Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

‘वेब उद्योगाला मोठय़ा प्रमाणात पदवीधर हवेत’
 
वर्ष २००१ ते २००७ या काळात वेबधारकांच्या संस्थेत एक लाखापासून पाच कोटीपर्यंत अभूतपूर्व अशी ५०० पट वाढ झाली आहे. ऑनलाईन बँकींग (३२%), बिलिंग आणि पेमेंटस् (१८%) शेअर्स आणि स्टॉक्स (१७%) जॉब प्लेसमेंट (१५%), ट्रॅव्हल्स आणि इतर (५%) असा आजमितीला वेबचा वापर होत आहे. यात रेल्वे रिझव्र्हेशन, ऑनलाईन शॉपिंग म्हणजेच जगात ई -कॉमर्सचा समावेश नाही. ई-कॉमर्सचा २००७ सालचा महसूल जगभरात जवळजवळ ५००००० कोटी रुपये व भारतात ५००० कोटी रुपये असून त्यात दरवर्षी १०० टक्के वाढ अपेक्षित आहे. शिवाय वेब अॅडव्हटाईझिंग (म्हणजे गुगलसारखे क्लिक अँडपे किंवा याहूप्रमाणे बॅनर अॅडस्)चा महसूल आज जगात १००००० कोटी रुपये असून त्यात प्रचंड वाढ अपेक्षित आहे.
या पाश्र्वभूमीवर २०१० चा वेब उद्योग कसा असेल हे पाहणं मनोरंजक ठरेल. तोपर्यंत वेब हे माध्यम सामान्य माणसाला इलेक्ट्रिसिटीसारखे २४ बाय ७ असं उपलब्ध होईल. टीव्ही आणि इंटरनेटचा ब्रॉडबँड फॅसिलिटीमुळे संगम झालेला दिसेल. उद्या सामान्य माणसालाही मोबाईल फोन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिक इंटरअॅक्टिव्ह, डायनॅमिक आणि कंटेटमध्ये समृद्ध झालेली वेब अॅप्लीकेशन्स आढळतील. मोबाईल आणि वेबवरील ऑनलाईन गेम्सला मोठी मागणी राहील.
२०१० पर्यंत वेब अॅडव्हटाईझिंगमधील महसूल जगात १५०००० कोटी रुपये एवढा वाढणार आहे. त्यात केवळ अमेरिकेकडून १००००० कोटी रुपयाची मागणी असेल. ही मागणी पुरविण्यासाठी प्रथम संधी भारतालाच मिळणार आहे.
केवळ भारतातच नव्हे पण जागतिक स्तरावरील उद्योगाला सेवा पुरवण्याची शक्यता ही वेब माध्यमाने देशाला मिळवून दिली आहे. उद्याचा वेब उद्योग भारतीय तरुणांसाठी मोठी उत्साहवर्धक संधी घेऊन येत आहे. आज योग्य प्रशिक्षणाच्या जोरावर भारतीय तरुण या संधीचं सोनं करून घेऊ शकतील असं आशादायक चित्र दिसत आहे.
एडिट इन्स्टिटय़ूटने पदवीधर विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन उद्योगाला वेब डिझाइनर्स पुरविण्याची जबाबदारी उचलली आहे. या प्रशिक्षणात केवळ सॉफ्टवेअरवर भर न देता वेब डिझाईनची तत्त्वे शिकवली जातात आणि शेवटी विद्यार्थ्यांकडून प्रोजेक्ट पोर्टफोलिओ बनविला जातो. एवढंच नाही तर हा पोर्टफोलिओ नेटवर अपलोड करता येतो व त्यामुळे नोकरी मिळणं सुलभ होतं. चांगली नोकरी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन आणि प्रोफेशनल्स स्किल्स शिकवली जातात.