Leading International Marathi News Daily                                  शनिवार, ३ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

चालू वीजमीटर बंद असल्याचा शेरा
‘महावितरण’च्या निष्काळजीपणाचा शेकडो ग्राहकांना झटका

 
पुणे, २ जानेवारी/प्रतिनिधी
विजेच्या बिलावर मीटरचा फोटो छापून योग्य रिडिंग घेण्याच्या उपक्रमाबाबत ‘महावितरण’ स्वतची पाठ थोपटून घेत असताना दुसरीकडे बििलगच्या यंत्रणेवर नियंत्रणच राहिले नसल्याचे दिसून येत आहे. मीटरच्या फोटोमध्ये स्पष्टपणे रििडग दिसत असतानाही संबंधित मीटर बंद असल्याचा शेरा मारण्याचे प्रकार घडत असल्याने यंत्रणेतील निष्काळजीपणा स्पष्ट झाला आहे.
विजेची बिले वेळेवर न मिळण्याची तक्रार आता नेहमीचीच झाली आहे. त्याबाबतही ‘महावितरण’ने अद्याप कोणतीही सुधारणा केली नाही. बिलांबाबत हा घोळ सुरू असतानाच चुकीच्या पद्धतीने बिलाची आकारणी करण्याचे प्रकारही सातत्याने होत आहेत.
चुकीचे रििडग घेतले जाऊ नये किंवा अंदाजे होणाऱ्या बिलाच्या आकारणीमुळे करण्यात येणाऱ्या तक्रारींमुळे ‘महावितरण’ने मागील काही महिन्यांपासून बहुतांश भागामध्ये बिलावर मीटरचा फोटो छापण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
बिलावरील फोटोमध्ये मीटरचे रििडग दिसत असल्याने मोठय़ा प्रमाणावर तक्रारी कमी झाल्याचे सांगत ‘महावितरण’ या उपक्रमाबद्दल स्वतची पाठ थापटून घेते आहे. मात्र प्रत्यक्षात फोटोत रििडग दिसत असतानाही मीटर बंद असल्याचा शेरा मारण्याचा ‘पराक्रम’ही सध्या करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सध्या येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सहकारनगरमधील एक ग्राहक आर. डी. नांदूरकर यांच्याबाबतीतही मागील तीन महिन्यांपासून असाच प्रकार होत आहे. नांदूरकर यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेल्या बिलावर मीटरचा फोटो व रििडग दिसते आहे. मात्र बिलावरील चालू रिडिंगच्या रकान्यात ‘आरएनए’ (रिडिंग उपलब्ध नाही) असा शेरा लावून सरसकट २२० युनिट वीजवापराचे बिल त्यांना पाठविण्यात आले. त्याकडे काहीसे दुर्लक्ष करून त्यांनी त्या महिन्याचे बिल भरले. मात्र नोव्हेंबर महिन्यात ‘महावितरण’ने दुसराच घोळ केला. या वेळीही फोटोत स्पष्टपणे रिडिंग दिसत असतानाही ‘लॉक्ड’ (मीटर बंद) असा शेरा मारून अंदाजे बिलाची आकारणी केली. या वेळी नांदूरकर यांनी बिलाचा भरणा करून याबाबत तक्रार दिली.
तक्रार दिल्यानंतर तरी योग्य पद्धतीने बिल मिळेल, अशी अपेक्षा असताना सलग तिसऱ्या महिन्यात म्हणजे डिसेंबरलाही ‘लॉक्ड’ असाच शेरा त्यांच्या बिलावर होता. प्रत्यक्षात नोव्हेंबर व डिसेंबरमधील मीटरचा फोटो पाहता रिडिंग बदलत असल्याचे दिसते. त्यामुळे मीटर सुरू असल्याचे स्पष्ट होते.
मात्र याबाबत तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याबद्दल नांदूरकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ व सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले, ‘महावितरणचे सध्या बििलगवरचे नियंत्रणच सुटले आहे. त्यामुळे अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहे.