Leading International Marathi News Daily
सोमवार ५ जानेवारी २००९
भारतीय कंपन्यांनाग्लोबल इंडियन होण्याची हीच संधी
‘सत्या’चा मार्ग स्वीकारा! ‘सत्यम’चा नव्हे!!
वळणावरची खरेदी
भविष्यातील माहिती तंत्रज्ञान
व्यापारी मित्र-मराठी उद्योजकांचा आधारवड
लक्ष्मीची पावले
बँकांविषयी सर्वकाही
यशोगाथा
वाटा स्वयंरोजगाराच्या
शेअर बाजारात फिट कसे राहाल?
माधवराव भिडे
एक ‘श्रीमंत’ व्यक्तिमत्त्व

अंधारातून प्रकाशाकडे..
उद्योजकता विकास वा मॅनेजमेंटसारख्या विषयाचे प्रशिक्षण घेताना एखादा प्रश्न असाही विचारला जातो. फळ्यावर १’बाय १’ ची चौकट रेखाटली जाते. चौकटीत मध्येच कुठेतरी एखादा ठळक टिळा चितारला जातो. चौकटीत काय दिसते. या प्रश्नाला बरेच प्रशिक्षणार्थी टिळा-टिंब दिसतो असे काही उत्तर देतात. त्यातले काही मोजके प्रशिक्षणार्थी टिळ्याभोवतालची मोकळी-पोकळी जागा दिसते असे सांगतात. दृष्टी तशी सृष्टी. ‘ऊर्जेडी राहून उजेड होईन’ असा प्रकाश फार थोडय़ांना दिसतो. इथेच कुठे तरी उद्योग दिसतो. उद्योजक घडतो असे म्हणावयास हरकत नाही. आणि असेच काही तरी ठाणेस्थित श्री. अजित नरेंद्र कुलकर्णी यांचे झाले. इतरांना वाटते जीवनाच्या चौकटीत अंधार आहे, पण अजित कुलकर्णीना तिथे प्रकाश दिसला. तेव्हा अंधारातून प्रकाशाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली. आता या वाटचालीलाही दोन तपे पूर्ण होत आहेत. इलेक्ट्रीकसिटी, HVAC, सिक्युरिटी, फआयर बिल्डिंग अटोमॅशन असा सेवा उद्योगात ‘अजित कुलकर्णी’ कन्स्लटन्ट प्रा. लि.’ या नावाने ख्यातकीर्त आहेत, पण दोन तपांपूर्वी अजित कुलकर्णीना उद्योग जगताच्या चौकटीतील मोकळी जागा कशी दिसली!

 


दोन तपापूर्वी बी. ई. (इले.) पास करून सलग दहा वर्षे अजित कुलकर्णी नोकरीत होते. घरची परिस्थितीच तशी कनिष्ठ मध्यमवर्गीय होती. इंडियन अ‍ॅल्युमिनियम, रॅलीज, जेनलेस असा कंपन्यांतून जे जॉब वर्क, संशोधन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, टेंडर मागोवा घेणे, डिझाईन, साईट वर्क, मटेरिअल मॅनेजमेंट, टेस्टिंग, प्लॅनिंग अशा कामाचा अनुभव घेत गेले. विश्वास दुणावत गेला. ठराविक पगार देणाऱ्या आपल्या नोकरीच्या टिळ्याभोवती कितीतरी जुजबी अनुभवी लोक इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टची कामे करून पैसा मिळवीत आहेत. आपण शिकलेले, अनुभवी असूनही मागे का? धाडस केले पाहिजे, धोका पत्करला पाहिजे, हा तर उद्योजकीय बाणा ठरतो. घरचा पाठिंबा होता. सौ. ज्योती कुलकर्णी चांगल्या विद्याविभूषित, त्यातून हुद्दय़ावर होत्या. समजा आपल्या स्वयंउद्योगाचे चाक नीट चालले नाही तर संसाराचे दुसरे चाक मजबूत आहे असा त्यांनी धीर दिला. अजित कुलकर्णीना ही एक प्रेरणा वाटली आणि उधारीवर आणलेल्या २० हजारांच्या भांडवलावर आपल्या नावे कंपनीची स्थापना केली.
नोकरीचा टिळा टाळून अजित कुलकर्णी उद्योग चौकटीत उतरले. कामे मिळत होती. कित्येक कामे अंतरावर-खेडय़ातून मिळावयाचे. एश्ऌ/ऌश् स्वीच यार्ड, सबस्टेशन, EVH/HV पॅनेल्स, केबल्स, अंतर्गत-बाह्य़ लाईटनिंग अशी कामे टाटा, बायर, बिर्ला, बँका, एम. टी. एन. एल. यांच्याकडून पार पाडली जायची. कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्याचे डिझाईन, नियोजन करण्यातली वैचारिक, बौद्धिक, आर्थिक क्षमता एकीकडे आणि त्यांची कार्यवाही, व्यवस्थापन, मनुष्यबळ. यांचे नियोजन म्हणजे सर्कस ठरावयाचे. त्यातून मध्ये काही काळ मंदी आल्याचे आर्थिक तााण वाढत गेला. कार्यवाही कामाचे पैसे मिळेनासे झाले, घटत राहिले. त्यामुळे अजित कुलकर्णी व त्यांचे सहकारी यांनी बेत बदलला. फक्त इलेक्ट्रिकल क्षेत्रातील कन्सल्टन्सीचा व्याप वाढविण्याचे ठरविले. आणि याच सुमारास जागतिकीकरणाचे वारे वाहू लागेल. आय. टी., पी.पी.ओ. यांची चलती सुरू झाली. या क्षेत्रात अजित कुलकर्णीना आव्हानात्मक कामे मिळाली.
आपल्या कन्सल्टिंग कामांचे वैशिष्टय़ सांगताना अजित कुलकर्णी म्हणाले, ‘‘आय. टी., बी. पी. ओ., बँका अशा मोठय़ा व्यापक संस्थांना ‘डेटा’ एकत्र ठेवणे म्हणजे ‘सरव्हर रूम’ची नितांत गरज असते. इथे एक सेकंदही वीज बंद होऊन चालत नाही. त्यासाठी यूपीएस, डिझेल इंजिन अशी पर्यायी कार्यक्षम व्यवस्था राखावी लागते. त्यासाठी योग्य योजना, निरीक्षण, देखरेख असावी लागते. कारण ‘सरव्हर रूम’ म्हणजे एक प्रकारे ज्या त्या संस्थेचा ब्रेन ठरतो. ही रूम सुरक्षित, सक्षम ठेवणे गरजेचे ठरते नाहीतर कोटय़वधी रुपयांचा फटका बसतो.’’ विजेशी खेळणारे अजित कुलकर्णी पुढय़ात असताना एकूण विजेचा तुटवडा, भारनियमन हा प्रश्न सुचला नाही तरच नवलाचे नाही का! यावर कुलकर्णी म्हणाले.. ‘‘अलीकडेच विजेचा तुटवडा नि भारनियमन जाणवते आहे. मागणी तसा पुरवठा करण्याची तयारी झाली नाही. निर्मितीकडे दुर्लक्ष झाले. हीच अडचण पूर्वीच्या काळात जाणवत नव्हती. यातून मार्ग काढण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे. शासनानेही सेवा स्वस्त दरात मिळेल अशी योजना केली पाहिजे आणि आमच्या परीने आम्ही ‘विजेचा ऑडिट’ करण्याचा सल्ला देतो. मोठय़ा संस्थांतून अनावश्यक तिथे दिवे, पंखे चालत असतात. नको तेवढय़ा टनाचे ए. सी. लावले जातात. वायरिंग, फिटिंग कमी दर्जाचे असतात. तेव्हा अनुभवी लायसेन्स होल्डर यांच्याकडूनच अशी कामे करून घ्यावीत, जेणेकरून विजेची बचत होईल.’’
असे हे अजित कुलकर्णी टिपिकल कनिष्ठ मध्यम वर्गात लहानाचे मोठे झाले. वडील रेल्वेत, तर आई शिक्षिका, एका खोलीतील जगणे. तेव्हा त्यांच्याकडे विजेचा दिवाहा नव्हता. अजित तेव्हा कंदीलाच्या प्रकाशात अभ्यास करीत होते. जात्याच हुशार असल्याने, घरच्या पाठिंब्याने ते इंजिनीयर झाले. पुढे पहिल्या पिढीचे उद्योजक झाले. महाराष्ट्र चेंबर व इंडिया इंटरनॅशनलतर्फे त्यांना पुरस्कारही मिळाला. उद्योजक म्हणून उभे राहण्यात आपल्या पत्नी सौ. ज्योती कुलकर्णीचा सहभाग मोठा आहे हे ते आवर्जून सांगतात. त्यांची अमोल, ओंकार मुले पुढे येत आहेत. इलेक्ट्रिक क्षेत्रातील अद्ययावत माहितीसाठी कुलकर्णी यांचे सारखे वाचन, प्रयोग, परिसंवादात भाग घेणे सुरू असते. आपली माहिती अद्ययावत राहावी म्हणून त्यांनी कॉम्प्युटर व फायर सेफ्टी क्षेत्रातील पदविका शिक्षण पूर्ण केले. देश, परदेस फिरून तिथल्या माहितीचा पाठपुरावा करतात. शिवाय अजित कुलकर्णी इलेक्ट्रिकलच्या तांत्रिक विषयावर लेखन करून विचारांची देवाण-घेवाण करतात. फक्त स्वत:च अपडेट राहून चालणार नाही, तसे सहकारी असले पाहिजेत म्हणून त्याना तसे प्रशिक्षणही देतात. इलेक्ट्रिकल क्षेत्रातील उच्च दर्जाची कामे भारतात होतात की नाही याची परदेशातील उद्योजकांना खात्री नव्हती. पण अजित कुलकर्णीसारख्या काही इंजिनीयर्सनी ही शंका दूर केली. इंग्लडंचे इलीस विल्यम यांनी अजित कुलकर्णी यांच्या कामाचे कौतुक केले. अजित कुलकर्णी कौतुकास पात्र ठरत असताना क्राय, हेल्प एज, कॅन्सर अ‍ॅकॅडमीसारख्या संस्थांना मदत करून अशा संस्थांचे कौतुक करतात. काळानुरूप आपली कन्सल्टन्सी अद्ययावत करीत, समाजाबरोबर राहात, अंधारातून प्रकाशाकडे निघालेले अजित कुलकर्णी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच!
भीमाशंकर कठारे
संपर्क - ९८२१०९२४५१, ०२२२५३८२३८१.