Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

आयसीसीच्या पहिल्या क्रिकेट ‘हॉल ऑफ फेम’मध्ये
गावसकर, कपिल आणि बेदी
सिडनी, २ जानेवारी/पीटीआय

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या शतकमहोत्सवानिमित्त आज जाहीर करण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या हॉल ऑफ फेम यादीतील ५५

 

माजी रथी-महारथी क्रिकेटपटूंमध्ये सुनील गावसकर, कपिल देव आणि बिशनसिंग बेदी या तीन भारतीय क्रिकेटपटूंना स्थान देण्यात आले आहे.
आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेमच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्य कार्यवाह हरून लॉर्गेट म्हणाले की, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनच्या (एफआयसीए) सहकार्याने क्रिकेटमधील महान व्यक्तींचा सन्मान करण्याची यानिमित्त संधी मिळाली आहे.
आयसीसीच्या शतकमहोत्सवानिमित्त खेळातील हॉल ऑफ फेम जाहीर करण्याचा निर्णय हे पूर्णता योजनाबद्ध पाऊल आहे, असे लॉर्गेट म्हणाले.
आज क्रिकेटला महान खेळाचे आणि महान चैतन्याचे प्रतीक मानले जाते. या शिखरत्वाला पोहोचताना क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासाला योगदान देणाऱ्या क्रिकेटपटू, अधिकारी आणि संस्थांचा सन्मान करणे, हा या मागचा हेतू असल्याचे ते म्हणाले.
सर डॉन ब्रॅडमन आणि सर गारफिल्ड सोबर्स यांच्यासोबत आपले नाव घेतले गेल्याबद्दल सुनील गावसकर यांनी ‘विनयशील’पणे सांगितले की, क्रिकेटमधील शिखर संघटनेने शतकमहोत्सवी वर्षांनिमित्त आपल्या सन्मानित करणे हा मोठा बहुमान आहे.
आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेमचे मानकरी : सिडनी बार्न्‍स, बिशनसिंग बेदी, अ‍ॅलेक बेडसर, रिची बेनॉ, अ‍ॅलन बोर्डर, इयान बोथम, जेफ्री बॉयकॉट, डोनाल्ड ब्रॅडमन, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, डेनिस कॉम्पटन, कॉलिन कॉड्रे, कपिल देव, सुनील गावसकर, लान्स गिब्ज, ग्रॅहम गुच, डेव्हिड गॉवर, डब्ल्यू. जी. ग्रेस, टॉम ग्रॅव्हनी, गॉर्डन ग्रिनिज, रिचर्ड हॅडली, वॉल्टर हॅमंड, नील हार्वे, रॉन हेडली, जॅक हॉब्ज, मायकेल होल्डिंग, लेनार्ड हटन, रोहन कन्हाय, इम्रान खान, अ‍ॅलन नॉट, जिम लेकर, हेरॉल्ड लारवूड, डेनिस लिली, रे लिंडवॉल, क्लाइव्ह लॉईड, हनिफ मोहम्मद, रॉडनी मार्श, माल्कम मार्शल, पीटर मे, जावेद मियाँदाद, किथ मिलर, बिल ओ’रेली, ग्रॅम पोलॉक, विल्फ्रेड ऱ्हॉडस्, विवियन रिचर्डस्, अ‍ॅन्डी रॉबर्टस्, गारफिल्ड सोबर्स, ब्रायन स्टॅथम, फ्रेड ट्रूमन, डेरेक अंडरवूड, क्लाईड वॉलकॉट, एव्हरटन विक्स, फ्रॅन्क वुली, फ्रॅन्क वॉरेल.