Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

शिल्पा पोळेकर
आपण नेहमी केवळ त्याच धाटणीच्या वस्तू पाहत असतो. इथला चहा सव्‍‌र्ह करायचा ट्रे पाहिल्यावरच तुम्हाला या वस्तूंचे वेगळेपण लक्षात येईल. मातीच्या विविध आकारातील वस्तू दिवाणखान्यात ठेवल्यावर नक्कीच ही वस्तू तुम्ही कुठून घेतलीत या प्रश्नाला तुम्हाला सामोरं जावं लागेल
लग्न, मुंज, वाढदिवस, बारसे हे आणि असे कितीतरी कार्यक्रम वर्षभरात सतत असतातच. परंतु अशा ठराविक प्रसंगी गिफ्ट काय द्यायचे, हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. त्यातून जर एखादी स्त्री असेल तर तिला गिफ्ट घेणं हे अधिक सोप्पं असं म्हटलं जातं. पुरुषांना द्यायचं तर काय हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. अशा वेळी मग आयत्या वेळी काहीतरी द्यायचं म्हणून खरं तर गिफ्ट घेतलं जातं. परंतु गिफ्ट असं असावं की ते प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं. आता मात्र एखादा समारंभ आला आणि काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न उपस्थित झाला तर तडक दादरकडे वळा.
दादरला पोर्तुगीज चर्चच्या समोरच्या गल्लीत म्हणजेच सिद्धिविनायकला जाणारा एक रस्ता लागतो. याच रस्त्यावर व्हाईट फ्लॉवर हे दुकान तुमच्या निदर्शनास येईल. इथे शिरताच एका नवीन सुंदर दुकानात आल्याचा प्रत्यय तुम्हाला येईलच.
इथे गिफ्ट आर्टिकल्स, सेंटेड कँडल्स, पेन स्टॅण्ड, विविध डिझाईन्सचे ट्रे, त्याचबरोबर इतर अनेक शोच्या वस्तू तुम्हाला दिसून येतील. आता तुम्ही नक्कीच म्हणाल,

 

यात काय नवल?
यात नवल असं की आपण नेहमी केवळ त्याच धाटणीच्या वस्तू पाहत असतो. इथला चहा सव्‍‌र्ह करायचा ट्रे पाहिल्यावरच तुम्हाला या वस्तूंचे वेगळेपण लक्षात येईल. मातीच्या विविध आकारातील वस्तू दिवाणखान्यात ठेवल्यावर नक्कीच ही वस्तू तुम्ही कुठून घेतलीत या प्रश्नाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. वैविध्यपूर्ण अशा रंगसंगतीत लाकडाच्या वस्तूही पाहायला मिळतील. येथे असलेल्या गिफ्टमध्ये पुरुषांना गिफ्ट म्हणून देता येतील अशा अनेक वस्तू उपलब्ध आहेत. उदा. इथे असलेला डायरीचा सेट हा आपण गिफ्ट म्हणून नक्कीच देऊ शकतो. युनिक असा हा डायरीचा सेट पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडाल. त्याचबरोबर शो पिसमध्येसुद्धा पुरुषांना आवडतील असे सेट उपलब्ध आहेत.
‘या ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या ९० टक्के वस्तू या महिला तयार करत असून, मला जशा हव्या तशा वस्तू मी त्यांच्याकडून तयार करून घेते’, अशी माहिती हे दुकान चालविणाऱ्या शिल्पा पोळेकर यांनी दिली.
सर्व वस्तू पाहताना त्यांच्यावरची नजर हलतच नाही. पण कुठेतरी तिथे असणाऱ्या शेणीच्या गोवऱ्या या नजरेला खुपतात. इतक्या सुंदर ठिकाणी शेणीच्या गोवऱ्या का, असा प्रश्न शिल्पाला विचारताच ती म्हणते, ‘या ठिकाणी अग्निहोत्राचे सामानसुद्धा मिळते. आपण मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कुठल्याही शहराच्या ठिकाणी आज अशा प्रदूषण असलेल्या वातावरणात जगत आहोत की येथे आपल्याला खरं तर स्वच्छ मोकळा श्वास घेणंही मुश्कील झालेलं आहे. अशा सर्वाना या अग्निहोत्राचा उपयोग होऊ शकतो.
अग्निहोत्र म्हणजे अग्नीची उपासना, सर्व प्राचीन उपासना मार्गात अग्निपूजेला महत्त्व आहे. सकाळी सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरच्या घरी कोणीही स्त्री-पुरुष ही उपासना करू शकतो. शरीर मनाच्या शुद्धीबरोबरच वातावरणातील प्रदूषणावर हा एक उत्तम उपाय आहे.’ येथे उपलब्ध असलेल्या पुस्तकांमध्ये अग्निहोत्राची उपासना कशी करावी याचे मार्गदर्शन केले आहे.
व्हाईट फ्लॉवर्समध्ये गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला जाणवेल तो या ठिकाणी येणारा सुगंध. दुकानात आत शिरताच तुम्हाला इतके प्रसन्न वाटेल की विचारता सोय नाही. याचे कारण काय असे विचारल्यावर शिल्पा म्हणते येथे आम्ही अग्निहोत्र करतो म्हणून व्हाईट फ्लॉवर्समध्ये केवळ गिफ्टस् नाहीत, तर वेदात सांगितलेला पंचकर्म मार्गही येथे आपल्याला गवसतो. चला तर कुणाला गिफ्टस् द्यायची असतील किंवा सुंदर सुगंधाचा साक्षात्कार घ्यायचा असेल तर व्हाईट फ्लॉवर्सला नक्कीच भेट द्यायलाच हवी.’
प्रभा कुंभार-कुडके
prabhakumbhar@gmail.com