Leading International Marathi News Daily                                  शुक्रवार, ९ जानेवारी २००९
लोकमानस
वाहतूक उद्योगास देशप्रेमाचे धडे कुणीही देऊ नये
 
वाहतूकदारांच्या आंदोलनाविषयी आपला अग्रलेख वाचताना एक वाहतूकदार म्हणून मनोमन वेदना झाल्या.
साधारण सहा महिन्यांपूर्वी , ३ जुलै २००८च्या उत्तररात्री केंद्र सरकारच्या विविध खात्यांनी दिलेल्या लेखी आष्टद्धr(२२४)वासनांनंतर तेव्हाचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.२परंतु यातील कुठल्याच आंदोलनाची पूर्तता होत नव्हती व वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे सरकारला समजणाऱ्या भाषेत म्हणजे आंदोलनाने उत्तर द्यावे या विचाराशी वाहतूकदारांच्या अडीच ते तीन हजार संघटना इंदूर येथील आम स़भेत पोचल्या व चक्का जाम आंदोलन पुन्हा सुरू झाले. मुंबईवरच्या २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यामुळेआंदोलन एक ते दीड महिना पुढे ढकलण्यात आले. ते ५जानेवारी २००९ रोजी सुरू करण्यात आले.पण त्यापूर्वी या व्यवसायाशी जोडल्या गेलेल्या सर्वच संस्था, सरकारे, व्यापारी संस्था, उद्योगजगत यांना विस्तृत खुलाशाद्वारे पूर्वकल्पना दिलेली होती,
जागतिक मंदीमुळे रोजच कमी होणाऱ्या आयात खनिज तेलाच्या किमतीच्या पाश्र्वभूमीवर सर्वच इंधनांच्या आपल्या देशात आकारल्या जाणाऱ्या किमती कमी व्हाव्यात, असे आमचे म्हणणे आहे. त्यामुळे मंदीच्या लाटेचे तडाखे सोसणाऱ्या सर्वच देशवासीयांना फार मोठा दिलासा मिळेल. देशांतर्गत महागाईस आळा बसेल. श्रीमंत व उच्चभ्रू समाज वापरत असलेल्या विमानाच्या इंधनाचे (अ५्रं३्रल्ल ळ४१्रुल्लीो४ी’) दर हे सामान्य माणूस वापरत असलेल्या ट्रक, बस, टेंपो यांच्या इंधनापेक्षा प्रतिलीटरमागे सुमारे ११ ते १२ रुपयांनी कमी आहेत; हा विरोधाभास सरकारच्या दुटप्पी धोरणांवर प्रकाश टाकतो.
रस्ते व महामार्ग बांधणीसाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता टोल माध्यमांतून करावी असे सरकारचे धोरण आहे. सर्वच वाहनांकडून वसूल होत असलेला रोड / व्हील टॅक्स, माल व प्रवासी, परवान्यांचे कर, इंधनावरील अधिभार हा रस्ताबांधणीसाठी वापरून कमी पडणारी रक्कम ‘टोल’ स्वरूपात वसूल करावी. ढ४ु’्रूो्रल्लंल्लूी च्या तत्त्वाप्रमाणे \दवकऊ ढफड दवड या करप्रणालीच्या नियमांचे पालन व्हावे एवढीच माफक अपेक्षा वाहतूकदारांची आहे.
याबाबत भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाचा कारभार पारदर्शी नाही व मोठय़ा प्रमाणात राजकीय हस्तक्षेपामुळे भ्रष्टाचारात बुडालेला आहे. यात सर्वसामान्य जनतेची लूट होत आहे. वाहतूक उद्योजकांस रोजच, दिवस-रात्र, या संकटांशी सामना करावा लागत असल्याने, तो टोलच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. या पाश्र्वभूमीवर सर्व बाबींचा पुर्नविचार करण्यासाठी सर्व घटकांचा समावेश असलेली समिती स्थापून, सहा महिन्यांत अहवाल आल्यावर ‘टोल’ वाढविण्याबद्दल आकारणी केली जाईल, असे आश्वासन सरकारतर्फे, ३ जुलै २००८ रोजी देण्यात आले, परंतु आजपर्यंत या समितीची स्थापना झालेली नाही. वाहतूकदारांच्या तोंडाला पाने पुसून अनेक ठिकाणी बिनदिक्कतपणे ‘टोल’ वाढ झाली. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून खदखदत असलेला असंतोष आंदोलनाच्या रूपाने उफाळून आला आहे.
वाहतूक उद्योगाला सामान्यांविषयी आस्था असल्यानेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्धार आम्ही व्यक्त केला आहे. जटिल व अनावश्यक पद्धती टाळून सेवा कर वसुलीची सुटसुटीत व्यवस्था करावी असा वाहतूकदारांचा प्रयत्न आहे. सरकारी यंत्रणेने, कायद्याचा चुकीचा अर्थ लावून छळवादाचा उच्छाद मांडू नये, असे आमचे म्हणणे आहे.
देशप्रेम व देशभक्तीचे धडे कुणीही वाहतूक उद्योगास देऊ नये. बांगलादेशची लढाई सुरू असताना वाहतूकदारांनी न बोलता पडद्याआडून केलेल्या सहकार्याची पावती माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी यांनी ठं३्रल्लं’ ढी१्रे३ ही योजना सुरू करून देशाला दिली आहे. अडथळेविरहित, निकोप भूपृष्ठ वाहतूक ही युद्धसदृश परिस्थितीत देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे, याची जाणीव आम्हाला आहे. आश्वासनांची पूर्तता करण्याने हे आंदोलन थांबवण्यात येईल. वाहतूकदारांच्या संयमाचा अंत कुणीही पाहू नये. ‘समंजसपणे मार्ग काढणे’ ही आजची गरज आहे.
सुनील काळे
उपाध्यक्ष, बॉम्बे गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशन

‘दैव व कर्म’ यावर सैद्धान्तिक चर्चा व्हावी
ल्ल डॉ. विद्याधर ओक यांचा ‘दैव 5 कर्म = आयुष्य’ हा प्रदीर्घ लेख (लोकसत्ता ४ जानेवारी) विचारप्रवर्तक आहे. डॉ. ओक स्वत: ज्योतिषशास्त्रतज्ज्ञ असूनही त्यांनी ज्योतिषशास्त्राबद्दलच अनेक शंका व मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत याबद्दल त्यांचे अभिनंदन. ज्योतिषशास्त्राबद्दल, विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादी लोक सदैव टीकाकाराच्या (किंबहुना विरोधकाच्या) भूमिकेत असतात, परंतु सर्वसामान्य जनमानसामध्ये प्रचंड कुतूहल व ओढ ‘ज्योतिष’ विषयाबद्दल आढळते. मराठी/ इंग्रजी/ हिंदी वर्तमानपत्रांमध्येही ‘राशिभविष्य’ न चुकता छापले जाते. नागपूरच्या ‘प्रज्ञालोक’मध्ये (अंक २०३-२०४) डॉ. भा. वि. देशकर यांनी ‘आधुनिक विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र’ या लेखात म्हटले आहे की, जी घटक द्रव्ये ग्रहांत आहेत तशीच द्रव्ये मानवी शरीरातही असतात. या गृहीतकाचा वैज्ञानिकदृष्टय़ा अभ्यास होणे गरजेचे आहे.
डॉ. ओक यांनी ‘ज्योतिषशास्त्रात गणित लागते, इंटय़ुशन किंवा सिद्धी नव्हे’ असे म्हटले आहे. याबाबत माझ्या माहितीतील लोकांना प्रत्यक्ष आलेले अनुभव पूर्णत: वेगळे आहेत. साहित्य क्षेत्रात जशी व्यक्तीच्या ठिकाणी मुळात प्रतिभा असावी लागते व अभ्यासाने, होणारी ‘अभिव्यक्ती’ आनंदमय व उच्च दर्जाची असते, त्याप्रमाणेच ज्योतिषशास्त्रातही ‘इन्टय़ुइशन’ (अंत:प्रेरणा) असली तर शास्त्राच्या अभ्यासाने अचूकता येते व अशा व्यक्तीने सांगितलेले भूत- भविष्य बरोबर ठरते. मात्र असा अनुभवांचा अद्याप कोणी नीटपणे मागोवा घेतल्याचे आढळत नाही.
डॉ. विद्याधर ओक यांनी ‘दैव व कर्म’ याबद्दलचा जो सिद्धान्त मांडला आहे त्यावर सैद्धाान्तिक पातळीवर चर्चा व्हावी.
सुहास बाक्रे, ठाणे

मंदी नव्हे, उद्योगपतींची चांदी!
ल्ल देशात आर्थिक मंदी निर्माण झाल्याची अफवा काही उद्योगपती जाणीवपूर्वक करीत आहेत. पैसा असूनही कंत्राटदारांची बिले थकविणे, कमी पैशात कामे करून घेणे, कामगारांचे वेतन उशिरा देणे, पगाराची मासिक उचल न देणे, शिल्लक सुट्टीचे पैसे न देणे, कामाच्या वेळी सुरक्षा न देणे अशा गोष्टी मंदीचे कारण पुढे करून, ‘अनुचित कामगार प्रथा’ या कायद्याचा सर्रास भंग ३० वर्षे प्रचंड नफा मिळविणाऱ्या उद्योजकांनी आरंभिला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी तरी मंदी ही चांदीच ठरते आहे.
जागतिक पातळीवरील आर्थिक मंदीची झळ भारताला बसू नये म्हणून उद्योजकांनी थोडी कळ सोसून शासनामागे उभे राहणे आवश्यक आहे. त्याऐवजी मंदीचा गैरफायदा घेऊन इतरांवर अन्याय करण्याचे धोरण स्वीकारून भारताला मंदीच्या गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या या उद्योजकांना शासनाने वेळीच वेसण घालणे गरजेचे आहे.
प्रदीप करमरकर, ठाणे

मच्छिमारांना तटरक्षक दलात सामावून घ्या
ल्ल २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी किनाऱ्याच्या रक्षणासाठी नवीन गस्ती नौका, रडार प्रणाली, अत्याधुनिक उपकरणे आणि बोटी खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तटरक्षक दलाची १३ ठाणी असून ७० छोटी व मोठी गस्ती नौका असलेल्या तटरक्षक दलामध्ये व सागरी किनाऱ्याच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या विविध सुरक्षा संस्थांमध्ये व्यापक समन्वय साधण्याचा निर्णयही घेण्यात आला. सागरकिनारी जन्माला येणाऱ्या लोकांना काही गोष्टी उपजत माहीत असतात; हवी असते ती विज्ञानाची मदत, म्हणूनच या किनारपट्टीवरील होतकरू तरुणांना तटरक्षक दलात सामावून घेतल्यास पुन्हा २६/११ होणार नाही.
या कोळीबांधवांना आपापल्या किनारपट्टीची इत्थंभूत माहिती असते व त्यांच्या चाणाक्ष बुद्धीचा तटरक्षक दलाला फायदा नक्कीच होईल.
मेजर डॉ. सुप्रिया येरागी, मुलुंड, मुंबई