15 August 2020

News Flash

साथी हाथ बढमना

फडणीसांनी टीमला संक्रांतीचा तिळगूळ देण्यासाठी आपल्या केबिनमध्ये बोलाविले.

17-lp-prashantफडणीस साहेबांकडे २५ जणांची तगडी टीम होती. हे हुशार, पुढाकार घेणारे, सकारात्मक विचार करणारे २५ जण त्यांना स्वतंत्ररीत्या दिलेल्या कोणत्याही कामाचा फडशा पाडायचे, पण यातला एकही जण स्वत:चे ज्ञान, माहिती शेअर करायला तयार नसायचा. ते फक्त आपल्या कामापुरता विचार करायचे. टीम म्हणून एखादे काम त्यांनी केलेच तर त्यात आपल्या वैयक्तिक यशाचा किती वाटा आहे हे ते सांगायला तत्पर असायचे. थोडक्यात त्यांच्यात सांघिक भावनाच नव्हती.

फडणीसांनी टीमला संक्रांतीचा तिळगूळ देण्यासाठी आपल्या केबिनमध्ये बोलाविले. तिळगुळासोबत त्यांनी पतंगाचा विषय काढून एक गोष्ट सांगावयाला सुरुवात केली. संक्रांतीसाठी एका मुलाने एक सुंदर पतंग बनविला, त्याला सुंदर शेपटी चिकटवली. त्यावर आकर्षक रंगीत चित्रेदेखील काढली. पतंग आकाशात उडू लागला तसतसे पाहणारा जो तो, त्या मुलाचे कौतुक करू लागला. हे पाहून वारा दुखाविला गेला; तो कौतुक करणाऱ्यांना म्हणाला, ‘‘पतंग सुंदर असून काय उपयोग? मी नसलो असतो तर याचा पतंग जमिनीवरच राहिला असता.’’ यावर पतंगाची शेपटी म्हणाली, ‘‘हा वारा मुजोर आहे, मी जर नसते तर या पतंगाने कधीच गटांगळ्या खाल्ल्या असत्या व वाऱ्याच्या तडाख्याने फाटलादेखील असता. मी आहे म्हणून पतंगाला योग्य दिशेला उडता येते. कौतुक करायचेच असेल तर या दोघांचे नाही तर माझे करा.’’ गोष्ट संपली होती; फडणीसांना काय संदेश द्यायचा आहे ते त्यांच्या टीमला कळले होते.

कोणत्याही गोष्टीचे यश हे टीमवर्कमध्ये असते हे टीमला कळले होते तरीदेखील फडणीसांनी एक मजेशीर खेळ खेळावयाचे ठरविले. त्यांनी आपल्या टीमला फुगे फुगविण्याचा टास्क दिला. प्रत्येक टीम मेंबरने फुगा फुगवायचा व त्यावर आपले नाव पेनने लिहायचे. फुगविताना किंवा त्यावर नाव लिहिताना फुगा फुटला तर तो मेंबर खेळातून बाहेर. टीममधून १५ जण अशारीतीने बाहेर पडले.

फडणीसांनी १० नावे लिहिलेले फुगे गोळा केले. त्या दहा जणांना त्यांनी एका खोलीत जायला सांगितले. त्या खोलीमध्ये त्या खोलीत तब्बल २०० फुगे होते ज्यात ते नाव लिहिलेले १० फुगेदेखील मिसळण्यात आले होते. प्रत्येकाला आपल्या नावाचा फुगा १० मिनिटांमध्ये शोधून काढायचा होता. आपल्या नावाचा फुगा काढताना एक जरी दुसरा फुगा फुटला तर तो मेंबर आऊट. अशा विचित्र अटीमुळे कोणताही मेंबर आपल्या नावाचा फुगा दिलेल्या वेळात शोधू शकला नाही.

आता हाच खेळ सर्वाना परत खेळायला सांगितला; यावेळी मात्र नियम जरा बदलला. कोणाचेही नाव लिहिलेला फुगा निवडला तरी चालेल असा तो बदल होता. आता मात्र सर्वानी दिलेल्या वेळात नाव लिहिलेला फुगा मिळविला. फडणीस त्यांच्या टीमला म्हणाले, ‘‘टीमवर्क पण असेच आहे. एखादे काम अवघड असते तेव्हा ते एकटय़ाने पूर्ण करण्याचा अट्टहास करू नये; त्याऐवजी टीमवर्कचा पर्याय वापरावा; परस्परांना मदत केली तर प्रत्येक जण आपले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करू शकतो.’’

कस्टमर डिलाइटसारखी भावना जोपासताना टीमवर्कला पर्याय नाही हे पटवून देण्यासाठी त्यांनी मग ‘पॅरिस क्रोयझंट’ची प्रसिद्ध केस स्टडी सांगावयाचे ठरविले. ‘व्ॉन रीसॉर्ट अ‍ॅण्ड कॅसिनो’ या कंपनीचे मालक एकदा आपल्या कुटुंबीयांसमवेत पॅरिसच्या ‘फोर सिझन’ हॉटेलमध्ये उतरले होते. त्यांची लहान मुलगी सकाळच्या नाश्त्यामध्ये क्रोयझंट खात असताना तिचे वडील म्हणाले, ‘‘बाळ लवकर आटप, पॅरिसच्या गायडेड टूरची वेळ झाली आहे.’’ मुलीने देखील विचार केला, उरलेला अर्धा क्रोयझंट फिरून आल्यावर खाऊ. म्हणून तिने तो उरलेला क्रोयझंट झाकून ठेवला.

संध्याकाळी फिरून आल्यावर तिने तो राहिलेला क्रोयझंट कुठे दिसत आहे का ते शोधण्यास सुरुवात केली. तिचे वडील म्हणाले, ‘‘अगं, ल्युसी तो क्रोयझंट कसा मिळेल? हाऊसकीपिंग स्टाफने तो टाकून दिला असणार.’’ पण फ्रंट ऑफिसतर्फे निरोप आला की ‘तुमचा राहिलेला क्रोयझंट सव्‍‌र्ह करायचा असल्यास जरूर सांगावे.’ ल्युसीच्या आनंदाला पारावर राहिला नाही. पण त्याचवेळी ल्युसीच्या वडिलांना या कस्टमर डिलाइटच्या पाठी असलेल्या टीमवर्कचे कौतुक वाटले.

आता हेच पाहा ना, हाऊसकीपिंग स्टाफने राहिलेल्या क्रोयझंटबद्दल रूम सव्‍‌र्हिसला सांगितले. रूम सव्‍‌र्हिसने तो क्रोयझंट किचन स्टाफकडे नीट ठेवायला दिला. किचन स्टाफने याची माहिती फ्रंट ऑफिसला दिली.  स्टीव्ह व्ॉन यांना प्रत्येक विभागाने साधलेला संवाद व कस्टमर डिलाइट प्रति उचललेला खारीचा वाटा भावला.

स्टीव्ह जॉब्ससारख्या दिग्गजाला देखील टीमवर्क प्रत्यक्षात आणणे आव्हानात्मक वाटायचे. तेव्हा त्यांना एका साध्या माणसाने एक सुरेख प्रात्यक्षिक दाखविले. त्या माणसाकडे एक रॉक टम्बलर होता. तो स्टीव्हला आपल्या अंगणात घेऊन गेला. त्याने ओबडधोबड व काहीसे टोकदार दगड घेतले. थोडी टाल्कम पावडर व पाणी त्याने टम्बलरमध्ये टाकले व मग गोल केलेले दगडदेखील. त्याने टम्बलर चालू केला. अध्र्या तासाने टम्बलरचे झाकण उघडले तेव्हा त्याला सुंदर तुळतुळीत, चकचकीत गोल खडे मिळाले. त्या खडय़ांपासून त्याने एक सुंदर ब्रेसलेट बनविले. तो स्टीव्हला म्हणाला, ‘‘टीमवर्क पण अशीच एक प्रोसेस आहे. ज्यात अनेक माणसे एकत्र येतात, सुरुवातीला त्यांचे अहंकार व स्वभाव टोकदार असतात किंवा त्यांचे व्यक्तिमत्त्व रांगडे असते. त्यामुळे दोन अहंकार एकत्र आल्यावर घर्षण होते, वादविवादाच्या ठिणग्या उडतात; पण जर लीडरने टाल्कम पावडरप्रमाणे मृदू शब्द वापरले व पाण्यासारखे सगळ्यांना आपल्या प्रेमाने न्हाऊ घातले व एकत्र सामावून घेतले तर टीम मेम्बर्सचे व्यक्तिमत्त्व सकारात्मक विचारांनी उजळून जाऊ शकते, त्यांच्या अहंकाराचे कंगोरे झडून जातात व त्यापुढे जाऊन मग लीडरने मेम्बर्सना ध्येयाच्या दोऱ्यामध्ये ब्रेसलेटसारखे एकत्र बांधले तर जगाचे डोळे दिपवून टाकणारे टीमवर्क आकारास येते.’’ स्टीव्ह जॉब्स काय किंवा आपणासारखे सामान्य लोक काय; टीमवर्कचे महत्त्व जाणून घेतले तर एक नवीन इतिहास घडवू शकतो.. नाही का?
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2016 1:19 am

Web Title: work collectively
Next Stories
1 वाटाघाटी
2 पॉझिटिव्ह थिंकिंग
3 कौतुक सोहळा
Just Now!
X