Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

सुहास खामकर नवी मुंबई महापौर श्री
 
बेलापूर/वार्ताहर : नवी मुंबई महापालिकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या सुहास खामकर या शरीरसौष्ठवपटूने २००९ सालचा ‘नवी मुंबई महापौर श्री’ पुरस्कार पटकाविला. ५१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिका क्षेत्र मर्यादित ‘नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री’चा पुरस्कार नेरुळच्या स्वप्नांजल पराडकर यांनी पटकाविला. १५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या स्पर्धेतील बेस्ट पोझर म्हणून पुण्याच्या विवेक शिर्के याने बाजी मारली, तर मुंबईच्या समीर वरळीकर याने उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू म्हणून सन्मान मिळविला.
राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २००८-०९ निकाल-
६० किलोपर्यंत- (१) सुनील हिंगणे, पुणे (२) चंद्रशेखर पवार, कोल्हापूर (३) प्रशांत गुरव, पुणे (४) दत्तात्रय बोले, मुंबई (५) नूपुर पांडव, मुंबई (६) कुणाल धातक, नाशिक.
६५ किलोपर्यंत- (१) मनोज सुतार, मुंबई (२) समीर भगत, ठाणे (३) चेतन कांबळे, मुंबई (४) मोहन जामदार, ठाणे (५) अजन कुंचीकुरवे, मुंबई (६) अश्विन पांचाळ, नाशिक.
७० किलोपर्यंत- (१) समीर वरळीकर, मुंबई (२) संतोष मुंगसे, पुणे (३) निशांत तोरस्कर, पुणे (४) निजेश पी. एन., नाशिक (५) दत्तात्रय शिंदे, कोल्हापूर (६) रमेश झगडे, मुंबई उपनगर.
७५ किलोपर्यंत- (१) प्रीतम सिंग, पुणे (२) सनिल गोंदकर, सांगली (३) सचिन डोंगरे, मुंबई उपनगर (४) विनोद कदर, मुंबई उपनगर (५) संतोषकुमार, पुणे (६) सर्जेराव पाटील, कोल्हापूर.
८० किलोपर्यंत- (१) सुहास खामकर, मुंबई (२) योगेश बने, मुंबई (३) कमलाकर शिंदे, पिंपरी-चिंचवड (४) मंगेश सावंत, नौदल (५) अमीर सय्यद, सातारा (६) अमित मोकाशी, ठाणे.
८० किलोवरील- (१) अभिजीत डॉन, नाशिक (२) दत्तकुमार श्रीरंगकर, मुंबई (३) ई.जी. वैजू, नौदल (४) राजू कवडे, पुणे (५) सागर काटे, पिंपरी-चिंचवड (६) गणेश लिमगुडे, पिंपरी-चिंचवड.

‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा : २००८-०९’
निकाल- ५० किलोपर्यंत- (१) संतोष फराड, (२) रूपेश म्हात्रे (३) दीपक मढवी
५५ किलोपर्यंत- (१) नरेश मुंडे (२) अविनाश खिरड (३) किशोर पाटील
६० किलोपर्यंत- (१) प्रभाकर पाटील, (२) मुकुंद पाटील (३) विश्वनाथ गोंधळ
६५ किलोपर्यंत- (१) नीलेश म्हात्रे (२) मच्छिंद्र फडके (३) सागर हिरे, पुरुषोत्तम जिम.
६५ किलोवरील- (१) स्वप्नांजल पराडकर, पॉवर इन फीट (२) आनंद मोरे, बॉडीझोन जिम (३) विश्वअमर उपाध्याय.