Leading International Marathi News Daily
सोमवार ५ जानेवारी २००९
भारतीय कंपन्यांनाग्लोबल इंडियन होण्याची हीच संधी
‘सत्या’चा मार्ग स्वीकारा! ‘सत्यम’चा नव्हे!!
वळणावरची खरेदी
भविष्यातील माहिती तंत्रज्ञान
व्यापारी मित्र-मराठी उद्योजकांचा आधारवड
लक्ष्मीची पावले
बँकांविषयी सर्वकाही
यशोगाथा
वाटा स्वयंरोजगाराच्या
शेअर बाजारात फिट कसे राहाल?
माधवराव भिडे
एक ‘श्रीमंत’ व्यक्तिमत्त्व

सेन्सेक्सची तिळातिळाने चढाई!
गेल्या आठवडय़ातही तेजीची मंद झुळूक चालूच राहिली. निर्देशांक पुन्हा १००००च्या दिशेने चालू लागला आहे. बुधवारी तो ९६५२ अंश होता म्हणजे ऑक्टोबरमध्ये ८७१० पर्यंत खाली आलेला निर्देशांक जवळ जवळ १२ टक्क्यांनी वर गेला आहे. सत्यम कॉम्प्युटर कंपनीबाबत येणाऱ्या बातम्या निवेशकांनी दुर्लक्षित केल्या. शासनाचे दुसरे तथाकथित पॅकेज येत आहे म्हणून जाहिराती लागलेल्या आहेत. रिझव्‍‌र्ह बँक, रोख गंगाजळी परिमाणात, रेपो दरात काही कपात करील अशी वृत्तेही प्रसृत केली जात आहेत. त्या दोन्ही बाबींना अजून मुहूर्त मिळालेला नाही, पण बहुधा मकरसंक्रांत झाल्यावर त्या प्रत्यक्षात ठोस स्वरूपात आल्या, तर निर्देशांकाचे उत्तरायण सुरू होईल. इंग्रजी पद्धतीप्रमाणे २१ डिसेंबरलाच उत्तरायण सुरू झाले आहे. उत्तरायणात दिवस तीळ तीळ मोठा होत जातो. निर्देशांकही असाच तिळातिळाने आता तीन महिने वर जात राहावा.

 


मुंबईवरील दहशती हल्ल्यानंतर आपली संरक्षण सिद्धता सतर्क झाली आहे. गाजावाजा न करता आपल्या संरक्षणदलांना अद्ययावत सामग्री पुरवली जाईल व त्या दृष्टिकोनातून निवेशकांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स या संरक्षण साहित्याचे उत्पादन करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीचा आवर्जून विचार केला पाहिजे. मिनी नवरत्न एकचा दर्जा असलेल्या या कंपनीत शासनाचे ७५.८६ टक्के शेअर्स आहेत. संस्थांकडे १४ टक्के व जनतेकडे सुमारे १० टक्के शेअर्स आहेत. कंपनीचे भागभांडवल फक्त ८० टक्के आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या या कंपनीची मार्च ०८ संपलेल्या वर्षांची विक्री ४०६० कोटी रुपयांनी होती व नक्त नफा ८२६.७४ कोटी रुपये होता. कंपनीचे या वर्षांचे भागनिहाय उपार्जन १०३.३४ रुपये होत. घसाऱ्यासह रोख उपार्जन (CEPS) ११४ रुपये होते. गेल्या सहा वर्षांची प्रगती खालीलप्रमाणे होते.
सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या वर्ष पूर्ण होईपर्यंत बरेच उत्पादन अंशत: पुरे दाखवतात व वर्षअखेर एकदम विक्री दाखवतात. त्यामुळे उत्तरार्धात विशेषत: शेवटच्या तिमाहीत विक्री व नफा एकदम हनुमान उडी घेतो. मार्च ०९ व मार्च १०ची अपेक्षित विक्री ४५०० व ५००० कोटी रुपये असेल. नक्त नफा ९२५ कोटी रुपये व १०७० कोटी रुपये व्हावा. वेतन आयोगाच्या शिफारशींचा सर्व बोजा या वर्षीच घेतला तर नफा कदाचित ३० कोटी रुपयांनी कमी दिसेल.
पुढील दोन अर्थसंकल्पांत संरक्षणासाठी जास्त तरतूद असेल. किंबहुना २००२ सालापासूनच पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी लक्षात घेऊन अशी तरतूद वाढत गेली आहे. २००२ ते २००३ या वर्षांत ती अनुक्रमे (कोटी रुपयांत) ६२०००, ६५०००, ६५३००, ७७७००, ८२९००, ८९०००, ९६००० व १०५००० कोटी रुपये होता. यापैकी निम्मी रक्कम वेतन वगैरे चालू खर्चासाठी खर्च होते व निम्मी साहित्याच्या उत्पादनासाठी होते. त्यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्सला ऑर्डर्सची कधीच कमतरता पडणार नाही. कंपनीच्या शेअरचे पुस्तकी मूल्य ४५० रुपये आहे. मार्च २००८ वर्षांसाठीचा लाभांश शेअरमागे २०.७० रुपये होता. सध्याचा भाव ७५० रुपये आहे. गेल्या आठवडय़ात सुरुवातीला तो ६६५ रुपयेच होता. गेल्या १२ महिन्यांतील कमाल भाव २१७० रुपये होता तर किमान भाव ५४५ रुपये होता. यावरूनच वर्षभरात सध्याच्या भावात निदान ४० टक्के वाढ अपेक्षायला हरकत नाही असे वाटते. देशाच्या संरक्षणाप्रमाणेच आपल्या भाग भांडाराचेही शेअर संरक्षण करेल.
२००९ मध्ये सर्वसाधारणपणे फारशी अपेक्षा केली नाही तरी एप्रिलपर्यंत उत्तरायण चालू राहील. नंतर नवीन सरकारच्या अर्थसंकल्पातील कठोरतेमुळे दिवाळीपर्यंत वातावरण नरमगरम राहावे व नंतर शेवटचे दोन महिने पुन्हा तेजी व्हावी. या दोलायमानतेतही उत्तम शेअर्समधली गुंतवणूक वर्षांला ४० टक्के नफा देऊन जावी. निर्देशांकही वर्षभरात १३००० पर्यंत गेल्याचे दिसेल.
थोडा दीर्घकाळाचा विचार केला तर रिलायन्स कम्युनिकेशनचा शेअर निवेशनासाठी घ्यावासा वाटले. सध्या हा शेअर २३५ रुपयांच्या आसपास आहे. पण गेला आठवडा सुरू होण्यापूर्वी तो २०० रुपयांना मिळत होता. वर्षभरातील कमाल व किमान भाव ८४४ रुपये व १४९ रुपये होता. थोडासा घसरून तो पुन्हा २०० रुपयांपर्यंत यायची वाट बघावी व मग खरेदी करावी. पुढील वर्षभरात या कंपनीचा व्यवहार मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. निदान गेल्याच आठवडय़ात ग्लोबल सिस्टिम फॉर मोबाईल ऑपरेशन्स सुरू केली आहे. (GSM) त्यासाठी १०००० कोटी रुपयांनी गुंतवणूक आतापर्यंत झाली आहे. सर्व देशांत ती सुरू झाली आहे. सध्या ११००० गावात असलेली ही सेवा २४००० गावांत २००९ साली पोहोचणार आहे. रिलायन्सच्या ग्राहकांना ही सेवा व सीडीएमए ही सेवा या दोन्ही सेवांचे पर्याय उपलब्ध असतील. सध्या तिच्याकडच्या सहा कोटी ग्राहकांपैकी बहुतेक जण सीडीएमए सेवा वापरत आहेत. सध्या GSM सेवा व्होडाफोन व भारती एअरटेल यांच्याकडमून मोठय़ा प्रमाणावर दिली जाते.
रिलायन्स कम्युनिकेशन, शासनातर्फे नजीकच्या भविष्यात तिसऱ्या पिढीच्या त्रिपाश्र्व विच्छिनीकरण प्रकारच्या (GSM Spectrum) वातावरणाचा होणाऱ्या लिलावात भाग घेणार आहे. सेवेसाठी रिलायन्स कम्युनिकेशन्स सुमारे ४००० कोटी रुपयांची आणखी गुंतवणूक करणार आहे. सध्या दर ग्राहकामागे कंपनीला २६० रुपये महिना मिळतात. म्हणजेच वर्षांला ३००० रुपयांचे उत्पन्न सहा कोटी ग्राहकांकडून मिळतात. (Landline व PCO चे उत्पन्न यात समाविष्ट आहे.) आणि या उत्पन्नात, कंपनीने सवलती जाहीर केल्या तरी घट होणार नाही. कारण ग्राहकांची संख्या सतत वाढणारच आहे.
काही आठवडय़ांपूर्वी एबीजी शिपयार्डमधली गुंतवणूक १०५ रुपयांच्या आसपास फायदेशीर ठरेल असे म्हटले होते. महिनाभरात हा भाव ३० टक्क्यांनी वाढला आहे. लार्सेन टुब्रोही वाढत आहे. टाटा स्टील २१५ ते २२० रुपयांच्या पट्टय़ात फिरत आहे व अजूनही त्यातील गुंतवणूक खूप फायदेशीर ठरेल. असे कितीतरी शेअर्स मंदीतही नफा देऊ शकतात. तो मिळविण्यासाठी माझ्याकडून सन २००९ साठी सर्व जाणकार, निवेशक, वाचकांना शुभेच्छा. ’