावळती संध्याकाळ सुखात तर जाईलच, पण नव्या पिढीचा उगवता सूर्योदयही तापदायक न ठरता, जीवन प्रफुल्लित करणारा ठरेल. – प्रदीप करमरकर, ठाणे</strong>

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padsad artist pleasure tourism rotations conducted tour tourism amy
First published on: 25-03-2023 at 12:00 IST