Leading International Marathi News Daily
सोमवार ५ जानेवारी २००९
भारतीय कंपन्यांनाग्लोबल इंडियन होण्याची हीच संधी
‘सत्या’चा मार्ग स्वीकारा! ‘सत्यम’चा नव्हे!!
वळणावरची खरेदी
भविष्यातील माहिती तंत्रज्ञान
व्यापारी मित्र-मराठी उद्योजकांचा आधारवड
लक्ष्मीची पावले
बँकांविषयी सर्वकाही
यशोगाथा
वाटा स्वयंरोजगाराच्या
शेअर बाजारात फिट कसे राहाल?
माधवराव भिडे
एक ‘श्रीमंत’ व्यक्तिमत्त्व

वाटा स्वयंरोजगाराच्या
कर्ज वसुली प्रशिक्षण

रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने बँका आणि इतर वित्तीय संस्थांच्या सर्व वसुली एजंटस् व वसुली कर्मचारी यांनी कर्ज वसुली एजंटसंबंधी प्रशिक्षण घेऊन त्याबाबतचे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्सकडून (आयआयबीएफ) प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे अशी अट घातली आहे. कर्जवसुली एजंट किंवा इतर एजंट व वसुली कर्मचारी जे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे या क्षेत्रात काम करतात त्यांना हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र आवश्यक आहे. वरील पाश्र्वभूमीवर इंडियन

 

इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्सने (आयआयबीएफ) मिटकॉन कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस लि., पुणे यांना सदर प्रशिक्षण देण्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. सदर प्रशिक्षण १०० तासांचे असून त्यामध्ये वसुलीच्या कायदेविषयक व एकूण कार्यप्रणालीबाबत २५ ते ३० तास व कौशल्यवृद्धीबाबत ७० ते ७५ तासांचे प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये बेसिक बँकिंग, बँकर-कस्टमर रिलेशनशिप, अ‍ॅन्टी-मनी लॉडरिंग व नो युवर कस्टमर (केवायसी), क्रेडिट कार्डस्, डेब्ट रिकव्हरी एजंट- रेग्युलेटरी फ्रेमवर्क, फंक्शन्स ऑफ डेब्ट रिकव्हरी एजंट, पॉलिसी, प्रोसेसर्स अ‍ॅण्ड प्रोसिजर ऑफ डेब्ट रिकव्हरी, अ‍ॅसेट क्लासिफिकेशन नॉर्मस्, क्रेडिट प्रॉडक्टस् (रिटेल), इंटरनॅशनल बेस्ट प्रॅक्टिसेस ऑन डेब्ट रिकव्हरी इत्यादी बाबींचा समावेश आहे. संपर्क- ९८२२६६५०४९, ०२०-६६२८९५०४/११.
शुद्ध पाण्याचा व्यवसाय
पिण्याचे पाणी विकत घेणे ही आता चैनीची बाब राहिलेली नसून ती आता आवश्यक व गरजेची गोष्ट झाली आहे. यामुळे मिनरल वॉटर किंवा बाटलीबंद पाण्याला सध्या प्रचंड प्रमाणात मागणी आहे. कार्यालये, समारंभ, पाटर्य़ा, प्रवासात या पाण्याचा वापर खूप वाढला आहे. यासाठी मिटकॉन, ठाणे या संस्थेने-पॅकेज्ड ड्रिंकिंग/ मिनरल वॉटर प्रकल्पावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम दि. १९ जानेवारी ०९ ते २३ जानेवारी ०९ या कालावधीत दररोज सकाळी १०.३० ते ५ या वेळेत ठाणे येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात या क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योग उभारण्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबी, परवाने यांची माहिती, तांत्रिक प्रशिक्षणात बी.आय.एस./ आय.एस.आय. स्टँडर्ड १४५४३ ची माहिती, त्यानुसार उद्योगासाठी जागेची निवड, नियमानुसार बांधकामाचा आराखडा व नियोजन, सूक्ष्म जैविक व रासायनिक प्रयोगशाळा, परीक्षण साहित्य व उपकरण, उत्पादन प्रक्रिया, उत्पादनाची किंमत, प्रॉडक्ट डिझाईन, ट्रेड मार्क रजिस्ट्रेशन, कच्च्या मालाचे पुरवठादार, मशिनरींची निवड, भांडवल उभारणी, संपूर्ण उद्योगाची रुपरेषा, व्यवस्थापन, पॅकिंग, दर्जा नियंत्रण, बाजारपेठेची माहिती, विपणन, वितरकांचे जाळे निर्माण करणे, शासनाच्या कर्ज योजना व अनुदान आणि संपूर्ण प्रकल्प अहवाल या सर्वच बाबतीत तंज्ञातर्फे मार्गदर्शन करण्यात येईल. संपर्क : ९८१९०७०१६६/ ९३२५०७२००६.