Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
विशेष

आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटाने प्रथम खेळाच्या उत्पन्नाचा उच्चांक केला, ही बातमी मंदीच्या काळात उत्साहवर्धक आहे. बाजारात उत्पादने नसली, तरी चित्रपटांच्या बाजारात सगळे काही हाऊसफुल्ल आहे. प्रेक्षकांना मंदीचा फटका विसरायला लावणारा हा करमणुकीचा खेळ माणसाच्या संस्कृतीचे दर्शन घडवतो. गाणे-बजावणे करणे हे आपल्या संस्कृतीत एकेकाळी हीनपणाचे मानले जात असे. ज्या कलांच्या उगमांमुळे मानवी आयुष्य सर्वार्थाने संपन्न बनत होते, त्या कलांकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलायला फार काळ जावा लागला. अभिजात कलांच्या बाबतही हेच चित्र होते आणि लोकप्रिय कलांकडे तर नेहमीच खालच्या दर्जाने पाहिले जाते आहे. फार पूर्वी नाही, पण अगदी चित्रपटाच्या आरंभीच्या काळात त्यामध्ये काम करणे हे सामाजिकदृष्टय़ा फारसे मानाचे मानले जात नव्हते. माणसाने इतरांना उपयुक्त होईल, असे काही तरी करणे म्हणजे त्याचे जीवन सार्थकी लागते, असा त्या काळातील सार्वत्रिक समज होता. चित्रपटांच्या आरंभीच्या काळात ज्याला गाता येते, तोच अभिनेता बनू शकत होता, कारण त्या काळात पाश्र्वगायनाचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. नट आणि नटी हे प्रकरण त्या काळात जरा हलक्या आवाजातच हाताळले जात होते. त्यापूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या संगीत नाटकांमध्ये ‘स्त्री-पार्ट’ करायला कोवळय़ा मुलांची मदत घ्यावी लागत असे. नाटकात काम करणे म्हणजे जीवनात वाया जाणे असा समज त्या काळात होता.

एकच लक्ष्य..२००९!
नवं वर्ष उजाडलं आणि साऱ्या राजकीय पक्षांची सार्वत्रिक निवडणुकांसाठी धांदल सुरू झाली. मावळत्या वर्षांत काय कमावलं आणि काय गमावलं, याचा मेळ घालत असतानाच येणारं नवीन वर्ष सर्वार्थानं ‘समृद्धीचे आणि भरभराटीचं’ जाण्यासाठी माय-बाप जनतेला साकडं घालण्यासाठी साऱ्यांची धावपळ सुरू सुरू झाली आहे. गेल्या वर्षांच्या उत्तरार्धात कोकणात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा जिल्हावार बैठका घेतल्या. पक्षाचे खासदार-आमदार आणि जिल्हा प्रमुखांना त्यापासून उद्धवनी दूर ठेवल्यामुळे या बैठका म्हणजे नेता आणि कार्यकर्ता यांच्यात खऱ्या अर्थाने ‘थेट-भेट’ किंवा ‘ग्रेट भेट’ होत्या. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही सावर्डे येथे जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांचं शिबीर आयोजित केले.तत्कालीन रत्नागिरी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष अर्थात मध्यमवर्गीयांना भुरळवणारा ‘राष्ट्रवादी’चा मुखवटा आर. आर. पाटील यांच्यासह पक्षाच्या प्रमुख मंडळींनी हजेरी लावल्यामुळे हे शिबीर प्रभावी ठरलं. सावडर्य़ाच्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि माजी खासदार कै. गोविंदराव निकम यांचे चिरंजीव शेखर निकम यांनी केलेलं उत्कृष्ट आयोजनही पक्षनेत्यांना प्रभावित करून गेलं आणि रमेश कदम व भास्कर जाधव यांच्यापेक्षा हा नवा चेहरा बरा, अशी कुजबुजती चर्चा सुरू झाली.

बाबल्या, सकाळच्या घडीक चललंय खयं?’
‘तात्यांनू, मी चललय जीमाक।’
‘जीमाक म्हणजे यायामशाळेत काय रे?’
‘‘होय तात्यांनू, तुम्ही जेका यायामशाळा म्हणतात, त्येका आम्ही तरुण पोरां जीम म्हणतोव!’’
‘‘पण, त्या जीमाक जावची तुमका कशी कायरे बुद्धी सुचल्यानी?’
‘‘त्येचा काय झाला, तात्यानू, आम्ही पोरांनी अमीर खानचो ‘गजनी’ बघलो आणि आमका पण अमीर खानसारखी आठ पेक्स बॉडी करुची इच्छा झालीसा!’’
‘‘पण कायरे, आमका आजपर्यंत ‘पेक’ एकच म्हाईत व्होतो, या नवीन ‘पेक’चा खुळ कसला?’’
‘तात्यानू, तुमका ह्य़ा समजूचा नाय, तेचेसाठी तुमका ‘गजनी’ बघुचो लागात’
‘‘तू माका शणपणा शिकव नको, यायाम माका माहीत नाय काय, अरे मेल्या जग ही यायामशाळाच आसा’’
‘‘जग ही यायामशाळा आसा, आज काय सकाळीच घोटभर ‘पेग’ लायलात्य की काय?’’
‘‘तो ‘गजनी’ बघून तुका ‘पेग’च दिसतत. जग ही यायामशाळा शाळा म्हणजे, जगात या ताकतीशिवाय काय खरा नाय. कुणाची पैशाची ताकत तर कुणाची बुद्धीची.’’
‘म्हणजे, ह्य़ा काय नवीन’
‘‘अरे बाबल्या, प्रत्येक जण आपापल्या ताकतीच्या जीवार या आयुष्यात कमवत असता. आता अमेरिकेचा बघ.. आपल्या ताकतीच्या जीवार हो देश जगात दादागिरी करता की नाय?’’
‘तात्यानू, या माझा डोक्या असा कधी चलूकच नाय!’
‘अरे, आपल्या देशातले राजकीय पक्ष यायामशाळाचं आसत!’
‘म्हणजे, या काय नवीन’
‘‘म्हणजे बघ हं, काँग्रेस, भाजप, शिवशेणा कोणतोय पक्ष घे, तेच्येतलो एकेक नेतो म्हणजे एक-एक पयलवान आसत. ह्य़ेंचेतलो प्रत्येक पयलवान ताकतीच्या जीवार सत्ता चाखीत असता’’
‘‘काँग्रेस ही देशातली सर्वात मोठी आणि जुनी यायामशाळा. ह्य़ेंचेकडे मोठे-मोठे पयलवान आसत.’’
‘‘म्हणजे या मोठय़ा-मोठय़ा पयलवानांक मुसक्यो बांधणाऱ्या त्या सोनियांचा कौतुकच करुक ह्य़ोया. बरोबर आसा काय नाय?’’
‘होय तर खराच आसा’
‘‘बाबल्या, तो यायाम करणा या तुझा काय काम नाय. तू आसय काडी पयलवान. त्या अमीर खानान बघ ‘गजनी’चो कितको गाजावाजो केलो आणि २०० कोटी रुपयांचो धंदो केलानी’’
‘तात्यानू, २०० कोटी रुपये म्हणजे कितके हो पैशे’
‘‘ता तुका काय करुचा आसा, तुका एवढे पैशे दिले तर मोजूक आयुष्य पुरुचा नाय. ते पैशे त्या खानाकडेच शोभतत.’’
‘‘तात्यानू, तुम्ही कायपण म्हणा, पण मी आता ध्यास घेतलोसाच, अमीर खानसारखो मी पण पयलवान जातलय’’
‘‘अरे येडय़ा, माका तर असो डाऊट आसा, की त्या यायामशाळेच्या मालकांनीच हो पिक्चर तयार केलोसा. त्येंच्यो यायामशाळा चलूक ह्य़ोयोत म्हणून..’’
‘‘तात्यानू.. तुमचा आपला कायतरी तिरक्याच डोक्या चलता.. मी आपलो चललय ‘जीमा’क ‘गजनी’ बनूक’’
प्रसाद केरकर
Prasadkerkar73@gmail.com