पात्रता फेरीचा अडथळा पार करत वेस्ट इंडिजचा संघ यंदा मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विंडीजची कामगिरी संमिश्र स्वरुपाची झाली आहे. स्पर्धेआधीच्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नसली तरीही ख्रिस गेल, आंद्रे रसेल, जेसन होल्डर आणि अन्य आक्रमक खेळाडूंमुळे वेस्ट इंडिजचा संघ कोणत्याही संघाला चांगली लढत देऊ शकतो.