Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, २ जानेवारी २००९
व्यापार-उद्योग

(सविस्तर वृत्त)

‘जैन इरिगेशन’ला युरोपातील सर्वात मोठे कंत्राट

 

व्यापार प्रतिनिधी: जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ला युरोपातील आपल्या प्रतिष्ठित ग्राहकांकडून डिहायड्रेटेड पांढऱ्या कांद्यांची २७ कोटींची ऑर्डर मिळाली आहे. हे डिहायड्रेटेड ओनियन येत्या वर्षांत जैन इरिगेशन पुरवणार आहे. कंपनी युरोपातील अनेक अन्नउत्पादक व अन्नविषयक सेवा देणाऱ्या कंपन्यांना अन्नघटकांचा पुरवठा करते.
जेआयएसएलचे उपाध्यक्ष विकास जैन म्हणाले, की ही ऑर्डर मिळाल्याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. डिहायड्रेटेड ओनियन व भाज्यांची आतापर्यंतची एकाच वेळी इतक्या मोठय़ा प्रमाणात मिळालेली ही पहिली ऑर्डर आहे. आम्ही कांद्यााच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत. त्यामुळे भारतीय शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजाराची गरज पूर्ण करू शकणार आहेत, तसेच अमाप फायदाही मिळवत आहेत.’’
जेआयएसएल डिहायड्रेटेड ओनियन व्यवसायातील जगभरात कार्यरत असलेली कंपनी आहे. तसेच भारतात फळ व भाजांवरील प्रक्रिया करणारी ही आघाडीची कंपनी आहे. जेआयएसएलचे फळ व भाज्यांवरील प्रक्रियेचे भारतात सहा व अमेरिकेत एक प्रकल्प आहे. कंपनी दरवर्षी ३५०००० मेट्रिक टन भाज्या व फळांवर प्रक्रिया करते. कंपनी आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्या व भारतातील कंपन्यांचा पुरवठादार आहे.
आपल्या उत्पादनांमध्ये वाढ करण्यासाठी सतत विस्ताराच्या प्रयत्नांत असते व त्यासाठी गुंतवणूक करते. कंपनी सध्या ४,००० शेतकऱ्यांशी कॉन्ट्रॅक्ट फार्मिग आणि बाय बॅक अ‍ॅरेंजमेंट या पद्धतीने कार्यरत आहे. शेतीतून अधिकाधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अ‍ॅग्रिकल्चर सायन्टिस्ट आणि अ‍ॅग्रोनॉमिस्ट हातात हात घालून काम करतात. नजीकच्या भविष्यात आणखी नव्या भाज्या व फळांचे उत्पादन घेण्यासाठी कंपनीला अधिकाधिक शेतकऱ्यांबरोबर काम करायचे आणि आपले उपक्रम विस्तारायचे आहेत.