Leading International Marathi News Daily
रविवार, ४ जानेवारी २००९

‘‘खड्डय़ात गेला तुम्ही अन् तुमचा तो सेक्रेटरी. उद्याच्या उद्या चांगला प्रोफेशनल स्पीच रायटर शोधून काढा अन् मला लगेच भेटायला सांगा. काय? कळ्ळं ना? कामं करताहेत साले.’’ नरिमन पॉइंटवरच्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये भरलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सच्या कन्ल्क्युजन समारंभास उपस्थित राहून बंगल्यावर परत आल्याबरोबर पहिल्यांदाच

 

कॅबिनेटमध्ये वर्णी लागलेल्या तरुण मंत्रिमहोदयांनी फोनवरून आपल्या पी.ए.ची तासंपट्टी केली.
झालं होतं काय कीत्या कॉन्फरन्सच्या समारोपप्रसंगी मंत्रिमहोदयांनी त्यांच्या पी.ए.नं तयार केलेलं छापील इंग्रजी भाषण वाचून दाखवलं होतं. जिभेला वेडीवाकडी वळणं देऊनसुद्धा धडपणे उच्चारता येणार नाहीत, अशा अनेक पारिभाषिक शब्दांची त्या भाषणात भरमार होती. ते शब्द उच्चारता उच्चारता मंत्र्यांची फॅ फॅ झाली होती. तिथं जमलेलं सगळं एलाईट ऑडियन्स कॉकटेल अ‍ॅण्ड डीनरसाठी अधीर झाले असताना मंत्रिमहोदयांचं भाषण काही संपता संपत नव्हतं. शेवटी नॉनस्टॉप टाळ्या सुरू झाल्या, तसं मंत्र्यांनी आपलं भाषण आवरतं घेतलं. संपलेल्या थ्री-डे कॉन्फरन्सला त्यांनी जाता जाता ‘आय विश द कॉन्फरन्स ऑल सक्सेस’ अशा शुभेच्छा दिल्यामुळे ऑडियन्सच्या टाळ्यांना हास्याची जोड मिळाली होती. या सगळ्या प्रकारामुळे आपल्या पब्लिक इमेजला ऑगस्ट गॅदरिंगमध्ये धक्का पोहोचल्यानं मंत्रिमहोदय चिडले होते. त्यांनी त्याचं खापर आपल्या पी.ए.वर फोडलं होतं.
दुसऱ्या दिवशी दुपारी आपल्या दालनातल्या अ‍ॅण्टी चेंबरमध्ये मंत्री चहा पीत बसले असताना त्यांच्या शिपायानं ‘ते’ आल्याची त्यांना वर्दी दिली.
‘‘द्या पाठवून आत,’’ मंत्री.
‘ते’ आले.
‘‘या. या. या, बाप्पा. तुम्हीच आहेत म्हटल्यानंतर माजं निम्मं टेन्शन गेलं बघा. घ्या, चहा घ्या.’’
बाप्पा म्हणजे भल्या भल्या मंत्र्यांनासुद्धा एक्सपोझ करणारा पत्रकारितेमधला एकेकाळचा ढाण्या वाघ. पण आता सीनिअर सिटीझन झाल्यामुळे (आणि कुणी किंमत देत नसल्यामुळे) राजकारणी लोकांना प्रभावी भाषणं लिहून देण्यासाठी प्रोफेशनल स्पीच रायटर म्हणून बाप्पा काम करत होते.
‘‘काल भाषण करताना तुमची फॅ फॅ झाली म्हणे,’’ बाप्पा.
मंत्रिमहोदय गालातल्या गालात हसले. म्हणाले, ‘‘अहो, यापुढे ती होऊ नये म्हणून तर तुमाला बोलावून घेतलंय. मला बगा साधं, सोपं भाषण पायजे. त्यात औघड शब्द नकोत. कोणत्याही समाजावर टीका नको. राष्ट्रीय पुरुषांवर टिप्पणी नको. भाषण विषयाशी व प्रसंगाशी विसंगत नको. सामाजिक क्रांती केलेल्या महापुरुषांचा त्यात विसर पडलेला नसावा. भाषण आठ मिनिटांपेक्षा जास्त मोठं नको. भाषण बारशापासून ते बाराव्यापर्यंत आणि भूमिपूजन समारंभापासून ते भूमीत गाडल्या गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यापर्यंत कोणत्याही प्रसंगात फिट्ट बसलं पायजे. शिवाय..’’
‘‘बास, बास, बास. समजलं. थोडक्यात तुमाला रंग, वास, चव नसलेल्या न्यूट्रल वायूसारखं त्रिकालाबाधित माष्टर भाषण पाहिजे, असंच ना?’’ बाप्पा.
‘‘कसं माझ्या मनातलं बोल्लात, बाप्पा. भाषणात विनोदी चुटके पण पायजेत बरं का. नाही तर भाषण नीरस व्हायचं. मग केव्हा देताय भाषण तयार करून?’’ मंत्री.
‘‘रविवारी संध्याकाळी देतो आणून,’’ बाप्पा.
सुट्टी असल्यानं आपल्या आलिशान बंगल्यातल्या ऐसपैस हॉलमध्ये बिग स्क्रीन टी.व्ही.वर मंत्रिमहोदय ‘हॅपी अवर्स’मध्ये उत्सुकतेनं एफ टी.व्ही. चॅनेल पाहत बसले होते. दिवेलागणी झाल्यावर बाप्पा बंगल्यात आले. थेट हॉलमध्येच गेले. अगोदर चॅनेलकडे व लगेचच मंत्रिमहोदयांकडे पाहून छद्मीपणानं हसले.
‘‘काय करणार. तुमच्या लेखण्या अन् चॅलेनवाल्यांचे कॅमेरे सतत आमच्या मागं. करमणूक करून घ्यायला जाणार तरी कुठं? त्यामुळे मनोरंजनासाठी हा एकमेव सेफ मार्ग निवडला. शिवाय, ‘तो’ होण्याची भीती नाही. बसा, बाप्पा बसा,’’ मंत्री.
‘‘ही घ्या तुमची भाषणं. मराठी, हिंदी व इंग्रजी. प्रत्येक भाषेतली एकेक माष्टर कॉपी आणलीय,’’ बाप्पा.
मंत्रिमहोदयांनी तिन्ही भाषणं काळजीपूर्वक वाचली अन् म्हणाले, ‘‘वा. वा. वा. याला म्हणतात भाषण. सुंदर, अतिसुंदर. बाप्पा, माझ्या मनात होतं तसं, अन् मला पायजे होतं तसं डिट्टो भाषण तयार केलं की हो तुमी. पण बाप्पा, मला सांगा, इतकं सुंदर भाषण तयार करण्याची प्रेरणा तुमाला दिली तरी कुणी?’’ मंत्री.
‘‘कुणी म्हणजे? माझ्या गुरुजींनी. सातवी-आठवीत शिकत असताना मी अभ्यासात ‘ढ’ होतो. मराठी भाषेत मला साधा निबंधसुद्धा लिहिता येत नसे. म्हणून शाळेत गुरुजींचा व घरी वडलांचा मला मार खावा लागायचा,’’ बाप्पा.
‘‘मग?’’ मंत्री.
‘‘मग काय. कॉपी करण्याची रिस्क घेण्यापेक्षा गुरुजींनाच एके दिवशी पटवलं. त्यांना घरी बनवलेलं झणझणीत चिकन आणि रस्सा नेऊन दिला. झालं. गुरुजी खूश. म्हणाले, ‘‘बोल बेटा, काय पाहिजे?’’ मी म्हणालो, ‘‘तुम्ही मला एक असा माष्टर निबंध लिहून द्या की, कुठलाही विषय आला तरी, तो लिहिता येईल, कोणत्याही प्रसंगात चपखल बसेल. म्हणजे मी पास होईन व मला मार खावा लागणार नाही.’’ गुरुजी म्हणाले, ‘‘घे लिहून.’’ शीर्षक- माझ्या घराला लागलेली आग. सुरुवात अशी करायची- ‘एकदा मी शाळेच्या मैदानात विटी-दांडू खेळत होतो. तेवढय़ात माझं घर असलेल्या गल्लीतून धुराचे लोट आकाशाकडे झेपावताना दिसले. जाऊन पाहतो तो काय, माझ्याच घराला आग लागली होती. मी धाय मोकलून रडू लागलो. घरात माझी आजी व धाकटा भाऊ अडकले होते. आग विझावी म्हणून शेजार-पाजारचे लोक बादल्या, घागरी, हंडे, कळशीतून पाणी आणून ते आगीवर फेकत होते. बघ्यांची ही गर्दी झाली होती. तेवढय़ात सायरन वाजवत अगोदर पोलिसांची गाडी व पाठोपाठ आग विझवणारा बंब आला. दहा मिनिटांत त्यांनी आग शमवली. मी सुटकेचा श्वास सोडला.’ बाकी कल्पनेनं वर्णन करून निबंध सजवायचा,’’ गुरुजी म्हणाले.
‘‘पण गुरुजी, एका वैमानिकाचं आत्मवृत्त असा निबंध आला तर?’’ मी.
‘‘घाबरायचं नाही,’’ गुरुजी म्हणाले, ‘‘सुरुवातीला लिहायचं, वार्षिक परीक्षा जवळ आली होती.’’ मी म्हणालो, ‘‘पुढचं मी लिहितो.’’ ‘‘म्हणून मी सकाळीच माळवदावर अभ्यास करीत बसलो होतो. तेवढय़ात एक मोठ्ठं विमान माझ्या डोक्यावरून दोनदा गेलं. त्याच वेळी मी ठरवून टाकलं की, मोठेपणी आपण विमानाचा ड्रायव्हर व्हायचं.’’
‘‘मूर्खा, ड्रायव्हर नव्हे; पायलट,’’ गुरुजी.
‘‘बरं, पायलट. मी वडिलांना तसं सांगितलं. म्हणाले, कसून अभ्यास कर, बारावीनंतर पाहू. पुढची सगळी र्वष मी नव्वद टक्क्यांपेक्षा कमी मार्क घेतले नाहीत. बारावीत मला ९५ टक्के गुण मिळाले. पायलट ट्रेनिंग सेंटरमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली. पायलट झालो. विमान चालवू लागलो; परंतु माझ्या गावावरून विमान घेऊन जाण्याची संधी मला मिळत नव्हती. एकदा ती मिळाली. मला खूप आनंद झाला. विमानातून खाली गावातली घरं, माणसं, जनावरं, झाडं.. सगळं कसं छोटय़ा छोटय़ा खेळण्याप्रमाणे बारीक दिसत होतं. मी विमानातून माझ्या वडिलांना हाक मारली. तितक्यात गावातल्या कुठल्या तरी घरातून आकाशाकडं धूर येताना दिसला. म्हणून मी लगेच हवाई कंट्रोल रूममार्फत गावच्या पोलिसांना विचारलं. ऐकतो तो काय, माझ्याच घराला आग लागली होती.’’ ‘‘पुढचं सगळं वर्णन तुला सांगितलं आहेच. द्यायचं ठोकून की झाला निबंध तयार,’’ गुरुजी.
‘‘पण गुरुजी, माझा आवडता नेता या विषयावर निबंध कसा लिहिणार?’’ मी.
‘‘अजिबात गोंधळून जायचं नाही,’’ गुरुजी म्हणाले, ‘‘सुरुवातच गावातल्या आमदाराच्या कार्यानं करायची. तो गरिबीत कसा वाढला, अडचणींना तोंड देत लोकसेवा करता करता तो मोठा कसा झाला, यात दोन परिच्छेद करायचे. त्याच्याबद्दल गोड गोड लिहून आमदारकीच्या निवडणुकीत तो दुसऱ्यांदा विजयी झाला म्हणायचा. विजयी मिरवणूक निघाली होती. मीही तीत सामील झालो होतो. बरंच अंतर चालून गेल्यावर माझं घर असलेल्या गल्लीतनं आकाशाकडे धूर जाताना दिसला. म्हणून आम्ही तिकडं धावलो. पाहतो तो काय, माझ्याच घरातून धूर येताना दिसला.’’ असं म्हणून बाकीचं वर्णन वर आलंय, ते डोळे झाकून लिहायचं, की झाला निबंध तयार. कुणाची माय व्यालीय तुला नापास करायची?’’ गुरुजी.
‘‘व्वा.. तुमचे गुरुजी मला भेटायला पायजेल होते. सोनं केलं असतं त्यांच्या जिंदगीचं. पण बाप्पा, या भाषणात विनोदी चुटके कुठेच नाहीत?’’ मंत्री.
‘‘चुटके पाठ करून सांगायचे असतात. फाइव्ह स्टार हॉटेलातल्या कार्यक्रमात भाषण करताना शेवटी शेवटी योग्य शब्दावर भर देत म्हणायचं, ‘व्हाइल कमिंग ओव्हर हियर, युवर चेअरमन टोल्ड मी, मिस्टर मिनिस्टर, प्लीज बी ब्रीफ. युवर स्पीच शुड बी लाइक अ मिनी स्कर्ट वुईच एक्स्पोजेस ऑल इंपर्ॉटट पॉइंटस्.. (थोडा पॉज घ्यायचा) अ‍ॅण्ड कव्हर ऑल व्हायटल आस्पेक्टस्. नाऊ यू डिसाइड, व्हेदर आय वॉज ब्रीफ इन माय स्पीच ऑर नॉट,’’ बाप्पा.
‘‘म्हणजे काय होईल?’’ मंत्री.
‘‘अहो, या विनोदामुळे तिथला एलाइट ऑडियन्स तुमच्या भाषणातल्या चुका विसरून जाईल अन् एक फर्डा इंग्रजी वक्ता म्हणून तुमची इमेज तयार होईल,’’ बाप्पा.
‘‘बाप्पा, माजं सगळं टेन्शन घालवलं बगा तुमी. आता दोन घास खाल्ल्याशिवाय जायचं नाही,’’ मंत्री.
यावर बाप्पांनी चमकून त्यांच्याकडं पाहिलं, तसं मंत्री म्हणाले, ‘‘आलं लक्षात माझ्या. तुमचा ‘शीण घालवून तरतरीत’ व्हायची व्यवस्था केलीय लॉनवर. तिकडंच जायचंय आता, चला.’’
वसंत पिटके

हरे राम हरेऽराम राम राम हरे हरेऽचा जप करीत स. दा. रडे हेडमास्तर कार्यालयात आले. टोपी टेबलावर ठेवून तुळतुळीत डोक्यावरचा घाम नेहरूच्या खिशातील रुमाल काढून पुसू लागले तोच त्यांचं लक्ष खाकी लिफाफ्यावर गेलं. अन् ते दचकले. हळुवार हातानं लखोटा फोडून आतील कागद त्यांनी वाचला अन् थोडा वेळ डोळ्यापुढं अंधारी आली. रघू शिपायाकरवी निरोप देऊन सर्व गुरुजनांना त्यांनी दोन वाजताच्या मीटिंगचा निरोप दिला. शाळा-दप्तरं घेऊन सोडून द्या म्हणून सांगितलं.
दोन-तीन दिवसांत शाळा तपासनीस येणार होते, तेही नवखे. त्यांच्याबद्दल दोन-तीन शाळांचा वाईट रिपोर्टही समजला होता.
कॅटलॉग, हजेरीपुस्तकं, अनुदानाचे हिशेब रजिस्टर्स सगळं अपूर्ण होतं. िभतीवरचा रंग उडाला होता. जमिनी उकलल्या होत्या. बाहेरच्या बाजूला दोन-तीन भगदाडं पडली होती. ही सर्व कामं दोन-तीन दिवसांत कशी पूर्ण व्हायची? सारवणं, रंगरंगोटी, भिंतीवर ऐतिहासिक चित्रं. काहीच तयारी नव्हती. चिंधेगुरुजी सकाळीच त्यांची परवानगी घेऊन खासगी कामाकरिता बाहेर गेले होते. करकरे, भोळे, कावळे, बगळेगुरुजी तेलतुंबडेबाई, पोटफोडेबाई सर्व कार्यालयांत जमले. स. दा. रडे गुरुजींनी वरील कामांचा पाढा वाचला. वर्ग सारवणं, रंगरंगोटी, चित्रं काढून घेणं, भगदाडं बुजवणं ही कामं त्या त्या मास्तरांकडे नेमून दिली. हे पहा. हे झालं नाही तर तीन शाळांचे रिपोर्ट आले आहेत एक हे- मा. सस्पेंड झाले, एक रिव्हर्ट झाले, एकाची वेतनवाढ थांबवली. सस्पेंड, वेतनवाढ बंद हे ठीक आहे, पण रिव्हर्ट काय भानगड आहे? आगलावे कपाळावरचा चष्मा डोळ्यावर घेत म्हणाले. काय आगलावेगुरुजी, तुमची नोकरी फक्त चार वर्षे राहिली, पण रिव्हर्ट माहीत नाही? म्हणजे खाली ओढणे म्हणजे तपासनीस तुम्हाला ओढून आदळणार म्हणाली ते काही फ्रीस्टाईल नाही. खेळणार खालच्या पदावर, आणणार तुमच्यासारखं बे एके बे करायला. एवढय़ात चिंधेगुरुजी आले. चिंधे, तुम्ही कॅटलॉग, हजेरी बुक व अनुदान हिशेब रजिस्टर पुरी करा. सातपुत्यांना घ्या मदतीस. पण तीन दिवसांत हे कसं शक्य आहे? वर्ग सारवणारीबाई गोव्याला गेलीय. पेंटर बेवडा तो कुठं पिऊन पडला असणार अन् रंगकाम करणारा त्याच्या गावी गेलाय.
मला काहीएक सांगू नका. रघूला घ्या मदतीला अन् घ्या भिंती रंगवून, पताका लावा. पळा.
पण सर, मला वाटतं हे सगळं करण्यापेक्षा सातवीचा वर्ग अपटूडेट करू. तोच दाखवू. बाकी नंतर! तपासणी या कार्यालयातच होईल आणि एक सांगतो. इकडं या, तपासनीससाहेब नवीन असले तरी, सातपुत्यांनी रडय़ांच्या कानात सगळी योजना सांगितली. रडय़ांच्या तोंडावर हसू फुटले, तकाकी आली. एवढय़ात चिंधे आले. गुरुजी, अनुदानाचा हिशेब जमत नाही. तुम्ही पत्नीच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशनला पैसे उचलले. पुढे मुलीचं लग्न झालं. त्यालाही अनुदानानं रक्कम उचलली. फंड व सोसायटी काढून भरतो म्हणाला. आता केव्हा भरणार? त्यामुळे ही कामं झाली नाहीत. अन् काय हिशेब बघणार. स. दा. रडेंच्या टकलावर परत घाम आला.
ठरल्या दिवशी तपासनीस आले. हजेरीबुकं, कॅटलॉग. सटरफटर कागद पाहून झाले. ते फारच खाष्ट होते. जेवणाची वेळ झाली. तसं रडे त्यांना घरी जेवायला घेऊन गेले. बेत साधाच होता. तपासनीस थोडे नाराज वाटले. संध्याकाळी सातपुत्यांनी कोंबडी अन् थ्रीएक्स रमची सोय केली होती.
मला हिशेब रजिस्टर, अनुदान खर्च दाखवा. चष्मा उतरवीत तपासनीस म्हणाले. पण उद्या, आता जेवायला चला. छान बेत केलाय. तपासनीस नाइलाजाने उठले. सातपुत्यांच्या घरी थ्रीएक्स रम, शेव व सोडय़ानं चांगलीच रंगत आणली. सगळ्यांनी थोडी थोडी घेतली. पण तपासनीसांना जरा जास्तच झाली. त्यात कोंबडीच्या रश्शाचा वास पोटात भुकेचा आगडोंब वाढवीत होता. कोंबडीवर तपासनीस तुटून पडले. मसाला पान चघळीत सातपुत्यांनी व्यवस्था केलेल्या खोलीत जाऊन पडले व घोरूही लागले. रात्री बारा- साडेबारा वाजता तीन-चार गुरुजनांनी त्यांना अलगद मैनाबाई डोंगरेंच्या खोलीत झोपावले. हे तिलाही कळले नाही. सकाळी सकाळी आठ-दहा ग्रामस्थ काठय़ा घेऊन आले. मैनाबाई, दार उघडा दार या गलक्यानं तपासनीस जागे झाले. ही काय भानगड आहे कळेल? ते पुटपुटले. मैनाही दचकली. तिनं दार उघडलं. साहेब, आहेत का शाळेच्या खोलीत? हे शाळेचे साहेब आहेत व्हय. मलाही माहीत नाही इथं कसे आले. मी आपली त्या कोपऱ्यांत झोपली व्हते. चांगली थेरं करताय दुसऱ्याच्या गावात येऊन हीच का तुमची तपासनी? चांगलं नाव काढताय शाळेचं. अहो पण.. मी रात्री दुसरीकडं.
त्यांना बोलू न देता म्हादा लरानं दटावलं. एवढय़ात रडे, चिंधे, कावळे, सातपुते आले. अहो, अहो, झालं काय? काय प्रकार आहे. हे तुमचे सायेब बघा गावात येऊन कसले धंदे करतायेत ते. अहो, चुकून झालं असेल. साहेब झोपेत असतील. आपली खोली समजून लघवीला उठले असतील तर चुकून शिरले, मैनाच्या खोलीत अन् झोपेत कडी लावली असेल. साहेब फार सज्जन माणूस. कधीही इकडं तिकडं पहाणार. तुम्ही जावा. चिंधे गुरुजींनी गपचूप डोळा मारला तसं गावकरी निघून गेले.
साहेब शरमेनं अर्धमेले झाले. हे पहा, मला आता गेलं पाहिजे.
साहेब, अनुदान हिशेब बघा, जेवण घ्या मग जा.
नको, पुढे केव्हातरी पाहू. साहेबानं आंघोळ उरकली, खाली मानेनंच चहा घेतला. गुरुजी याची वाच्यता कुठे करू नका. छे! छे! आम्ही कशाला बोलू, पण साहेब जेवून जावा. तुमचं शेरे बुक आणा. वर न पहाताच साहेब म्हणाले. सकाळपासून डरकाळी फोडणारा वाघ मांजर झाला होता. चांगले, उत्तम, उत्कृष्ट असे शेरे शाळा बुकावर देऊन बॅग उचलून ते एसटी स्टँडकडे निघाले. बरोबर स. दा. रडे व गुरुजन मंडळ. साहेब एसटीत बसले. टाटा करून सर्वानी निरोप दिला. तसं गुरुजींनी हातावर हात मारत स. दा. रडेंना म्हटलं, गुरुजी, आम्ही हीतं आहे तोपर्यंत शाळा तपासणीची चिंताच सोडा. खोऽखो हसत मंडळी शाळेवर आली.
शरद के. चव्हाण

स्वर्ग आणि नरक यांच्यामध्ये जी भिंत होती ती नरकातील लोक नेहमी पाडायचे आणि प्रत्येक वेळेस स्वर्गातले लोक ती बांधून काढायचे. पुष्कळदा हा प्रकार झाल्यावर स्वर्गातले लोक कंटाळून गेले. परत जेव्हा नरकातील लोकांनी भिंत पाडली तेव्हा मात्र स्वर्गातील लोक चिडले आणि त्यांनी धमकी दिली, ‘‘हे बघा, यावेळी आम्ही भिंत बांधतो, पण परत जर तुम्ही पाडली तर सरळ आम्ही कोर्टात जाऊन तुमच्यावर दावा लावू.’’
‘‘खुशाल जा कोर्टात,’’ नरकातले लोक निश्चिंतपणे म्हणाले. ‘‘सगळे वकील आमच्याकडे आहेत.’’
- भाग्यश्री कुंभार, पिंपरी, पुणे-१७.
----------------------------
महिलेने आपल्या मैत्रिणीला विचारले, ‘‘तुमच्या मुलीची सोयरिक होऊन तीन वर्षे झाली. मग लग्न का नाही करून टाकीत.’’ मैत्रीण म्हणाली, ‘‘मुलगा वकील आहे, जेव्हा लग्नाची तारीख येते तेव्हा तो लगेच पुढची तारीख देत राहतो.’’
----------------------------
मॅनेजर - आज ऑफिसात उशिरा का आलात?
कर्मचारी - साहेब, मी गाडीला हात दिला, पण थांबली नाही.
मॅनेजर - कोणती गाडी होती ती?
कर्मचारी - लोकल ट्रेन.
- नेमीचंद राका, नाशिक.
---------------------------
कुलकर्णी आणि जोशी यांनी एकाच पदासाठी अर्ज केले होते. दोघांची लेखी चाचणी घेण्यात आली. चाचणीचा निकाल जाहीर करताना मुलाखतकर्त्यांनं दोघांना बोलावून म्हटलं, ‘‘तुम्हा दोघांचीही चुकीच्या उत्तरांची संख्या सारखीच आहे, परंतु ही जागा आम्ही कुलकर्णींना देण्याचं ठरविलं आहे.’’
‘‘आम्ही दोघांच्या चुकीच्या उत्तरांची संख्या सारखीच असताना ही नोकरी कुलकर्णींना कशी काय मिळाली?’’ जोशीनं जरा घुश्श्यातच विचारलं.
‘‘हे बघा, तुम्हा दोघांच्या चुकीच्या उत्तरापैकी एक चुकीचं उत्तर तुमच्यापेक्षा कुलकर्णीचं अधिक बरं वाटलं,’’ मुलाखतकर्ता म्हणाला.
‘‘हे कसं शक्य आहे?’’ गोंधळलेल्या स्वरात जोशीनं विचारले.
मुलाखतकर्ता म्हणाला, ‘‘सांगतो, चव्वेचाळिसाव्या प्रश्नाचं उत्तर कुलकर्णी यांनी ‘मला माहीत नाही’ असं लिहिलंय आणि तुम्ही लिहिलंय ‘मलाही’.
- दत्ता राशिनकर, चिंचवड.
----------------------------
दुसऱ्या महायुद्धानंतर एक प्रसिद्ध चित्रपटतारका जखमी जवानांना भेट द्यायला हॉस्पिटलमध्ये गेली. ‘‘तुम्ही शत्रू सैनिकांना मारलंत का?’’ तिने विचारले.
‘‘हो, एका जवानाला ठार केले,’’ सैनिक.
‘‘कुठल्या हाताने मारलंत?’’ चित्रपटतारका.
‘‘या, उजव्या हाताने,’’ सैनिक.
चित्रपटतारकेने पटकन त्या जवानाच्या उजव्या हाताचे चुंबन घेतले. ती पुढच्या कॉटवरील सैनिकाजवळ जाऊन विचारू लागली.
तो म्हणाला, ‘‘मी बारा जवानांना ठार केले.’’
‘‘कोणत्या हाताने,’’ चित्रपटतारका.
‘‘पाच जवानांना उजव्या हाताने आणि सात जवानांना चक्क चावून चावून काढले.’’
- प्रतिभा विवेक बिवलकर, डोंबिवली (पूर्व)
--------------------------
अमित - एकदा हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळताना मुंगी मंदिरात जाऊन लपते, ते हत्तीला कसे माहीत होते?
सुमित - कसे?
अमित - मंदिराबाहेर तिच्या चपला पाहून.
- सुदीप पात्रा, वासिंद, ठाणे.
---------------------------
एका लॉजिंग बोर्डिगवर एक विवाहित जोडपं मौजमजा करण्यासाठी गेलं होतं. परंतु तेथील व्यवस्थापकाने सांगितलं की, आम्ही तुम्हाला खोली देऊ शकत नाही. तेव्हा तो गृहस्थ म्हणाला की, तुमच्या डोक्याजवळ जी पाटी लावली आहे तिच्यावर तर विवाहित जोडप्यासाठी येथे खोली मिळेल, असं लिहिलंय आणि आम्ही दोघेही विवाहित आहोत. तेव्हा तो व्यवस्थापक म्हणाला की, तुम्ही या पाटीवर कंसात काय लिहिलंत हे नीट वाचलेलं नाही. त्यात स्वच्छ लिहिलंय की, परस्पराशी विवाह झालेल्या जोडप्यास खोली दिली जाईल.
- मनोहर बापूजी कुरुलकर, सोलापूर.
----------------------------
आपल्या दारूडय़ा पतीला कंटाळलेली पत्नी घटस्फोट घेऊ इच्छित होती. प्रकरण न्यायालयात गेलं असता न्यायाधीशांनी विचारलं, ‘‘तुमचे पती एकटे असतानादेखील दारू पितात का?’’ त्यावर पत्नी म्हणाली, ‘‘साहेब, ते मला कसं माहीत असणार, कारण ते एकटे असताना मी कधीही त्यांच्याबरोबर राहिले नाही ना!’’

एक नंबरी
समोरच्या कारची धडक बसल्याने संतापलेले पाटीलसाहेब आपल्या कारमधून उतरून त्याला जाब विचारायला धावले. धडक देणारा पटेल दोन्ही गाडय़ांचं झालेलं नुकसान पाहत शांतपणे म्हणाला, ‘‘माय मिस्टेक. मी तुम्हाला २५०० रुपये देतो. लगेच मिटवून टाकू.’’ कंपनीचीच कार वापरणारे पाटील मनातून खूश झाले. पटेल पुढे बोलला, ‘‘चला मला गाडी बदलायचीच होती. तुमच्यामुळे निमित्त मिळालं. आपण हे सेलिब्रेट करू.’’ पटेलने आपल्या गाडीतून व्हिस्कीची बाटली अन् दोन ग्लास काढले. पाटीलसाहेबांनी आनंदाच्या भरात उभ्या उभ्या तीन पेग घेतलेसुद्धा. अन् एकदम वरमून पटेलला म्हणाले, ‘‘अरे, मी एकटाच घेतोय. तुम्ही का घेत नाही?’’ पटेलने ती बाटली अन् ग्लास पाटीलसाहेबांच्या हातून घेऊन त्यांच्याच गाडीत ठेवले. अन् उद्गारला, ‘‘आता वाहतूक पोलीस येऊ दे, चौकीवर तपासणी होऊ द्या कोण प्यायलं त्याची. त्यानंतर घरी जाऊन घेईन की मी आरामात.’’
- श्रीपाद पु. कुलकर्णी पुणे

Some basic facts of life which applies to the Salaried People!!!!

Bank Balance
First Week : 10000
Second Week : 1000
Third Week : 100
Fourth week : 10

Conveyance
First Week : Auto ("I can afford it")
Second Week : Share Auto ("I would like to share. I am selfless!")
Third Week : Bus ("Public figures should travel by public transport")
Fourth week : Walk ("Good for health")

Girl friends
First Week : Eena, Meena, Tina ("I can BUY love")
Second Week : Meena, Tina ("I have enough girl friends")
Third Week : Tina ("I am loyal to her")
Fourth week : "Huh! There is no pure love on earth!"

Mobile Maintenance
First Week : Frequent outgoing calls ("This is what mobile is invented for")
Second Week : Restricted o! utgoing calls ("I should not create unnecessary traffic on mobile lines")
Third Week : Rare outgoing calls ("Mobile should be used in urgent
situations only")
Fourth week : Only incoming calls ("I am not going to call her until she
calls me")

And last....but not the least...

Boozing
First Week : "Come, let's go to Goa and freak out!"
Second Week : "Man, there is nothing in Goa. Let's go to Lonawala."
Third Week : "The best place to booze on earth is our house itself. what
say?"
Fourth week : "Drinking is injurious to health".