Leading International Marathi News Daily                                  गुरुवार , १ जानेवारी २००९

नव्या वर्षांत लोकल पंधरा डब्यांची!
* पश्चिम रेल्वे आणि एमआरव्हीसीकडून पुढाकार
* आरडीएसओच्या मदतीने तांत्रिक चाचण्या
* राइटस्चा अहवाल जानेवारी अखेपर्यंत अपेक्षित
प्रतिनिधी

नऊ डब्यांच्या बहुतांशी लोकल बारा डब्यांच्या करण्यात आल्या. दोन लोकलमधील कालावधी पाचऐवजी तीन मिनिटांवर आणण्यात आला. एमयूटीपीच्या नव्या लोकल मुंबईत दाखल झाल्या.तरीसुद्धा मुंबईच्या लोकलमधील गर्दी कमी होताना दिसत नाही. ‘सुपर डेन्स क्रश लोड’ प्रकारच्या या गर्दीवर मात करण्यासाठी पंधरा डब्यांच्या लोकल चालविण्याच्या दृष्टीने रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.

पालिका आर्थिक संकटात तरीही करवाढ नाही!
बंधुराज लोणे

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक मिरवणाऱ्या पालिकेपुढे यंदाच्या वर्षी आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. गेले काही वर्षे शिलकी अंदाजपत्रक सादर करणाऱ्या पालिकेच्या तिजोरीत या वर्षी आवश्यक तेवढी गंगाजळी जमा झालेली नाही. याशिवाय अनावश्यक खर्चात वाढ झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी काही प्रमाणात विकास कामांना कात्री लावण्याची तयारी प्रशासन करीत आहे. तूर्तास मुंबईकरांवर कोणतेही कर न आकारण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

मराठी चित्रपटांचेही आता ट्रेड गाईड!
सुनील डिंगणकर

मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या दरवर्षी वाढत आहे. चित्रपटांचे बजेटही वाढलेले आहे. असे असले तरी निर्माते, दिग्दर्शक, वितरक आणि चित्रपटक्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना मराठी चित्रपटांविषयीची व्यावसायिक आकडेवारी मिळण्याचा एकही स्रोत उपलब्ध नव्हता. कोणत्या चित्रपटांची निर्मिती सुरू आहे, किती चित्रपटांना सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले, चित्रपटाने प्रत्येक टेरिटरीमध्ये किती गल्ला गोळा केला याबद्दलची माहिती मिळण्याची काहीच सोय नव्हती.

मराठी चित्रपटांची उलाढाल शंभर कोटींवर!
प्रतिनिधी

‘गजनी’ पाहायला जाणारा महाविद्यालयीन विद्यार्थी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन मराठी चित्रपटासाठीही दीडशे रुपये खर्च करू लागला आहे. गेल्या वर्षभरात ४२ चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित झाले आणि त्यांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसादही दिला. त्यामुळे बजेट वाढण्याबरोबरच मराठी चित्रपट पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येतही वाढ होत आहे, अशी आकडेवारी आढळली आहे.

‘वेब उद्योगाला मोठय़ा प्रमाणात पदवीधर हवेत’
वर्ष २००१ ते २००७ या काळात वेबधारकांच्या संस्थेत एक लाखापासून पाच कोटीपर्यंत अभूतपूर्व अशी ५०० पट वाढ झाली आहे. ऑनलाईन बँकींग (३२%), बिलिंग आणि पेमेंटस् (१८%) शेअर्स आणि स्टॉक्स (१७%) जॉब प्लेसमेंट (१५%), ट्रॅव्हल्स आणि इतर (५%) असा आजमितीला वेबचा वापर होत आहे. यात रेल्वे रिझव्र्हेशन, ऑनलाईन शॉपिंग म्हणजेच जगात ई -कॉमर्सचा समावेश नाही. ई-कॉमर्सचा २००७ सालचा महसूल जगभरात जवळजवळ ५००००० कोटी रुपये व भारतात ५००० कोटी रुपये असून त्यात दरवर्षी १०० टक्के वाढ अपेक्षित आहे.

मुंबई हल्ल्यातील सामान्य बळींचे काय?
मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊन महिना लोटत आलाय. हा हल्ला दहशतवाद्यांचा आहे हे कळायला पोलीस यंत्रणांनाही काही अवधी जावा लागला, इतका तो अचानक व अनपेक्षित होता. मुळातच अशा हल्ल्याची शक्यता कधी गृहीतही धरण्यात आली नसावी. अमेरिकेतही ९/११ च्या हल्ल्याबाबतही अशीच अवस्था होती. त्यामुळे काहीशा भांबावलेल्या स्थितीत जनमानसातून तीव्र भावना व्यक्त होत गेल्या. त्यात राजकीय नेत्यांनीही भर घातली. एकूणच सगळीकडे काहीशा गढूळ वातावरणातच मुंबईने खूप सहन केले. आता हल्ला झालेले ताज व ट्रायडन्ट सुरुही झाले आहे.

२ जानेवारीपासून मॅजेस्टिक गप्पा
प्रतिनिधी : महत्त्वाची सांस्कृतिक घटना म्हणून सर्वजण आवर्जून वाट पाहतात ती मॅजेस्टिक गप्पांची! यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षी २ ते ११ जानेवारीदरम्यान विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात ‘मॅजेस्टिक गप्पा’ रंगणार आहेत. यावेळी ग्रंथप्रदर्शनही भरविण्यात येणार आहे, अशी माहिती मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे यांनी दिली. ज्येष्ठ पत्रकार, लेखक अरूण टिकेकर, संतुरवादक पं. शिवशंकर शर्मा, गायक अरूण दाते, हर्ष भोगले, शबाना आझमी, मोहनभाई पटेल यांच्या मुलाखती यावेळी घेण्यात येतील. अनेक विषयांवर या काळात परिसंवादही होणार आहेत. मॅजेस्टिक गप्पांच्या रौप्य महोत्सवानिमित्त एक स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे. यावेळी हजारो मराठी ग्रंथ विक्रीसाठी इथे उपलब्ध आहेत. १० ते ३० टक्के सवलतीवर हे ग्रंथ मिळणार आहेत. ग्रंथप्रदर्शन सकाळी दहा वाजल्यापासून खुले असणार आहे. गप्पांचा कार्यक्रम संध्याकाळी ७.४० वाजता होणार आहे.

राम प्रधानलिखित नृत्यनाटिका ‘अंधारातून प्रकाशाकडे’
प्रतिनिधी : राम प्रधान यांनी लिहिलेल्या ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या नृत्यनाटिकेचा नुकताच शानदार प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये झाला. मानवी जीवनाचे अंतिम रहस्य, शाश्वत सत्य कोणते याचा शोध चिरंतन काळापासून अनेकांनी घेतला आहे. त्या शोधाचा एक आविष्कार ‘अंधारातून प्रकाशाकडे’ नृत्यनाटिकेतून अनुभवास येतो. भगवान बुद्धांच्या - पूर्वाश्रमीच्या राजपुत्र गौतमाच्या प्रबोधनातून जे सत्य त्यांना प्रतीत झालं त्याच प्रसंगावर आधारलेले कथानक राम प्रधान यांनी ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या नृत्यनाटिकेत बेतले आहे. नृत्यनाटिका असल्यामुळे यातील अनेक प्रसंग समर्पक गीतरचना, निवेदन आणि सुंदर नृत्याविष्कार पाहायला मिळतात. कथ्थकालय या संस्थेद्वारा सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका रंजना फडके यांनी नृत्यनाटिका बसवली आहे. तर आशा खाडीलकर यांनी वेगवेगळ्या रागांतून संगीत साज चढविला आहे. लेखनाबरोबरच नेपथ्यही राम प्रधान यांचेच आहे.

अंधेरीत मालवणी खाद्यपदार्थाची जत्रा
प्रतिनिधी : अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर परिसरात मुंबई प्रदेश काँग्रेस समिती आणि समर्थ जनसेवा मंडळातर्फे मालवणी जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे कोकणातील सामान्य विक्रेत्यांचे सर्वाधिक स्टॉल्स आणि स्थानिक कलाकारांना प्रवृत्त करणाऱ्या समूह नृत्य, गायन व नाटय़ स्पर्धा. डी. एन. नगर मैदानात येत्या ४ जानेवारीपर्यंत सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही जत्रा सुरू राहणार आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करून जत्रोत्सवाची सुरूवात करण्यात आली. डी. एन. नगर विभागाचे सहाय्यक आयुक्त दिलीप सूर्यवंशी व वरिष्ठ निरीक्षक अजेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मंडळाचे अध्यक्ष जयवंत परब यांनी श्रद्धांजली वाहिली. शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ मैदानाच्या मध्यभागी स्तंभ उभारण्यात आला होता. जत्रोत्सवाचे यंदाचे सातवे वर्ष असून यंदा दहशतवादी हल्ल्यामुळे शहीद पोलीस व निरपराध नागरिकांच्या कुटुंबीयांचे दु:ख लक्षात घेऊन यंदाचा जत्रोत्सव साधेपणाने साजरा होत असल्याचे परब यांनी सांगितले.