पं. विजय जकातदार – response.lokprabha@expressindia.com

विवाह हा स्त्री-पुरुषांच्या जीवनाला कलाटणी देणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण. आपली रक्ताची नाती बाजूला सारून संपूर्णपणे नवीन अशा जोडलेल्या नात्याबरोबर सहजीवन सुरू करण्याचा प्रसंग. संसाररथाची ही दोन चाकं मजबूत नसतील, त्यांच्यातील परस्परांतील सामंजस्याचा पाया पक्का नसेल तर त्यावरील इमारत अर्थात वैवाहिक जीवन हे निश्चितच अयशस्वितेकडे झुकणारे असेल. अर्थातच याचे पर्यवसान विवाहविच्छेदनात होण्यात वेळ लागणार नाही. त्यामुळेच सहजीवन असफलतेकडे होऊ नये असे वाटत असेल तर मुख्य प्रश्न उभा राहतो तो वैवाहिक सौख्याचा.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…

कोण कुठला कोलकात्याचा सुब्रतो पुण्यात येतो आणि कुलकण्र्याच्या माधवीला मागणी घालतो. एखादा पिल्लई पंजाबच्या कौरबरोबर शादी होण्याची स्वप्नं कॉलेज कट्टय़ावर बघत असतो. जाती-भेद-धर्माच्या पलीकडे जाऊन सध्याचे वैवाहिक सहजीवन नवी पिढी समाजात रुजवू पाहात आहे. हे सहजीवन रुजवताना, सहजीवनात पहिले पाऊल टाकताना प्रेम आणि सहजीवनांतून येणारे आकर्षण, मौजमजा यांचाच विचार जास्त होतो. त्यामुळे सहजीवन सुरू झाल्यानंतर आवश्यक असणारी तडजोड, संयम यांच्या अभावामुळे परस्परांवरील विश्वास डळमळीत होऊन घटस्फोटाचे प्रमाण वाढू लागलेले दिसत आहे. एका संस्कृत सुभाषितात म्हटलेच आहे की,

विवाह श्वार्थ मन्हंच् जनंनं मरणं तथा ।
कण्ठेबध्वा दृढम् सूत्रम् यत्रस्थ तत्र नियते ॥

अर्थात विवाह, जन्म आणि मृत्यू या तिन्ही गोष्टींना नियतीच्या एका सूत्रांत बांधले असून मनुष्य प्राणिमात्रांचे त्यावर संपूर्णतया नियंत्रण नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याचाच अर्थ विवाह हा एक योग असतो तर वैवाहिक जीवनाची सफलता ही मानवी मनावर तथा प्रयत्नांवर अवलंबून असते असे माझे स्पष्ट मत आहे.

आजच्या संगणक युगात जगण्यासाठी स्पर्धा चालू असते. स्ट्रेस आणि स्ट्रेन हा आजचा परवलीचा शब्द झालेला आहे. नोकरीत हायर आणि फायर हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे विवाह बंधनात अडकताना तरुण-तरुणींना संयमाची व तडजोडीची आवश्यकता आहे याची जाणीव झाली नाही तर ते वैवाहिक जीवन ढासळायला सुरुवात होते.

वैवाहिक जीवनाच्या असफलतेच्या कारणांचा विचार करावयाचा झाल्यास त्यातच सफलतेची कारणे लपली आहेत असे म्हणता येईल.

एखादा डॉक्टर तुमचे शारीरिक आरोग्य, रक्तगट, एड्स यांबाबत सांगू शकेल. या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत असे आमचे मुळीच म्हणणे नाही. परंतु संसार असफल होताना यापेक्षा आणखी काही गोष्टींची आवश्यकता असते. त्या गोष्टी म्हणजे-

अ) मानसिकता : दोघांचे स्वभाव व त्या स्वभावाच्या माध्यमातून सुख मिळवण्याची चालेलेली धडपड ही अतिशय महत्त्वाची असते. अर्थात सुख ही सापेक्ष संकल्पना आहे. व्यक्ती-व्यक्तीनुसार ती सापेक्ष आहे. आपली कुवत, आपले राहणीमान आणि स्वतहून स्वीकारलेली तथा अंगीकारलेली जीवनपद्धत यातून शोधत असलेला आनंद, मनोमीलन, ऐहिक सुख, संतती, घर, गाडी, बंगला, शारीरिक सुख याच्या व्यक्ती-व्यक्तीनुसार कल्पना वेगळ्या असतात. सहजीवनांत येण्यापूर्वी रचलेल्या अवास्तव कल्पना, सिनेमा व तत्सम माध्यमातून शारीरिक संबंधांविषयी मांडलेल्या कल्पनांचा बाजार, आणि प्रत्यक्ष सहजीवनात यांचा भ्रमाचा फुटलेला भोपळा यांचे एकत्रीकरण होऊन नराश्य येते व वैवाहिक जीवन असफलतेकडे वाटचाल करू लागते.

ब) शारीरिक संबंध : विवाह सफल होण्यासाठी शारीरिक संबंध ही काळाची गरज आहे. नव्हे, वैवाहीक जीवनाचा तो एक उद्देशही आहे. स्त्री-पुरुषांमध्ये असलेली आसक्ती ही सक्ती न वाटता तिचे भक्ती व प्रेम यांत रूपांतर झाले तर मीलनाचा परमोच्च आनंदी क्षण दोघांनाही उपभोगता येऊ शकतो व मानसिक सुख मिळू शकते. यांत काही गफलत झाली तर चिडचिडेपणा वाढून मनक्षोभामुळे टोकाची भूमिका घेतली जाऊ शकते.

क) करिअरमधले स्थर्य :  मुलगा असो वा मुलगी त्यांचे करिअर उत्तम असावं, पगार चार आकडी, हा शब्द आता जुना झाला, पाच आकडी असावा या अपेक्षा सुरुवातीपासून असतात. परंतु करिअर याच विषयावर लक्ष केंद्रित केल्यानंतर विवाहानंतर घी देखा, लेकिन बडगा नही देखा अशीच त्या कुटुंबाची परिस्थिती होते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे मुलांसाठी पाळणाघर शोधण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता पाळणाघर गरजेचे झाले आहे.

हे तीन मुद्दे सध्याच्या पिढीत विवाहाच्या असफलतेत ऐरणीवर आलेले आढळतात. आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो दुर्लक्षून चालणार नाही. तो म्हणजे, नातेवाईक (सासू, सासरे, दीर, नणंदा, भावजय). एखादी मुलगी आपले आई, वडील, भाऊ, बहिणींचे स्नेहसंबंध तोडून आपल्या नवऱ्याच्या घरी सर्वार्थाने झोकून देते व तितक्याच आपुलकीने सासरच्या लोकांत मिसळण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला सासरच्या सगळ्यांनी मिळून समजून घेणे गरजेचे असते. दोन्ही बाजूंचा एकमेकांच्या गुणदोषांसहित स्वीकार न झाल्यास स्वभावातील कंगोरे आणखी टोकदार होऊन एकमेकांना बोचू लागतात. घरच्या आघाडीवर युद्धभूमी तयार होते. आपल्या मुलांच्या अशा प्रश्नांमध्ये पालकांचा नको एवढा हस्तक्षेप  झाल्यास सौजन्याची ऐशीतशी होऊन जाते.

ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून वैवाहिक जीवनातील असफलता टाळावयाची असेल तर विवाहपूर्व गुणमेलन करणे आवश्यक मानले जाते.  त्यासाठी केवळ पारंपरिक गुणमेलन कोष्टकावर लक्ष केंद्रित न करता या लेखात चर्चा केल्याप्रमाणे तर्कशास्त्राचा विचार करून ज्योतिषशास्त्राचा अवलंब करावा. गुणमेलनाची व्याख्याच मुळी माझ्या मते वधू-वरांनी एकमेकांना गुणदोषांसहित स्वीकारणे व ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून या गुणदोषांची आधीच माहिती करवून घेऊन पुढील सहजीवनातील तडजोडींसाठी तयार होणे. कारण गुणांनी मुले (अगदी प्रेमविवाहातसुद्धा) एकत्र येतात व दोषांवर तडजोड केली तरच एकत्र राहतात, हे निखळ सत्य आहे. या व्याख्येच्या माध्यमातून विवाहचे उत्सुक मुला-मुलींना एकत्र बसवून त्यांना समुपदेशन करणे व आरशासमोर उभे करून ‘अ‍ॅक्सेप्ट द फॅक्ट’ हा नियम समजावून देणे हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो असा माझा अनुभव आहे.

विवाह कुंडली

यासाठी गेल्या दहा वर्षांतील वैवाहिक जीवनात असफल झालेल्या प्रकरणांचा आणि त्यामागील कारणांचा अभ्यास केला.  त्यातूनच तयार झाली, सात ‘स’कारावर आधारलेली आधुनिक गुणमेलनाची सप्तपदी,

१)  स्वभाव

२)  संतती

३)  सुख-वैवाहिक

४)  सेक्स

५)  सेटलमेंट अर्थात करिअर

६)  सासू

७)  सासरे

ग्रहांचा विचार :

स्त्रियांचे कुंडलीत – रवी -जीवनशैली मानसिक सामथ्र्य, चेतना

मंगळ : पुरुषाची कणखरता / जोम / कर्तृत्व

पुरुषांचे कुंडलीत – चंद्र – ममता / कौटुंबिक जाणीव

शुक्र : प्रवृत्ती / कामप्रवृत्ती

सप्तपदीतील पहिला मुद्दा :

१) स्वभाव  :  एकमेकांच्या लग्न राशी, चंद्र राशी व रवी ज्या राशीत असेल ती रास व त्याचे स्वामी ग्रह, त्यांचे कारकत्व / शत्रू – मित्र यांचा तौलनिक विचार करून त्यातून एकमेकांत असलेल्या गुणदोषांची ओळख करून घ्या.

ग्रहांचे / राशींचे चांगले-वाईट गुण बघून पूर्वपात्रता (प्रीक्वालिफाय) करणे. कारण नवी पिढी अतिशय पारदर्शक आहे. एकदा का त्यांनी एखादी गोष्ट (गुणदोष) मान्य केली की मग ते त्यास बांधिल   असतात.

उदा. १) बुध-शनी :  बालीश / प्रौढत्व – नातू आजोबा किती वेळ एकत्र राहणार, दीड तास – दोघांनी बिझी राहा.

२) धनू – वृषभ :  गुरू / शुक्र – सल्ला / कल्पनाविश्व योग्य / अयोग्य कल्पनेला त्याच वेळेस नाकारू नका. सांगून सोडून द्या. थोडा काळ इगो सांभाळा.

२) संतती :

पंचम, पंचमाचे पंचमेश (नवम), पंचमाचे भाग्य (लग्न), वंशवृद्धीसाठी द्वितीय स्थान व सप्तमाचे पंचम (लाभ). प्रत्येक कुंडलीच्या या स्थानाचे शुभाशुभत्व नोंद करून त्या दोघांचा अ‍ॅव्हरेज काढा. पंचमस्थान किंवा पंचमेश अशुभ योगात असेल, त्यावर लाभस्थानातून पापग्रहांची दृष्टी असेल व दोघांच्या कुंडल्यांचा अ‍ॅव्हरेज चांगला नसेल व निम्म्यापेक्षा जास्त गुण अशुभ स्थितीत असतील तर नो प्लानिंगची कल्पना कुंडली जुळविताना द्या.

प्रेम प्रकरणातसुद्धा संततीबाबत समस्या दिसत असेल तर मूल दत्तक घेण्याची कल्पना द्या.

कारण नवीन पिढी या गोष्टीला तयार होऊ शकते. तेवढय़ावरून गुणमेलन बाद ठरवू नका.

३) सुख :

वैवाहिक – इन्ट्रा रिलेशनशिप – सप्तम, लग्न, तृतीय, द्वितीय, लाभ या स्थानांचा विचार.

विवाहातील विवाहापूर्वीच्या तडजोडीचा विचार करून त्या स्वीकारावयास सांगा. तडजोडीला काय करावे लागेल याची दिशा द्या.

उदा. उंची / रंग / शिक्षण / करिअर इत्यादीबाबची तडजोड समजून घेऊन करायला सांगा.

४) शारीरिक संबंध

अष्टमाच्या बरोबरीने पंचमस्थान व व्ययस्थान (पंचम – प्रणय, अष्टम –  दैनंदिन संपर्काचे स्थान व व्यय – शय्यासुख ) या स्थानांतील राशी, ग्रह यांची कारकत्वे एकमेकांना कशी पूरक आहेत याचा सकारात्मक विचार घ्यावा. उदा. एकाच्या कुंडलीत अष्टमेश किंवा अष्टमांत किंवा कारक भावात शनी असेल व दुसऱ्याच्या कुंडलीत अष्टमेश किंवा अष्टमांत चंद्र व शुक्र असेल तर सेक्शुअल वेव्हलेंग्थ अ‍ॅडजेस्ट करायला सांगा. ग्रहांच्या / राशींच्या तत्त्वांचा विचार करून सुखाची सीमारेषा सीमित करा.

५) करिअरमधील स्थैर्य

अर्थ त्रिकोण : दशम, दशमाचे दशम  (सप्तम), दशमाचे भाग्य (षष्ठ) व धनस्थान किमान या चार स्थानांच्या भावेशाचा व भावस्थित ग्रहांचा वैयक्तिक कुंडलीचा विचार करावा. तसेच उद्योगाला पूरक तृतीय व लाभस्थानाचा विचार जोडावा व मग दोघांच्या कुंडलीचा तुलनात्मकदृष्टय़ा विचार करा.

दोघेही करिअर करणारे असतील तर सुखाच्या व्याप्तीची कल्पना सुरुवातीला ठरवावयास सांगा. कारण मुलगी करिअरला प्राधान्य देणारी असेल तर कुटुंबाची तडजोड अगोदरच स्वीकारण्यास सांगा.

करिअर नको असेल तर तसा निर्णय घ्यावयास सांगा व त्यामुळे आíथक स्थितीबाबतचे नियोजन   करावयास सांगा.

६) सासू :   (नणंदा, दीर, भावजय, इ.)

७) सासरे :

मुलाच्या कुंडलीत चतुर्थस्थान आईसाठी

व दशमस्थान वडिलांच्या नात्यासाठी, दीर नणंदांसाठी तृतीय या स्थानाची स्थिती बघावी

व मुलीच्या कुंडलीतील उलट स्थिती म्हणजे सप्तमाचे चतुर्थस्थान म्हणजे सासूसाठी दशमस्थान व सासऱ्यांसाठी चतुर्थस्थानाचा, भावेशाचा व तेथील ग्रहांचा विचार करून विचार करावा.

सासू-सासऱ्यांच्या तसेच नणंद, दीर-भावजय यांच्या राशी माहिती असतील तर मुलीच्या राशी ग्रहाचे भावानुसार एकमेकांच्या स्वभावातील गुणदोषांची माहिती घ्या. त्यानुसार तडजोडीस तयार राहिल्यास पुढचा अनर्थ टळेल. समुपदेशनाच्या माध्यमातून ते सर्व करता येईल.

वरील सात – स-कारांचे महत्त्व लक्षात घेता या सप्तपदीचा उपयोग गुणमेलन करताना सकारात्मक निर्णय घेण्यासाठी करावा असे मला वाटते.

आज समाजात गुणमेलनाबाबत जे गरसमज आहेत, त्याबाबत जी भीती आहे ती काढणे ज्योतिषांच्या हातात आहे. आजच्या काळात समाज जागृत झाला आहे, त्याच्यात जाणिवा निर्माण झाल्या आहेत. त्याला तर्कशास्त्रीय आधार हवा आहे. आज २१ व्या शतकात नव्या पिढीसाठी गुणमेलन करताना आपली जबाबदारी जास्त वाढली आहे. मृत्युषडाष्टक, मंगळदोष, नारायण नागबली, कालसर्प योगशांती इत्यादी गोष्टींनी घाबरण्यापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला,  वैवाहिक जीवनातील तडजोड स्वीकारली तर जीवनात आनंद मिळवता येईल. तो मिळवणे हे आपल्याच हातात असते.

हे झाले तरच आजचे हे आधुनिक गुणमेलन यशस्वी होऊन वैवाहिक जीवनातील असफलता टाळता येईल. आज विस्कळीत झालेली कुटुंब व्यवस्थाही स्थिर राहून सामाजिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.