Leading International Marathi News Daily                                  रविवार, ४ जानेवारी २००९

विविध

मुजुमदार संगीत समारोहात शौनक अभिषेकी, सतीश व्यास
माळव्याचे संगीतकार मामासाहेब मुजुमदार यांच्या स्मृत्यर्थ मामासाहेब मुजुमदार यांच्या स्मृत्यर्थ मामासाहेब मुजुमदार स्मृति संगीत समारोह समितीच्या विद्यमाने एका शानदार संगीत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आग्रा आणि जयपूर

 

घराण्यांची शास्त्रीय परंपरा लाभलेल्या पं. शौनक अभिषेकी यांची छोटा ख्याल, भक्तिगीत, भजन व मराठी नाटय़गीताची सुरावट प्रेक्षकांना विलक्षण भारावून गेली. यावेळी संवादिनीवर विवेक बनसोड, तबल्यावर उल्हास राजहंस होते. तानपुऱ्यावर अर्पिता वैशंपायन व शिल्पा मसुरकर होत्या. पं. सतीश व्यास यांचे संतूर वादन हे या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण होते. आलाप, जोड नंतर झिंझोटी. वेगवेगळ्या स्वरावलीतून, राग बहरत गेला. युवा तबला वादक ओजस अढिया यांनी त्यांना साथ केली. या समारोहात प्रारंभी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शिरगांवकर स्मृतीदिन
ग्वाल्हेरमधील प्रसिद्ध तबलावादक, आबा महाराज श्रीराम मंदिराचे मालक, यशवंत शिरगावकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त एकल तबला वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत १५ वर्षांपर्यंतच्या वयोगटात ऐश्वर्य चतुर्वेदी (प्रथम), शुभम् कालगावकर (द्वितीय) व अथर्व पोतनीस आणि चिराग श्रीवास्तव यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
२५ वर्षांपर्यंतच्या वयोगटात आकाश शर्मा प्रथम, जयप्रकाश कोष्टी यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. कोलकाताचे तबला वादक नितीश चटर्जी आणि ग्वाल्हेरचे प्रमोद संत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नितीश चटर्जी यांच्या तबलावादनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

‘पुष्पगंध’ प्रकाशित
जगदीश बिनीवाले

अहमदाबादचे दिवंगत लेखक व कवी पुरुषोत्तम ग. कुलकर्णी यांच्या ‘पुष्पगंध’ या काव्यसंग्रहाचे अलीकडेच वि. ल. शिंत्रे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. कुलकर्णी यांचे स्नेही श्रीनिवास आठले आणि केदारनाथ पारोळकरांनी कुलकर्णी यांच्या पहिल्या पुण्यतिथीदिनी हा काव्यसंग्रह प्रकाशित करून, त्यांना काव्यसंग्रहाच्या रूपाने श्रद्धांजली वाहिली.

अनिल खेर स्मृति शिष्यवृत्ती
डॉ. गणेश मतकर

इंदूरमधील खेर कुटुंबियांतर्फे इंदूरच्या युवा गायक-गायिकेला संगीत साधनेसाठी दिवंगत अनिल खेर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विशेष शिष्यवृत्ती एक वर्षांकरिता दरमहा रुपये तीन हजार याप्रमाणे दिली जाते. या वर्षी या शिष्यवृत्तीकरिता हेमांगी भगत या गायिकेची निवड करण्यात आली आहे. सानंद न्यासच्या एका कार्यक्रमात सुरेश खेर यांच्या हस्ते हेमांगी भगत हिला ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

आगळा उपक्रम
अरुण धारकर

बडोदे येथील ‘सी.के.पी. सीनियर सिटीझन्स मंडळ’ या सीकेपी ज्ञातीच्या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेतील कार्यकारी सभासदांनी मंडळाचे अध्यक्ष अनिल अधिकारी यांच्या नेतृत्वात वारसिया येथील प्रेमदास वृद्धाश्रमाला भेट दिली. या भेटीच्या प्रारंभी मंडळाच्या सभासदांनी मंडळाची ओळख करून देऊन, मंडळाद्वारे चाललेल्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. यानंतर मंडळाला प्राप्त झालेल्या ‘व्हिक्स व्हेपोरब’ आणि ‘मूव्ह’ औषधांचे वितरण अनिल अधिकारी यांच्या हस्ते, आश्रमातील प्रत्येक व्यक्तीला करण्यात आले. याप्रसंगी रमेश देशमुख व सुरेशचंद्र चित्रे यांनी जादूचे प्रयोग सादर केले.
रेखा दिघे