प्रेमाच्या वेगवेगळय़ा प्रकारांसाठी कारणीभूत असणाऱ्या मूलभूत आकर्षणाचा पाया किती मजबूत आहे हे जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी मी प्रेमाचे आठ प्रकारचे वर्गीकरण तीन गटांत खालीलप्रमाणे केलेले आहे. त्यामुळे प्रेमविवाहाचा टिकाव किती लागू शकेल वा ते टिकवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागणार आहेत, याचा अंदाज संबंधितांना येऊ शकेल.
ये इश्क़ नहीं आसाँ इतना तो समझ लीजे
इक आग़ का दरिया है और डूब के जाना है
असे सुप्रसिद्ध शायर जिगर मुरादाबादी यांनी म्हटले आहे. प्रेमाच्या सर्व गोंधळांचा अलिप्तपणे अभ्यास करणारे ‘सॉक्रेटिस’, ‘प्लेटो’पासूनचे अभ्यासक आपली काही प्रमेये, काही सिद्धांत घेऊन प्रेमाचे तत्त्वज्ञान जगापुढे कित्येक शतके मांडत आले आहेत. आता काही वैद्यकीय तज्ज्ञही याविषयी आपापली संशोधने प्रस्तुत करीत आहेत. या सर्वाचा गंभीरपणे विचार केल्यास शृंगारिक ‘प्रेम’ ही धारणाच मुळी किती खोलवर, अथांग आहे हे ध्यानात येते.
स्टर्नबर्गचा प्रेमाचा त्रिकोण
शृंगारिक प्रेमभावना अन्य व्यक्तीच्या अलैंगिक शारीरिक आकर्षणावर तसेच तिच्यात असणाऱ्या काही अपेक्षित गुणांच्या अस्तित्वावरही अवलंबून असते. परंतु भिन्निलगी व्यक्तीविषयी वाटणारी कुठलीही प्रेमभावना ही वासनारहित नसते. उदात्त प्रेम म्हणजे वासनेपेक्षा इतर गुणांच्या आकर्षणाचे प्राबल्य एवढेच.
मानसशास्त्रज्ञ स्टर्नबर्ग याने ‘प्रेमाचा त्रिकोण’या पुस्तकात प्रेमाचे मानसशास्त्र सांगताना आधार म्हणून घनिष्ठता (इन्टिमसी), वासना (पॅशन) व जबाबदारपणा (रिस्पॉन्सिबिलिटी) या तीन गोष्टी मानल्या आहेत. त्यानुसार प्रेमाचे वर्गीकरणही केले आहे. तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात वासनेची तीव्रता जास्त असते, तर कालांतराने निर्माण होणाऱ्या सहवासोत्तर प्रेमामध्ये जबाबदारपणाची जाणीव वाढलेली असते.
प्रेमाचा चौकोन : माझे प्रमेय
परंतु माझ्या मते, प्रेमाचा त्रिकोण नसून चौकोन असतो. त्याला मत्रीची (फ्रेन्डशिप) अत्यंत महत्त्वाची चौथीही बाजू असते. त्याशिवाय प्रेम हे यशस्वीरीत्या टिकू शकत नाही.
या सर्व घटकांचा विचार करून प्रेमाच्या वेगवेगळय़ा प्रकारांसाठी कारणीभूत असणाऱ्या मूलभूत आकर्षणाचा पाया किती मजबूत आहे हे जाणून घेतले पाहिजे. वरील सर्व गोष्टींचा विचार करून मी प्रेमाच्या आठ प्रकारांचे वर्गीकरण तीन गटात खालीलप्रमाणे केले आहे. त्यामुळे प्रेमविवाहाच्या यशस्वितेची कल्पना साधारणपणे करता येऊ शकते. म्हणजे प्रेमविवाहाचा टिकाव किती लागू शकेल वा ते टिकवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागणार आहेत याचा अंदाज संबंधितांना येऊ शकेल.
पहिला गट : यामध्ये होणाऱ्या प्रेमाकर्षणाला वास्तवतेचे भान वा जबाबदारीची जाण नसते. हेच ते ‘आंधळे’ प्रेम. त्यामुळे त्यांच्यात परिपक्वता नसते. आपली प्रिय व्यक्ती ही अत्यंत आदर्श व परिपूर्ण असल्याचा साक्षात्कार अशांना सतत होत असतो. आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी व्यक्तीच आपल्याला मिळाली आहे, असे त्यांना वाटत राहते. परंतु काळाच्या ओघात वास्तवाचे चटके व अपेक्षाभंगाचे फटके मिळाल्याने असे प्रेम उडून जाते. हे लला-मजनू प्रेम. अशा आकर्षणातून होणारी लग्ने टिकवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात याची कल्पना संबंधितांना आली पाहिजे. यामध्ये तीन प्रेम-प्रकार मी केलेले आहेत.  
१. कोवळे प्रेम (काफ लव):
कोवळे प्रेम हे नवतारुण्याच्या सुरुवातीच्या काळातच, टीन एजिंगमध्ये (१३ ते १९ वष्रे वयामध्ये) निर्माण होत असते. याच काळात अननुभवता, निव्र्याजपणा यांचे प्राबल्य असते. या प्रेमाचे वैशिष्टय़ म्हणजे ते वारंवार व वेगवेगळ्या व्यक्तींविषयी उत्पन्न होऊ शकते. याचे कारण त्यात जबाबदारपणाची जाणीव नसल्यामुळे ते उच्छृंखल असते.
२. लुब्ध प्रेम (इन्फॅच्युएशन) :
अचानक पाहिल्या पाहिल्या एखाद्या व्यक्तीविषयी वाटणारी तीव्र ओढ व लुब्धता असे प्रेम निर्माण करीत असते. हे प्रेम कोवळ्याप्रेमापेक्षा वेगळे असते, कारण हे टीन एजिंगनंतर (१३ ते १९ वष्रे वयानंतर) कुठल्याही वयात घडू शकते. प्रथमदर्शनी प्रेमापेक्षाही वेगळे असते कारण हे पहिल्याच नजरेत होईल असे नाही. यात वास्तवतेचे भान नसते तसेच अशा प्रेमसंबंधातून निर्माण होणाऱ्या जबाबदारीची जाणही कमी असते. हे केवळ वैषयिकतेतूनच निर्माण होते असे नाही. ज्या व्यक्तीवर प्रेम जडते ती व्यक्ती असामान्य व अद्वितीय असल्याचा साक्षात्कार त्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला अत्यंत तीव्रपणे होत असतो. त्यामुळे हे प्रेम कोवळ्या प्रेमाणेच आंधळे असते.
हे प्रेम एकतर्फी असण्याच्या शक्यता अधिक असतात. कालांतराने अशा प्रेमाची तीव्रता कमी होण्याची भीतीही असते. प्रथमदर्शनी प्रेमापेक्षा अशा प्रेमात जबाबदारपणा व टिकाऊपणा बराच कमी असतो. म्हणून हे प्रेम काळाच्या ओघात निश्चितच नष्ट होते. प्रिय व्यक्तीविषयी आदराची भावना कमी व मालकी हक्काची भावना जास्त असते म्हणूनच या प्रकारातील एकतर्फी प्रेमात ‘सूड प्रवृत्ती’ची गुन्हेगारी वृत्ती बळावण्याचे चान्सेस अधिक असतात.
३. प्रथमदर्शनी प्रेम (इन्स्टंट लव) :
प्रेमाचा हा प्रकार कोवळय़ा प्रेमापेक्षा जरा वेगळा असतो. याला वयाचे बंधन नसते. कुठल्याही वयात घडणाऱ्या या प्रेमात, आकर्षण हे क्षणार्धात निर्माण होते व त्याला केवळ शारीरिक आकर्षणच जबाबदार असते असे नाही, तर व्यक्तिमत्त्वातील इतरही अनाकलनीय गोष्टी कारणीभूत असू शकतात. हे प्रेम एकतर्फीच असेल असे नसून त्याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता असू शकते. कारण यात थिल्लरपणा कमी व सेन्स ऑफ कमिटमेंट जास्त तर प्रिय व्यक्तीविषयी आदराची भावना जास्त व मालकी हक्काची भावना कमी असल्याने ‘सूड प्रवृत्ती’ची गुन्हेगारी वृत्ती अत्यल्प असते. म्हणजेच अशा प्रेमात वासनेच्या पलीकडीलही काही कारणे असू शकतात. यात अन्य व्यक्तीच्या इतर गुणांचाही समावेश असतो. परंतु तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात मात्र वासनेची तीव्रता अधिक असते. वाढत्या वयात निर्माण होणारे प्रथमदर्शनी प्रेम मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या आकर्षति करणाऱ्या अन्य गुणांमुळे निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. या प्रेमात कोवळय़ा प्रेमात आढळणारा उच्छृंखलपणा कमी असून भावुकता अधिक असते.
असे प्रथमदर्शनी प्रेम हे वारंवार होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असले तरी पूर्णपणे अशक्य नसते. अशा प्रेमातील आकर्षण हे जास्त करून भावनिक किंवा बौद्धिक असू शकते. वाढत्या वयोमानात घडणाऱ्या अशा प्रेमाला जबाबदारपणाची जाणीव होऊन गंभीरपणाही येत असतो. कष्टाने असे प्रेम, प्रेमविवाह टिकण्याची शक्यता वरील दोन प्रकारांपेक्षा जास्त असते.
दुसरा गट- या गटात मोडणारे प्रेम, काही विशिष्ट निकषांवर आधारित असल्याने यातील प्रेमाकर्षण मुळातच ठिसूळ असते. कारण ते विशिष्ट कारण दूर झाले की या प्रेमाची तीव्रताही कमी होते. उत्तेजकतेचे मूळ कारण नंतर बोथट होत असल्याने अशा प्रेमातून होणारे विवाह हे टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक कष्ट घ्यावे लागतात.
४. वासनांध प्रेम (पॅशनेट लव) :
यात प्रामुख्याने वासनेचाच भाग असल्याने हे केवळ शारीरिक आकर्षणातूनच उद्भवणारे प्रेम असते. यामध्ये कामसुख ओरबाडून घेण्याची प्रवृत्ती बळावत असते. यात जोडीदाराविषयी मालकी हक्काची भावना निर्माण होत असते किंवा त्याला इतर वस्तूंच्या प्रमाणेच वापरण्याची वृत्ती प्रबळतेने उत्पन्न होत असते. तसेच जोडीदाराचे शारीरिक आकर्षण कमी झाल्यास असे प्रेम पूर्णपणे नष्टही होऊ शकते.
५. दयाद्र्र प्रेम (कम्पॅशनेट लव):
अशी भावना प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीविषयी वाटणाऱ्या दयेपोटी किंवा त्याच्याविषयी कीव येऊन निर्माण होत असते. विशेषत: दुसऱ्या व्यक्तीचा विभक्तपणा, एकटेपणा अथवा कोणाच्या तरी सहवासाची त्याला असणारी आत्यंतिक निकड हृदयाला भिडून त्यातून ही भावना निर्माण होऊ शकते. परंतु प्रत्येक प्रेमामध्ये असणारा शारीरिक आकर्षणाचा भाग या प्रेमातही असतोच.
६. उद्देशी प्रेम (पर्पजफुल लव) :
एखादा विशिष्ट उद्देश मनात ठेवून केले गेलेले प्रेम हे मुळात आकर्षण कमी आणि इतर हेतूने प्रेरित असते (उदा. इस्टेट, वारसा, श्रीमंत मुलगा/मुलगी). हे खऱ्या अर्थाने प्रेमविवाह नाहीत. उद्देश सफल झाला की, ती ओढही साहजिकच नष्ट होऊन लग्न असफल होण्याचे चान्स जास्त असतात.
तिसरा गट : वरील सर्व प्रकारांमध्ये जोडीदाराकडून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा व त्यामुळे होणारा अपेक्षाभंग आणि अर्थातच त्याने येणारी निराशा नात्याला निस्तेज करीत असते. परंतु या तिसऱ्या गटामधील प्रेमाकर्षणाला वास्तवतेचे भान वा जबाबदारीची जाण असते. या आकर्षणातून होणारे प्रेमविवाह हे टिकणे जास्त सोपे जाते. जोडीदारातील उणिवा, कमतरता समजूनही आपण त्याच्याशी ‘अ‍ॅडजस्ट’ होऊ शकतो व आपलेपणाच्या भावनेत काहीही फरक पडत नाही, असा आत्मविश्वास अशांमध्ये येतो. वास्तवतेचे भान आल्याने नाते दृढ होत जाते.
७. सहवासोत्तर प्रेम (असोसिएशन लव) :
वारंवार येणाऱ्या संपर्काने शारीरिक आकर्षणाच्या जोडीला भावुकतेची झालर असल्यास अशा प्रकारचे प्रेम निर्माण होत असते. सर्वसाधारणपणे आढळणारे प्रेम हे सहवासोत्तर प्रेमच असते. प्रथमदर्शनी आकर्षण निर्माण न होताही कालांतराने असे प्रेम होऊ शकते. यात वचनबद्धता व जबाबदारपणा निश्चितच असतो. त्यामुळे हे प्रेम परिपक्व असते. तारुण्यातील कोवळ्या प्रेमाचा काळ ओसरल्यावर हे प्रेम कधीही निर्माण होते. विशेषत: सतत संपर्कात येणाऱ्या दोन भिन्न िलगी व्यक्तींमध्ये हे प्रकर्षांने आढळते. त्यामुळे जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाची ‘निगेटिव’ बाजू लक्षात येऊनही त्यासाठी अ‍ॅडजस्ट होण्याची मनाची तयारी यात होत असते.
८. साहचर्य प्रेम (कम्पॅनियनशिप लव) : हे प्रेमसुद्धा सततच्या संपर्काने निर्माण होते. सहवासोत्तर प्रेमातील संपर्क वारंवार असला तरी तो सततचा नसतो. म्हणजेच दिवसरात्र संपर्कात असणाऱ्या व्यक्तींमध्येच साहचर्य प्रेम निर्माण होते. समाजामध्ये सर्वसाधारणपणे ही गोष्ट वैवाहिक बंधनातील व्यक्तींच्या बाबतीत घडत असते. म्हणून दाम्पत्यामधे विवाहोत्तर काळात या प्रेमाचे महत्त्व फार आहे.
या प्रेमाचे वैशिष्टय़ म्हणजे हे कष्टसाध्य असते. म्हणजेच प्रयत्नाने असे प्रेम करता येण्याची कला आत्मसात करता येते. यासाठी ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ म्हणजेच इंटिमसीची कला महत्त्वाची ठरते. यामुळे एरव्हीचे आंतर-व्यक्तीसंबंधातील तणाव काही प्रमाणात सुसह्य़ होऊ शकतात. या प्रेमात मित्रता व जबाबदारपणा यांचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. मत्रीची बाजू असल्याने कुठल्याही प्रकारचा विवाह असू दे, साहचर्य प्रेम जर साध्य केले तर ते दाम्पत्य ‘वेल अ‍ॅडजस्टेड’ दाम्पत्य होऊ शकते.
८. अशारीरिक प्रेम? (प्लॅटॉनिक लव?) :
प्लॅटॉनिक लव किंवा अशारीरिक प्रेम ही पूर्णपणे, तत्त्वज्ञानी प्लेटोने प्रसूत केलेली कविकल्पना आहे. अशा भिन्निलगी प्रेमात बौद्धिक आकर्षणाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून शारीरिक आकर्षण हे अत्यल्प असते. तरी ते नाकारता मात्र येत नाही. म्हणजेच असे अशारीरिक प्रेम हे खरोखरच अशारीरिक नसते. आपले वासनामय आकर्षण काही वेळा नाकारण्यासाठी संबंधित व्यक्ती ही पळवाट शोधून काढते. कित्येकदा असे आकर्षण स्वत:लाच अमान्य करून व नाकारून ती व्यक्ती स्वत:लाच फसवीत असते.
प्रेमाची गोडी संबंधितांनी नात्यात जाणीवपूर्वक आणलेल्या परिपक्वतेने वाढते. ही परिपक्वता त्या दोघांच्याही ‘आर्ट ऑफ इंटिमसी’मधील पारंगततेवर अवलंबून असते. कारण एकतर्फी प्रेम हे त्रासदायक पण दुतर्फी असणारे प्रेम हेच आनंददायक असते. नाते समृद्ध करते.
इश्क़ जब एक तरफ़ हो तो सज़ा देता है
इश्क़ जब दोनो तरफ़ हो तो मज़ा देता है
आणि कुठलेही भिन्निलगी आकर्षण शृंगारिकच असते व त्यातील शारीरिक, बौद्धिक वा भावनिक घटक पूर्णपणे नसणे हे असंभवच नव्हे तर अनसíगक असते. परंतु एखाद्या घटकाचे प्रमाण जरा कमी असू शकणे शक्य असते. म्हणूनच वर उल्लेखलेल्या प्रेमप्रकारांचा विचार करता लक्षात येईल की, ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं..पण तुमचं आमचं सेम नसतं’ हेच खरे आहे.

‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
Why HbA1c test important for diabetes diagnosis Who should do it and how consistently
विश्लेषण : HbA1c चाचणी मधुमेह निदानासाठी महत्त्वाची का आहे? ती कुणी आणि किती सातत्याने करावी?