Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

गुगल-मायक्रोसॉफ्ट वादाचा जी-मेल यूजर्सना फटका
मुंबई, २ जानेवारी/प्रतिनिधी

जीमेलच्या यूजर्सना गेल्या तीन दिवसांपासून अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात यूजर आयडी इनव्ॉलिड दाखविणे, स्क्रिन काहीच न दिसणे आदी अडचणींचा समावेश आहे. इंटरनेट एक्सप्लोररच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करणाऱ्या यूजर्सचे

 

जीमेल अकाऊंट सुरु होत नसल्याचा अनुभव येत आहे. याचे मूळ आहे ते मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांच्यातील व्यावसायिक वादामध्ये.
मायक्रोसाफ्ट इंटरनेट एक्सप्लोजरच्या यूजर्सनी जीमेल सुरु केल्यास त्यांना ‘गेट फास्टर जीमेल, बॅड रीक्वेस्ट, एरर-४००’ असा संदेश येतो. मात्र एक्सप्लोरर न वापरता गुगलच्या ‘क्रोम’ किंवा मॉझिला कॉर्पोरेशनच्या ‘फायरफॉक्स’चा वापर केला तर जीमेल अकाऊंट सहज ओपन होते. यामुळे मागील वर्षांत रंगलेल्या गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या व्यावसायिक वादाचा हा फटका असल्याची चर्चा सर्वत्र आहे.
गुगलला टेकओव्हर करण्यासाठी मागील वर्षांत मायक्रोसॉफ्टने कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्यातील आर्थिक वाटाघाटी विस्कटल्याने त्यांना अपयश आले होते. यानंतर दोनही कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढू लागली आहे. टाऊस क्रोम आणि फायरफॉक्सबरोबरच अ‍ॅपलच्या सफारी, ओपेरा सॉफ्टवेअसरच्या एएसए ब्राऊजर्सच्या यूजर्सनाही जीमेलची सेवा उत्तम प्रकारे मिळत आहे. जीमेलच्या या प्रकारामुळे जगभरातील यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. विविध ब्लॉग्ज्वरही याविषयी यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.
गुगलच्या कस्टरमर सव्‍‌र्हिसच्या मेल आयडीवर संपर्क साधला असताही यूजर्सना कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याचा उल्लेख बॉग्लज्वर करण्यात आला आहे. जीमेलच्या या प्रकारामुळे अनेकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याचे चित्र आहे. एकाकाळी सर्वात जलद आणि उत्तम सेवा देणाऱ्या जीमेल यूजर्ससाठी हा मोठा धक्का आहे