डॉ. अभिजीत म्हाळंक – response.lokprabha@expressindia.com
चातुर्मासाच्या काळात हवामान सतत आणि झपाटय़ाने बदलत असते. त्याचा शरीरावर परिणाम होत असतो. या बदलत्या हवामानाशी आपल्या शरीराला जुळवून घेणे सोपे जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या काळातल्या आहाराची आखणी केली आहे.

आषाढी एकादशीपासून काíतकी एकादशीपर्यंतच्या काळाला आपल्याकडे चातुर्मास म्हणतात. या चार महिन्यांत आरोग्य उत्तम राहावे या उद्देशानेच यातील उपक्रम निवडलेले आहेत. पण अनेकदा इतक्या डोळसपणे आपण त्याकडे पाहत नाही. या चार महिन्यांत हवामानात झपाटय़ाने बदल घडतात. चातुर्मासाच्या प्रारंभी पावसाचा जोर असतो, नंतर आश्विन महिन्यात शारदीय उष्मा घामाघूम करते तर काíतकात हिवाळा अंगावर शहारा आणतो. या स्थित्यंतरांचा परिणाम आपल्या शारीरिक तसंच मानसिक आरोग्यावर होतच असतो. या बदलांना सामोरे जाताना आपली जीवनशैली कशी असावी, आहार कसा असावा आणि आचरण, व्यायाम वगरे कसे असावेत याचेच मार्गदर्शन आपल्या पूर्वजांनी चातुर्मास या संकल्पनेतून केलेले आहे. त्यांच्या वैज्ञानिकदृष्टीचे आणि कल्पकतेचे कौतुकच करायला हवे.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

चातुर्मास सुरू होतो तेव्हा पावसाळ्यामुळे भूक व पचनशक्ती मंदावलेली असते. म्हणून या काळात येणाऱ्या आषाढी एकादशीला आणि गुरुपौर्णिमेला उपवास करण्याची प्रथा आहे. पचनसंस्थेला विश्रांती मिळावी तसेच या काळात शरीरात शिरणारे रोगजंतू आतडय़ातील एन्झाईम्समुळे मारले जावेत हा त्यामागचा हेतू आहे. वांगे पचायला जड असते आणि पोटात गॅसेस उत्पन्न करू शकते. या काळात ते हितकारक नसते, म्हणून चातुर्मासात वांगे खात नाहीत. छोलेदेखील या काळात शक्यतो टाळावेत, कारण तेही गॅसेस उत्पन्न करतात. मांसाहार पचायला जड असल्याने तोही आध्यात्मिक निमित्त साधून या काळात बंद केला जातो. चालण्यामुळे भूक व पचनशक्ती सुधारते. म्हणून पंढरीची वारी या काळात असते. विठ्ठल-विठ्ठल नामस्मरणामुळे हृद्रोग होण्याची शक्यता कमी होते असेही मानले जाते. वारीला जाणे प्रत्येकाला शक्य नसले तरी चालण्याचा व्यायाम आणि नामस्मरण करणे नक्कीच अशक्य नाही. पावसाळ्यात सतत ढगाळ वातावरण असल्याने व अनेकदा सूर्यदर्शन होत नसल्याने डिप्रेशन, अस्वस्थतादेखील जाणवू शकते. चातुर्मासातील व्रतवैकल्ये, पूजाअर्चना, जपजाप्य, पोथीवाचन, भजनकीर्तन तसंच तीर्थक्षेत्री होणाऱ्या जत्रांच्या माध्यमातून मनाला उभारी व प्रेरणा मिळावी, नराश्य दूर व्हावे आणि मानसिक आरोग्य टिकून राहावे अशी त्यामागे दूरदृष्टी आहे.

हरभऱ्याच्या डाळीचे पीठ आणि तिखट वापरून केलेला आषाढ या काळात तळतात. कारण त्यातले मसाले भूक तसेच पचनशक्ती वाढवतात. खरे तर हरबऱ्याच्या डाळीचे पीठ रूक्ष असते आणि गॅसेस उत्पन्न करू शकते. ते बाधू नये म्हणून आषाढ स्निग्ध तेलात तळला जातो आणि सायीच्या दह्यबरोबर खाल्ला जातो. जोडीला गूळ, गव्हाचे पीठ व रवा वापरून केलेल्या कापण्याही असतात. यातला गूळ भूक वाढवतो आणि शरीराला लोह, कॅल्शियम, पोटॅशियम  आणि फॉस्फरस पुरवतो तर गहू कबरेदके, ब जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ (फायबर्स), खनिजे आणि ऊर्जा पुरवतो. म्हणजे शरीराला उष्मांक आणि खनिजे तर मिळतील पण अगदी बठा व्यवसाय असणाऱ्याचेही वजन वाढणार नाही एवढी काळजी हे घटक निवडताना आपल्या पूर्वजांनी घेतलेली आहे.

दीपअमावास्येने आषाढमासाचा शेवट होतो त्यादिवशी नवेद्याला पुरणपोळी असते. त्यातही पुन्हा हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, गूळ आणि गव्हाचे पीठ हेच घटक हजेरी लावतात. वर पुरणात वेलदोडे, जायफळ आणि केशर असते. हे तिघेही श्वसनमार्ग साफ ठेवतात आणि त्यातल्या जंतूंचा नाश करतात. सर्दी-खोकला आणि फ्लू त्यामुळे आपोआप टळतात. या सर्व घटकांमुळे पुरण परिपूर्ण मिष्टान्न होते, म्हणून तर त्याला ‘पुरण’ असे नाव आहे. ते लाभदायक असल्याने दीप अमावास्येनंतर पाच दिवसांनी येणाऱ्या नागपंचमीला कडबू करताना पुरणच वापरले जाते. पुराणातील गुळाची उष्णता बाधू नये म्हणून या पदार्थावर साजूक तूप घेतले जाते आणि पुरणपोळी दुधाबरोबर खाल्ली जाते. श्रावणी मंगळवारी मंगळागौरीला पुरण असते. मंगळागौरीला केल्या जाणाऱ्या भाजणीच्या वडय़ांचे गुणधर्मही आषाढाप्रमाणेच असतात आणि तेही दह्यबरोबरच खाल्ले जातात. मटकीची उसळ, वालाचे बिरडे, पडवळाची भाजी, खमंग काकडी आणि पंचामृत यांचाही मंगळागौरीच्या मेनूत समावेश असतो. हे सर्वच जिन्नस प्रथिने तसेच जीवनसत्त्वे यांनी समृद्ध असतात. रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहावी म्हणून ते या काळात खायचे असतात.

श्रावणमासाची गोडी द्विगुणित करतो तो राखीपौर्णिमेचा नारळीभात. तोही पुरणाप्रमाणेच पोषक व बलवर्धक असतो. तो करताना तांदूळ आणि नारळाचा कीस भाजून घेतले जातात, ज्यामुळे हा भात या काळात पचनशक्ती फार उत्तम नसूनही सहज पचतो. साखर, वेलदोडे, लवंग, बेदाणे, काजू आणि बदाम हे या भातात घातले जाणारे अन्य घटक त्याचे पोषणमूल्य आणखी वाढवतात. वजन न वाढवता पोषकद्रव्ये पुरवणारा हा भात चॉकलेट, पेस्ट्री व केकपेक्षा केव्हाही चांगलाच आहे. राखीपौर्णिमेनंतर आठ दिवसांनी येणाऱ्या जन्माष्टमीला केला जाणारा गोपाळकाला पोहे, दही, दूध, तेल, काकडी, मिरच्या, आले आणि डाळे वापरून केलेला असतो. या मिश्रणातून शरीराला एकाच वेळी प्रथिने, कबरेदके व स्निग्ध पदार्थ मिळतात. विशेषत: मुलांची सर्वागीण वाढ नीट व्हावी यासाठी तो फारच चांगला.

यानंतर साधारण १५ दिवसांनी येणाऱ्या हरितालिका आणि गौरीगणपतीला आरोग्याच्या दृष्टीने असेच महत्त्व आहे. हरितालिकेचा २४ तासांचा उपवास झाल्यावर नारळ, गूळ, कणिक किंवा उकड वापरून केलेले मोदक खाल्ले की गमावलेल्या कॅलरीज् भरून निघतात पण लगेच वजन वाढण्याचे भय नसते. गौरीगणपतीला वाहिल्या जाणाऱ्या २१ प्रकारच्या पत्री व दुर्वा म्हणजे तर औषधी वनस्पतींचा खजिनाच असतो. गरजेनुसार त्यांचा वापर रोग दूर करण्यासाठी आणि आरोग्य टिकवण्यासाठी करावा हा संदेशच त्यातून दिलेला आहे. या वेळी प्रसाद म्हणून दिले जाणारे पंचामृत दूध, दही, तूप, मध व साखर यांपासून केलेले असते. शरीरातील पेशींच्या पोषणासाठी आवश्यक असणारी सर्व द्रव्ये एकटय़ा पंचामृतातून मिळतात. बालकांसाठी तर ते उत्तम टॉनिकच आहे.

गणेशोत्सवानंतर साधारण १५ दिवसांनी प्रारंभ होणाऱ्या नवरात्रात ज्या नवदुर्गाचे पूजन केले जाते त्या नवदुर्गा सृष्टीत अनुक्रमे हरीतकी, ब्राह्मी, हळीव, कोहळा, जवस, चांगेरी, दवणा, तुळसव शतावरी या नऊ औषधी वनस्पतींच्या रूपात अस्तित्वात असतात असे मानले जाते. या वनस्पतींचे औषधी गुणधर्म अधोरेखित करणे हाच यामागचा उद्देश आहे. काही लोक नवरात्रात उपवास करतात. त्यामुळे गमावलेल्या कॅलरीज् भरून काढण्यासाठी तुपात तळलेल्या आणि साखर घालून केलेल्या मद्याचा कडकण्या नवरात्राच्या अखेरीस सेवन केल्या जातात. शारदीय नवरात्रात रात्री सुखद असल्या तरी दिवसा सूर्य तळपत असतो. त्यामुळे वाढलेली उष्णता बाधू नये म्हणून कोजागिरीला थंड दूध प्यायची पद्धत आहे. अर्थात शारदीय काळात चहा-कॉफीऐवजी रोज दूध घेणेच अधिक चांगले.

यानंतर येणाऱ्या दसरा-दिवाळीला गोडधोड पदार्थाची रेलचेल असते. दिवाळीपासून हवामान बदलणे अपेक्षित असते. शारदीय उष्णता जाऊन थंडी जोर धरू लागते. त्यामुळे भूक कडकडून लागायला लागते. परिणामत: फराळाचे पदार्थ पचवणे फारसे अवघड नसते. पण आजकालची बठी जीवनशैली, व्यायामाची कमतरता आणि समाजात बळावलेले हृद्रोग-मधुमेहासारखे आजार लक्षात घेता इथे सावधता बाळगायला हवी. फराळाचा प्रत्येक जिन्नस ‘कॅॅलरीज्’ने भरलेला असतो. त्याचा त्रास होऊ नये यासाठी फराळ दिवसाच करावा, सूर्यास्तानंतर करू नये. तसेच या काळात चहाकॉफी, चॉकलेट, पेस्ट्री, बेकरी उत्पादने, फास्ट फूड, पिझ्झाबर्गर, वडे सामोसे, डोसा उत्तप्पा, कृत्रिम शीतपेये असे भरपूर उष्मांक असणारे पदार्थ पूर्णत टाळावेत. पावसाळ्यामुळे व्यायामात खंड पडला असेल तर तो कटाक्षाने पुन्हा सुरू करावा.

काíतकी एकादशीला चातुर्मास संपतो. वांगी वगरे वज्र्य पदार्थ खायला मग मुभा असते, कारण हिवाळ्यात ते हानीकारक ठरत नाहीत. चातुर्मास या संकल्पनेमागे आहारशास्त्रीय तसेच वैज्ञानिक बठक आहे हे यावरून स्पष्ट होईल. या कालावधीत आरोग्य बिघडण्याची शक्यता बरीच जास्त असते, म्हणून आपल्या पूर्वजांनीही तात्त्विक चौकट आखून दिली आहे. जुनाट रूढी म्हणून तिची अवहेलना न करता तिचे पालन आपण डोळसपणे करायला हवे. पुढील मुद्दे विशेष करून लक्षात घ्यायला हवेत:

  • या चार महिन्यांत हवामान अनेकदा बदलते. हे बदल लक्षात घेऊन सुयोग्य आहारविहार, व्यायाम व जीवनशैली निवडायला हवी.
  • चातुर्मासाच्या प्रारंभी असणारा पाऊस, नंतर पडणारे शारदीय ऊन आणि काíतकात अवतरणारी थंडी यापासून स्वतचा बचाव करावा. आपली वेशभूषा त्यानुसार ठेवावी. यापकी कुणाशीही जास्त संपर्क आल्यास आरोग्य बिघडल्यावाचून राहत नाही. सहली व ट्रेकिंगला जाताना हे लक्षात घ्यावे.
  • सणावाराला केल्या जाणाऱ्या पदार्थाचे सेवन आपले वय, वजन, प्रकृती, पथ्यपाणी लक्षात घेऊन करावे. आपण जितक्या कॅलरीज् सेवन करत आहोत तितक्या जाळतो आहोत का याचा हिशेब मनात करून पाहावा.
  • व्यायाम नियमितपणे करावा हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पावसाळ्यामुळे मदानी व्यायाम करणे अशक्य झाले तरी योग, प्राणायाम व ध्यानधारणा यांची साथ सोडू नये. जपजाप्य, मंत्रपठण व भजनकीर्तन हेही ध्यानाचेच प्रकार आहेत हे लक्षात घेऊन त्यांचा वापर करावा. पावसाळा संपला की मदानी व्यायाम पुन्हा सुरू करावा.
  • उपवासाचा उद्देश पचनसंस्थेला विश्रांती देणे हाच असतो. त्यासाठी फळे, मध, दूध, खीर, राजगिरा, ताक असे हलके पदार्थच सेवन करायला हवेत. साबुदाणा, वरई, शेंगदाणे, साखर, खवा, बटाटा व रताळी हे जिन्नस पचायला जड असल्याने व कबरेदकांनी युक्त असल्याने त्यांचे सेवन केल्यास उपवासाचा खरा उद्देश साध्य होत नाही हे लक्षात घ्यावे. उपवास करायचे का व करायचे झाल्यास किती प्रमाणात हे ठरवताना स्वतचे वय, वजन, प्रकृती, व्यवसाय, दिनक्रम, पथ्यपाणी आदी बाबी लक्षात घेऊन ठरवावे.
  • चातुर्मासाच्या प्रारंभी पावसाळ्यात आणि काíतकातील हिवाळ्यात गरम पाणी पिणे चांगले. शारदीय उन्हात साधे पाणी प्यावे, पण फ्रिज वा कूलरमधील पाणी पिऊ नये. तसेच कृत्रिम शीतपेयेही पिऊ नयेत. आईसक्रीम खाऊ नये.
  • पावसाळ्यात मसाज, वाफारा (स्वेदन) व औषधी एनिमा (बस्ती) घेतल्याने तत्कालीन सांधेदुखी, कंबरदुखी, पोटाचे विकार असे अनेक रोग वर्षभर डोके वर काढत नाहीत. शरदात औषधीविरेचन घेतल्याने अनेक त्वचारोग, यकृतरोग, पचनविकार, मूळव्याध वगरे आजारांत असाच लाभ होतो. थंडीत त्वचा कोरडी पडणे, सर्दी-खोकला, संधिवात अशा त्रासांसाठी पुन्हा मसाजेस व वाफारा(स्वेदन) घेणे हितकर ठरते.

अशा प्रकारे थोडे ताळतंत्र पाळल्यास चातुर्मासाचा आनंद छान लुटता येतो, स्वार्थ आणि परमार्थ यांचा मेळ घालता येतो. त्यासाठी हवी फक्त सजगता आणि वैज्ञानिक दृष्टी!