Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

चित्रकार दीपक शिंदे यांचे प्रदर्शन ६ ते १३ जानेवारी २००९ या काळात जहांगीर आर्ट गॅलरी इथे भरवण्यात आले आहे. ‘इंटीमेट अ‍ॅलगोरिज’या प्रदर्शनात त्यांची २४ पेन्टिंग्ज आहेत. १९७२ साली जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून फाईन आर्टसची पदवी घेतल्यानंतर गेली २५ वर्षे त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनात भाग घेतला आहे. जनावरांच्या चित्रांमधून मिथ्स व लिजंड्स दर्शवणे ही त्यांची खासियत आहे.