Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९
व्यापार-उद्योग

‘इंटेल’चा ग्रामीण महाराष्ट्रासाठी ‘ई-पीसीओ’ उपक्रम
व्यापार प्रतिनिधी: इंटेल कंपनीने ‘बीएसएनएल’ व ‘आयटीझेडकॅश’ यांच्या सहयोगाने ‘ई-पीसीओ’ (इलेक्ट्रॉनिक पब्लिक कॉल ऑफिस) हा अभिनव पुढाकार आज रायगडमध्ये सुरू केला. निमशहरी व ग्रामीण भागात माहिती तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढवून स्वयंरोजगाराला चालना देणे, हा ‘ई-पीसीओ’ संकल्पनेमागील हेतू आहे. इंटेल कंपनी या पुढाकारामागील प्रेरक व समन्वयक असून, ‘ई-पीसीओ’ केंद्राची रचना करण्यात व हे जाळे भारतभर विस्तारण्यात सहयोगी घटकांना मदत करते.

३० लाख ग्रामीण ग्राहकांची ‘फिनो’कडे नोंदणी
व्यापार प्रतिनिधी : फायनान्शिअल इन्फोर्मेशन नेटवर्क अॅण्ड ऑपरेशन लिमिटेड अर्थात ‘फिनो’ या स्मार्ट कार्ड पुरवणाऱ्या आघाडीच्या कंपनीने तिसऱ्या बँकर्स फायनान्शिअल इन्क्ल्युजन कॉन्फरन्स अर्थात ‘हॉरायझन २००८’ मध्ये महत्त्वाच्या आणि आघाडीवर असलेल्या बँका व आर्थिक संस्थांच्या सहाय्याने ३० लाख ग्राहक नोंदणीचा टप्पा गाठल्याचे जाहीर केले आहे. फिनो फक्त बँकिंग क्षेत्राच्या सेवा पुरवत नाही तर नॉन-बँकिंग सेवा उदाहरणार्थ बिझनेस कॉरस्पॉन्डन्ट मोडय़ुलही पुरवते.

दीपिका चांदोरकर यांना ‘सुशीलाबाई ओक महिला उद्योजिका’ पुरस्कार
व्यापार प्रतिनिधी: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये या वर्षीचा सुशीलाबाई ओक उद्योजिका पुरस्कार जळगावच्या महिला उद्योजिका दीपिका दीपक चांदोरकर यांना मुंबई येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव होते. यावेळी सारस्वत को-ऑप. बँकेच्या प्रबंध व्यवस्थापक व महिला विभागाच्या अध्यक्षा उर्वशी धैर्यधर, चेंबरच्या अध्यक्षा मोनल मोहाडीकर, उपाध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, प्रख्यात उद्योजक भारत डहाणूकर, भारत रेडिएटर्सच्या अध्यक्षा शर्वरी दफ्तरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना दीपिका चांदोरकर म्हणाल्या, की विजेची टंचाई, पाण्याची टंचाई ही प्रमुख अडथळ्यांची शर्यत पार करून आपण आपला ‘स्त्री सखी’ चा व्यवसाय वाढवला. अनेक अडचणी सोसून एका छोटय़ाशा रोपाचे वटवृक्षात रुपांतर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. जळगाव शहराच्या आसपासच्या सुमारे १५० महिलांना आपण रोजगार पुरवित आहोत. आपल्या यशामध्ये आपले पती दीपक चांदोरकर आणि सासूबाई वृंदा चांदोरकर यांच्या सहकार्याचा आणि प्रोत्साहनाचा बहुमोल वाटा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी सर्व पारितोषिक विजेत्या उद्योजकांना बहुमोल मार्गदर्शन केले. चेंबरचे उपाध्यक्ष पोपटलाल ओसवाल यांनी आभार प्रदर्शन केले.

‘रिलायन्स मनी’चा मलेशियात प्रवेश
व्यापार प्रतिनिधी : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचा एक भाग असलेल्या रिलायन्स मनीने मलेशियातील महत्त्वपूर्ण आर्थिक उत्पादने व सेवावितरण कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘इन्फिनिटी फायनान्शिअल सोल्युशन्स’समवेत हातमिळवणी केली असून, संपूर्ण जगभरात आपला ठसा उमटविण्याच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. मलेशियातील अनिवासी भारतीयांकरिता अनेक प्रकारच्या आर्थिक सेवा व उत्पादने देऊ करण्याचा प्रयत्न प्रथमच भारतीय ब्रोकिंग आणि डिस्ट्रिब्युशन कंपनीकडून होत आहे, अशी घोषणा रिलायन्स मनीचे संचालक आणि संचालक आणि सीईओ सुदीप बंडोपाध्याय यांनी केली आहे. या युतीच्या माध्यमातून रिलायन्स मनी अन्य गुंतवणूकविषयक सेवांबरोबरच पोर्टफोलिओ मॅनेजमेण्ट सव्र्हिसेस (पीएमएस) सुरू करीत आहे. रिलायन्स मनीच्या मलेशियातील पोर्टफोलिओ मॅनेजमेण्ट सव्र्हिसेस अत्यंत कमी दरात म्हणजेच ५०,००० अमेरिकन डॉलपर्यंत उपलब्ध आहेत. रिलायन्स मनी यापूर्वी तीन खंडात म्हणजेच आशिया, युरोप आणि आफ्रिका येथे अस्तित्वात असून, पुढील वर्षांत १५ हून अधिक देशांमध्ये कामकाज सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.

‘म्युच्युअल फंड मार्गदर्शक’चे प्रकाशन
व्यापार प्रतिनिधी : म्युच्युअल फंड विषयाला पूर्णत: वाहिलेले भारतातील पहिले पाक्षिक प्रकाशन जळगाव येथे डॉ. अनिल खडके, डॉ. संजीव झांबरे आणि प्रा. संजय भारंबे यांच्या हस्ते अलीकडेच संपन्न झाले. विशेष म्हणजे हे पाक्षिक मराठीत असून, संपूर्ण महाराष्ट्रात एका वेळेस उपलब्ध करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनंजय काळे, हरिश्चंद्र जगताप व पंकज तळेले या संपादकीय मंडळाच्या हस्ते मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात संपादक आणि वरिष्ठ गुंतवणूक सल्लागार सुनील कानडे यांनी पाक्षिकरूपी हे साहित्य काळाची गरज असून, त्यासंबंधी दूरदर्शी विचार विशद केले. प्रमुख पाहुणे डॉ. अनिल खडके आणि प्रा. संजय भारंबे यांनी अंकाबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमास गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड विशेषज्ज्ञ आणि अभ्यासक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेस म्युच्युअल फंड अभ्यासक मनोज देशमुख (नायब तहसीलदार) आणि धुळे टीमचे प्रशांत सरवदे यांनी परिश्रम घेतले. ११ बाय १६ इंच आकाराच्या या रंगीत सहा पानी माहितीपूर्ण अंकास देखणा बनविणाऱ्या विश्वरूपा प्रिंटस्चे दीपक पाटील आणि उमेश नेरकर यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अंकाचे मूल्य सामान्य गुंतवणूकदारांसही परवडणारे रुपये १५/- असून, २४ अंकाच्या वार्षिक रुपये ३००/- वर्गणीत १७ टक्के सूट अंतर्भूत आहे. अधिक माहितीसाठी- सुनील ९३७००००८११, धनंजय- ९९२२४०४४००, चित्रा- ९८५००७१९२९, कांचन- ९४२१६९४८९४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

बिर्ला सनलाइफचा ‘टॅक्स रिलीफ ९६’ फंड; नऊ गंभीर आजारांवर १० लाखांपर्यंत विमा संरक्षण
व्यापार प्रतिनिधी: बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आपल्या ‘बिर्ला सनलाइफ टॅक्स रिलीफ ९६’ फंडाला आणखी एका वैशिष्टय़ाची किनार जोडली आहे. या फंडातील ग्राहकांना नऊ गंभीर आजारांवर विमा उतरविण्याची योजना सुरू केली आहे. ही सुधारित इक्विटी लिंक्ड बचत योजना १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. दीर्घकालीन भांडवलवृद्धीच्या माध्यमातून ही योजना ग्राहकांस लाभ मिळवून देणार आहे. ‘बीएसएल टॅक्स रिलीफ ९६’ योजनेत जे नवे वैशिष्टय़ जोडण्यात आले आहे त्यानुसार गुंतवणूकदाराला वयाच्या ‘ व्या वर्षांपर्यंत नऊ गंभीर आजारांवर १० लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
या योजनेची घोषणा करताना बिर्ला सनलाइफ अॅसेट मॅनेजमेण्ट कंपनीचे सीईओ अनिल कुमार म्हणाले की, या फंडाद्वारे ग्राहकांच्या वित्तीय नियोजन प्राधान्य, करव्यवस्थापन, संपत्तीनिर्मिती आणि आरोग्य गरजा या गोष्टींची काळजी घेतली जाईल.
या फंडातील गुंतवणुकीस प्राप्तिकर कायद्याच्या कलम ‘८० सी’ अन्वये करसवलत दिली जाते. या योजनेवर जाहीर झाल्यापासून आजतागायत २१६० टक्के लाभांश देण्यात आला आहे.

व्यापार संक्षिप्त
मुंबईच्या गणेरीवाला यांची व्हर्जिनियाच्या खजिनदारपदी नेमणूक
व्यापार प्रतिनिधी: जानेवारी २००९ पासून व्हर्जिनियाच्या खजिनदारपदी मंजू गणेरीवाला यांची निवड झाल्याची घोषणा गव्हर्नर तिमोथी एम कैने (डी) यांनी केली. भारतीय वंशाच्या श्रीमती गणेरीवाला या व्हर्जिनियाच्या खजिनदार मंडळाच्या अध्यक्षपदी असतील आणि कॉमनवेल्थची गुंतवणूक, तसेच कर्जाच्या व्यवस्थापनावर त्या लक्ष ठेवतील.
जानेवारी २००६ पासून मंजू गणेरीवाला या अर्थखात्याच्या उपसचिव होत्या. राज्याशी संबंधित सर्व आर्थिक घडामोडींबाबत त्या गव्हर्नरला सल्ला देत असत. ज्यामध्ये अर्थसंकल्पाची मांडणी, महसुलाबाबतचे चित्र विकसित करणे, कर्ज देणे, ‘एएए’ बॉण्ड रेटिंग कायम ठेवणे, तसेच आर्थिकदृष्टय़ा व्यवस्थापन केलेले राज्य, असा व्हर्जिनियाचा लौकिक कायम राखणे आदींचा समावेश होता. यापूर्वी त्यांनी जून २००० ते जानेवारी २००६ या कालावधीत वैद्यकीय सहाय्य सेवा खात्यात वित्त आणि प्रशासनाच्या उपसंचालकपदी काम केले होते. त्या जुलै १९८५ पासून राज्य शासनाच्या सेवेत आहेत. मंजू मूळच्या मुंबईच्या आहेत. त्यांनी पोदार महाविद्यालयातून बी. कॉम.ची पदवी घेतली आणि लग्नानंतर १९७६ पासून यूएसएला स्थायिक झाल्या. त्यांनी मुंबई विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे आणि ऑस्टीनमधील टेक्सास युनिव्हर्सिटीची मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी मिळविली आहे.
सिनलॉगचे बँकांसाठी नवे ‘एएमएल सोल्युशन’
व्यापार प्रतिनिधी : ग्लोबसिन कंपनीची सिनलॉग ही कंपनी अॅन्टि मनी लाँडरिंग (एएमएल) साठी आरएएफटीएस (रिअल-टाइम एएमएल फिल्टर फॉर टबरे स्विफ्ट) नावाचे उत्पादन करणारी एकमेव कंपनी आहे. सध्याच्या घडीला हे एकमेव सॉफ्टवेअर रिअल टाइम आधारावर ट्रांझ्ॉक्शन्स ट्रॅक करण्यास सक्षम आहे. विदेशी चलन नेटवर्कशी संबंधित साशंक मनी लाँडरिंग कामकाजावर हे सॉफ्टवेअर देखरेख ठेवते आणि त्याच्याशी लढा देते. आरएएफटीएस या पेटंट असलेल्या आपल्या उत्पादनाबाबत सिनलॉगचे मुख्य संचालक अधिकारी प्रकाश सिरनानी म्हणाले की, अंदाजे तीन ट्रिलीयन डॉलर्स प्रति वर्ष एवढे मूल्य असलेला मनी लाँडरिंग हा जगातील तिसरा मोठा उद्योग आहे. सिनलॉगमध्ये आम्ही, बीएफएसआय उद्योगातील ही तूट भरून काढण्यासाठी केवळ एएमएल सोल्युशन्सच प्रदान केले नाहीत तर त्यांना रिअल-टाइम ट्रांझ्ॉक्शन ट्रॅकिंगसोबत एकरूप केले आणि भविष्यात मनी लाँडरिंगवर र्निबध घालणारे हे एकमेव प्रभावी सॉफ्टवेअर बनले आहे. सर्व प्रकारच्या ट्रांझ्ॉक्शन्सवर (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय) प्रभावीपणे देखरेख ठेवण्याची गरज वाढत आहे. भारत आणि जगभरात घडत असलेल्या दहशतवादी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर बँका आणि वित्तीय संस्था मनी लाँडरिंगला आळा घालण्यासाठी गंभीर उपाययोजना करत आहेत. प्रचंड मोठय़ा रोख ठेवींसह असलेल्या खात्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने कडक लक्ष ठेवणे तसेच साशंक ट्रांझ्ॉक्सन्सवरही देखरेख ठेवणे गरजेचे आहे.
‘कर्लऑन’ची विवाह ऑफर
व्यापार प्रतिनिधी : येऊ घातलेल्या लग्न हंगामात सर्वात आकर्षक ठरेल अशी ऑफर ‘कर्लऑन’ने प्रस्तुत केली आहे. ग्राहकांना कर्लऑनच्या मॅट्रेसच्या खरेदीसोबत मिळणाऱ्या स्क्रॅच कार्डवर हमखास भेटवस्तू मिळविता येईल. या भेटवस्तूंमध्ये इलेक्ट्रिक मोटर सायकल, सोफा सेट, डायनिंग टेबल, आयपॉड, मोबाईल फोन किंवा पिलोज् यापैकी काहीही खात्रीशीर जिंकता येईल. एका भाग्यवान नवदाम्पत्याला भारतभरातील कुठल्याही १८ प्रेक्षणीय स्थळांपैकी एका ठिकाणी दोन रात्री व तीन दिवसांचे आकर्षक सहल पॅकेज जिंकता येईल. त्याचप्रमाणे या स्क्रॅच कार्डवर दागिन्यांच्या खरेदीसाठी डिस्काऊंट कूपन्स, वॉटर प्युरिफायर, व्हीआयपी लगेज बॅग्ज किंवा कर्लऑन मॅट्रेसची भेटही जिंकता येईल. ही योजना ठराविक मॅट्रेसेसवर आणि मुंबईसह ठराविक शहरांमध्येच उपलब्ध आहे.
हिवाळ्यासाठी पॅराशूटचे ‘हॉट ऑइल’
व्यापार प्रतिनिधी: हिवाळ्यामध्ये साधारण खोबरेल तेल गोठून जाते आणि केसांना हवी असलेली काळजी पुरविण्यात असे तेल निरूपयोगी ठरते, यावर उपाय म्हणून मॅरिको लिमिटेडने कंपनीने ‘पॅराशूट अॅडव्हान्स्ड रिव्हायटलायझिंग हॉट ऑइल’ हे अत्यंत अभिनव असे उत्पादन बाजारात आणले आहे. हे केसांना लावावयाचे गरम तेल आहे. या तेलामध्ये खोबरेल तेलाच्या जोडीला रोझमेरी, थाइम आणि पचौली या वॉर्मिग ऑइल्सचा संगम साधण्यात आला आहे. पॅराशूट हॉट ऑइल देशभरात १७० मिलिच्या आकर्षक पॅकमध्ये ६५ रुपयांना उपलब्ध झाले आहे.
बारट्रॉनिक्सचे अधिक क्षमतेचे आरएफआयडी सोल्युशन
व्यापार प्रतिनिधी : बारट्रॉनिक्स इंडिया लि.या कंपनीने भारतीय बाजारात विस्तारित क्षमतेचे आरएफआयडी (रेडिओ फ्रीक्वेन्सी बेस्ड आयडेंटिफिकेशन) सोल्युशन आणले आहे. हे सोल्युशन आणून कंपनीने ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन आणि डेटा कॅप्चर (एआयडीसी) तंत्रज्ञानात आपली कंपनी अग्रणी असल्याचे दाखवून दिले आहे. बारट्रॉनिक्स हे तंत्रज्ञान अमेरिकेच्या इंटरफ्लेक्स कार्पोरेशन या कंपनीच्या भागीदारीत करत आहे. ही सोल्युशन वाहन, कृषी, निर्मिती आणि किरकोळीच्या क्षेत्रात वापरली जातात. उपकरणे आणि वाहन यार्ड व्यवस्थापन, उच्च मूल्य अॅसेट ट्रॅकिंग, रियुजेबल कंटेनर ट्रॅकिंग आणि पर्सोनेल मॉनिटरिंग या कामात हे तंत्रज्ञान फार उपयोगी ठरते. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीरराव म्हणाले की, इंटेल फ्लेक्सच्या भागीदारीतून देण्यात येणाऱ्या या तंत्रज्ञानाने आम्ही ग्राहकांची अधिक चांगली सेवा करू शकू.