डॉ. नीता ताटके
क्रीडा नैपुण्य असलेल्या प्रतिभावान ्त्रिरयांंनी शिक्षणानंतर, विवाहानंतर, मातृत्वानंतर खेळांमध्ये टिकून राहावं यासाठी समाज, क्रीडा संघटना, खेळाडूंना प्रायोजित करणार्या कंपन्या आणि सरकार या सर्वांनी दूरगामी व सूक्ष्म स्तरावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. समाजाच्या ्त्रिरयांकडून असलेल्या अपेक्षा, खेळाडू स्त्रियांची स्वप्ने व त्यानुसार विविध पातळ्यांवर मदत व सामंजस्य याची सक्षम परिसंस्था उभी राहिली तर मोठ्या संख्येने मुली-स्त्रिया खेळात टिकून राहतील.
स्थळ : मँचेस्टर, इंग्लंड. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २००२. महिला हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ३-० ने पिछाडीवर असताना, आपण अविश्वसनीय पुनरागमन करत हा सामना ३-३ असा बरोबरीत आणला आणि अतिरिक्त वेळेत ४-३ ने विजय मिळवला. या स्पर्धेत ‘हा संघ पाठवायचा कशाला?’ या प्रश्नापासून, निधीची तीव्र कमतरता, क्रीडा क्षेत्रातूनही दुर्लक्ष, ‘कॉर्पोरेट’ पाठिंब्याचा अभाव, अशा खेळाडूंच्या गुणवत्तेशी थेट संबंध नसलेल्या घटकांवर मात करत हा संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला.
या संघात मणिपूर, हरियाणा, पंजाब, ओडिशा आणि झारखंड यासारख्या देशातल्या कानाकोपर्यातील राज्यातील दिग्गज अनुभवी व उदयोन्मुख खेळाडू यांचा सुंदर मिलाफ होता. या खेळाडूंकडे कौशल्य होतेच, मात्र आत्मविश्वास, मानसिक कणखरता यांचा अभाव होता. संघाची बांधणी करताना याच गुणांवर भर दिला गेला. अंतिम फेरीत यजमान इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर अतिरिक्त वेळेत ३-२ ने हरवून ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून भारतीय स्त्री खेळाडूंनी आपल्या अदम्य जिद्द आणि अतूट सांघिक भावनेने आंतरराष्ट्रीय क्रीडा जगाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. संघाच्या या नेत्रदीपक यशामुळे स्त्री खेळाडूंसाठी अधिक चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या.
२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक्समध्ये १२ संघांमध्ये १२व्या स्थानी राहिलेल्या ्त्रिरयांच्या हॉकी संघाने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये दमदार पुनरागमन केले. कांस्यपदकासाठी ब्रिटन विरुद्ध खेळताना अतिशय चुरशीच्या लढतीत शेवटच्या काही क्षणांमध्ये आपण ३-४ ने जरी हरलो असलो तरी या संघाने एक उत्तम सांघिक दर्जेदार खेळ दाखवला, यासाठी या संघाचे देशाच्या पंतप्रधानांकडूनही कौतुक झाले.
भारतातच नव्हे तर आज जगातल्या कुठल्याही देशाच्या स्त्री खेळाडूंचा प्रवास बघितला तर ‘कष्टसाध्य’ हा शब्द देखील कमी पडेल असे वाटते. ‘त्यांच्या क्रीडानैपुण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष, वेळप्रसंगी थट्टा, हेटाळणी, अगदी समाजाचा तर जाऊच दे, पण घरच्यांचाही विरोध’ या सगळ्यावर मात करीत मुली उभ्या राहिल्या. आज आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधले ‘महिलाराज’ बघताना, मुलींनाही खेळण्यासाठी प्रोत्साहन, चांगले प्रायोजकत्व मिळताना बघितले की, या मागच्या पिढीतल्या स्त्री खेळाडूंना दंडवतच घालावासा वाटतो. मात्र सुधारणा झाल्या असल्या तरी आजही या स्त्री खेळाडूंसमोर खूप आव्हाने आहेत.
्त्रिरयांची शारीरिक, मानसिक व सामाजिक बांधणी एकदम वेगळी असते. मुलींनी खेळायला हरकत नाही, ही समाजाची मनोभूमिका तशी अलीकडचीच आहे. बहुसंख्य मुलींचा खेळ वयात आल्यावर सुटतो आणि ज्यांचा पुढे चालू राहतो त्यातील बहुसंख्य ्त्रिरयांचा खेळ फारतर शिक्षण सुरू असेपर्यंतच टिकतो. विवाहानंतर खेळायचे असेल तर सामाजिक श्रृंखला तोडण्याचे साहस, टोमण्यांकडे दुर्लक्ष व खेळण्यासाठी कौटुंबिक सहकार्य आवश्यक आणि अनिवार्य ठरते. मातृत्वानंतर मैदानावर परत येऊन खेळणार्या व जिंकणार्या ्त्रिरया हा भारतात व परदेशातही अपवादात्मक अनुभव ठरावा. आपली सुवर्णकन्या मेरी कोम हिने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आई झाल्यावरच जिंकले. दोन जुळ्या मुलांच्या जन्मानंतर मेरी कोमच्या पतीने आपल्या फुटबॉल खेळाच्या कारकीर्दीला तिलांजली देऊन पूर्ण वेळ घर आणि मुलांना सांभाळायचे ठरवले यामुळेच हे शक्य झाले, अन्यथा मेरी कोमला स्पर्धामक खेळाला नाईलाजाने ‘टाटा बाय बाय’ करण्यावाचून गत्यंतर उरले नसते. ‘स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया’च्या नियमानुसार कुटुंबीयांना खेळाडूंसोबत राहता येत नाही. पतियाळाच्या राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या खडतर प्रशिक्षणापेक्षा मणिपूर येथे राहात असलेल्या आपल्या मुलांपासून दूर असणे हे मानसिकदृष्ट्या मेरी कोमला खूप आव्हानात्मक होते. अगदी नुकत्याच जुलै २०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील थाळीफेकीतील कांस्यपदक विजेती सीमा कालिरामना हिचा मुलगाही जेमतेम दोन वर्षांचाच आहे. त्याच्या जन्मानंतर सांधेदुखीच्या प्रचंड त्रासानंतरही उभारी घेऊन केलेली सीमाची कामगिरी कौतुकास्पदच आहे. पदक मिळाल्यानंतर ‘मला खूप आनंद झाला’ असे व्यक्त न होता, ‘मला माझ्या मुलाची खूप खूप आठवण येत आहे.’ हेच सीमामधली आई बोलून गेली. या दोघी (आणि अशाच काहीजणी) यांचे हे यश देशासाठी गणले जात असले तरी ते खूपच वैयक्तिक आहे.
स्त्री क्रीडापटूंनी मातृत्वानंतर खेळाकडे परत यावे यासाठी कोणतेही धोरण नाही, पाठिंबा नाही. मातृत्वाची रजा, त्यानंतर विशिष्टप्रकारे शारीरिक तंदुरुस्ती मिळविण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा नाहीत. क्रीडा नैपुण्य असलेल्या ्त्रिरयांनी शिक्षणानंतर, विवाहानंतर, मातृत्वानंतर खेळांमध्ये टिकून राहावं यासाठी समाज, क्रीडा संघटना, खेळाडूंना प्रायोजित करणार्या कंपन्या आणि सरकार या सर्वांनी दूरगामी व सूक्ष्म स्तरावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. समाजाच्या ्त्रिरयांकडून असलेल्या अपेक्षा, खेळाडू ्त्रिरयांची स्वप्ने व त्यानुसार विविध पातळ्यांवर मदत व सामंजस्य याची एक परिसंस्था (इकोसिस्टिम) उभी राहिली तर मोठ्या संख्येने मुली-्त्रिरया खेळात टिकून राहतील.
स्पर्धात्मक खेळाकडे वळल्यावर उच्चतम कामगिरीकडे पोहोचण्याचा कालावधी मोठा असतो. पदकविजेती कामगिरी करणे, प्रशिक्षक, पालक, प्रेक्षक यांच्या अपेक्षांची पूर्तता करणे हा ताण खूपच जास्त असतो. ‘‘आम्हाला सगळे प्रतिस्पर्धी संघ सारखेच आहेत’’ असं खेळाडू जरी म्हणत असले, तरी विशिष्ट संघ, विशिष्ट देश यांच्याविरुद्ध खेळताना मानसिक दबाव खूप मोठा असतो. सांघिक खेळात तर संघात निवडले जाण्यासाठी, टिकण्यासाठी अत्यंत अटीतटीची स्पर्धा असते. उच्च दर्जाच्या खेळाडूंना रेल्वे वा सरकारी नोकर्यांमध्ये सामावले जाते, पण तिथे त्यांना कचेरीत जाण्याची व काम करण्याची फार आवश्यकता नसते.
२४ तास खेळासाठीच देणं अपेक्षित असताना निवड झाली नाही, सातत्याने अपयश आले तर नकारात्मक मानसिकता तयार व्हायला वेळ लागत नाही. भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू ऋषभ पंत वैयक्तिक कारणासाठी रात्री आपल्या गाडीने प्रवास करत असताना (खेळाडूंनी असे प्रवास करू नयेत अशी अलिखित नियमावली असतानासुद्धा) झालेल्या अपघातानंतर क्रिकेट संघटनेने त्याच्या उपचारासाठी करोडो रुपये खर्च केले, न खेळतासुद्धा त्याला आय.पी.एल. कोट्यवधींचे मानधन, इतर सर्व करारांच्या रकमा मिळाल्या. या ठिकाणी जर एखादी स्त्री खेळाडू असती तर या सर्व सुविधा तिला मिळाल्या असत्या का? असा प्रश्न सहजपणे मनात येतो. आपल्याला का नाही? या विचाराचा नाही म्हटलं तरी नकारात्मक परिणाम स्त्री खेळाडूंवर होतो.
स्त्री खेळाडूंवर जगभरातच संशोधन कमी आहे, जे संशोधन आहे ते बहुधा पुरुष संशोधकांनीच केलेले आहे आणि त्यामुळे साहजिकच या संशोधनांमध्ये मोजकेच विषय हाताळले गेले आहेत. ्त्रिरयांची मानसिकता, शारीरिक बदलांचे होणारे मानसिक परिणाम, ‘आधी घर, नातीगोती, मग खेळ’ या मानसिकतेचा कामगिरीवर होणारा परिणाम आणि तत्सम विषय यावर स्त्री संशोधकांकडून संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे.
मैदानावर पोहोचायला थोडा उशीर झाल्यावर ७ मिनिटांत मैदानाला १० फेर्या मारायला लावणारा, सांगितलेले ऐकले नाही म्हणून खेळायला परवानगी न देणारा, संघामधल्या भांडणांना खतपाणी घालून बंडखोरी करणार्या बिन्दियाचा दंड खचकन खेचून ‘‘हर टीममें एक गुंडा होता हैं, इस टीम का गुंडा मैं हुं’’ अशी तंबी देणारा, कठोर शिस्तीने ‘बारा गावच्या बारा जणी’ अशा संघाची बांधणी करून त्यांना अंतिम विजेतेपदाकडे नेणारा ‘चक दे इंडिया’ चित्रपटातील त्यांचा प्रशिक्षक कबीर हा चित्रपट बघितलेल्या सर्वांना आठवेल. अत्यंत उत्कटतेने शिकवताना तोंडात येणारी शिवराळ भाषा, मानसिक खच्चीकरण करणारे शब्द, आत्मसन्मानाला ठेच लावणारी वाक्ये वापरणारे प्रशिक्षक आज क्रीडाजगातल्या तज्ज्ञांसमोर एक खूप मोठा प्रश्न बनून उभे राहिले आहेत. स्त्री खेळाडूंवर होणारे याचे परिणाम जास्त तीव्र आहेत. खेळाचा सराव, स्पर्धा यावेळी कोणताही अपघात होऊ नये म्हणून ‘शारीरिक सुरक्षा याला प्राधान्य देणार्या सर्वांनीच आता ‘मानसिक सुरक्षा’ या ऐरणीवर येणार्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता जाणवू लागली आहे. या विषयावरच्या स्त्री खेळाडूंवर झालेल्या एका संशोधनाचे व निरीक्षणाचे निष्कर्ष डोळे उघडवणारे आहेत. ‘‘जोपर्यंत या स्त्री खेळाडू सरावात असतात, त्यांना यश मिळत जाते वा मिळण्याची शक्यता आहे असे वाटत असते, तोपर्यंत हे खेळाडू त्रास होत असला तरी त्याबद्दल ब्र काढत नाहीत, मात्र याचे दूरगामी परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर होतात. आपल्याला असा ओरडा पडतो आहे म्हणजे आपणच दोषी आहोत ही अपराधीपणाची भावना मनात घर करून राहते. याबद्दल त्यामुळेच मनमोकळेपणाने बोलले जात नाही. ‘‘प्रशिक्षक रागावले, म्हणजे तूच चुकलीस’’ असे पालकही सहजपणे बोलून जातात. खेळामधून निवृत्त झालेल्या स्त्री खेळाडू प्रशिक्षकांच्या अशा वर्तणुकीबद्दल खासगीत बोलताना दिसतात, मात्र आता यावर थोडं खुलेपणाने बोलायला सुरुवात झाली आहे. क्रीडामानसतज्ज्ञांकडेही यावर मदत मागणारे खेळाडू येऊ लागले आहेत. यासाठी प्रशिक्षक, पालक व खेळाडूंमध्येही जागरूकता करण्यासाठी प्रयत्नही सुरू झाले आहेत ही समाधानाची बाब आहे. खेळ खेळणारे सर्वच स्पर्धात्मक खेळ खेळत नाहीत. व्यायाम व्हावा, मनोरंजन व्हावे, त्यानिमित्ताने सामाजिक भेटीगाठी व्हाव्यात यासाठीही खेळ खेळला जातो. अशा खेळामध्ये सहभाग घेतल्यामुळेही विशेषत: व पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांना अमाप फायदे होतात हेसुद्धा समजायला लागले आहे आणि हे फायदे समाजापर्यंत पोहोचवायला सुरुवात झाली आहे.
स्त्री खेळाडूंमधून प्रशिक्षक, पंच, क्रीडा प्रशासक व नेते घडावेत यासाठी कसोशीने प्रयत्न करणारी, खेळातील व्यावसायिक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून भारतातील क्रीडा क्षेत्रातील नैतिक मूल्यांचे पालन, शिक्षण आणि सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी प्रामुख्याने ्त्रिरया असलेल्या ‘इंडियन स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट असोसिएशन (कठरढअ)’ ही संस्था चांगले काम करीत आहे. स्त्री खेळाडूंबरोबरच इतर संलग्न यंत्रणा व संबंधित प्रणाली यांची एक जबरदस्त फळी उभारण्यासाठी आता स्त्रियांनीच पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपले खेळाडू चमकताना दिसत आहेत. या सर्व स्त्री खेळाडूंचे कर्तृत्व, योगदान याचा फायदा समाजातील अगदी तळागाळातील खेळाडूंपर्यत पोहोचण्यासाठीही खेळाडू, पालक, क्रीडा संघटना, समाज, सरकार, अभ्यासक या सर्वांची एक सक्षम परिसंस्था उभी राहो यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
tatkeneeta6@gmail.com
