सर्वसाधारणपणे सगळ्यांचाच आपला वाढदिवस हा आवडीचा दिवस असतो. आपण कितीही मोठे झालो तरी वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला उत्साही वाटत असतं आणि जर त्या दिवशी आपल्याला कोणी शुभेच्छा दिल्या नाहीत तर आपलाही हिरमोड होतो. मग अशा या विशेष दिवसाचं आपल्या वर्गातही विशेष सेलिब्रेशनकरायलाच हवं असं वाटत होतं. आणि त्यातूनच जन्म झाला वाढदिवस वर्गया संकल्पनेचा.

एक दिवस असा येतो, सारे लाड पुरवून जातो

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

आई म्हणते ऊठ राजू, आणि देते खारिक, काजू

बाबाही जवळ घेतात, खूप खूप लाड करतात,

आजी-आजोबा घरी येतात,

मामा-मावशी पण येतात,

भरपूर भरपूर खेळणी आणतात,

भरपूर भरपूर खाऊ आणतात,

सांगा बरं हा कोणता दिवस, हा तर माझा वाढदिवस

वर्गात सगळे जण तालासुरात मयूरेशसाठी गाणं म्हणत होती. मयूरेश खास त्याच्यासाठी ठेवलेल्या स्टुलावर खुशीत बसला होता. गालातल्या गालात छान हसत हसत आपल्यासाठी गाणं म्हणणाऱ्या मित्र-मैत्रिणींवरून नजर फिरवत होता. तो आज पाच वर्षांचा झाला होता. त्याच्यासाठी आम्ही बरोबर पाच टाळ्या वाजवल्या. नंतर तो ज्या स्टुलावर बसला होता त्यावरून त्याने पाच उडय़ा मारल्या आणि आम्ही सगळ्यांनी त्या मोजल्या. वर्गात कागदावर पाच असा आकडा मोठ्ठा काढला होता. ज्याला छान डोळे आणि अच्छा करणारे हात काढले होते. त्याच्यावर त्यानंतर मयूरेशचं नाव वाजतगाजत (खंजिरी आणि ताटल्या-चमचे वाजवत) लिहिलं गेलं. तो किती वर्षांचा झाला हे परत एकदा सगळ्यांनी एक, दोन, तीन, चार, पाच असं तालासुरात म्हणून प्रत्येकाच्या मनात पक्कं केलं. मयूरेशला परत स्टुलावर बसवून खास मराठमोळ्या पद्धतीनं वाढदिवसानिमित्त मी त्याला ओवाळलं. त्याला एक ग्रीटिंग कार्ड शाळेकडून भेट म्हणून दिलं आणि साखरफुटाणे खायला दिले. त्याच्या मित्रांनी स्वत: तयार केलेली भेटकरड त्याला दिली. शाळेत वाढदिवस साजरा करण्याचा सोहळा आमच्या वर्गात चालू होता.

वाढदिवस. आपला जन्मदिवस. आपण या जगात आलो तो दिवस. मुलांच्या दृष्टीने तर अत्यंत महत्त्वाचा दिवस. कारण त्यांना माहीत असतं या दिवशी आपले विशेष लाड पुरवले जातात. खास वाढदिवसाचे म्हणून नवीन कपडे खरेदी केले जातात. ते त्या दिवशी घालायला मिळतात. सकाळपासून आपली विशेष बडदास्त ठेवली जाते. घरातले सगळे आपल्याला भाव देत असतात. ‘आज काय बाबा, वाढदिवस आहे,’ असं कौतुकानं म्हटलं जातं. घरी मित्र-मैत्रिणींना बोलावलं जातं. आपल्यासाठी खास केक आणला जातो. घरी आपल्या आवडीचे छान छान पदार्थ केले जातात. शाळेच्या डब्यातही रोजच्या पोळी-भाजीऐवजी आवडीचा खाऊ  मिळतो. शिवाय वर्गात आपल्यासाठी सोहळा साजरा होतो. सगळ्या वर्गाकडून विशेष म्हणजे बाईंकडून शुभेच्छा मिळतात. मामा-मामी, आजी-आजोबा, मावशी खास आपल्यासाठी घरी येतात. येताना खाऊ आणि खेळणी आणतात. किती छान वाटत असतं त्यांना त्या दिवशी. किंबहुना वाढदिवस हा शब्दच सगळ्याच लहान मुलांसाठी किती आवडीचा आणि महत्त्वाचा असतो. वर्गात रोज कोणी ना कोणी आपल्या कोणाचा ना कोणाचा वाढदिवस आहे किंवा होता हे सांगतच सांगतं. ‘‘बाई, उद्या ना आमच्या आईचा वाढदिवस आहे. तुम्ही याल का घरी?’’ किंवा ‘‘बाई, आमच्या बाबांचा वाढदिवस होता. आम्ही मजा केली.’’ असा दादा, ताई, माई कोणाचा तरी वाढदिवस झालेला तरी असतो नाही तर होणार तरी असतो. त्यांचा स्वत:चा वाढदिवस जवळ आलेला असेल, तर मग विचारूच नका. रोज काऊंटडाऊन चाललेला असतो. मोठय़ा शिशूमध्ये हे जास्त प्रमाणात आढळतं. खरं सांगायचं झालं तर सर्वसाधारणपणे आपल्या सगळ्यांचाच आपला वाढदिवस हा आवडीचा दिवस असतो. आपण कितीही मोठे झालो तरी वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला उत्साही वाटत असतं आणि जर त्या दिवशी आपल्याला कोणी शुभेच्छा दिल्या नाहीत तर आपलाही हिरमोड होतो. मग अशा या विशेष दिवसाचं आपल्या वर्गातही विशेष ‘सेलिब्रेशन’ करायलाच हवं असं वाटत होतं.

या वयोगटातील मुलांचे वर्ग बहुतेक त्याच्या जन्मतारखेनुसारच पडतात. म्हणजे आमच्या शाळेत आम्ही जानेवारी ते डिसेंबर महिन्यांचे जानेवारी-फेब्रुवारी-मार्च, एप्रिल-मे-जून, जून-जुलै-ऑगस्ट, सप्टेंबर-ऑक्टोबर, नोव्हेंबर-डिसेंबर असे गट करून त्या त्या महिन्यांतील मुलांचा एक वर्ग करतो. त्यामुळे एखाद्या वर्गात वाढदिवस सुरू झाले की चांगले तीन महिने कोणाचा ना कोणाचा वाढदिवस असतोच असतो. म्हणजेच तो वर्ग पुढचे तीन महिने ‘वाढदिवस वर्ग’ असतो. त्यामुळे ‘वाढदिवस’ जसा सर्वसामान्य दिवसांपेक्षा वेगळा उठून दिसतो, तसा हा ‘वाढदिवस वर्ग’ बाकीच्या वर्गामध्ये उठून दिसायला हवा असा विचार मनात आला. मुलांना त्या तीन महिन्यांत सतत जाणीव व्हायला हवी की, आपल्या वर्गातील आपले सगळ्यांचेच आता वाढदिवस सुरू झालेत. वर्गात त्यांना त्यासाठी वाढदिवसाची सजावट रोज दिसायला हवी. ‘वर्गात आमचे सगळ्यांचे वाढदिवस चालू आहेत आणि ते साजरे होत आहेत,’ असं त्यांनी उत्साहाने सगळ्यांना सांगायला हवं. तसंच ते सगळे किती वर्षांचे होत आहेत हेही त्यांना कळायला हवं. मग या सगळ्यासाठी मला तशी वर्गात वातावरणनिर्मिती करणं आवश्यक होतं. आपल्या घरी जशी वाढदिवसाच्या दिवशी सजावट करतो तशी सजावट वर्गात वाढदिवस सुरू होण्यापूर्वी करणं आवश्यक होतं. तसंच चांगले तीन महिने ते वातावरण व सजावट राहील याची खबरदारी घ्यायला हवी होती. तरच तो खरा ‘वाढदिवस वर्ग’ म्हणून त्यांना व इतरांना जाणवणार होता.

त्यासाठी दरवर्षी माझा जो वर्ग असेल त्यांचे वाढदिवस सुरू होण्याआधी एक-दोन आठवडे ‘वाढदिवस’ या विषयावर आमच्या जाणीवपूर्वक गप्पा सुरू होतात. वर्गात मला वर्षांच्या सुरुवातीला एक चार्ट करण्याची सवय होती. त्यावर शाळेचे नाव, आमच्या वर्गाचे नाव, माझे म्हणजे त्यांच्या बाईंचे नाव, माझा फोटो, माझा वाढदिवस, वर्गातील मुलांचे वर्गातील क्रमांक, त्यांची नावे, त्यांचा फोटो, त्यांचा वाढदिवस अशी माहिती असे. त्या चार्टचा उपयोग मला ‘वाढदिवस वर्ग’ ही संकल्पना मुलांना समजावयाला (पहिल्या वर्षी अचानक) खूप झाला आणि नंतर होत होता. आपला वर्ग आता पुढच्या आठवडय़ापासून ‘वाढदिवस वर्ग’ होणार आहे असं सांगितल्यावर एकदम मुलांच्या लक्षात येत नसे. मला आठवतंय एके वर्षी एका मुलाने ‘‘बाई, वाढदिवस हा दिवस असतो, वर्ग नाही.’’ अशी माझी (गैर)समजूत काढली होती. त्याचं अगदी बरोबर होतं. वाढदिवस हा ‘दिवस’ असतो, तो ‘वर्ग’ कसा असेल, नाही का? त्यामुळे आधी ‘वाढदिवस वर्ग’ म्हणजे काय हे त्यांना सांगताना मी आमचा चार्ट घेत असे. त्यात पहिला ज्याचा वाढदिवस असेल तो सांगत असे. म्हणजे तो किंवा ती आपल्या वर्गात सगळ्यात मोठा किंवा मोठी आहे आणि तो वाढदिवस वर्गात पहिला साजरा होणार आहे. मग असं करत करत चार्टवरून प्रत्येकाचे वाढदिवस कधी आहेत आणि शेवटचा वाढदिवस कधी असणार आहे हे सांगत असे. म्हणजे पहिला वाढदिवस ज्या दिवशी असेल ती तारीख सांगून त्या तारखेपासून, शेवटच्या वाढदिवसाच्या तारखेपर्यंत आपल्या वर्गात वाढदिवसच वाढदिवस आहेत, हे सांगताच त्यांचे डोळे चमकत असत. म्हणजे आता वर्गात भरपूऽऽऽर वाढदिवस असा एकदम साक्षात्कार त्यांना होत असे. म्हणून आपला वर्ग हा ‘वाढदिवस वर्ग’. त्यांच्या मनात ही संकल्पना चांगली चार-पाच वेळा ठसवावी लागत असे. त्यानंतर मात्र आपला वर्ग ‘वाढदिवस वर्ग’ आहे. सगळ्यांचे वाढदिवस संपेपर्यंत त्याला ‘वाढदिवस वर्ग’च म्हणायचं हे त्याच्या पक्कं लक्षात असे. आता त्याच्या पुढची पायरी. ती म्हणजे ‘मग हा वर्ग इतर वर्गापेक्षा कसा बरं वेगळा वाटला पाहिजे’ आणि ‘त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं’ हे मुलांपर्यंत पोहोचवायचं असायचं. मी त्यांना विचारत असे की, आपल्या घरात कुठलाही कार्यक्रम असला की सर्वात आधी आपण काय करतो. ‘‘बाई, दारावर छान तोरण लावतो, घर छान सजवतो. म्हणजेच घराच्या दारापासूनच बाहेरच्यांना कळतं की या घरात काही तरी आहे.’’ कधी कधी हे असं उत्तर मिळायचं तर कधी कधी मलाच द्यावं लागायचं. मग मी सांगायचे, ‘‘आपल्यालाही वर्गात असंच वाटायला पाहिजे. आपल्या वर्गात रोज कोणाचा ना कोणाचा तरी वाढदिवस असणार आणि तो आपण साजरा करणार याची आपल्याला वर्गात आल्यावर आठवण व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आता सांगा काय करायचं?’’ असं विचारताच, त्यावर ‘‘बाई वर्गाच्या दारावर तोरण लावू या, वर्गात फुगे लावू या.’’ अशा आणि यासारख्या अनेक कल्पना मिळत असत. मग आमच्या सजावटीला सुरुवात दारापासून होत असे. सजावट विकत आणलेल्या गोष्टींपासून करायची नाही यावर माझा कटाक्ष असे. सजावटीची प्रत्येक गोष्ट  मुलांकडून तयार झालेली आहे आणि होणार आहे यावर भर असे. दारावर ‘वा ढ दि व स व र्ग’ असं लिहिलेलं तोरण, कधी मुलांनी कागदावर काढलेल्या व रंगवलेल्या केकचं असे, कधी त्यांनी काढलेल्या व रंगविलेल्या फुलांचं असे तर कधी कागदावर रंगवलेल्या फुग्याचं असे. दरवर्षी त्यात विविधता असे. वर्गाच्या दोनही दारांवर लहान शिशूचा वर्ग असेल तर ‘५’ आणि मोठय़ा शिशूचा वर्ग असेल तर ‘६’ असा मोठा आकडा त्याला हसरा चेहरा काढून स्वागताला लावला जात असे. तोच आकडा वर्गातही प्रकर्षांने सगळीकडे दिसेल असा लावला जात असे. कारण अर्थातच पुढच्या तीन महिन्यांत वर्गातले सगळे हळूहळू तेवढय़ा वर्षांचे होणार असत आणि ते त्यांचे वय त्याच्या डोळ्यासमोर सतत दिसणं आवश्यक होतं. सगळ्या वर्गात मुलांनी काढलेली वेगवेगळी चित्रं लावली जात. जो मुलगा पाच किंवा सहा वर्षांचा पूर्ण होत असे त्याला खास एका कागदावर त्याच्या वयाइतकी फुलं रंगवायला मिळत. त्यावर त्याचं नाव लिहून तो कागद वर्गामध्ये लावला जात असे.

एके वर्षी वर्गात वर्तमानपत्राच्या रद्दीपासून सजावट करायची ठरवली. मुलांना पंख्याच्या घडय़ा सहज येत होत्या. त्याचा उपयोग करून वर्गभर वर्तमानपत्राच्या पंखाच्या घडय़ा करून त्याचे पिसारे लावले होते. वर्तमानपत्रावर काढलेल्या केकच्या मोठय़ा चित्रामध्ये वर्तमानपत्रांचे गोळे भरून तो स्टफकेक (स्टफ खेळण्यांप्रमाणे) वर्गात चिटकवला होता. साध्या वर्तमानपत्राने वर्गात किती छान सजावट करू शकतो हे आश्चर्यचकित करणारं होतं. आता मला लिहिताना सगळं आठवतंय आणि मस्तही वाटतंय. कारण तीन महिने वर्गात रोज सण साजरा केल्यासारखे वातावरण असायचं. तीन महिने रोज वाढदिवसाची मजाच मजा असायची. त्या दरम्यान वर्गात रोज सगळ्यांना एकेक भेटकार्ड काढायला देत असे. ज्याच्या वाढदिवस असेल त्याला, मुलांची इच्छा असेल तर ते द्यायचं असं सांगितलेलं असायचं.

जो मुलगा किंवा मुलगी वर्गात जास्त लाडका किंवा लाडकी असेल, त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप भेटकरड मिळत. पण प्रत्येकाला वाढदिवसाला किमान एक तरी भेटकार्ड मिळेल याची खबरदारी मात्र घ्यावी लागायची. कारण मुलं खरोखरीच त्यांना वाटलं तरच आपलं भेटकार्ड देतात हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळायचं. त्या तीन महिन्यांतील एक दिवस ठरवून आमची वाढदिवस पार्टी असायची. त्या दिवशी सगळ्यांनीच खूप नटून यायचं असं ठरवलं जाई. त्या दिवशी वर्गात आवडीची गाणी लावून आमचा नाचण्याचा मुख्य कार्यक्रम असे. पार्टीच्या दिवशी वर्गात अभ्यास अजिबात नसे. मुलं डब्यात त्या दिवशी खाऊचा वार नसला तरी खाऊ  आणत. सगळे एरवी बास्केटच्या जोडय़ा करून डबा खात असत, तर या दिवशी गोलाकार मोठी पंगत बसत असे. सगळ्यांनी आपला खाऊ  एकमेकांच्यात वाटून खायचा हे ठरलेलं असे. बाईंनी खास वाढदिवसाची म्हणून केलेली काही तरी हस्तकलेची वस्तू भेट म्हणून मुलं घरी घेऊन जात असतं. त्यामध्ये ठळक आठवताहेत त्या टोप्या. एकदा सगळ्यांना वर्तमानपत्राच्या टोप्या करून त्यावर त्यांच्या वाढदिवसाची तारीख लिहिली होती. वर्गातून घरी जाताना सगळ्यांच्या डोक्यावर त्या टोप्या होत्या. ती टोपी घातलेली माझी मुलं बाकीच्या मुलांच्यात खूप उठून दिसत होती हे नक्की.

दरवर्षी नवे भिडू नवे राज्य, तसं नवी मुलं नवी मजा असा अनुभव या उपक्रमात येत असे. मुलांना आपला वाढदिवस जसा आवडीचा आणि दरवर्षी ‘कधी एकदा येतोय’ असं वाटणारा असतो, तसाच माझ्यासाठी दरवर्षी   ‘वाढदिवस वर्ग’ हा ‘कधी एकदा सुरू होतोय’ असं वाटायला लावणारा आवडीचा उपक्रम होता.

ratibhosekar@ymail.com