Leading International Marathi News Daily
सोमवार ५ जानेवारी २००९
भारतीय कंपन्यांनाग्लोबल इंडियन होण्याची हीच संधी
‘सत्या’चा मार्ग स्वीकारा! ‘सत्यम’चा नव्हे!!
वळणावरची खरेदी
भविष्यातील माहिती तंत्रज्ञान
व्यापारी मित्र-मराठी उद्योजकांचा आधारवड
लक्ष्मीची पावले
बँकांविषयी सर्वकाही
यशोगाथा
वाटा स्वयंरोजगाराच्या
शेअर बाजारात फिट कसे राहाल?
माधवराव भिडे
एक ‘श्रीमंत’ व्यक्तिमत्त्व

वळणावरची खरेदी
शेअरबाजारातील गुंतवणूक म्हटली की डोळ्यासमोर येतं ते झटपट नफा किंवा भांडवलवृद्धी. लाभांशाकरिता किंवा एक ठराविक उत्पन्न म्हणून कुणी शेअर्स खरेदी करत नाही. मात्र २०-२५ वर्षांपूर्वी लाभांशाकरितादेखील शेअर्स खरेदी केले जात. अर्थात त्या वेळी शेअर्सचे भावही आटोक्यात असल्याने लाभांश परतावा (Dividend Yield) देखील आकर्षक होता. तसेच शेअरचे

 

दर्शनी मूल्यही रु.१० किंवा रु. १०० असल्याने लाभांश परतावा अभ्यासण्यात गोंधळ होत नव्हता. गेल्या काही वर्षांत शेअर बाजारातील गुंतवणुकीचे कन्सेप्टच बदलले आहेत. केवळ झटपट पैसा हा एकमेव निकष शेअरबाजारातल्या गुंतवणुकीला लावला जातो. पूर्वी पब्लिक इश्यू किंवा हक्कभाग विक्रीच्या वेळीही अधिमूल्याने विक्री करणे सोपे नव्हते. आता बहुतांशी आयपीओ केवळ अधिमूल्यानेच विकले जातात. त्यामुळेही लाभांशाच्या परतावा कमी होतो. अर्थात लाभांश हा निकषच राहिला नसल्याने नवीन गुंतवणूकदार लाभांशाचा तितक्या गंभीरतने विचारही करताना दिसत नाही. खरं तर काही वेळा आकर्षक लाभांश परताव्यामुळेही शेअर्सची खरेदी फायदेमंद ठरू शकते.
लाभांश परतावा (Dividend Yield) म्हणजे काय?
‘लाभांश परतावा’ किती आहे ते मोजण्यासाठी शेअरचे दर्शनी मूल्य, बाजारभाव आणि लाभांशाचा दर माहिती असणं आवश्यक आहे. कंपनी लाभांश जाहीर करते ते दर्शनी मूल्यावर आपण शेअर खरेदी करतो तो बाजार मूल्याने म्हणून जाहीर झालेला लाभांश आणि प्रत्यक्षात मिळणारा लाभांश यात तफावत असते. दर्शनी मूल्यापेक्षा शक्यतो बाजारभाव जास्त असल्याने लाभांश परतावा हा जाहीर झालेल्या लाभांशापेक्षा खूप कमी असतो. मात्र तरीही मिळणारा लाभांश करमुक्त असल्याने आणि सद्य परिस्थितीत व्याजदर कमी असल्याने उत्तम लाभांश देणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणं कधीकधी फायद्याचं ठरू शकतं. यात आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्वसाधारणपणे लाभांश सप्टेंबर महिन्यात जाहीर होऊन त्याचे वाटप होत असल्याने आता म्हणजे जानेवारीत केलेल्या गुंतवणुकीवर परतावा मिळणार आहे केवळ नऊ महिन्यात. पुढील सोप्या उदाहरणाने एखाद्या कंपनीचा लाभांश परतावा कसा काढायचा ते कळू शकेल.
‘अ’ कंपनीचे शेअरचे दर्शनी मूल्य १० रुपये असून त्याचा बाजारभाव रु. ३० आहे. कंपनीने ४० टक्के लाभांश जाहीर केला तर त्याचा परतावा बाजारभावाने शेअर खरेदी करणाऱ्या गुंतवणुकीला किती मिळेल?
दर्शनी मूल्य-- १० लाभांश- ४०% = रु. ४/-
बाजारभाव- ३० . परतावा ३० रुपयांवर ४ रुपये.
. . ४/३० १००= १३.३३%
हा परतावा किती महिन्यात मिळाला हेही महत्त्वाचं. म्हणजे तुम्हाला केवळ सहा महिन्यांत हा परतावा मिळाला असेल तर वार्षिक परतावा (Dividend Yield) होईल.
१६.६६% वरील उदाहरणावरून लाभांश परतावा कसा काढायचा हे कळलं असलं तरीही ‘लाभांश’ परतावा काढण्यासाठी पुढील बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे.
(१) शेअरचे दर्शनी मूल्य: हे १, २, ४, ५, १० असं कसंही असू शकतं.
(२) लाभांशाचे सातत्य : काही वेळा कंपन्या लाभांश सातत्याने किंवा तितक्याच दराने देत नाहीत. त्यामुळे कंपनीचे तिमाही/ सहामाही निकाल अभ्यासावेत. म्हणजे लाभांशाचा दर किमान गेल्या वर्षीइतका राहील का याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
(३) कंपनीचे भागभांडवल विस्तार: अनेक कंपन्या लाभांश जाहीर करतात तो केवळ हक्कभाग विक्री करण्याआधी मात्र त्यानंतर विस्तारित भागभांडवलावर तेवढा लाभांश देतील असं सांगता येत नाही.
(४) विशेष लाभांश : कंपनीला १०.२५ किंवा ५० र्वष पूर्ण झाली किंवा कंपनीची काही मालमत्ता विकली तर कसे. लाभांशाचा तोच दर पुढील वर्षी राहील असे सांगता येत नाही. रिसर्च करताना ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवायला हवी.
योग्य संधी : मुंबई शेअरबाजार निर्देशांक २१,००० वर असताना लाभांश देणाऱ्या कंपनीच्या शेअरचा कुणी गुंतवणुकीसाठी किंवा केवळ लाभांश परताव्यासाठी विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र आता निर्देशांक १०,००० च्याही खाली असताना अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स केवळ भांडवलवृद्धीसाठीच नव्हे तर लाभांश परताव्यासाठीही चांगली गुंतवणूक ठरू शकतात. पुढील वर्ष कसे असेल याचा अंदाज वर्तवणे कठीण असले तरीही शेअरबाजाराच्या दृष्टीने ते धोकादायकच असेल असा तज्ज्ञांचा होरा आहे. बँकांचे कमी होणारे व्याजदर, मुदत ठेव योजनांतील धोका या पाश्र्वभूमीवर लाभांश परतावा/ भांडवली वृद्धी असे दुहेरी धोरण गुंतवणुकीसाठी ठेवणं फायद्याचं ठरेल.
गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी काही निवडक कंपन्यांचे शेअर्स खरेदीसाठी सुचवत आहे.
तुम्ही गुंतवणूक करताय जानेवारीत आणि तुम्हाला हा लाभांश मिळणार आहे केवळ नऊ महिन्यांत म्हणजे सप्टेंबर २००९ पर्यंत. म्हणजेच वार्षिक परतावा होईल अजून ३३% ने जास्त (१०% नऊमाहीत तर १३% वार्षकि).
अर्थात आकर्षक परतावा म्हटलं की थोडाफार धोका वाढणारच. अनेकदा लाभांश जाहीर झाल्यावर लाभांशबाद शेअरचा बाजारभाव कमी होतो म्हणजेच भांडवलवृद्धी होण्याऐवजी भांडवल घटही होऊ शकते. लेखात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इतरही धोके आहेतच. त्यामुळेच वेळोवेळी जाहीर होणाऱ्या आर्थिक निकषांवर नजर ठेवणं आवश्यक ठरतं. गेल्या वर्षी जाहीर केलेले लाभांश येणाऱ्या वर्षांतही किमान तितकेच राहतील याचा अंदाज आल्यावर मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. डिसेंबर २००८ साठी संपलेल्या नऊमाहीचे निकाल आता लवकरच जाहीर होतीलच.
नवीन गुंतवणुकीसाठी नवीन वर्षांच्या शुभेच्छा!
अजय वाळिंबे
walimbeajay@yahoo.com