आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com
पर्यटन विशेष – भव्य दिव्य वास्तू
एकदा लडाखला गेलं की ती भूमी आपल्याला पुन्हा पुन्हा साद घालत राहते. इतर कोणत्याही ठिकाणचं नियोजन केलं तरी ते रद्द करून आपण पुन्हा पुन्हा लडाखलाच जात राहतो. तिथला आपल्याला नादच लागतो म्हणा ना..

साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी साहसी पर्यटकांव्यतिरिक्त इतर कुणाच्या खिजगणतीत नसलेलं लडाख आता पर्यटकांच्या पसंतीत पहिल्या क्रमांकावर आलं आहे. आज प्रत्येकाला लडाखला जायचं आहे.. कुणाला कुटुंबासोबत, कुणाला मित्रमंडळींना घेऊन, कुणाला ग्रुपने तर कुणाला एकटंच, कुणाला मोटरसायकलवर, कुणाला सायकलवरसुद्धा, कुणाला कधीही न अनुभवलेल्या थंडीच्या मोसमात चादर ट्रेकसाठी तर कुणाला स्नोलेपर्डच्या शोधात..

satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…

बऱ्याचदा आपण एखाद्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलो की पुन्हा त्या जागी क्वचितच जातो. तो वेळ आणि ते पैसे वापरून दुसरं काहीतरी बघायचं आपण ठरवतो. विश्वास ठेवा लडाखच्या बाबतीत असं होतं नाही. तुम्ही लडाखला एकदा गेलात की लडाखचं भूत तुमच्या डोक्यावर बसतं आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा आकर्षति करतं. लडाख जणू काही तुम्हाला त्याच्याकडे पुन्हा पुन्हा खेचूनच नेतं. काहीशी दैवी किंवा आध्यात्मिक ताकतच म्हणा ना. तुम्हाला एक प्रकारे लडाखचा नादच लागतो.

तुम्ही लडाखहून परत आल्यानंतर दुसऱ्या ट्रिपच्या नियोजनाला सुरुवात करता आणि शेवटी पुन्हा लडाखला जायचंच नक्की करता.

मित्रांनो हे शेकडो लोकांच्या बाबतीत झालेलं मी पाहिलं आहे आणि मी तर या गोष्टीचं जिवंत उदाहरण आहे. १९९५ मध्ये लडाखची माझी पहिली भेट मोटरसायकलवरून झालेली थरारक भेट होती, तरीही दोन वर्षांनी पुन्हा लडाखला गेलो. गेल्या २२ वर्षांत लडाखला अनेक वाऱ्या झाल्या आहेत. तरीही लडाखमध्ये अजूनही खूप काही बघायचं बाकी आहे असं मला वाटतं.

लडाखचं सौंदर्य

लडाखमध्ये आहे काय नेमकं, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. खरं तर लडाख हा प्रांत सर्वसामान्यांच्या निसर्गाच्या व्याख्येत बसणाराच नाही. त्यांच्या दृष्टीने निसर्ग म्हणजे बर्फाच्छादित पर्वतरांगा, त्यातून खळाळत वाहणाऱ्या नद्या, फुलं, फळं, डेरेदार वृक्ष, घनदाट जंगले, नदी, नाले, पक्षी, प्राणी आणि बरंच काही. लडाखमध्ये यातील अनेक गोष्टी नाहीत. पण जे काही आहे ते अद्भुत, विस्मयकारक, उत्तुंग आणि अफाट आहे. निसर्गासमोर मनुष्यप्राणी किती कस्पटासमान आहे याची लडाखमध्ये वेळोवेळी प्रचीती येते. लडाख म्हणजे जगाला शांततेची शिकवण देणाऱ्या बुद्धाची भूमी. लडाख

म्हणजे उघडे बोडके डोंगर. त्यावर निसर्गाने केलेलं रंगकाम, लडाख म्हणजे अथांग पसरलेली विविधरंगी तळी. लडाख म्हणजे जगातील सर्वात उंचीवरील रस्ते. कोणतेही प्रदूषण नसलेलं ठिकाण म्हणजे लडाख. आकाशगंगा पाहण्यासाठी जगातील उत्तम जागा म्हणजे लडाख, लडाख म्हणजे निसर्गदेवतेने फुरसतीत निर्माण केलेला आविष्कार. डोळ्यांत आणि कॅमेऱ्यातसुद्धा न मावणारा निसर्ग म्हणजे लडाख.

 आध्यात्मिक लडाख

लडाख ही लडाखी साधूसंतांची म्हणजे बुद्धिस्ट लामांची भूमी. ते जगात शांतता, प्रेम, सद्भावनेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सहवासात आपण शहरी मंडळी आलो तर जात, धर्म, आंदोलनं, भ्रष्टाचार, दंगली अशा वातावरणात वाढलेल्या आपल्या मनावर परिणाम होतो.

 आदरातिथ्य

जगभरात तुम्ही कुठेही पर्यटक म्हणून गेला असाल पण लडाखच्या आदरातिथ्याला तोड नाही. मुळातच पहाडी माणसं बाहेरून करारी आणि कडक वाटतात पण आतून खूप गोड असतात आणि लडाखी माणसांनी त्यातही उंची गाठली आहे. लडाखी मग तो कोणत्याही धर्माचा असेल कमरेत थोडंसं वाकून ‘झुले’ म्हटलं की ही मंडळी तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतात.

सर्वोत्तम फोटोग्राफी

लडाख एवढं सुंदर आहे की जाऊन आलेल्या प्रत्येकाला असं वाटू लागतं की जगातला उत्तम फोटोग्राफर मीच आहे, पण ती कमाल आपली नसते. निर्सगाने एवढं भरभरून दिलं आहे लडाखला की कुणीही फोटो काढले तरी ते सर्वोत्कृष्ट वाटतात.

लडाखच्या गोष्टी

गमतीत सांगायचं तर लडाखला जाऊन आलेल्या व्यक्तीला इतर लोक टाळायला लागतात. कारण ती व्यक्ती लडाखबद्दल एवढं बोलायला लागते की लडाखला न गेलेली व्यक्ती कंटाळून तिला टाळू लागते. तुम्ही लडाखला जाऊन आलेले असाल आणि नंतर तुम्ही स्वित्र्झलड, नॉर्वे, ब्राझील, ऑस्ट्रेलिया किंवा जगात कुठेही असाल तरी तुम्ही तिथली लडाखशी तुलना करू लागला. पण काय करणार, लडाख आहेच तेवढं सुंदर.

भारतीय सन्य

भारतीय सेना दलातील लोकांना प्रत्यक्ष भेटायचं असेल तर लडाखसारखं दुसरं ठिकाण भारतात नाही. १९९९ च्या कारगिल युद्धानंतर लेहमध्ये भारतीय सन्याच्या १४ व्या कोअरची स्थापना झाली. त्यामुळे तिथे आता मूळ लडाखी लोकांपेक्षा सनिक जास्त दिसतात. त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधता येतो. प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाता येतं. ज्या ठिकाणी आपल्या सनिकांचं रक्त सांडलं आहे तिथे नतमस्तक होता येतं. देशाभिमान काय असतो त्याची अनुभूती घेता येते. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. माझ्यासोबत आलेल्या पर्यटकांनी एका सनिकाला विचारलं, ‘‘आपका नाम क्या, और कहासे हो?’’ त्याने उत्तर दिलं, ‘‘िहदुस्थानसे.’’ आपल्या लोकांचा उत्साह भारी. ते म्हणाले, ‘‘हम भी िहदुस्थानी है.. लेकिन आप िहदुस्थान में कहाँ से हो?’’ मग मात्र त्यानं विचारलं, ‘‘िहदुस्थानी होना हमारे लिए काफी नही क्या? क्या जरूरत है किस प्रांत से होना, किस धर्म और जाती का होना? हम अपने आप को सिर्फ िहदुस्थानी क्यू नही कहते?’’ डोळ्यात अंजन घालणारं हे जळजळीत सत्य त्याने मांडलं होतं.

लडाखमध्ये कुठे बौद्ध मॉनेस्ट्रीमधून लडाखी प्रार्थनेचं ‘ओम माने पदंमे हुंम’चे स्वर कानावर पडतात, केव्हा अजानचे सूर कानी येतात आणि त्याच वेळेला गुरुद्वारातून गुरुवाणीदेखील ऐकू येते. राष्ट्रीय एकात्मतेचा अनुभव आणि सर्व धर्म गुण्यागोिवदाने कसे राहतात हे पाहण्यासाठी लडाखलाच यावं लागेल.