नीलिमा किराणे

मैत्री कधीच मोजूनमापून होत नाही. काही वेळा मैत्रीच्या नावाखाली एखाद्याला गृहीत धरणं, वापरून घेणं असे प्रसंग घडू शकतात. ते लक्षात आलं की, मात्र त्या मैत्रीचा डाटा तपासून पाहायला हवा. मैत्रीतलं पालकत्व तर आपण स्वीकारलं नाही ना? ते पाहायला हवं. कसं?

parental challenges, children s independence, generational tensions, family dynamics, emotional support, parent child relationship,
सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
family, old women, attention to old women,
मनातलं कागदावर: दुधातील साखर…
mindset of a rapist, rapist, mindset,
बलात्कारी मानसिकता कशी असते? कशी घडते?
Loksatta chaturang Friends friendship Express implicit relationship
माझी मैत्रीण: व्यक्त-अव्यक्त नातं
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
schizotypal personality disorder in marathi
स्वभाव-विभाव: संदर्भाचा भ्रम
achieving life goals steps to be successful in life
सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता

वेदाला दोन-तीन दिवसांपासून अपूर्वाची खूप आठवण येत होती. मध्यंतरी एका लांबलेल्या आजारपणामुळे आणि नंतरच्या कामाच्या धांदलीमुळे संपर्क झाला नव्हता. आता मात्र तिला अपूर्वाला भेटायलाच हवं असं तीव्रतेनं जाणवलं. तिच्या नवीन संशोधन विषयात वेगळ्याच शक्यता आणि निष्कर्ष हाती येत होते त्याबद्दल बोलायचं होतं, इतर आवांतर गप्पा होत्याच. आज संध्याकाळी फोन करायचाच असं तिनं ठरवलं आणि तेवढ्यात अपूर्वाचाच कॉल आला. ‘‘वेदा, येत्या २२ ते २५ तारखेला मी नाशिकला येतेय. तुलाच भेटायला येतेय समज.’’

‘‘वा. टेलिपथीच म्हणायची ही. अगं, मी तुझाच विचार करत होते आत्ता.’’ वेदा अत्यानंदाने म्हणाली, पण कॅलेंडरकडे नजर जाताच तिचा आनंद ओसरला. ‘‘… अगं, पण नेमकं तेव्हाच आम्ही दोघं हैदराबादला जातोय.’’

‘‘हो का? काही हरकत नाही. मला नाशिकच्या ‘महिला न्यासा’चं काम कव्हर करायचंय. वनिता आणि किशोरही सोबत आहेत. तुझ्या घराची किल्ली ठेवून जाशील का? तुम्ही दोघंही नसाल, तर आम्ही सगळेच तुझ्या घरी राहू. चार दिवसांसाठी ओळखीत कुणाची कार मिळेल का गं? सोयीचं पडतं. किशोर करेल ड्राइव्ह…’’

वेदाला यावर काय बोलायचं ते सुचलंच नाही. ‘‘बघू, सांगते.’’ असं म्हणून तिनं फोन ठेवलाच. ती विलक्षण दुखावली होती. ‘तुलाच भेटायला येतेय.’ असं तिचं म्हणणं, पण प्रत्यक्षात घराची किल्ली आणि गाडीची सोय व्हावी यासाठी कॉल केला होता, हे उमजणं वेदाला झेपत नव्हतं. आपली भेट होणार नाही, याचंही तिला काहीच वाटलं नाही, ना आपल्या तब्येतीची चौकशी केली, ना बाकी काही बोलली. याचा वेदाला अनपेक्षित धक्का बसल्यासारखं झालं होतं.

फ्री-लान्सर म्हणून काम करणाऱ्या अपूर्वाशी तिची काही वर्षांपूर्वी ओळख झाली. दोघींच्या आवडी सारख्या, विचार करायची पद्धत सारखी आणि सिनेमाची आवड यामुळे मैत्री वाढत गेली. पुढे अपूर्वाचे तिच्या नवऱ्याशी मतभेद होऊन ते विभक्त झाले तेव्हा ती दोन महिने वेदाकडेच राहिली होती. वेदाच्याच ओळखीनं अपूर्वाला पुण्यात चांगल्या कंपनीत प्रोजेक्ट मिळाला. तिथेच कायम झाली आणि मग तिनं मागं वळून पाहिलं नव्हतं.

हेही वाचा >>> तुमचं कार्यालयीन ठिकाण सुरक्षित आहे का?

आजच्या संवादानं अस्वस्थ होऊन वेदानं दोघींच्या पहिल्या भेटीपासूनच्या गोष्टी आठवायला सुरुवात केली. पुण्याला नोकरी मिळाल्यानंतर, सहज आठवण आली म्हणून अपूर्वानं कधीच फोन केलेला नाहीये. बहुतेकदा काही ना काही कामासाठीच संपर्क केलाय. कधी कधी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या, पण तिला काही स्पष्टता हवी असायची म्हणून त्या होत्या. आपल्याला त्या चर्चांमधून बौद्धिक आनंद मिळतो, आपल्या विचारांना नवीन दिशा मिळते त्यानेच आपण खूश असतो. तसं म्हटलं तर, ‘अपूर्वाला गरज असते तेव्हाच ती फोन करते की काय?’ असं एक-दोन वेळा मनात येऊनही आपण दुर्लक्ष केलं होतं. हे लक्षात आल्यावर ‘अपूर्वा कधीच वेळ पाळत नाही.’ हे त्यांच्या ग्रुपचं जाहीर मत तिला आठवलं. ‘अपूर्वा कामापुरतं गोड गोड बोलते.’ असं लोक म्हणाले तेव्हा आपण किती तावातावानं तिची बाजू घेऊन भांडलेलो, यांचंही आता तिला नवल वाटलं.

विभक्त झाल्यावर वेदा अपूर्वा सोबत राहात होती तेव्हाचे अनेक प्रसंग वेदाला आठवत गेले. त्यावेळी वेदाचा नवरा टूरवर असल्यानं दोघींना सहजपणे राहता आलं होतं. अपूर्वाला नोकरी / काम नव्हतं तेव्हा कित्येकदा ती न सांगता कुठेही जायची. वेदा ऑफिसमधून दमून आल्यानंतर ती नोकरीच्या शोधात गेली असेल, असं समजून स्वयंपाक करून तिची वाट पाहायची पण ही अनेकदा जेवूनच यायची. एकदा तर रात्री साडेदहापर्यंत वाट पाहून शेवटी वेदानं काळजीनं फोन केला, तर अपूर्वा सिन्नरला तिच्या बहिणीकडे पोहोचून जेवायला बसली होती. वेदा जेवायची थांबलीय याबद्दल कुठलाही अपराधीभाव न वाटता, ‘अगं हो, तुला सांगायला विसरले.’ हे ती इतकं सहजपणे म्हणाली की वेदाचा संताप झाला होता. त्यावेळी अपूर्वा रिकामी बसलेली असतानाही रोजचा स्वयंपाक / घरकाम बहुतेकदा आपल्यावरच पडत होतं. हेही वेदाला आत्ता जाणवलं. हिची बेपर्वाई एवढ्या दिवसांत आपल्या लक्षात कशी आली नाही? कारण ‘सध्या अपूर्वाचं मन थाऱ्यावर नाहीये, विचारांच्या नादात होत असेल.’, अशी स्वत:ची समजूत घालून आपण दुर्लक्ष केलं होतं. तिला मदत करण्याला महत्त्व दिलं होतं, पण अपूर्वाला मतलबाच्या गोष्टी बरोबर समजायच्या हेही तिला आठवलं.

एकेका आठवणीसोबत वेदाची चिडचिड वाढत होती. मैत्री मैत्री करत आपल्याला गृहीत धरलं गेलं, वापरलं गेलं आणि आपण चांगुलपणाच्या नावाखाली बावळटपणे वागलो याचा तिला खूप म्हणजे खूपच त्रास व्हायला लागला. माझी इतकी जवळची मैत्रीण माझ्याशी अशी कशी वागू शकते? खरं तर ही नोकरीसुद्धा माझ्या शिफारशीमुळेच मिळालीय, यांचंही तिला काहीच कसं नाही? ऑफिसचा कबिला घेऊन ही माझ्या घरी राहणार, ऑफिसकडून डीए घेणार, माझी ओळख वापरून फुकटात गाडी मिळवणार, किशोर ड्राइव्ह करणार, मग बाईसाहेब काम करणार. भारी प्लॅनिंग आहे. माणसं इतकी कृतघ्न का असतात? की मला माणसं ओळखता येत नाहीत? आणखी कुणासोबत झालंय माझं असं? ती आठवायला लागली. सलोनी, आणखी एक दोन मित्र-मैत्रिणी, नातलगांसोबत असं झालंय खरं. पण मोजूनमापून वागावं लागलं तर त्याला मैत्री कसं म्हणायचं? याचं आश्चर्य करत असतानाच दरवाजाची बेल वाजली.

‘‘हाय मावशी, कशीयेस? इकडून चालले होते, म्हटलं तू असशील तर पाच मिनिटं भेटून जावं.’’ असं म्हणत तिची लाडाची भाची आसावरी आत आली. लहान असूनही आसावरीच्या विचारांमध्ये असलेली स्पष्टता वेदाला आवडायची. आसावरी अपूर्वालाही ओळखत होती. त्यामुळे आजचा प्रसंग आणि मनात चाललेली तगमग, प्रश्नचक्र तिच्यापाशी मोकळं करून वेदा म्हणाली,

‘‘ही मला इतकी गृहीत कशी धरू शकते गं? माझ्या तब्येतीची साधी चौकशीसुद्धा केली नाही. मी कधीच तिच्यासारखं वागू शकणार नाही. स्वत:ची सोय बघून दुसऱ्याचा फायदा घ्यायचा विचारही माझ्या मनात येत नाही. त्यामुळे मला वापरलं गेल्याची भावना येतेय.’’

मावशीचा स्वभाव आणि अपूर्वाची वृत्ती आसावरीला चांगलीच माहीत होती. ती म्हणाली, ‘‘मावशी, तू एखाद्या व्यक्तीला आपलं मानलंस की, तिच्या समस्या पण तू दत्तक घेऊन टाकतेस. त्या सोडवणं हे मग तुझ्यासाठी आद्या कर्तव्य बनतं. अपूर्वाचं आणि तुझं अनेक गोष्टीत जुळतं. त्यामुळे तुमच्या दोघींचा स्वभाव अगदी सारखा आहे, असं तू नकळत गृहीत धरलं असणार. तुझ्या ‘मनातल्या’ मैत्रिणीपेक्षा प्रत्यक्षातली व्यक्ती वेगळी असू शकते हे तुझ्या लक्षातच आलं नाही. त्यामुळे तिच्याशी वागताना तू तुझ्या कल्पनेतल्या अपूर्वाशी वागत होतीस. शिवाय ती अडचणीत होती त्यामुळे तू तिच्या पालकाच्याच भूमिकेत राहिलीस. त्यामुळे तिनं तुझा फायदा घेणं सहजच झालं. मला वाटतं तुझ्या मनातली मैत्रीची व्याख्या एकदा तपासून पहा.’’ आसावरी म्हणाली.

‘‘असं म्हणतेस? पण तिचं मतलबी वागणं समोर घडत असून मला दिसलं कसं नाही? एवढी काही मी ‘ही’ नाही.’’ वेदाच्या बोलण्याने आसावरीला हसू आलं.

‘‘तू एवढी ‘ही’ नाहीसच, पण ‘परोपकारी मित्र विनू’च्या भूमिकेत घुसली होतीस ना? त्यामुळे ती प्रत्यक्षात कशी वागतेय ते तू पाहिलंच नाहीस. मनात मैत्रीचं अद्वैत आणि डोळ्यावर परोपकाराचा चष्मा असल्यामुळे तुला सगळं त्याच रंगाचं दिसत होतं.’’

‘‘खरंय. हेच होतं माझं प्रत्येक वेळी. पण म्हणजे कोणाला मदतच करायची नाही?’’

‘‘तुझ्यासारखी व्यक्ती एखाद्याची गरज दिसल्यावर, धावून मदत करणारच. न करणं जमणारच नाहीये तुला. पण मदत करणं म्हणजे प्रत्येक वेळी स्वत:ला झोकून देणं नव्हे ना? मदतीचा पहिला भर ओसरल्यानंतर, समोरच्या व्यक्तीचं वागणं प्रेमाचा किंवा रागाचा कुठलाच चष्मा न लावता पाहायचं. त्रयस्थ, तटस्थपणे पाहिलं तर तो डेटा असतो. डेटा कधी फसवत नाही. दुसरं म्हणजे, आपण अशा वेळी असे वागतो, त्यामुळे ती पण तसंच वागेल असं तर नसतंच. कारण तू वेदा असतेस आणि ती अपूर्वा असते.’’

‘‘पण म्हणजे मदत किती, कशी करायची ते कसं ठरेल?’’

‘‘ते समोरच्या माणसावर, त्याच्या गरजेवर आणि हेतूवर पण ठरतं ना गं. जी मदत केल्यावर तुला विसरून जाता येईल आणि अंगावर येणार नाही तेवढी करायला काहीच हरकत नाही. कारण अपूर्वाकडून तर मैत्री आणि बौद्धिक आनंद दोन्ही हवं आहेच तुला. पण त्यापुढची मदत करताना, अपेक्षा करताना डेटा हवा. ’’

‘‘तसं मग आपल्या घरात त्यांनी राहायला काहीच हरकत नाही. पण अपूर्वासाठी कुणाकडे शब्द टाकून जबाबदारी दत्तक घ्यायची नाही. हं, हे सोपं आहे.’’ वेदाच्या मनातला गुंता सुटलाच.

‘‘करेक्ट. डेटा तपासला आणि स्वत:वर अनावश्यक ताण न घेता जबाबदारी घेतली, पालकगिरी थांबवली की सोपंच असतं सगळं.’’ तिरकसपणे आसावरी म्हणाली.

‘‘असं का? मग माझ्याकडचा जुना डेटा सांगतोय, की तुझा मूळ हेतू जाता-जाता इथे थांबून कॉफी पिण्याचा होता. पण ठीक आहे, माझ्या डोक्यातली किरकिर थांबवल्याबद्दल एक कॉफी तो बनती हैं।’’ वेदा म्हणाली तशा दोघी हसत सुटल्या.

neelima.kirane1@gmail com