Leading International Marathi News Daily                                  रविवार, ४ जानेवारी २००९

आतषबाजी. फटाके. रोषणाई. नाच. गाणी. मद्यपान. धांगडधिंगा. नववर्षांचे परवलीचे शब्द. माणसाने नव्याच्या स्वागतासाठी आणि आनंद व्यक्त करण्यासाठी स्वत:चे असे खास सण आणि उत्सव तयार केले आहेत. या वर्षीच्या उत्सवाला मुंबईच्या हल्ल्याची पाश्र्वभूमी होती. ताज हॉटेलातील निघणाऱ्या धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला, सीएस्टीवरच्या रक्तरंजित भिंती, नरिमन भवनावर उतरणारे कमांडो, स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलणारे पोलीस या पाश्र्वभूमीवर नववर्षांच्या स्वागताला उत्सुक मनावर चिंतेची झालर साहजिक आहे. चित्र एवढय़ाने पूर्ण होत नाही. आर्थिक संकटाच्या ड्रॅगनच्या जबडय़ाची अजून आपल्याला कल्पना नाही, जगभरच्या अन्नधान्य टंचाई आणि किमतीचे खरे चित्र कळत नाही, सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे आकलन करता येत नाही, सामाजिक क्षेत्रातील निर्देशांक (शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा) महासत्तेच्या आकांक्षेला अजून पूरक नाहीत, माओवाद्यांपासून जातीय, धार्मिक, आर्थिक तणावापर्यंतच्या अनेक समस्या देशाला आतून पोखरताहेत. या पाश्र्वभूमीवर ‘नववर्ष मंगलमय होवो’ अशा शुभेच्छा! अशा शुभेच्छा ही आता औपचारिकता झाली आहे. वैश्वीकरणाचा एक महत्त्वाचा धोका हा आहे की संकल्पनांचा फार लवकर सोहळा बनून जातो. शुभेच्छांचा तात्काळ ईमेल बनून जातो, भावनांचा विनाविलंब एसएमएस होऊन जातो आणि माणूस कळत-नकळत यंत्र बनतो किंवा यंत्राच्या हातातील बाहुले.

कल्याणचा आधुनिक सुभेदार कोण?
रा मभाऊ म्हाळगी, कृष्णराव धुळप आणि रामभाऊ कापसे यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व लाभलेल्या ऐतिहासिक कल्याण नगरीने अनेकदा राजकीय समीकरण बदलण्यास भाग पाडले आहे. ठाणे लोकसभा क्षेत्रातील शिवसेना-भाजप युतीचा किल्ला अबाधित ठेवण्यास नेहमीच कल्याणने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मध्य रेल्वेच्या दक्षिण व उत्तर दिशांना जोडणाऱ्या कल्याण जंक्शनच्या नावाने नव्या लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. आकारमान व मतदारसंख्येच्या दृष्टीने देशातील पहिल्या पाच मतदारसंघांपैकी एक असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत ठाणे आणि कल्याण असे दोन मतदारसंघ अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे कल्याणकरांना एक नव्हे, तर दोन-दोन खासदार लाभणार आहेत.
या नव्या रचनेतील कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुंब्रा-कळवा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात कल्याण, ठाणे, उल्हासनगर या तीन महापालिका, अंबरनाथ व बदलापूर या दोन नगरपालिका आणि २७ ग्रामपंचायतींचे क्षेत्र मोडते. कल्याण महापालिका क्षेत्रात कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली असे तीन विधानसभा मतदारसंघ येतात.

देशात लोकशाही, पण पक्षांमध्ये हुकूमशाही!
ऑ क्टोबर २००४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आठवते? मंगळवारी १३ तारखेला मतदान झाले आणि शनिवारी १६ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाले. निर्विवाद बहुमत नसलेल्या पक्षांची आघाडी जिंकली पण मुख्यमंत्री आणि अन्य खाती जाहीर व्हायला बरेच दिवस खर्ची पडले. पडद्यामागे बऱ्याच हालचाली आणि सौदेबाजी सुरू होती, यात शंका नाही. भावी मुख्यमंत्री म्हणून तेव्हा अनेक नावे चर्चेत होती. आता मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यंमत्री बदलले जातानाही अशीच अनेक नावे चर्चेत आली आणि गेली.. महाराष्ट्र पुन्हा एकदा २००९ मध्ये निवडणुकांना सामोरा जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकवार आपल्याला स्वार्थी, स्वकेंद्रित आणि सर्व तत्त्वांना मूठमाती देणारे सवंग राजकारण पाहावे लागणार काय, असा प्रश्न आहे. सामाजिक जीवनातील ढासळत्या मूल्यांबाबत आपण नेहमीच रोष व्यक्त करतो. प्रत्यक्षात एकदा का सध्या भेडसावणारे संकट दूर झाले की आपण पुन्हा पूर्वीच्याच रहाटगाडग्यात गुंतून जगू लागतो. आपल्या राजकीय प्रक्रियेत जो व्यापक दोष निर्माण झाला आहे त्याबाबत तर आपण खऱ्या अर्थाने सजग होतच नाही. या परिस्थितीमुळे आपली लोकशाहीदेखील हळुहळू निसत्त्व होत चालली आहे.

ज्यो तिषांना भविष्य समजते का? या जगात सर्व माणसांचे जे जे काय होणार ते ठरलेले असते का? आणि जर ज्योतिषशास्त्र काय व कसे ठरले आहे ते सर्व बरोबर सांगू शकत असेल तर वेगवेगळे ज्योतिषी तीच पत्रिका पाहून वेगवेगळी भाकिते कशी (व का) करतात? आणि त्यातली बरीचशी चुकतात कशी? आणि ज्योतिषी मंडळींेना जर अचूकपणे काही ठाऊक नसेल तर त्यांच्याकडे जायचेच कशासाठी? आणि याचा अर्थ शास्त्रच चुकीचे आहे, की ज्योतिषी चुकत आहेत, की आपण ज्योतिषांकडे जाणारी माणसेच त्यांच्याकडे जाण्याची चूक करत आहोत? काहीतरी चुकते आहे एवढे नक्की.
कै. प्रमोद महाजनांची पत्रिका पाहून ते पंतप्रधान होतील असे भाकीत करणाऱ्यांना, त्यांचा सख्खा भाऊ राहत्या घरी येऊन गोळी घालील हे कसे दिसले नाही? तसेच, ते १२ दिवस मृत्यूशी झुंजत असता ते वाचणार नाहीत हे कुणी ज्योतिषाने का सांगितले नाही? (सर्व गोष्टी ज्योतिषांना, त्या झाल्यानंतरच का समजतात?) गेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा क्रिकेट संघ नामुष्की पत्करून परत येईल, परंतु तो २०-२० षटकांचा विश्वचषक मात्र दिमाखात जिंकेल हे कुणा ज्योतिषाला कसे कळले नाही? ऐश्वर्या रायचे अभिषेक बच्चनबरोबर लग्न होईल हे कुणा ज्योतिषाने अमिताभ बच्चनला का सांगितले नव्हते? तसेच ते लग्न आता किती काळ टिकणार आहे हे आज कुणी ज्योतिषी का सांगत नाहीत? मुंबईवरील दहशतवादी हल्ला होईपर्यंत राजकीय व सुरक्षा यंत्रणेप्रमाणे सगळे ज्योतिषीसुद्धा झोपले होते का? त्याआधीही काही वर्षांपूर्वी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला ‘नियतीने’ ठरवला होता का? बाबरी मशीद पडणारच होती की काही माणसांनी ती पाडली? दिल्लीत इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखांची व गोध्रा रेल्वे दुर्घटनेनंतर गुजरातमध्ये मुसलमानांची शिरकाणे होणार हे ठरले होते,

आर्थिक मंदी म्हणजे एखाद्या समाजाने केलेली उत्पादने विकत घेण्याइतकी क्रयशक्ती लोकांकडे उपलब्ध नसणे. यातून बेकारी वाढते. लोकांची क्रयशक्ती आणखीनच घटते आणि मंदी अधिकच तीव्र होते. अशी एक महामंदी, द ग्रेट डिप्रेशन, १९२९-३९ या काळात अमेरिकेला त्रासून गेली. अमेरिकेला उत्पादने पुरवणाऱ्या देशांनाही याची झळ लागली. या काळाचे उत्कृष्ट वर्णन जॉन स्टाइनबेकच्या द ग्रेप्स ऑफ रॅथ (The Grapes of wrath, 1939)या कादंबरीत भेटते. आज पुन्हा एकदा अमेरिका हे केंद्र असलेली जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या स्थितीजवळ आहे. जगाच्या बऱ्याच भागांत दोन हस्तक, एक मस्तक यांना काम मिळणार नाही, अशी धास्ती सर्व अर्थशास्त्रज्ञांना छळते आहे. यावेळी द ग्रेप्स ऑफ रॅथची पुन्हा ओळख करून घ्यायला हवी. १९२९ अखेरीला अमेरिकन शेअरबाजार कोसळला. अनेकांना वाटते की, यामुळे मंदी सुरू झाली, पण वास्तव वेगळे आहे. जॉन केनेथ गॅलब्रेथचे १९२९ द ग्रेट कॅश (१९५५) हे पुस्तक तपशीलात दाखवून देते, की शेअरबाजार कोसळणे हा परिणाम होता, कारण नव्हे. आधी मंदी होती आणि तिचा परिणाम म्हणून शेअरबाजार कोलमडला.