Leading International Marathi News Daily

गुरुवार, ८ जानेवारी २००९

गाजर हलवा
साहित्य : गाजर, खवा, तूप, वेलची, साखर, बदाम.
कृती : थोडय़ा तुपावर गाजर परतून घ्यावे. अर्धा किलो गाजर असल्यास एक वाटी साखर व १५० ग्रॅम खवा असे प्रमाण ध्यावे. मग ते नीट शिजवून घ्यावे. त्यात खवा कुस्करुन घालावा. त्यानंतर साखर, वेलची पावडर, काजू, बदाम घालावेत. प्रेशर पॅन मध्ये एक शिटी येईपर्यंत ठेवावे.

मटाराच्या करंज्या
साहित्य : मटार, कांदा, आलं, लसूण, मिरची, कणीक, रवा, तेल, मीठ
कृती : तेलाची फोडणी देऊन त्यात कांदा परतून घ्यावा. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करावी. त्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे. सारण तयार झाले की कणकेत थोडा रवा आणि मीठ घालावे. त्यात थोडे तेल घालून ते घट्ट भिजवावे. करंजीच्या आकारात हे सारण भरुन तेलात तळावे.