तीळ व गूळ आपल्या आहारात घेणे अतिशय जरुरी आहे. थंडीत तिळासारखा स्निग्ध व उष्ण पदार्थ तसेच गुळासारखा लोहयुक्त पदार्थ आपल्या शरीराला ऊर्जा देतो. तीळ व गुळाचे स्वत:चे काही गुणधर्म आहेत.

*  तिळात ओमेगा सहा व तीन ऑइल आहेत. त्यामुळे अनिष्ट कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा

* संधिवात, कोलायटिस त्वचा यावर अतिशय उपयुक्त आहे.

* हाडाची ताकद वाढवते.

* हाय प्रोटीन व फायबरयुक्त असल्याने पचनास चांगले.

* व्हिटामिन बी व ई जास्त प्रमाणात आहेत.

*  जुना गूळ तब्येतीला चांगला असतो.

*  कफ व जंतावर गूळ उपयुक्त आहे.

* आयुर्वेदिक आसव व आरिष्ट बनवताना गुळाचा वापर करतात.

* गुळामुळे रक्त शुद्ध होते, युरिन साफ होते, पित्त कमी होते

* डायबिटिस असेल तर साखरेपेक्षा गूळ वापरणे चांगले.

*  चीन व जपानमध्ये आहारात तिळाच्या तेलाचा खूप वापर करतात.

*  मकरसंक्रांतीनिमित्त इथे तीळ व गुळाच्या पाककृती देत आहे.

तीळ व दुधीचे घावणे

साहित्य :

तीळ – पाव वाटी भाजून कूट करणे/ भरड काढणे.

जाड रवा – १ वाटी

दही – १ टेबल स्पून

दुधी – अर्धी वाटी किसलेला

हिरवी मिरची – १-२ बारीक चिरलेल्या

कोथिंबीर – थोडीशी

साजूक तूप – पाव वाटी

हिरवी चटणी – सव्हिंगसाठी

मीठ – चवीप्रमाणे

फोडणीचे साहित्य – तेल, मोहरी, कडीपत्ता.

कृती :

दुधीचा कीस थोडासा वाफवून घ्या. बाऊलमध्ये तिळाची भरड (कूट) जाड रवा, दही, दुधाचा कीस, हिरवी मिरची तुकडे, कोथिंबीर, मीठ मिक्स करा. त्यात साधारण १ वाटी पाणी घाला. भिजवून ठेवा.

साधारण १०-१५ मि. ठेवा.

घट्ट वाटल्यास परत थोडेसे पाणी घाला. घावणे करण्यापूर्वी या पिठाला तेल, मोहरी व कडीपत्ताची फोडणी द्या व परत पाच मिनिटे झाकून ठेवा. त्यामुळे फोडणीचा स्वाद व वास चांगला मुरतो.

फ्राय पॅनला तूप लावून त्यावर घावने टाका. एक बाजू खमंग भाजल्यावर उलटून दुसरी बाजू चांगली भाजा. वरून तूप सोडा.

गरम घावणे हिरव्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा.

तीळ, गूळ व ओट्स खीर

साहित्य :

भाजलेल्या तिळाचे कूट – २ चमचे

ओट भाजून पावडर – चार चमचे

गूळ – पाव वाटी बारीक चिरलेला

दूध – अर्धा लिटर

वेलची पावडर – १ चमचा

साजूक तुप – १ चमचा

कृती :

प्रथम साजूक तुपावर ओट्स पावडर व तिळाचे कूट परतून घ्या. गरम दूध थोडे थोडे घालत जा व सर्व नीट मिक्स करा. त्यात वेलची पावडर टाका. उकळी आणा. गॅस बंद करून त्यात गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत ढवळत राहा.

गरम किंवा गार सव्‍‌र्ह करा.

तिळाचे कटलेट

साहित्य :

तीळ – पाव वाटी भाजलेले  बटाटे – ३ ते ४ उकडून कुसकरलेले

हिरवी मिरची – ३-४ क्रश करून  मीठ-साखर – चवीप्रमाणे

ओट्स – अर्धी वाटी भाजून पावडर करणे.  तेल – अर्धी वाटी

हिरवी चटणी – सव्हिंगसाठी

कृती :

प्रथम उकडून कुसकरलेले बटाटे, भाजलेले तीळ, मिरची क्रश, मीठ, साखर सर्व एकत्र करून घ्या. त्याचे लिंबापेक्षा मोठे गोळे करून मध्ये दाबून घ्या. नंतर ओटसच्या पावडरमध्ये घोळवून फ्रायपॅनमध्ये तेलावर श्ॉलो फ्राय करा. दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन करा.

गरम गरम कटलेट हिरव्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा.

तीळ व पातीच्या लसणाची चटणी

साहित्य :

तीळ – पाव वाटी भाजून कूट करणे.

लसूण पात – १ मध्यम जुडी

हिरवी मिरची – ३/४ किंवा आवडीप्रमाणे

मीठ, साखर – आवडीप्रमाणे

लिंबाचा रस – अध्र्या लिंबाचा

तिळाचे तेल – १ चमचा

कृती :

प्रथम ओली लसूण पात, मिरच्या बारीक चिरून घ्या. मिक्सरच्या भांडय़ात लसूण, मिरची, मीठ, साखर व थोडेसे पाणी घालून बारीक वाटा.

बाऊलमध्ये काढून त्यात तिळाचे कूट व लिंबाचा रस एकत्र करा.

चटणीत वरून १ चमचा तिळाचे तेल घालून सव्‍‌र्ह करावे.

तिळाचा हलवा

साहित्य :

साधे तीळ – पाव वाटी भाजून कूट करणे

दलिया – १ वाटी

वेलची पावडर – १ चमचा

ड्रायफ्रुट – अर्धी वाटी काजू, बदाम, पिस्ता बारीक तुकडे

साजूक तूप – अर्धी वाटी

गूळ – १ वाटी किसलेला

कृती :

गुळात थोडेसे पाणी घालून गूळ विरघळेपर्यंत गरम करून पाक करा. बाजूला ठेवा.

दलिया साजूक तुपात परतून शिजवून घ्यावा. कढईत दलिया, तिळाचे कूट, ड्रायफ्रूट, वेलची पावडर मिक्स करा.

कढई गॅसवर ठेवून त्यात गुळाचा पाक हळूहळू मिक्स करा. वरून साजूक तूप घाला. ढवळत राहा. शेवटी झाकण ठेवून वाफ आणा.

गरम किंवा गार सव्‍‌र्ह करा. वरून थोडे ड्रायफ्रूट घाला.

अलका फडणीस – response.lokprabha@expressindia.com