प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात, विहिरीत विसर्जित करून ते पाणीसाठे दूषित करण्याऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती पुजून नंतर त्या कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणं ही काळाची गरज आहे.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे स्वरूप, त्याचा आयाम आता पूर्णपणे बदलतो आहे.. काही अपवाद वगळता या सणाच्या उपयुक्ततेकडे दुर्लक्ष होत चालले आहे. गणेशोत्सवात सगळ्यात मोठा झालेला बदल म्हणजे गणपतीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचा झालेला व्यापक शिरकाव तथा त्यातून निर्माण होत असलेल्या भयावह प्रदूषणाच्या समस्या. सोबतच पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर, सजावटीकरिता प्लास्टिकचा वापर, थर्माकोलसारख्या विघटन न होणाऱ्या साहित्याचा वापर, जास्त घातक रासायनिक रंगाचा वापर, गुलालाची अतिरेकी उधळण, या सर्वामुळे मोठय़ा प्रमाणावर जलप्रदूषण होऊन पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे.

lp69
या वर्षी राज्यात मराठवाडा तथा विदर्भात जनता दुष्काळाने होरपळून निघते आहे. ऐन पावसाळ्यात गुरांना चारा तथा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर कित्येक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे.. पाण्याअभावी लाखो हेक्टर जमीन पेरणीविना पडीक पडलेली आहे. या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सवातून मोठय़ा प्रमाणात होणारे जलप्रदूषण रोखणे आवश्यक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठमोठय़ा गणपती मूर्ती पाण्यात विसर्जित होण्याएवढे पाणीदेखील नदी पात्रात नसते. गणेशभक्तांद्वारा त्या मूर्ती तशाच सोडून देण्यात येतात. या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. नदीपात्रात साचून राहतात. पर्यायाने नदीपात्रात प्लास्टरचा थर निर्माण होतो. परिणामी पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. पर्यायाने जमिनीतील पाण्याची पातळी कमी होते. विहिरी, बोअर, तलाव आदींमध्ये पाणी न झिरपल्यामुळे ते कोरडे पडण्याचा धोका संभवतो. आपण नदीतील गाळाची माती सुपीक म्हणतो पण प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नदीतील गाळाच्या मातीचा पोत खराब होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मूर्ती रासायनिक रंगांनी रंगवल्या जातात. यामुळे मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण होते व त्याचा मानवी जीवनावर मोठा दुष्परिणाम जाणवतो. काळ्या रंगात ऑक्साइड रसायन असते. यामुळे मूत्रसंस्थेचे कार्य बंद पडते. हिरव्या रंगातील कॉपर सल्फेटमुळे डोळ्यांचे विकार होतात. चांदीसारख्या रंगात असणाऱ्या अॅल्युमिनियम ब्रोमाईड रसायनामुळे कर्करोग होतो. निळ्या रंगात पार्शियन नीळ असते. यामुळे त्वचेचे आजार संभवतात. तर लाल रंगातील मक्र्युरी सल्फाईड हे विषारी रसायन मोठय़ा प्रमाणावर असते. त्यामुळे त्वचेचा रोग होतो. गणेशोत्सवानंतर नदी, तलाव, धरणे, बंधारे आदींची पाहणी केली असता हजारोंच्या वर पाण्यात न विरघळलेल्या व भंगलेल्या गणेशमूर्तीमुळे आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व बघून कुण्याही खऱ्या गणेशभक्ताचे मन विषण्ण झाल्यावाचून राहत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व गणेशमूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडूमातीच्या गणेशमूर्तीचा वापर करायला हवा.
विघ्नहर्त्यांच्या प्लास्टरच्या मूर्तीमुळे लाखों जलचरांवर, समुद्री जीवांवर मृत्युमुखी पडण्याचे विघ्न ओढवते आहे. नद्या या आपल्या जीवनदात्या म्हणून ओळखल्या जातात. पिण्याच्या पाण्याच्या सगळ्यात मोठय़ा स्रोत या नद्या व त्यावरील धरणे होत. मात्र याच नद्यांमध्ये प्लास्टरच्या मूर्तीसोबतच हजारो टन निर्माल्य विसर्जित करत मोठय़ा प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. दुष्काळ, पाण्याचे दुíभक्ष असताना गणेशविसर्जनाद्वारे मोठय़ा प्रमाणावर जलप्रदूषण करणे ही ईश्वरभक्ती ठरेल का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन हे वाहत्या पाण्याऐवजी कृत्रिम गणेशकुंडात करण्याची आवश्यकता आहे.

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा
married woman murder her son
सोलापूर : लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण उजेडात येऊ नये म्हणून विवाहितेने केला मुलाचा खून अन् स्वतः केले विषप्राशन

lp70इको-फ्रेंडली गणेशोत्सवासाठी अकोला वनविभागाचे व्हिजन -२०१५
पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवण्यासाठी अकोल्यात वनविभागाच्या अखत्यारीतील सामाजिक वनीकरण विभागाने या वर्षी शाडूच्या मातीच्या २५ हजाराहून अधिक गणेशमूर्ती निर्मितीचा व्हिजन २०१५ हा भव्य उपक्रम सुरू केला आहे. सामाजिक वनीकरण अकोलाचे सुनील जयस्वाल, उपसंचालक डॉ. आर. एन. राय तथा सामाजिक वनीकरणचे जनसंपर्क अधिकारी गोिवद पांडे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर हा उपक्रम राबवला जातोय. राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांद्वारा हा उपक्रम पूर्ण करण्यात येणार आहे. एका शाळेला एक साचा व एका साच्याद्वारे दर दिवशी शंभर विद्यार्थी १०० गणेशमूर्ती निर्माण करणार आहेत. याकरिता जिल्हय़ात १० साचे उपलब्ध करत रोज दहा शाळांत १० ७ १०० = १००० शाडूचे गणपती निर्माण करण्याचे मिशन अकोला वनविभागाने आखले आहे. त्यानंतर हे साचे फिरत्या क्रमाने दर दिवशी हलवले जाऊन जिल्हाभरच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या शाळांतून २५ हजार गणेशमूर्ती निर्माण करण्याचा व्हिजन २०१५ हा उपक्रम पूर्णत्वास नेत आहेत. यासाठी सामाजिक वनीकरणाने प्रथम एका मूर्तिकाराच्या मदतीने १० शिक्षकांना प्रशिक्षित केले, तर त्या १० शिक्षकांनी एकास दहा या प्रमाणात १०० शिक्षकांना प्रशिक्षित केले, तर या १०० शिक्षकांनी २५ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करत साखळीबद्ध उपक्रम राबवला आहे. एका गणेशमूर्तीसाठी दीड किलो माती वापरण्यात आली, तर रंग देण्यासाठी हळद, बीट, कोळशाचा बुक्का, चुना आदींचा वापर करण्यात आला. २० मिनिटांच्या समयावधीत एक मूर्ती तयार होत असल्याची माहिती गोविंद पांडे यांनी दिली, तर एका मूर्तीचा खर्च हा फक्त रु. १५ येत असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशमूर्ती स्वनिर्मित बनवल्याचा आनंद हे या उपक्रमाचे मोठे यश असल्याचे सिद्ध होत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी निसर्गकट्टय़ाची विद्यार्थी चळवळ
पर्यावरणाविषयी, जंगलांविषयी, वन्यप्राण्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागृती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी अकोल्यात निसर्ग चळवळ चालवली आहे. निसर्गकट्टा म्हणून ही विद्यार्थी चळवळ अल्पावधीतच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. गेल्या १६ वर्षांपासून विविध उत्सव पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी झटत आहे. मात्र यात लहानग्यांच्या आवडत्या बाप्पांचा उत्सव निसर्गपूरक साजरा करण्यासाठी विशेष जनजागृती केली जाते आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी याकरिता निसर्गकट्टा पर्यावरण संवर्धन चळवळीची सुरुवात झाली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा भाग म्हणून निसर्गकट्टय़ाच्या वतीने २००६ पासून विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून अगदी सोप्या रीतीने गणेशमूर्ती निर्माण करण्याची कार्यशाळा जिल्हय़ात शेकडो ठिकाणी घेण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना घराघरांत जावी यासाठी निसर्गकट्टाचे अमोल सावंत, संदीप वाघडकर, संतोष सहारे, गौरव झटाले, अजीम शेख, प्रेम अवचार, हरीश शर्मा हे अविरत राबत आहेत. हेच नव्हे, तर नागरिकांना शंभर टक्के शाडूची गणेशमूर्ती उपलब्ध व्हावी म्हणून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर गणेशनिर्मिती व विक्री करत आहेत. शिवाय मूर्ती घेणाऱ्यांनी घरीच गणपती विसर्जन करण्याचे आवाहन ते गणेशभक्तांना करतात. याव्यतिरिक्त पारंपरिक मूर्तिकारांनी मातीचीच गणेशमूर्ती निर्मिती करावी यासाठीपण निसर्गकट्टा प्रयत्न करतो आहे. २००३ मध्ये सातपुडा फाऊंडेशन तथा निसर्गकट्टाद्वारे अकोला शहरातील पहिले गणेश विसर्जन कुंड निर्माण केले. त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे अकोला पालिकेने पुढाकार घेत मोर्णा नदीवर भव्य गणेश विसर्जन कुंड निर्माण करून लोकार्पित केले. यासोबतच निर्माल्य संकलन, पर्यावरणपूरक गणेश सजावट इत्यादी उपक्रम निसर्गकट्टा राबवतो आहे. या पर्यावरणपूरक आनंदोत्सवाने निसर्गकट्टा विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे.