सिद्धी महाजन snmhjn33@gmail.com
एलिझाबेथ वाथुती ही के नियातील २५ वर्षांची पर्यावरण कार्यकर्ती. तिचा पर्यावरणाकडे असलेला ओढा मात्र वयाच्या सातव्या वर्षांपासून सुरू झाला आणि ‘नोबेल’विजेत्या वांगारी मथाई या कार्यकर्तीच्या प्रेरणेनं तिनं शिक्षण आणि पर्यावरण रक्षणाचा वसाच घेतला. शाळांमध्ये जाऊन मुलांना हवामान बदलाबद्दल समजावून सांगणं, झाडं लावून ती जगवणं, अन्नसुरक्षेचं महत्त्व पटवून देऊन मुलांना फळझाडं लावण्यास प्रोत्साहन देणं असे अनेक उपक्रम तिनं राबवले. नव्या पिढीची हरित चळवळ उभारत तिनं मथाई यांचा  वारसा सशक्तपणे पुढे चालवला आहे..

मार्च २०२० चा पूर्वार्ध. केनियामधील सर्वात जास्त वनक्षेत्र लाभलेल्या येरी काऊंटीमधील तेतू या गावात राहाणाऱ्या एलिझाबेथ वाथुती या मुलीनं आपल्या छोटय़ाशा गावातून युरोप प्रवासासाठी प्रस्थान के लं. तिला हवामानबदलाविषयीच्या एका चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. ग्राझ, ऑस्ट्रिया इथे भरलेल्या ‘एलेव्हेट’ परिषदेत एलिझाबेथ व्यासपीठावर उभी राहिली अन् तिनं सत्तर वर्ष तिच्या देशाला हलवून सोडणाऱ्या निर्वनीकरण, पूर, प्रदूषण, भूकबळी इत्यादी समस्या आणि हल्लीच पिकांवर आलेल्या टोळधाडीबद्दल उपस्थितांना माहिती दिली. ती म्हणाली, ‘‘आफ्रिकेत किंवा सगळ्याच जगात घडत असलेला वातावरणबदल आणि वेगानं होत असलेली तापमानवाढ, ही काही ‘सायन्स फिक्शन’नं जन्माला घातलेली रंजक कथा किंवा नॉस्टड्रॉमसची खळबळजनक भविष्यवाणी नाही. ते खरंखुरं वास्तव आहे आणि आपण सारे त्यात जगत आहोत.’’

Buldhana, Police Seize 4 Pistols, Live Cartridges, Buldhana Madhya Pradesh Border, Buldhana Madhya Pradesh Border Operation, police operation, pistols seize in buldhana, buldhana crime news, crime news, buldhana news, lok sabha 2024,
बुलढाणा : चार पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात कारवाई
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…

आठवडाभर झालेल्या पावसानं सगळीकडे घडवलेली प्रलयसदृश परिस्थिती पाहिलेल्या, येऊ घातलेल्या हवामानबदलाच्या महासंकटाची धावती झलक ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेल्या आपल्याला ते जाणवतंय का, जे एलिझाबेथ वाथुती आपल्या खंबीर नजरेतून ठामपणे सांगू पाहातेय? आपण वर्षांनुवर्ष डोळ्यांवर चढवलेली ‘आमच्याकडे सारं काही छान छान, गोड गोड चाललं आहे’ ही घट्ट वैचारिक झापडं ही मुलगी आपल्याला प्रयत्नपूर्वक काढायला लावते आहे का? पर्यावरणावर, दूरदेशातील अनोळखी लोकांच्या विचारसरणीवर बोलायला धजावणारी कोण बरं ही मुलगी? असे प्रश्न पडणं साहजिकच.

एलिझाबेथ वाथुतीचा जन्म केनियातील डोंगराळ प्रदेशातला, आफ्रिकेतल्या घनदाट अरण्यानं व्यापलेल्या भागातला. आफ्रिकेतील सर्वाधिक वेगानं वाहाणारी नदी, अशी ख्याती असलेल्या गुरा नदीजवळ वसलेलं तिचं गाव. स्फटिकधवल नदीचं खळाळतं पात्र डोंगरउतारावरून झेप घेत घनदाट वनराईत लुप्त होतं, ते अवर्णनीय दृश्य पाहात तिचं बालपण सरलं. तशी तिची वृत्ती जन्मत: निसर्गप्रेमी. शीळ घालणारे पक्षी, झाडापेडांतून मनमुक्त वाहाणारा वारा आणि निसर्गात वास करून राहाणारी शांतता, यांची एकत्र अनुभूती घेत ती नदीच्या काठावर तासन्तास बसून राहात असे. शिक्षणाला अतोनात महत्त्व देणाऱ्या आपल्या आजीच्या तोंडून, शेकोटीभोवती रमलेल्या भावंडांच्या कोंडाळ्यात, एलिझाबेथनं एका धाडसी स्त्रीच्या कथा ऐकल्या होत्या. त्या स्त्रीचं नाव होतं वांगारी मुटा मथाई. वीसाव्या शतकात केनियामधील एका छोटय़ाशा खेडेगावात जन्माला आलेली वांगारी, ही शिक्षण पूर्ण करण्याच्या ध्येयानं पछाडलेली तरुणी. त्या तुलनेनं मागास प्रदेशात त्या काळीही मुलींनी शिक्षण घेणं ही वहिवाट बनली नव्हती. वांगारीनं ती वहिवाट तयार केली. १९६० मध्ये ही मुलगी विज्ञानातील उच्च शिक्षण घेण्याच्या उद्देशानं अमेरिकेत गेली. तिथे शिक्षण घेऊन ती पुन्हा केनियात आली आणि नैरोबी विद्यापीठात ‘पीएच.डी.’साठी तिनं प्रवेश घेतला.अख्ख्या पूर्व आणि मध्य आफ्रिकेत डॉक्टरेट मिळवणारी आणि विद्यापीठातील विभागाचा कार्यभार सांभाळणारी केनियातील ती पहिली स्त्री.

वांगारीपासून प्रेरणा घेऊन, तिच्या निसर्गप्रेमापासून प्रेरणा घेऊन वयाच्या सातव्या वर्षी एलिझाबेथनं शाळेतील पर्यावरण संवर्धन क्लबचं सदस्यत्व घेतलं. सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेत हिरिरीनं सहभाग घेतला. वयाच्या सातव्या वर्षीच शाळेसमोर असलेल्या परिसरात जाऊन तिनं पहिल्यांदा वृक्षारोपण केलं, शिक्षकांशी संवाद साधला. पर्यावरण संवर्धनाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पराकाष्ठा केली. तिचं निसर्गाशी असलेलं नातं सहज फुलत गेलं. २००४ मध्ये शाश्वत विकास, लोकशाही आणि शांतता यांसाठी मौलिक योगदान दिल्याबद्दल वांगारी मथाई यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झालं, तेव्हा एलिझाबेथच्या आनंदाला पारावार राहिला नाही. वांगरींना भेटणं, त्यांचं अभिनंदन करणं, त्यांच्यासोबत काम आणि वृक्षारोपण करणं हे तिचं स्वप्न बनलं, पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. २०११ मध्ये वांगारींना कर्क रोगानं गाठलं आणि त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांचं निधन झालं.

वांगारींनी दिलेल्या प्रेरणेबद्दल एलिझाबेथ मनापासून बोलते. ‘‘तिनं आपलं हृदय ओतून आणि स्वत:च्या हातानं कष्ट करून आमचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी जी बीजं रोवली, त्यांचे आता महावृक्ष होत आहेत. नि:स्वार्थ भावनेनं तिनं पर्यावरण रक्षणासाठी जो लढा दिला, तो आमच्या कायम स्मरणात राहील. तिच्या आकस्मिक मृत्यूमुळे तिला भेटण्याची, तिच्यासोबत काम करण्याची माझी स्वप्नं उद्ध्वस्त झाली, जी पूर्ण करण्यासाठी मी शाळकरी वयापासून कष्ट घेतले होते. तेव्हा माझी शाळेत जाण्याची इच्छाच जणू नष्ट झाली; पण माझं मन मला सांगत होतं, की तिच्या पावलावर पाऊल ठेवून मला वाटचाल करायची आहे.’’

वांगारींच्या मृत्यूनंतर एलिझाबेथनं वाचनालयात जाऊन वांगारी यांनी लिहिलेली एकूण एक पुस्तकं वाचून काढली. त्यांची राजकीय भूमिका, पर्यावरण रक्षणासाठी दिलेला लढा आणि तीन मुलांची एकल पालक म्हणून जगलेलं आयुष्य, यावर भाष्य करणारं  ‘वल्लु६ी ि’ हे आत्मचरित्र तिला सापडलं. एलिझाबेथनं त्यातलं अक्षर अन् अक्षर वाचून काढलं आणि त्यावर सखोल विचार केला. वांगारींनी ‘ग्रीन बेल्ट’ चळवळीची मुहूर्तमेढ कशी रोवली, या कहाणीपासून ते आदिवासी स्त्रियांना वृक्षारोपण करण्यासाठी वेतन आणि सहकार्य देऊ करून कसं खरंखुरं आत्मनिर्भर केलं, यापर्यंत त्यांच्या जीवनातील सर्व रोचक आणि प्रेरणादायक कथा तिनं मन लावून वाचल्या. या पुस्तकानं तिला खंबीर बनवलं आणि वांगारींच्या मार्गावरून मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित केलं. वांगारी तिला प्रत्यक्ष भेटल्या नव्हत्या, तरी अप्रत्यक्षपणेही तिच्यावर फार मोठा ठसा उमटवून गेल्या होत्या. आता तिलाही जगावर त्यांच्यासारखाच मोठा ठसा उमटवायचा होता.

एलिझाबेथनं पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक विकास या विषयांमध्येपदवी संपादन केली. वयाच्या एकविसाव्या वर्षी तिनं ‘ग्रीन जनरेशन’ या चळवळीची स्थापना केली. या चळवळीमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. या सर्व उपक्रमांतर्गत नवीन पिढीला पर्यावरण संरक्षणासाठी अधिक सजग केलं जातं आणि त्यांच्यामध्ये पर्यावरणवाद रुजवण्यासाठी विशेष प्रयत्न के ले जातात. २०१६ मध्ये एलिझाबेथला तिचं सर्वस्व असलेल्या वांगारी मथाईंच्या नावे दिली जाणारी शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलंच नाही. तिनं आणि तिच्या मित्रांनी प्रत्येक आठवडय़ाला शाळांना भेटी द्यायला सुरुवात केली. ते शाळेत जाऊन तिथल्या मुलांना हवामानबदलाबद्दल माहिती देत, तापमानवाढीची माहिती देत, त्यामागची कारणं समजावत आणि दैनंदिन आयुष्यात पर्यावरणपूरक बदल घडवून या समस्यांविरुद्ध लढायला बळ देत. आजूबाजूला दिसणाऱ्या प्रदूषण, भूकबळी, निरक्षरता या प्रश्नांबरोबरच, निसर्गापासून दूर जाणारी जीवनशैली आणि इतर सामाजिक समस्यांविरुद्ध भर चौकात उभं राहून जाब विचारायला प्रोत्साहन देत. ग्रीन जनरेशन चळवळीनं आजपर्यंत सुमारे २० हजार लहान मुलांची मानसिकता सकारात्मकरीत्या बदलवण्यासाठी हातभार लावला आहे. एवढंच नव्हे, तर एलिझाबेथ आणि तिच्या स्वयंसेवकांनी या मुलांच्या मदतीनं आजपर्यंत तीस हजार झाडांचं यशस्वी वृक्षारोपण आणि संवर्धन केलं आहे.

वृक्षारोपण करणं सोपं असतं. मात्र ते रोप नीट वाढतंय की नाही, त्याची नीट काळजी घेतली जात आहे की नाही, हे पाहाणं महत्त्वाचं असतं. ‘ग्रीन जनरेशन’ चळवळीनं केनियातील विविध शाळांमध्ये ‘इको क्लब’ची स्थापना केली. त्यांच्यामार्फत वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन, त्यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी मुलांना प्रोत्साहित केलं. वृक्षारोपण केलेल्या झाडांची दर दिवशी व्यवस्थित काळजी घेण्याचं काम प्रत्येकाला नेमून दिलं. ती आणि तिचा चमू शाळांना भेटी देऊन त्या झाडांची नीट काळजी घेतली जात आहे की नाही हे जातीनं पाहातात. त्यावरून मुलांना मार्गदर्शन करतात आणि पर्यावरण शिक्षणाबद्दल कार्यशाळा घेतात. या कार्यक्रमांमधून लावण्यात आलेल्या वृक्षांचा जतन दर ९९ टक्के- म्हणजेच अतिशय उत्तम आणि उत्साहवर्धक आहे. हवामानबदलानं सर्वात मोठा परिणाम गरीब समाजाच्या अन्नसुरक्षेवर केला आहे. म्हणूनच त्यांनी वेगवेगळ्या शाळांमधून मुलांना फळझाडांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

२०१९ मध्ये ‘इलेव्हन इलेव्हन ट्वेल्व्ह फाऊंडेशन’नं तिला ‘आफ्रिका ग्रीन पर्सन ऑफ द इयर’चा किताब देऊन सन्मानित केलं. आपल्या समाजात असलेल्या अन्नाबाबतच्या असुरक्षिततेवर लहान मुलांनी उपाय म्हणून फळझाडांची लागवड करावी, यासाठी त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या एलिझाबेथला प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनीही शाबासकी दिली आहे.

एलिझाबेथला जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा ती जंगलात जाऊन झाडांशी गप्पागोष्टी करण्यात रमते. निसर्गाशी असलेलं आपलं सहिष्णुतेचं नातं अजूनही ताजं टवटवीत राखण्याचा ती प्रयत्न करते. आज ती ‘रिझव्‍‌र्ह काऊन्सिल’ची सभासद म्हणून काम पाहात आहे. पर्यावरण संवर्धनाचं रीतसर शिक्षण आणि समाजातील प्रत्येक स्तरावर जनजागृती हाच हवामानबदलावर जालीम उपाय आहे, असं ती सांगते. ती जनसमुदायासमोर हवामानबदलानं घडवलेल्या आपत्तींच्या घटना समजावून सांगते. त्यामागची कारणमीमांसा सोप्या शब्दांत विशद करते. या प्रश्नाचं महत्त्व उच्चस्तरीय नेत्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि जास्त उशीर व्हायच्या आधी त्यांनी तातडीनं त्यावर उपाययोजना केली पाहिजे, असं तिला कळकळीनं सांगायचं असतं.

हवामानबदल ही आता एक अदृश्य आपत्ती राहिली नसून, ती तुम्हा आम्हा सर्वाच्या उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपली आहे, हे या वर्षीच्या अतिवृष्टी आणि महापुरानं पुन्हा दाखवून दिलं. सतत येणारी वादळं, दुष्काळ, अवर्षण आणि बाकी नैसर्गिक आपत्ती पुन:पुन्हा हेच दाखवून देत आहेत, की आपण कुठे तरी चुकतो आहोत अन् कदाचित ही चूक सुधारायला उशीर झाला असेल; पण तरीही नवीन चुका करणं थांबवायला हवं आहे. माणसानं आपली पावलं पुन्हा निसर्गाकडे वळवण्याची गरज आहे. एलिझाबेथ आणि इतर मुलांची ही हाक आपणा सर्वाच्या अंत:करणापर्यंत पोहोचेल, तोच सुदिन!