गैरज्ञान

एकदा मोहनला एसटी स्टॅण्डवर लैंगिकतेविषयीचं एक पुस्तक मिळालं. आधुनिक वैद्यकशास्त्राचा गंधही नसलेल्या एका अवैद्यकीय व्यक्तीने लिहिलेलं होतं, जेवढं वीर्य गमवाल तेवढे मृत्यूला जवळ कराल. ‘वीर्यनाश हा मृत्यू’.

एकदा मोहनला एसटी स्टॅण्डवर लैंगिकतेविषयीचं एक पुस्तक मिळालं. आधुनिक वैद्यकशास्त्राचा गंधही नसलेल्या एका अवैद्यकीय व्यक्तीने लिहिलेलं होतं, जेवढं वीर्य गमवाल तेवढे मृत्यूला जवळ कराल. ‘वीर्यनाश हा मृत्यू’. झालं. आधीच काळजीच्या आगीत जळत असलेला मोहन चिंतेच्या वणव्यात सापडला. आत्मविश्वास संपला. सरभर मनामुळे एकलकोंडा होऊन स्वत:ला घरातच कोंडून घेऊ लागला. घरच्यांना कळेना, हाताशी आलेला एकुलता एक पोरगा असा का वागतोय..
माझ्यासमोर बसलेला तो तरुण जेमतेम पंचविशीत होता. चेहऱ्यावरती ताण दिसत होता. झोप व्यवस्थित येत नसणार हे कळत होते. त्याच्याकडील पिशवी बघून तो कुठून तरी गावावरून आलेला दिसत होता. त्याला जरा शांत होऊ दिल्यावर त्याने परिचय सांगितला. मोहन हा सोलापूरजवळच्या एका गावातून आलेला होता. हळूहळू त्याची कहाणी मला तो सांगू लागला. वयात आल्यापासूनच त्याची मन:स्थिती गोंधळलेली झाली होती. वयानुरूप होणाऱ्या आकर्षणांमुळे वाढणारी बेचनी, अभ्यासावर होणारा त्याचा विपरीत परिणाम आणि त्यासाठी काय करावं हे न कळल्याने मुळात हुशार असणारा मोहन हा अभ्यासातच नव्हे तर इतरही एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिविटीमध्ये मागे पडू लागला. जेमतेम काठावर पास होत पुढे पुढे जात होता. गॅ्रज्युएटही झाला, पण न्यूनगंडांनी पछाडला होता. त्यातून स्वकामपूर्तीसाठी लागलेली हस्तमथुनाची सवय काही केल्या सुटत नव्हती. यामुळे काळजीनेही त्याची मानसिकता ही ढेपाळलेली होती.
त्यातच त्याला एकदा एसटी स्टॅण्डवर लैंगिकतेविषयीचं पुस्तक मिळालं. ते आधुनिक वैद्यकशास्त्राचा गंधही नसलेल्या एका अवैद्यकीय व्यक्तीने लिहिलेलं होतं. त्यातील माहिती वाचून तर तो सुन्नच झाला. त्याला आता काय करावं हेच कळेना. त्यात तर चक्कलिहिलं होतं की जेवढं वीर्य गमवाल तेवढं मृत्यूला जवळ कराल. ‘वीर्यनाश हा मृत्यू.’ झालं. आधीच काळजीच्या आगीत जळत असलेला मोहन चिंतेच्या वणव्यात सापडला. आत्मविश्वास खलास झाला. सरभर मनामुळे एकलकोंडा होऊन स्वत:ला घरातच कोंडून घेऊ लागला. घरच्यांना काळजी वाटू लागली. हाताशी आलेला एकुलता एक पोरगा असा का वागतोय हेच त्यांना कळेना. वेगवेगळे डॉक्टर केले, भरपूर औषधं केली पण मोहन आपला चिंताग्रस्त एकांतवासी. घरचे समजुतीने घेत होते. थोरामोठय़ांनी सल्ला दिला, ‘लग्न करा, सुधारेल.’
घरचे मोहनसाठी मुली पाहू लागले. मोहनचं धाबं दणाणलं. त्याला आता मात्र काय करावं सुचेना. त्याला जीवन जगणं असहय़ वाटून त्याने निश्चय केला की झालं एवढं बस्स. आता जगण्यात अर्थ नाही. सर्वकाही संपवावं. आपल्या आजवर झालेल्या वीर्यनाशामुळे नाहीतरी आपला मृत्यू जवळ आलेलाच आहे. तर पुढे अजून आपले िधडवडे उडण्यापेक्षा आताच आयुष्याला फुलस्टॉप द्यावा. तशी वाटचालही मोहन करणार तेवढय़ात माझं ‘वैद्यकीय कामशास्त्र’ हे पुस्तक त्याला मिळालं आणि आशेचा ‘शेवटचा किरण’ म्हणून माझा सल्ला घेण्यासाठी एवढे कष्ट घेत पुण्याला आला.
सेक्सवरील अशास्त्रीय पुस्तकं वाचून संमोहित होऊन स्वत:चा विनाश करायला उद्युक्त झालेले असे अनेक ‘मोहन’ आत्तापर्यंत माझ्याकडे आले. किंबहुना आम्हा सेक्सॉलॉजिस्टच्या प्रॅक्टिसमध्ये अविवाहित तरुणांच्या जवळजवळ दहापकी पाच केसेस तरी याचसंबंधित असतात आणि हे बहुतेक जण अपराधी भावना व न्यूनगंडांनी पोखरून गेलेले असतात. याच्यासाठी जी गरज आहे ती वैद्यकीय कामशास्त्राची. असं शिक्षण वयात येताना व आल्यानंतर तसंच लग्नाळू तरुण-तरुणींना दिलं तर संसारातील वादळंही पुष्कळ कमी होतीलच परंतु समाजव्यवस्थाही सध्याच्या घटस्फोटांसारख्या सामाजिक दुर्घटनांमुळे विस्कळीत होण्यापासून वाचेल.
याला काही प्रमाणात आधुनिक वैद्यक व्यावसायिकही कारणीभूत आहेत. सेक्ससारखा विषय गंभीरपणे तसंच संवेदनशीलपणे हाताळणं व त्यासाठी स्वत:च्या प्रॅक्टिसमध्ये वेळ काढून वेळ देणं हे जर ते करायला लागले तर बहुतांशी तरुणवर्गात लैंगिक सुशिक्षितपणा व आत्मविश्वास येईल. त्यासाठी डॉक्टरांनीसुद्धा सेक्सॉलॉजीचा, वैद्यकीय कामशास्त्राचा अभ्यास योग्य त्या तज्ज्ञांकडूनच करणे इष्ट राहील. औषध-कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून नव्हे. सेक्सवरील अशास्त्रीय पुस्तकं वाचण्याचं प्रमाणही त्यामुळे कमी होत जाईल.
स्वाती तिच्या नवऱ्याला, प्रकाशला घेऊन माझ्याकडे आली होती. प्रकाश हा त्रेचाळीस वर्षांचा एका एमएनसीमध्ये मोठय़ा हुद्दय़ावर होता. त्याची समस्या ही जरा वेगळी होती. त्याने एक गुरू केला होता आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे काही कर्मकांडांमध्ये तो आपला संध्याकाळचा वेळ घालवू लागला. कामावरून आल्यानंतर चार तास तरी त्यात जात होते. कामपुरुषार्थापासून तो दूर राहू लागला. गेले कित्येक महिने असेच चालले होते. स्वातीने जोर केला तर दोन-तीन महिन्यांतून एखाद्या वेळी तो जवळीक करायचा. नाइलाजाने. कारण त्याच्या गुरूने त्याला ‘वीर्यनाशावर ताबा’ ठेवायला सांगितलं होतं. स्वाती वैतागून गेली होती.
मोहनची केस काय किंवा प्रकाशची केस काय, दोघांनाही अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशात आणणं हेच आवश्यक होतं. मोहनच्या लैंगिकतेचं अज्ञान दूर करण्यासाठी मला स्वत:ला संयमाने घ्यावं लागलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे येणारा अडथळा हा ‘अज्ञान’ नसून ‘गरज्ञान’ हा होता. गरज्ञानातून व्यक्तीला घाबरून टाकणाऱ्या मनोधारणा समाजात मुळं घट्ट रोवून शेकडो वषर्र् टिकून राहत असतात.
आम्हा सेक्सॉलॉजिस्टसमोर  संबंधित व्यक्तीचं अज्ञान कसं दूर करायचं ही समस्या नसून त्याला ठामपणे वाटणारं ज्ञान किती अशास्त्रीय व गर आहे हे कसं समजावून द्यायचं ही असते. कारण असं गरज्ञान ठामपणे त्यांच्या मनात घर करून राहिलेलं असतं व ते काढणं ‘मुश्कील ही नहीं नामुमकीन’ असतं. म्हणून आम्हाला संयम बाळगून व कलात्मकतेने लैंगिकता शिकवणं आवश्यक असतं.
खरं म्हणजे ‘सेक्स’ हा ज्यांच्या आवडीचा, विवंचनेचा वा कुतूहलाचा विषय आहे, केवळ त्यांच्यासाठीच ‘वैद्यकीय कामशास्त्र’ आहे असं नसून, सेक्स हा जीवनाचा अविभाज्य व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असं मानून त्याच्या ज्ञानाने जे आपला आनंद, आपल्या नात्यातील स्थर्य व तन-मनाचे स्वास्थ्य वाढवण्यास उत्सुक असतात, त्यांच्याहीसाठी ते असतं.      
मोहनला पहिल्यांदा त्याचं मन मोकळे करू दिल्याने त्याच्या मनावरचं ओझे उतरून तो जरा रिलॅक्स झाला. हळूहळू गाडी मूळ मुद्दय़ावर आणून मी जवळजवळ पाऊण तास त्याला सचित्र लेक्चरच दिलं. मानवी शरीरशास्त्राच्या स्लाइड दाखवून त्याला पुरुषाचा सेक्शुअल रिस्पॉन्स कसा तयार होत असतो हे समजावून दिलं. हस्तमथुनाचे कुठलेही तोटे नसतात, त्यामुळे कुठलीही लैंगिक दुर्बलता किंवा वैगुण्य येत नसतं. उलट ते ‘सेक्स फिटनेस’साठी कसं उपयुक्त असतं वगरे वगरे पुन:पुन्हा समजावून दिलं. पण मोहनने लक्षपूर्वक ते ऐकून नंतर स्वत:विषयीचा न्यूनगंड काढून टाकला.
प्रकाशला हीच गोष्ट जरा जास्त वेळ देऊन सांगावी लागली, कारण त्याच्यावरच्या गृहस्थाश्रमी जबाबदारीची जाणीव त्याला करून देणंही आवश्यक होतं. ही जबाबदारी झिडकारण्याच्या कोणाच्याही सल्ल्याने त्याच्या जोडीदारावरही तो अन्याय असतो, हे त्याला सर्वप्रथम जाणवून दिलं आणि मग ‘वीर्यनाशावर ताबा’ या अशास्त्रीय कल्पनेला तडा देण्यासाठी सविस्तर वैद्यकीय माहिती स्लाइडसह दिली.
मुळात पुरुषाचा लैंगिक प्रतिसाद हा तो वयात येताना म्हणजे सर्वसाधारणपणे तेरा-चौदा वर्षांपासून विकसित होत असतो व तो सतराव्या-अठराव्या वर्षांपर्यंत पूर्णपणे विकसित होत जातो. सुरुवातीला लैंगिक ताठरता येणं व नंतर वीर्यपतन होणं असे विकासाचे टप्पे असतात. पुरुषाच्या िलगाची ताठरता ही िलगात ज्या तीन नळय़ा असतात त्यामध्ये पसरणाऱ्या रक्तामुळे येत असते. त्याचा वीर्याशी कुठलाही संबंध नसतो. वीर्य हा एक साधा जैविक द्राव आहे.
जसे डोळय़ांत अश्रू, तोंडात लाळ व शरीरात लघवी तयार होत असते तसंच हा लघवीच्या पिशवीच्या उजव्या व डाव्या बाजूंना असणाऱ्या वीर्यपिशव्यांमध्ये तयार होत असतो. फरक एवढाच की वीर्य सोडून इतर सर्व जैविक द्राव हे जन्मापासूनच तयार होत असतात. पण वीर्य हा एकमेव असा द्राव आहे की जो पुरुष वयात आल्यानंतरच तयार होत असतो.
पुरुषाच्या वृषणांमध्ये जे पुरुषबीज, शुक्राणू (स्पर्म) वयात आल्यापासून तयार होऊन वीर्यपिशव्यांच्या तोंडापाशी येऊन जमत असतात त्यांना शरीराबाहेर टाकण्यासाठीच निसर्गाने वीर्य तयार केलं आहे. म्हणजेच वीर्य केवळ एक शुक्राणूवाहक द्राव आहे. वीर्यपिशव्यातून तो प्रोस्टेट ग्रंथीत उतरल्यावर त्यात प्रोस्टेट ग्रंथीचा स्रावही मिसळतो व शुक्राणू, वीर्यपिशव्यातील द्राव व प्रोस्टेट ग्रंथीचा स्राव या सर्वाचे मिश्रण स्खलनाच्या वेळी पुरुषाच्या लघवीच्या मार्गातून शरीराबाहेर टाकले जाते. यालाच आपण ‘वीर्य’ (सीमेन) म्हणतो.
निसर्गाने वीर्य शरीराबाहेर जाण्यासाठीच निर्माण केलं आहे, शरीरात ठेवून देण्यासाठी नाही, हेही महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. प्रोस्टेट ग्रंथीचा स्राव हा वीर्याला पातळ करण्यासाठी असतो. त्याचमुळे शुक्राणू हे हालचाल व्यवस्थित करत गर्भाशयनलिकांमध्ये पोचतात व गर्भधारणा सुलभ होत असते. म्हणजे वीर्याचा पातळपणा हा ‘दोष’ नसून गर्भधारणेसाठीची उपयुक्तता असते.
वीर्य सतत तयार होत असतं व ते ‘मरेपर्यंत’ तयार होत राहतं. परंतु तारुण्याच्या काळात त्याचं असणारं प्रमाण चाळिशीनंतर मात्र त्या पुरुषाच्या कामजीवनाच्या नियमितपणावर अवलंबून असतं. चाळिशीनंतर जेवढं कामजीवन नियमित तेवढं वीर्यप्रमाणही व्यवस्थित राहतं. सर्वसाधारणपणे अर्धा ते एक चमचा (दोन ते पाच मिलिलीटर) एवढंच वीर्य स्खलनाच्या वेळी बाहेर पडतं.
वीर्य बाहेर टाकण्याची क्रिया ही लैंगिक स्नायूंच्या (पीसी स्नायू) आकुंचनांनी घडत असते. ती काही क्षणात अत्यंत तीव्रतेने अमलात येत असते. ०.८ सेकंदाला एक इतक्या तीव्रतेने. ही क्रिया वीर्याचा एक थेंब जरी प्रोस्टेटमध्ये उतरला तर लगेच सुरू होते. ती मनाच्या नियंत्रणाखाली नसते. हा पीसी स्नायूंचा तीव्र व्यायाम असतो. त्यात जवळजवळ शंभर ते दीडशे कॅलरीज खर्ची पडतात. (ट्रेड मिलवर १५ मिनिटं जलद चालण्याचा व्यायाम करताना साधारणत: सत्तर ते ऐंशी एवढय़ाच कॅलरीज नष्ट होत असतात.)
पार्टनर-सेक्सपेक्षा सेल्फ-सेक्समध्ये म्हणजेच हस्तमथुनामध्ये जरा कमी कॅलरीज खर्च होतात एवढेच. पण मुळात वीर्यपतन हा पीसी स्नायूंचा व्यायाम असल्याने ते स्नायू तर थकतातच पण पार्टनर-सेक्समध्ये संपूर्ण शरीराचाच तो व्यायाम असल्याने थकवा जरा जास्तच जाणवतो. पण ती ‘कमजोरी’ (वीकनेस) नसते हे ध्यानात ठेवलं पाहिजे. उलट सेक्सचे पीसी स्नायू अशा प्रत्येक व्यायामानंतर बळकटच होत असतात.
परंतु ‘सेक्स’च्या या व्यायामानंतरच्या थकव्याला अज्ञानामुळे कमजोरीशी जोडल्यामुळे सर्वसामान्यांची घाबरगुंडी उडाली तर आश्चर्य ते काय? लघवी शरीराच्या बाहेर टाकण्यासाठीच असते, हे प्रत्येकाने गृहीतच धरलेलं असतं, कारण तसा अनुभव जन्मापासूनच येत असतो. परंतु वीर्य हे शरीराबाहेर जाण्यासाठीच असतं, हे नसíगक तत्त्व (असा अनुभव जन्मापासून नव्हे तर वयात आल्यानंतरच येत असल्यामुळे) न कळल्याने तरुणांच्या मनात न्यूनगंड तयार होतात.
जसं लघवीनंतर कुणाच्याही मनात ‘अरेरे, मूत्रनाश झाला’ असा विचार येऊन ती व्यक्ती अस्वस्थ होत नाही तसंच वीर्याच्या बाबतीत मानलं पाहिजे. कारण वीर्यही लघवीप्रमाणेच शरीराच्या बाहेर टाकण्यासाठीच असतं. म्हणून ‘अरेरे, वीर्यनाश झाला’ असं म्हणून डोकंआपटून स्वत:ला दोष देणं हे सर्वथा चुकीचंच नव्हे तर लैंगिक गरज्ञानाची परिसीमाच आहे. शिवाय वीर्य बाहेर पडल्याने मृत्यू तर येत नाहीच, उलट एक जीवच जन्माला येऊ शकतो. आणि हे त्रिकालाबाधित निसर्गसत्य नजरेआड करणं म्हणजेच स्वत:चीच प्रतारणा करण्यासारखं नाही का?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कामस्वास्थ्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sexual misconceptions

ताज्या बातम्या