Leading International Marathi News Daily                                  रविवार, ४ जानेवारी २००९

कैलास कोरडे
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम करणाऱ्या रत्नाकर जोशी यांच्या घरा‘समोर’ भले एकही गाडी नाही, पण त्यांचे घर मात्र विविध प्रकारच्या शेकडो गाडय़ांनी भरलेले आहे. त्यांच्या घरातील या गाडय़ा खेळण्यातील नाहीत. अगदी खऱ्याखुऱ्या आहेत. १९३६ ची रोडस्टर, १९४९ मधील कॅडिलॅक (कुपे डी विली), २००३ ची हमर, मर्सिडिज बेंझची ५०० के.. अशा अनेक गाडय़ा ‘स्केल’ मॉडेलच्या स्वरुपात त्यांच्याकडे आहेत. या गाडय़ाच आपले खरे वैभव आहे, असे जोशी सांगतात.
लहानपणापासूनच गाडय़ांची आवड असलेल्या रत्नाकर जोशी यांना १९८९ पासून वाहनांची स्केल मॉडेल्स जमा करण्याचा छंद जडला. आज त्यांच्या खजिन्यात शंभराहून अधिक वाहनांची स्केल मॉडेल आहेत. त्यात कार, ट्रक, बस, ट्रॅक्टर आदींचा समावेश आहे. त्यांच्याजवळ अशा काही गाडय़ांची स्केल मॉडेल आहेत की, आजमितीला त्या वापरातही नाहीत.
रत्नाकर जोशी यांच्याकडे १९२३ सालच्या फोर्ड ‘स्टेक बेड’ ट्रकचे सर्वात जुने स्केल मॉडेल आहे. काही अल्ट्रामॉर्डन बसेसखेरीज ‘फॉम्र्युला वन कार’ची स्केल मॉडेलही त्यांनी जमविली आहेत.

प्रतिनिधी
आताशा तब्बल अध्र्या तासाची किंवा मग ४० मिनिटांची मालिका पाहायला वेळ कुणाला आहे? ज्यांना वेळ नाही, त्यांच्यासाठी काय? तरुणाईने त्यावरही एक पर्याय शोधला आहे, तो सिटकॉम्सचा! सिटकॉम म्हणजे झटपट मालिका तीही फक्त एक मिनिटाची! अशी अस्सल भारतीय मालिका सुरू झाली आहे आणि त्याला प्रतिसादही उत्तम मिळतोय.. शक्य तितक्या सर्व सुविधा व मनोरंजनाची माध्यमे आपल्याबरोबर ‘कॅरी’ करण्याची सवय लागलेली आजची तरुण पिढी. लांबलचक मेलोड्रामा बघण्यात त्यांना जराही रस नसतो आणि वेळही. सगळं काही एका क्लिक्च्या अंतरावर पटकन उपलब्ध.

‘तीच ती दिवाळी’
स्थित्यंतरांची आल्बमी झलक

चार-पाच वर्षांमागे रूपारेल महाविद्यालयानं आय.एन.टी. स्पर्धेत ‘तीच ती दिवाळी’ ही एकांकिका सादर करून सवरेत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार पटकावला होता. १९४७ ते आजघडीपर्यंत एका सी. के. पी. कुटुंबातील चार पिढय़ांत झालेल्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि मूल्यांसंदर्भातील बदलांच्या पाश्र्वभूमीवर विविध स्थित्यंतरांचा मागोवा तीत घेतला गेला होता. इरावती कर्णिक लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित ही एकांकिका (‘त्रिकूट’ निर्मित व ‘मिथक’ प्रकाशित) आता ‘तीच ती दिवाळी’ याच नावानं पूर्ण लांबीच्या नाटकाच्या रूपात व्यावसायिक रंगभूमीवर आलं आहे. खरं तर या विषयाचा आवाका पाहता त्यावेळी ही एकांकिका भरपूर गोष्टी एकत्र कोंबलेल्या होल्डॉलसारखी वाटली होती. परंतु कॉलेज विद्यार्थ्यांच्या पातळीवर तो प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद होता. विशेषत: त्यात चार पिढय़ांतील बदलांचा सर्वागानं घेतलेला वेध दाद देण्यायोग्य होता. आता पूर्ण लांबीच्या नाटकात हे बदल अधिक तपशिलवारपणे ठळक केले गेले आहेत.

‘आविष्कार’चा महेश एलकुंचवार नाटय़महोत्सव
नाटय़-प्रतिनिधी : आविष्कार संस्थेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा अरविंद देशपांडे स्मृती नाटय़महोत्सव यंदा ६ ते १० जानेवारी यादरम्यान माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात होणार असून, ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या गौरवार्थ तो होत आहे. एलकुंचवारांच्या नाटकांचे प्रयोग, त्यांच्या लेखनावर आधारित रंगमंचीय सादरीकरण तसेच चित्रपटाचे प्रदर्शन यात होईल. महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या हस्ते होणार आहे.

रंगलेले संमेलन
चतुरंग प्रतिष्ठानचा अठरावा सोहळा २५ डिसेंबरला दादरच्या जोशी सभागृहात अतिशय सुनियोजित व काटेकोरपणे पार पडला. सध्या सगळीकडे ‘उत्सवमूर्ती’च्या स्वरूपात अवतरणारे लिटिल चॅम्प्स या ठिकाणी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्यांनी झाली. छोटीशी मुग्धा आणि प्रथमेश यांना नेहमीप्रमाणेच प्रेक्षकांकडून दाद मिळत होती. या छोटय़ांची गाणी व सुनील बर्वे यांचे सूत्रसंचालन यामुळे कार्यक्रमाची सकाळ प्रसन्न वातावरणात उजाडली.
उद्घाटन सोहळ्याला प्राध्यापक वामन केंद्रे, नाटय़ दिग्दर्शक विजय केंकरे व टाटा ग्रुप इंडस्ट्रीचे प्रमुख किशोर चौकर हे उपस्थित होते. नटराजपूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यावर बोलताना प्रा. वामन केंद्रे म्हणाले की आपल्याकडे दोन पद्धतीच्या संस्था आहेत. एक म्हणजे मनस्वी, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व दुसऱ्या काम कमी, पण घोषणा खूप या प्रकारात मोडणाऱ्या.

‘डाव’ रंगलाय
ज्याची बॅट तोच पहिला खेळणार आणि सर्वात जास्त बॅटिंगही तोच करणार हा नियम काही वेळा लागू असतो. ‘एक डाव धोबीपछाड’ चित्रपटाची निर्मिती अशोक सराफ यांनी केली असली तरी या चित्रपटात त्यांनी सर्व कलाकारांना ‘बॅटिंग’ करायला वाव दिलेला आहे. त्यामुळे ‘सबकुछ अशोक सराफ’ न राहता वेगवेगळ्या स्वभावाच्या पात्रांनी घातलेला ‘गोंधळ’ प्रेक्षकांना हसवतो आणि मुख्य म्हणजे अंगविक्षेप किंवा शब्दांचे पोस्टमार्टम करून मुद्दाम विनोदनिर्मिती न करता प्रसंगनिष्ठ विनोदांवर भर दिल्यामुळे हा डाव चांगलाच रंगला आहे. दादासाहेब दांडगे (अशोक सराफ) ही गावातील (गुंड प्रवृत्तीची) बडी आसामी. गावातील एका जागी शाळा बांधायची की जुगाराचा अड्डा या निमित्ताने दादासाहेबांना त्यांची जुनी प्रेयसी हेमा (किशोरी शहाणे) भेटते. यावेळी तरूणपणी दोघांमध्ये झालेले गैरसमज दूर होतात आणि दादासाहेब पुन्हा एकदा हेमाला लग्नाची मागणी घालतात. पण अशिक्षित, गुंड अशा दादासाहेबांशी लग्न करायला हेमा तयार नसते.

उपयुक्त आरएसपी
मुंबई शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना १९५१ पासून मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखा शिक्षण विभागातर्फे रस्ता सुरक्षेसाठीचे शिक्षण देण्यात येते. आजही अशा प्रकारच्या शिक्षणाची अत्यंत आवश्यकता असल्याचे म्हणावे लागते. रस्ता सुरक्षा दल अर्थात ‘आरएसपी’ या नावाने दिले जाणारे हे शिक्षण विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातही खूपच उपयुक्त ठरत असते.
मुंबई पोलीस शहर अधिकारी व वाहतूक पोलीस अधिकारी तसेच संबंधित मंत्री यांनी मुंबई शहरातील नागरिक यांनी एका बैठकीत अपघाताविषयी चर्चा केली. ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये १९२० व अमेरिकेमध्ये १९२२ मध्ये त्यांच्या शाळांमध्ये रस्ता सुरक्षा दलाची स्थापना केली होती व त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले, त्याचप्रमाणे मुंबई शहरातही शाळांमध्ये रस्ता सुरक्षा दलाची स्थापना व्हावी असा एकमताने ठराव मंजूर झाला. त्यानुसार मुंबई शहरात रस्ता सुरक्षा दलाची फेब्रुवारी १९५१ साली बोरीबंदरच्या न्यू भरडा हायस्कूलमध्ये स्थापना झाली. न्यू भरडा हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. एच. मुल्लासाहेब व वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सेक्स्बीसाहेब यांचे मोलाचे सहकार्य त्यावेळी या कामात होते.

कोकणी नाटकाचा विक्रमी ‘नंदादीप’ लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये!
मराठी नाटकांचा सुवर्णमहोत्सव होणे ही बाब दुर्मिळ खचितच नाही. नाटकधंद्याच्या अगदी सध्याच्या मंदीच्या काळातही सर्वसाधारण चांगल्या नाटकाचे पन्नास प्रयोग सहज होतात. मात्र कोकणी नाटकाचे दहा प्रयोग झाले तरी डोक्यावरून पाणी असे म्हणण्याची वेळ असते. अशा स्थितीत कोकणी त्रिवेणी कला संगम या मुंबईच्या कोकणी कलावंतांच्या संस्थेने ‘नंदादीप’ या नाटकाचे चक्क पन्नासहून अधिक प्रयोग रंगवले आहेत आणि त्याचाच एक खास विक्रम घडवला आहे ! म्हणूनच सर्वाधिक काळ चाललेले कोकणी नाटक, ही ‘नंदादीप’ची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस (२००९)’ने घेतली आहे.
कोकणी भाषेचा प्रसार कलेच्या माध्यमातूनही व्हावा, या उद्देशाने १९८० साली काही कोकणी कलावंत एकत्र आले आणि त्यांनी ही बिगरव्यावसायिक अशी कला या विषयाला वाहून घेतलेली नाटय़संस्था स्थापन केली.

प्राणिमित्र ‘पेटा’ची नवी दिनदर्शिका
नव्या वर्षांची सुरुवात ही सरत्या वर्षांचे कॅलेंडर बदलून नव्या कॅलेंडरने सुरू होते. प्रत्येक घराघरांमध्ये ‘भिंतीवरी असावे’ या कॅलेंडरपासून विविध प्रकारची एक-दोन कॅलेंडर्स असतातच. आजकाल अनेक कॉर्पोरेट कंपन्याही आपली स्वत:ची कॅलेंडर्स प्रकाशित करतात. त्यापैकी बहुतांश कॅलेंडर्सवर निसर्गचित्रे, वाहने, मॉडेल्स यांची चित्रे असतात. ‘पीपल फॉर दी एथिकल ट्रिटमेंट ऑफ अ‍ॅनिमल’ म्हणजे ‘पेटा’ या संस्थेतर्फे दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या कॅलेण्डरचे वैशिष्टय़ म्हणजे त्यामध्ये प्राण्यांची छायाचित्रे असतात, आणि प्रत्येक छायाचित्रामागे एक वेगळी कथा असते. ‘पेटा’च्या कार्यकर्त्यांनी सुटका केलेल्या प्राण्यांची ही छायाचित्रे आहेत. ‘पेटा’च्या कार्यकर्त्यांनी मृत्यूच्या जबडय़ातून या सर्व प्राण्यांची सुटका करून त्यांना जीवनदान दिले आहे. आपल्या सभोवताली आपल्याला असे प्राणी आढळले तर त्यांच्या सुटकेसाठी काय करता येईल, त्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी : www.petaindia.com
प्रतिनिधी

‘तहान’ मुंबईत
प्रतिनिधी : एकीकडे भारत चंद्राकडे झेपावला असला तरी ग्रामीण भागात पाणीटंचाईसारख्या मूलभूत समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. राज्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, सत्ताधारी व विरोधकांनी या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष, जनतेचा प्रक्षोभ याचे चित्रण असलेला ‘तहान’ हा चित्रपट अलीकडेच मुंबई प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘किसान पिक्चर्स’च्या बॅनरखाली भीमसेन धोंडे यांची निर्मिती असलेल्या ‘तहान’ या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद श्रीकांत बोजेवार यांची असून दासबाबू यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. पाणी नाही म्हणून पीक नाही, पीक नाही म्हणून आवक नाही, आवक नाही म्हणून जीवन नाही. मग शेतकरी जगण्यासाठी कर्ज काढतो आणि त्या दुष्टचक्रात अडकतो. या सर्व परिस्थितीचा परामर्श ‘तहान’ मध्ये घेण्यात आला आहे. सदाशिव अमरापुरकर, अरूण नलावडे, कुलदीप पवार, सुनील शेंडे, विजय चव्हाण, विक्रम गोखले या कसलेल्या नटांप्रमाणेच सुनील बर्वे, आदिती भागवत, सुरेखा कुडची ही यंग ब्रिगेडही या चित्रपटात आहे. चित्रपटातील गीते जगदीश खेबुडकर, प्रा. भगवान देशमुख आणि इंद्रजित भालेराव यांनी लिहिली असून अच्युत ठाकूर यांनी संगीतबद्ध केली आहेत.

सत्यशोधक व्याख्यानमाला
प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या वतीने ५ जानेवारी ते नऊ जानेवारी दरम्यान सत्यशोधक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उद्धाटन खासदार एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी रात्री ८.०० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कन्नमवार नगर, विक्रोळी- पूर्व येथे होणार आहे.अभय शिक्षण केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयातर्फे गेली अनेक वर्षे या व्याख्यानमालेचे सातत्याने आयोजन करण्यात येते. यावर्षी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरविंद इनामदार, पत्रकार राजू परुळेकर, आमदार वर्षां गायकवाड वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. पाच जानेवारी रोजी ज्योतीराम फडतरे, बाबासाहेब परीट व हिंमत पाटील यांचे नवा बहर या विषयावर कथाकथन असेल. ६ जानेवारीला अरविंद इनामदार यांचे आम्ही भारतीय व दहशतवाद या विषयावर भाषण आहे तर ७ तारखेला राजू परुळेकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मराठी भाषा, ८ तारखेला वर्षां गायकवाड अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक यावर बोलतील. शेवटच्या दिवशी संपत कांबळे व प्राध्यापक सुरेश मोहिते यांचा कवितांचा कार्यक्रम होणार आहे.