Leading International Marathi News Daily
सोमवार ५ जानेवारी २००९
भारतीय कंपन्यांनाग्लोबल इंडियन होण्याची हीच संधी
‘सत्या’चा मार्ग स्वीकारा! ‘सत्यम’चा नव्हे!!
वळणावरची खरेदी
भविष्यातील माहिती तंत्रज्ञान
व्यापारी मित्र-मराठी उद्योजकांचा आधारवड
लक्ष्मीची पावले
बँकांविषयी सर्वकाही
यशोगाथा
वाटा स्वयंरोजगाराच्या
शेअर बाजारात फिट कसे राहाल?
माधवराव भिडे
एक ‘श्रीमंत’ व्यक्तिमत्त्व

शेअर बाजारात फिट कसे राहाल?
‘निर्देशांक ८५२ अंशांनी कोसळला’, ‘जेट एअरवेजमध्ये पगार कपात’, ‘जगभरातील दीड अब्ज नोकरदारांच्या वेतनात मोठी कपात होण्याची भीती’ या आणि अशाच स्वरूपाच्या बातम्या, लेख वाचून किंवा चॅनेलवरच्या मुलाखती पाहून तुम्ही निराश झाला असाल तर पहिले नैराश्य सोडा! कारण नैराश्यात नेहमी नकारात्मक विचारच येत असतात. ‘जग हे मंदिशाळा’ झाले असले तरी परिस्थिती एवढी बाऊ करण्यासारखी नक्की नाही. या परिस्थिीतही गुंतवणूक, बचत अन् खर्च यांचा ताळमेळ साधला अन् त्याप्रमाणे निश्चित योजनाबद्ध कार्यक्रम आखला तर या सुवर्णसंधीचा तुम्हीही फायदा घेऊ शकाल.

 


अनिश्चित शेअर बाजारात नक्की काय कराल?
सध्या शेअर बाजारात तीन प्रकारांचे गुंतवणूकदार दिसून येतात. एक म्हणजे जुने जाणते मुरलेले पण आता हिरमुसलेले. लंबे रेसके घोडे! दुसरे गेल्याच वर्षी अन् जानेवारी २००८ पासून उंच उंच झोके घेणारे. शेअर बाजारात करोडपती होण्याची स्वप्ने बघणारे गुंतवणूकदार! तिसरे गुंतवणूकदार म्हणजे शेअर बाजारात मंदी आहे तर त्याची संधी घेऊन भविष्यात श्रीमंत गुंतवणूकदार होण्याची योजना तयार करण्यात गुंतलेले, पण प्रत्यक्ष शेअर बाजाराच्या कुंपणावर बसलेले गुंतवणूकदार! याव्यतिरिक्त काठावरून पोहायला शिकवणारे, टीका टिप्पणी करणारे.. असेही गुंतवणूकदार अस्तित्वात आहेत. तुम्ही कुठल्याही वर्गीकरणात बसत असाल किंवा नसाल. प्रथम आपण शेअर बाजारात गुंतवणूक करायला ‘फीट’ आहोत की नाही हे पाहा.
गुंतवणूकदार दोन प्रकारच्या फिटनेसमध्ये बसतात.
एक म्हणजे ‘आर्थिक फिटनेस’, अन् दुसरा ‘मनासिक फिटनेस’. तुमच्या बाबतीत दोन्ही प्रकारचे फिटनेस असतील तर उत्तमच! पण तुम्हाला हे फिटनेस टेस्ट करायची असेल तर खालील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे द्या.
फिटनेस टेस्ट
शेअर बाजाराची फिटनेस टेस्ट प्रश्नमालिका (वाचत असताना अ, ब, क, ड पैकी एकावर टीक करा)
१) स्टॉक निवडताना तुम्ही कुठल्या गोष्टीवर अवलंबून असता?
अ) रिसर्च रिपोर्टस्, ब) तुमचा स्वत:चा रिपोर्ट, क) कंपनीचा न्यूज रिपोर्ट, ड) ब्लॉग्ज आणि टीका- फायनान्शिअल पोर्टल.
२) तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी किती आहे?
अ) तीन वर्षांपेक्षा जास्त, ब) एक ते तीन वर्षे, क) सहा ते बारा महिने, ड) सहा महिन्यांपेक्षा कमी.
३) शेअर बाजारातून किती टक्के वार्षिक रिटर्न्‍स तुम्हाला अपेक्षित आहेत?
अ) १२ ते १५ टक्के, ब) १२ ते २५ टक्के, क) २५ ते ३० टक्के, ड) ३० टक्क्यांहूनही अधिक.
४) तुम्हाला एखादा स्टॉक वर जाणार आहे अशी ‘टीप’ मिळाली तर तुम्ही काय करता?
अ) विश्वसनीय गोटातून तुम्ही बातमीची शहानिशा करता, ब) त्या स्टॉकविषयी रिसर्च करता, क) अफवांकडे दुर्लक्ष करता, ड) तो शेअर लगेच विकत घेता.
५) शेअर बाजारात जे पैसे गुंतवता ते
अ) जादा पैसे, ब) दुसऱ्या गुंतवणुकीतून काढून, क) सोने-चांदीसारखी संपत्ती विकून, ड) मित्र वा नातेवाईकांकडून उधार वा कर्ज घेऊन.
६) तुम्हाला म्युच्युअल फंडाऐवजी पैसे डायरेक्टली शेअर बाजारात गुंतवायचे आहेत. कारण
अ) तुम्हाला अशा गुंतवणुकीचे ‘थ्रिल’ अनुभवायचे आहे. ब) तुम्हाला आत्मविश्वास आहे की तुम्ही चांगले निर्णय घ्याल, क) गुंतवण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. ड) वारंवार तुम्हाला शेअर्सची खरेदी-विक्री करावयाची आहे.
७) एखाद्या ‘ब्ल्यू चीप’ कंपन्यांचे निराशाजनक निकाल लागल्यामुळे ५२ आठवडय़ांतील निचांक त्या शेअरने गाठला असेल तर तुम्ही काय करता?
अ) निराशाजनक निकालाचे कारण शोधता, ब) थोडय़ा प्रमाणात ते शेअर्स घेता. क) किंमत स्थिर होण्याची वाट बघता. ड) मोठय़ा प्रमाणात शेअर्स खरेदी करता.
८) तुम्ही मोठय़ा प्रमाणात पैसे गुंतवल्यावर शेअर बाजार कोसळला तर तुम्ही काय करता.
अ) काहीच नाही, ब) जास्त शेअर्स घेऊन ‘कॉस्ट अव्हेरेजिंग’ करता, क) काही शेअर्स विकता, ड) सर्व शेअर्स विकून लॉस बुक करता.
९) तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही किती वेळा चेक करता?
अ) तीन ते सहा महिन्यांतून एकदा, ब) एक ते तीन महिन्यांतून एकदा, क) दररोज, ड) प्रत्येक तासाला.
१०) तुम्ही जो शेअर घेतला त्याची किंमत ‘टार्गेट प्राईस’पेक्षा वरती गेली. तुमचा ब्रोकर खात्रीलायकरीत्या सांगतोय की तो शेअर आणखी वर जाणार आहे. अशा वेळी तुम्ही काय करता?
(अ) तुमच्याकडे असलेले काही शेअर्स विकता आणि उरलेल्या शेअर्ससाठी ‘स्टॉपलॉस’ बुक करता (ब) तुम्ही ठरवल्याप्रमाणे सगळे शेअर्स विकून टाकता (क) तुमचं टार्गेट तुम्ही रिसेट करता (ड) अल्पकाळाकरिता आणखी शेअर्स खरेदी करता.
११) कुठल्या प्रकारचे शेअर्स तुम्ही विकत घेता?
(अ) जरी जास्त किंमत असेल तरी ब्ल्यू चीप कंपन्यांचे शेअर्स (ब) योग्य-वाजवी भावात मिळणारे मिडकॅप शेअर्स (क) स्वस्तात मिळणारे कमी किमतीचे स्मॉल कॅप शेअर्स (ड) हजारोंनी खरेदी करता येतील असे ‘पेनी स्टॉक’ शेअर्स.
१२) तुम्ही ज्या कंपनीत गुंतवणूक केली ती अडचणीत आली आहे आणि नजीकच्या काळात त्यात सुधारणा होण्याची शक्यता नाही, तर तुम्ही काय कराल?
(अ) यातून बाहेर पडता आणि ‘लॉस’ बुक करता (ब) त्यातले काही शेअर्स विकता (क) आहे ते शेअर्स ‘होल्ड’ करता आणि काही ‘टर्न अराऊंड’ होण्याची वाट पाहाता (ड) ‘अ‍ॅव्हरेज कॉस्ट’ करण्याकरिता काही अधिक शेअर्स खरेदी करता.
स्कोअर कसा द्याल?
उत्तर (अ) चार मार्क (ब) तीन मार्क (क) दोन मार्क (ड) एक मार्क.
स्कोअरकार्ड : कसे बघाल?
४१ ते ४८ मार्क्‍स : अभिनंदन! वॉरन बफेटच्या पावलावर पाऊल ठेवताय, तुम्ही शेअर्सची रिस्क आणि गुंतवणूक हाताळू शकता. तुम्हाला लॉसेस केव्हा बुक करायचे आणि ‘बाहेर’ केव्हा पडावयाचे हे नक्की माहीत आहे.
३१ ते ४० मार्क्‍स : तुम्ही बऱ्यापैकी चांगले गुंतवणूकदार आहात; परंतु तुम्हाला तुमची ‘रिस्क टॉलरन्स’ वाढवण्याची गरज आहे.
२१ ते ३० मार्क्‍स : तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक म्युच्युअल फंडमार्फत केलेली बरी. तुमच्या अपेक्षांना आळा घाला आणि सतत शेअर्सची खरेदी-विक्री करण्याचे टाळा.
१२ ते २० मार्क्‍स: तुम्ही शेअरबाजारात काय करता आहात? तुम्ही कष्टाने मिळवलेला पैसा घालवण्याची ही जागा नाही.
त्यापेक्षा सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवा किंवा म्युच्युअल फंडचा मार्ग स्वीकारा.
‘फिटनेस’ टेस्ट पास झाल्यावर काय कराल?
एकदा जर वरील प्रकारे ‘फिटनेस’ टेस्ट पास झालात किंवा ‘फर्स्ट क्लास’ मिळवलात की स्वत:च्या गुंतवणुकीचा आढावा घ्या. यात प्लॅनिंग करताना स्वत:चा असलेला पैसा, उपलब्ध उत्पन्नाची इतर साधने आणि जोखीम घेण्याची क्षमता (रिक्स टेकिंग कपॅसिटी) ही त्रिसूत्री लक्षात घेऊन शेअरबाजारात ‘ट्रेडिंग’ केले की पश्चात्तापाची पाळी येणार नाही. सध्या तरी चालू असलेला ‘डाऊन ट्रेंड’ लक्षात घेतला तर १०० टक्के इक्विटी असलेला पोर्टफोलिओ ४० टक्क्यांनी खाली असला तरी एखाद्या तरुणाला ही भरपाई करण्याकरिता जास्तीत जास्त ‘मार्केट सायकल्स’ बघायला मिळणार आहेत; परंतु त्याकरिता त्या तरुणाकडे जास्तीत जास्त स्टॉक्स ‘ब्ल्यू चीप’ कंपनीचे असणे आवश्यक आहे. सध्याचा चढ-उतार वा दोलायमान शेअर बाजार लक्षात घेतला तर पहिल्यांदा तुमची ‘गुंतवणूक’ सुरक्षित पाहिजे आणि त्यानंतर त्याच्या वाढीचा विचार केला पाहिजे.
त्याकरिता निर्देशांक बघणे आवश्यक आहे, पण चढ-उतार अल्प काळाकरिताच असतात त्याला अवास्तव महत्त्व देऊ नका.
डेट-इक्विटीचा समतोल साधणारा पोर्टफोलिओ ठेवा
जास्त हाव किंवा अवास्तव भीती धरून शेअर बाजारात व्यवहार करू नका.
चांगल्या प्रकारच्या वाढ होणाऱ्या शेअर्समध्ये पैसे गुंतवा; ते लवकर वाढतील.
कधीही कर्ज काढून शेअर बाजारात पैसे गुंतवू नका. कर्जाचे हप्ते गडगडणारा शेअर, वाढणारे टेन्शन यांचा समतोल साधणे केवळ अशक्य आहे.
आहे ती कर्जे पहिल्यांदा फेडा. क्रेडिट कार्डावर कधीही कर्ज घेऊ नका.
प्रत्येक शेअरच्या- किमतीमागे काहीतरी गणित असते, याचं ज्ञान घ्या.
गेली चार ते पाच वर्षे निर्देशांक वाढत असताना बऱ्याच गुंतवणूकदारांनी कमाई केली; परंतु कुंपणावर बसलेल्या गुंतवणूकदारांना कमवायची हीच संधी आहे. त्यामुळे बीएसई ३० मधील कंपन्यात गुंतवणूक करून ‘रिटायरमेंट’ची तरतूद करा.
त्यामुळे २००८ मध्ये गेलेली संधी २००९ मध्ये नक्की आहे!
कारण ‘तकदीर बदलते देर नहीं लगती!’
सुनील टाकळकर
stakalkar@hotmail.com