03 March 2021

News Flash

भक्तीची महायात्रा

दर पंधरा दिवसांनी एकदा एकेका अमराठी संताविषयी लिहिणं झालं.

द्रष्टा आणि लढाऊ संत

भक्तिसंप्रदायांचा इतिहास हा सर्व काळ, सर्व प्रांतांत प्रेमानं आणि शांतीनं भरलेला इतिहास नाही

उत्कट संवेदनशील संतकवी

भीमा भोईचा पिंड वेगळा होता. पंथीय कर्मकांड आणि तांत्रिक उपचार यात त्याला रस नव्हता.

ज्ञानदाता गुरू

एषुत्तेच्छन गुरुपदी शोभणारा संत आहे. एषुत्तेच्छन या नावाचा अर्थच मुळी ज्ञानदाता गुरू असा आहे.

जनसामान्यांचा भक्तकवी

कनकदास विद्वान दार्शनिक व्यासरायांचा शिष्य होता. त्यानं पदरचनेप्रमाणेच ग्रंथरचनाही केली आहे.

निर्माता ‘तिरु’कुरलचा

तिरुवल्लुवर’ हे बिरूद सार्थ वाटतं, त्याची ‘कुरल’ ही अद्वितीय कृती तमिळ वाङ्मयात वेदांची प्रतिष्ठा पावली आहे.

निर्गुणी संत

करुणा हा मलूकदासांच्या सगळ्या चिंतनाचा, उपदेशाचा आणि कार्याचाही गाभा राहिला आहे.

सर्वश्रेष्ठ भक्तिमार्ग

शंकरदेव यांनी भक्तीचं मोठं रसाळ विवेचन केलं आहे. त्यांच्या संकलित कीर्तनांमधून त्यांनी पुन:पुन्हा भक्तीचं मोठेपण सांगितलं आहे.

मानवतेचा मधुर झरा

संत दादू दयाल यांचा विश्वास आहे लोभमुक्तीवर, अहंकाराच्या त्यागावर आणि सदाचरणावर. केवळ खाणं-पिणं आणि झोपणं यातच आयुष्य घालवणं म्हणजे आयुष्याचं सार्थक नव्हे,

थोर प्रतिभेचा संतकवी

उपहास, विनोद आणि व्याजोक्ती ही वेमनाच्या काव्याची वैशिष्टय़ं आहेत आणि मार्मिक प्रश्न विचारण्याची त्याची शैलीही खास त्याची अशी आहे. कधी कडवट, कधी आक्रमक, कधी उग्र धारदार, तर कधी सूक्ष्मपणे...

प्रेमभक्तीचा सागर

सूरदासांचं जीवन म्हणजे प्रेमभक्तीनं उचंबळणारा एक सागरच बनला. एकीकडे भगवंत निर्गुण, निराकार आहे आणि तोच आपल्या सच्चिदानंद रूपात आविष्कृत होताना नित्यवृंदावनात गोप-गोपींसह नाना प्रकारच्या लीला रचतो आहे, असा त्यांचा

कणकण गेला उजळुन..

सहजोबाई ही संत चरणदासांची भाची आणि शिष्या. १७८२ मध्ये चरणदासांचा देह पंचत्वात विलीन झाल्यानंतर जवळजवळ २३ र्वष सहजोबाईनं संप्रदायाची गादी सांभाळली. आजही दिल्लीत तिच्या नावानं गादी आहेच. चरणदासी संप्रदायाच्या

शाश्वत जीवनमूल्यांची ओंजळ

शासन आणि प्रजाजन यांचे आदर्श तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’मध्ये फार तन्मयतेने रंगवले. भक्ती हे लोकमंगलाचे एक समर्थ साधन कसे होऊ शकते याचा वस्तुपाठ त्यांनी निर्माण केला.

भगवद्भक्ताचं जग

पुरंदरदासानं भक्तीच्या प्रांतातल्या ढोंगांवर, विसंगतीवर नेमकी टीका केली आहे. सोवळय़ाचं अवडंबर माजवणाऱ्यांना फटकारताना त्यानं म्हटलं आहे, की तुमचा देह जर अस्थी, मांस, कातडं यांनी बनलेला आहे तर तुमचं सोवळं

आलमदारे-कश्मीर

अनेक मधुर प्रार्थना अंत:स्फूर्तीने गाणारे हजरत शेख नुरुद्दीन वली केवळ संतच नव्हते तर काश्मीरचे लोककवी ठरले. हिंदूंनी ‘सहजानंद’ म्हटलं.

‘तेरा साहब है घर माँ ही’

कबीर सगळ्या जगण्यातली व्यर्थता सांगतो. म्हणतो, मी तीर्थामध्ये स्नान करून पाहिलं, मी मूर्तीची पूजा करून पाहिलं, पण सगळाच पोकळ कारभार.

राधा-कृष्णाचं चैतन्यमय स्मरण

चैतन्यांचं तत्त्वज्ञान भक्तीच्या गाढतेनं भरलं- भारलेलं आहे. त्यांचा कृष्णवेध पूर्ण समर्पण मागणारा आहे. स्वत:ला विसरा आणि कृष्णरंगात रंगून जा. हृदय शुद्ध करा, त्यात भक्तीचा उदय होऊ द्या- इतकं साधं

अर्धजन

सोळाव्या शतकातल्या प्रमुख उडिया स्त्री-संतांपैकी माधवी दासी ही सर्वात पहिली संत कवयित्री. चैतन्य परंपरेत तिचा उल्लेख आढळतो खरा; पण तो तिचा संपूर्ण माणूस म्हणून स्वीकार न करणारा आहे. श्री

परिवर्तनाचा आग्रह

एका बाजूला धर्ममान्य, पण अन्याय्य आणि शोषण अशा परंपरेतल्या अनेक गोष्टींना नकार देत बसवेश्वरांनी नऊशे वर्षांपूर्वी वीरशैव तत्त्वज्ञानातून क्रांतिकारक परिवर्तनाचा आग्रह धरला, परंतु त्यांची वाट रक्तरंजितच राहिली आणि आजही

रंगनायकी

आंदाळ ही बारा प्रसिद्ध आळवार संतांमधली एकमेव स्त्री-संत. आंदाळ या शब्दाचा अर्थ आहे, देवावर सत्ता गाजवणारी, देवाची प्रियतमा.

नानक वाणी, अमृतवाणी!

नुसत्या तीर्थयात्रा, नुसते उपवास आणि नुसता ठरावीक दानधर्म करून ईश्वराचं प्रेम पुरेसं मिळत नाही, पण वाचनानं, श्रवणानं, चिंतनानं आणि हृदयातल्या गाढ भक्तीनं त्याची कृपा भरभरून मिळू शकते,

वनवासिनी

देहाच्या जाणिवेचा त्याग करून सर्वामध्ये वस्त्रहीन हिंडणं-वावरणं हे धाडसच होतं. महादेवीचं हे दुर्मीळ धाडस भारतीय स्त्रीवादाच्या इतिहासात महत्त्वाचं आहे.

एकतेचे उद्गाते

समतेची स्पष्ट ग्वाही देत असताना, रैदास वा रोहिदासांनी कर्मशुद्धीचा आग्रह धरला. विशिष्ट जातीत जन्माला आल्यानं कोणी नीच होत नाही. माणसाला नीच करणारं असतं ते फक्त त्याचं स्वत:चं वाईट कर्म!

भटकी विरागिनी

नवव्या-दहाव्या शतकापासून साऱ्या भारतभर विविध भक्तिसंप्रदायाचा उदय झाला. वेगवेगळ्या धर्ममतांच्या गलबल्यातून सामान्य माणसाला सहज साध्या भक्तिमार्गाकडे वळवण्याचं आणि कर्मकांडापलीकडचं सुलभ,

Just Now!
X