scorecardresearch

पडसाद : तसलिमा नासरिन विचारसेनानीच!

मंगला आठलेकर यांचा तसलिमा नासरिन यांच्या पुस्तकावरील लेख (१६ एप्रिल) वाचला. हा लेख वाचकांसमोर आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

मंगला आठलेकर यांचा तसलिमा नासरिन यांच्या पुस्तकावरील लेख (१६ एप्रिल) वाचला. हा लेख वाचकांसमोर आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तसलिमा या एकविसाव्या शतकातील एक विचारसेनानी आहेत यात शंका नाही. समाजातील समस्त स्त्रियांच्या फायद्यासाठी त्या दडपशाहीबद्दल बोलल्या. पुस्तक वाचल्याने आपण राहात असलेल्या समाजाच्या कुरूप चेहऱ्याबद्दल जागरूकता वाढेल यात शंका नाही. मला अधिक त्रास होतो तो म्हणजे ४५ टक्के स्त्रिया/मुली असलेल्या जगात सुरक्षिततेच्या कारणास्तव तसलिमाजी पिंजऱ्यात जीवन जगत आहेत. त्या अधिक सामान्य जीवन का जगू शकत नाहीत? त्या एकटय़ा नाहीत आणि त्या आपल्या कुटुंबाचा भाग आहेत हे त्यांना कळवण्यासाठी या समाजातील स्त्रिया काय करतात? तसलिमांचे सामाजिक जीवन घडवण्याचा एक मुद्दा बनवू शकतात का? माझ्याकडेही उत्तरे तयार नाहीत, पण भविष्यात आणखी अनेक धाडसी तसलिमा उदयास याव्यात यासाठी या धर्तीवर विचार करायला हवा.

– ललित आंबाळकर

‘कामजीवनाला जीवनशैलीचे ग्रहण’ भावला

९ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला ‘कामजीवनाला जीवनशैलीचे ग्रहण’ हा निरंजन मेढेकर यांचा लेख वाचला. लेख वाचायला सुरू केला तो संपल्यावरच थांबले. एकेक ओळ वाचनीय असून आज प्रत्येकाच्या मर्मावर बोट ठेवणारी आहे. मी माझ्या मैत्रिणींना लेख शेअर केला आणि त्यांनी आपल्या पतीलाही पाठवावा असं सांगितलंय. धन्यवाद खूप छान लिहिल्याबद्दल! 

– स्वाती भाटिया

आजच्या जीवनाचं वास्तव

‘कामजीवनाला जीवनशैलीचे ग्रहण’ हा लेख प्रत्येकालाच विचार करण्यास लावणारा आहे. निव्वळ कामजीवन हा लेखाचा विषय न होता आजच्या जीवनाचं वास्तव यात निरंजन मेढेकर यांनी मांडलंय. निसर्गानं मानवाला प्राण्यापासून वेगळं तर केलं, पण आदिम प्रेरणा मात्र कायम ठेवून गेला. त्यामुळे कामप्रेरणा व विवेक याचे मानसिक संतुलन सांभाळणे तारेवरची कसरत होऊन गेली. आपण वाचकांस अंतर्मुख केलेत.

    – रंजन र. इं. जोशी, ठाणे

मृदुला भाटकर यांची शैली आवडली

‘गेले लिहायचे राहून’ हे सदर मी नियमित वाचते. वकील म्हणून आणि न्यायाधीश म्हणून मृदुला भाटकर यांचा अनुभव दांडगा असणार आणि सांगण्यासारखे (व काही वेळा न सांगता येण्यासारखे) बरेच काही असणार हे नक्कीच. अनुभवांव्यतिरिक्त मला त्यांची लिखाणाची शैली आवडली आणि प्रत्येक लेखाला एक आकृतिबंध असतो हे विशेषत: सांगायला हवे.

– संजीवनी चाफेकर

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Padsad loksatta readers response letter ysh

ताज्या बातम्या