19 October 2019

News Flash

२०१९ सालचे ग्रहपरिवर्तन

राहू, केतूच्या तसंच गुरूच्या परिवर्तनाचा मानवी जीवनावर नेमका काय परिणाम होईल याचा आढावा-

माणसाच्या जीवनावर ग्रहांच्या चलनवलनाचा परिणाम होत असतो हेच फलज्योतिषाचे मुख्य सूत्र आहे.

डॉ. मनीषा देशपांडे – response.lokprabha@expressindia.com
माणसाच्या जीवनावर ग्रहांच्या चलनवलनाचा परिणाम होत असतो हेच फलज्योतिषाचे मुख्य सूत्र आहे. म्हणूनच पुढील वर्षी राहू, केतूच्या तसंच गुरूच्या परिवर्तनाचा मानवी जीवनावर नेमका काय परिणाम होईल याचा आढावा-

अंकशास्त्रीय दृष्टीने २०१९ हे वर्ष गुरुप्रधानतेचे आहे. त्यामुळे या वर्षी जगात गुरूशी संबंधित क्षेत्रात प्रगती होणार आहे. शिक्षण, प्रयोग, संशोधन, अध्यात्म या क्षेत्रांत प्रमुख भरीव काम होणार आहे. ग्रहस्थितीप्रमाणे या वर्षी दोन प्रमुख बदल होणार आहेत. पहिला राहू व केतूचे परिवर्तन तर दुसरे गुरूचे ग्रहपरिवर्तन.

राहू-केतू हे १८ महिन्यांकरिता वक्र गतीने परिवर्तन करतील, तर गुरू वर्षांच्या सुरुवातीला काही दिवस पुढे जाईल व मग परत मागे येईल. तसेच वर्षांच्या शेवटी १३ महिन्यांकरिता पुढच्या राशीत प्रवेश करेल. शनी मात्र या वर्षी एकाच राशीत स्थिरावेल व पुढच्या वर्षी (२०२०) स्थानपरिवर्तन करेल. एकूण ही परिवर्तने या वर्षांत आहेत. आपण आता सविस्तर त्याचे प्रभाव बघू.

राहू-केतू बदल :

राहू-केतू हे छायाग्रह मानले जातात. ते नेहमी उलट पद्धतीने फिरतात. हे दोन्ही ग्रह समान अंतरावर म्हणजे पत्रिकेत सातव्या घरात एकामेकांपासून अंतर राखून असतात.

राहू : मुळात राहू हा मनुष्याला गर्वष्ठि, फाजील आत्मविश्वासी तसेच दुष्ट बनवतो. विषबाधा, संसर्ग असले प्रकारही त्याच्या प्रभावात होतात. तसेच तो संशोधनवृत्ती वाढवतो. पसा, प्रगती, नवीन पद, प्रतिष्ठाही मिळवून देतो.

केतू : केतू माणसाला आध्यात्मिक बनवतो. तो व्यवहारीपणा कमी करतो आणि मानसिकता वाढवतो. बरीच आजारपणं या काळात बळावतात. विरक्ती, शंका अशा गोष्टी वाढतात. पण केतू यश, मान, पुरस्कार असे फायदेही देतो.

या वर्षी ७.३.२०१९ रोजी गुरुवारी पहाटे २:४८ वाजता राहू-केतू परिवर्तन होईल. राहू कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल तर केतू मकर राशीतून धनू राशीत प्रवेश करेल. राहू-केतू इथे पुढचे १८ महिने राहतील व २३.०९.२०२० रोजी परत परिवर्तन करतील.

राहू : केतू १८ महिने त्यांच्या सर्वोच्च राशीत असतील. त्यामुळे सर्व राशींना त्याची शुभफळे प्राप्त होतील.

राशीप्रमाणे राहू-केतूचे फळ :

मेष : भाग्योदय, विदेशातून लाभ, मित्रांचा सहयोग होईल. कष्टात वाढ होईल.

वृषभ : लॉटरी, प्रमोशन, पसा मिळेल, कुटुंबापासून बरेच दिवस दूर राहावे लागेल.

मिथुन: मानसन्मान, शिक्षणात यश, पुरस्कार स्कॉलरशिप मिळेल. मात्र जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.

कर्क : दुखणी बरी होतील, शत्रुत्व कमी होईल.

सिंह : व्यापारात वृद्धी, पसा, शिक्षणात यश मिळवून देईल तर केतू घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी दाखवतो.

कन्या : नोकरी मिळणे, प्रमोशन-व्यापारात वृद्धी दाखवतो तर दगदग कमी करण्याचा सल्ला देतो.

तूळ : लॉटरी, विदेश यात्रा. मोठे पद, मानसन्मान दाखवतो तर हात, खांदा व डोळ्यांचा त्रास दाखवतो.

वृश्चिक : धनदौलत लाभ, नवीन काम, प्रमोशन दाखवतो. तर कुटुंबात वादही आहेत.

धनू : विवाह होणे, विदेश यात्रा, भागीदारीमध्ये यश दाखवतो तर शारीरिक त्रासही आहे.

मकर : शत्रुत्व संपेल, धनलाभ, नवीन कामे मिळतील. यश मिळेल, ईर्षां, द्वेष यांचा त्रासही होईल.

कुंभ : प्रेमात, स्पर्धा परीक्षेत यश, पदलाभ, प्रॉपर्टी इत्यादीचा फायदा दाखवतो तर विरक्ती, शंका यांचाही त्रास आहे.

मीन :  प्रॉपर्टीसंबंधी कामे होतील, करिअर लाभ, पसा दाखवतो. कमरेचा त्रास होईल.

ही होती १२ राशींची ग्रहस्थिती.

आता गुरू परिवर्तन बघू.

गुरू परिवर्तन :

वर्षांच्या सुरुवातीला ३०.०३.२०१९ रोजी शनिवारी पहाटे ३ वाजून ११ मिनिटांनी गुरू धनू राशीत जातोय व २२.०४.२०१९ रोजी  सोमवारी सांयकाळी ५ वाजून ३५ वाजता परत वृश्चिक राशीत येतोय. या काळात गुरू स्वराशीत येत आहे, त्यामुळे या काळातील परीक्षेत मुलांना यश मिळेल, करिअरला नवीन मार्ग मिळतील.

२२.०४.२०१९ ते ५.११.२०१९ पर्यंत गुरू वृश्चिक राशीत राहील तर ५.११.२०१९ रोजी मंगळवारी ६:४२ मिनिटांनी धनू राशीत प्रवेश करेल. पुढचे १३ महिने तो तेथे राहील.

गुरू वृश्चिक राशीत असेपर्यंत १२ राशींत खालील प्रभाव पडतील.

  • वृषभ-तूळ-धनू यांना चिंता वाढेल.
  • मिथुन-कन्या-कुंभ यांना शुभफळ देईल.
  • मेष-सिंह-मकर यांना श्रीप्राप्ती होईल.
  • कर्क-वृश्चिक-मीन यांना कष्टाचे जाईल.

मुळात गुरू हा शुभग्रह असल्यामुळे कोणत्याही राशीला विशेष त्रास देत नाही.

शनी : या वर्षी शनी पूर्ण वर्ष धनू राशीत राहील तेव्हा वृश्चिक, धनू व मकर यांना साडेसाती असेल.

७.०३.२०१९ नंतर केतू धनू राशीत प्रवेश करेल तेव्हा शनी+केतू युती होईल. ही युती काही लोकांना शारीरिक त्रास देईल. नियमित व्यायाम, आहार, आणि कमी ताण घेणे हा एकमेव उपाय आहे.

जागतिक स्तरावरही या काळात अशांतता राहील. युद्ध, मारामारी, दंगल, रोगराई, नसíगक त्रास, भूकंप, त्सुनामीसारखे त्रास होतील. याचबरोबर अध्यात्म, धार्मिक उत्सव, मानव कल्याणाकरिता नवीन शोध होतील.

असे हे वर्ष आशा-निराशेचे आहे.

First Published on January 4, 2019 1:05 am

Web Title: astrology planet transition