Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

एकता कपूर जे करते ते तिचं असतं! अगदी महाभारतसुद्धा! व्यासमुनींनी लिहून ठेवलेलं महाभारत तिच्यासाठी फक्त एक आधार म्हणून आहे.(तेवढं तरी नशीब) मग ते महाभारत ती तिला हवं तसं सादर करेल आणि त्यासाठी वाटेल तितकी मेहनतही घेईल! अगदी लडाखला जाऊन चित्रीकरण करेल. आता नाईन एक्स वाहिनीवरून प्रसारित होणारं हे महाभारत कितीजण बघतात हा प्रश्नच आहे! तरीही ती तिच्याकडून मेहनतीत कसूर करत नाही. आता जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णजन्माच्या खास एपिसोडबद्दलच बघाना!
बालकृष्णाच्या भूमिकेसाठी छोटय़ा बाळाला शोधण्यासाठी तिने जंगजंग पछाडलं होतं. प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या जवळपास अडीच महिने आधी तिने आपली २०-२५ जणांची टीम कामाला लावली होती. त्यांना तिने भारतभरातील मोठी हॉस्पिटल धुंडाळायला लावली. या मोहिमेत तिला गेल्या वर्षी जन्माष्टमीच्या दिवशी जन्मलेल्या बाळाची यादी मिळाली. तिने भारतभरातल्या वेगवेगळ्या प्रांतांतल्या ज्योतिषांची समिती नेमली. त्यांच्याकडे तिने या बाळांच्या पत्रिका दिल्या. त्यांनी सात-आठ निवडलेल्या पत्रिकांतून तिने तीन अंतिम पत्रिका निवडल्या. एका बाळाचा जन्म कृष्णाष्टमीच्या दिवशी रात्री ठीक बारा वाजता झाला असून क्रिष नाव असलेल्या बाळाची तिने या भूमिकेसाठी निवड केली! एकता कपूरला छोटय़ा पडद्याची ‘क्वीन’ म्हणतात ते काही उगाच नाही!
लव्हली गर्ल