Leading International Marathi News Daily
 


बुधवार, १४ जानेवारी २००९
  औषधशास्त्र : आकर्षक करिअरची संधी
  करिअर स्कील्सची आवश्यकता
  नौदलातील विविध आकर्षक संधी
  विमा क्षेत्रात बॅकऑफिस करिअर
  हे विश्वचि माझे..
  समस्येच्या गर्भात संशोधनाची पहाट
  युको बँक प्रोबेशनरी ऑफिसर पदाची तयारी
  खाद्यान्नप्रक्रिया उद्योगातील राजमार्ग बेकरी व्यवसाय
  परदेशात नोकरी करणाऱ्यांनी ‘करिअर’ कसे करावे?
  जाहिरात क्षेत्रातला दादा माणूस

 

औषध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती बनण्यासाठी औषधशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी स्थानिक आणि जागतिक पातळीवर घडणाऱ्या औषधनिर्मितीच्या क्षेत्रातल्या बदलांचा नियमित आढावा घेतला पाहिजे. याकरिता शिक्षकाची भूमिका कुठली असावी? विद्यार्थ्यांना शिकवण्याअगोदर शिक्षकाने स्वत: औषधनिर्मिती क्षेत्रातले नवीन शोध, बदल, तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. हे खरे तर सोपे नाही. वेळ खर्च करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणा या गोष्टी शिक्षकाच्या अंगी असतील तर असा शिक्षक विद्यार्थ्यांनाही उच्च प्रतीचं ज्ञान देऊ शकतो.
औषधशास्त्राच्या अभ्यासक्रमाच्या नियोजनातल्या अडचणी कुठल्या?
अडचणी अनेक प्रकारच्या आहेत. सदोष व्यवस्थापन त्यातलेच एक. शासनानुदानित बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये ‘बाबू’ संस्कृती आहे जी व्यावसायिकतेच्या बिलकुल विरुद्ध आहे. उदाहरणार्थ जर अनुदानित महाविद्यालयाचा प्राचार्य वातानुकूलित वर्गाना आणि हायटेक प्रयोगशाळांना ‘पंचतारांकित संस्कृती’ म्हणून संबोधत असेल तर अशा ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह नक्कीच उभे राहते. शासनानुदानित महाविद्यालयांना शासकीय कारभाराचा जाच नेहमीच सहन करावा लागतो. कधी कधी विशिष्ट महाविद्यालयाला झुकतं माप दिलं जातं. अनुभवी आणि संवाद कौशल्यात निपुण असणाऱ्या व्यक्तीला संधी न देता कुणीतरी फक्त ढँ.ऊ. झालाय म्हणून त्याला संस्थेचा प्रमुख करणं हीसुद्धा एक अतिशय चुकीची पद्धत आहे जी औषधशास्त्राच्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता ढासळण्यास कारणीभूत ठरली आहे. भले भारत कळ क्षेत्रात अग्रेसर असेल तरीही बऱ्याचदा फार्मसी विद्यालयात अजूनही ई-लर्निगसारख्या सुविधेचा अभाव आहे. काही विद्यार्थ्यांना तर पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशनही येत नाही. संगणकाचे पुरेसे ज्ञान नसल्याकारणाने बरेचसे
 
विद्यार्थी आजही कागदाचा फाफटपसारा वागवताना दिसतात. जर आजही औषधशास्त्रांच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत जुनाट उपकरणेच हाताळावी लागत असतील तर या क्षेत्रातील तज्ज्ञ तयार तरी कसे करायचे? बऱ्याचशा विद्यापीठात जेथे औषधशास्त्राचा अभ्यासक्रम शिकवला जातो. तेथे शिक्षकच सुधारित ज्ञानाबाबत अनभिज्ञ असलेले दिसून येतात. त्याहून विशेष म्हणजे या शिक्षकांना चालू घडामोडींविषयी जागृत करण्यासाठी कुठली पाऊलेही उचलली जात नाहीत. कधी कधी या शिक्षकांचीच नवीन ज्ञान घेण्याची तयारी नसते.
औषधनिर्मिती क्षेत्रातील ताज्या घडामोडी अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याकरता कुठली पावले उचलली पाहिजेत?
दर चार वर्षांनी अभ्यासक्रमाची उजळणी करणे क्रमप्राप्त असावे (ही चार वर्षे- चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ध्यानात घेऊन सांगितलेली आहेत.).
अशा प्रकारची उजळणी शिक्षकांनाही नवीन विषयांची उजळणी करण्यास भाग पाडेल.
अशा प्रकारे विद्यार्थ्यांनाही नापास न होता अभ्यास करून पासच व्हावे लागेल. नाहीतर त्यांना नवीन अभ्यासक्रमाला सामोरे जावे लागेल.
अभ्यासक्रम ठरवणारी एखादी समिती स्थापन केली जावी जिच्यावर संबंधित क्षेत्रातील लोक विराजमान असतील.
औषधशास्त्राप्रती असणाऱ्या शासकीय दृष्टिकोनाबद्दल तुम्ही काय म्हणाल?
सामान्यत: शासकीय दृष्टिकोन चांगला आहे मात्र त्याची अंमलबजावणी अतिशय वाईट झालेली आहे. खरंतर शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार बऱ्याच प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या बौद्धिक संपदेचा योग्य वापर होऊ देत नाही. शिक्षणाची गुणवत्ता ठरवण्याचा शासनाचा प्रयत्न स्तुत्य आहे मात्र त्यांच्या योजनांची अंमलबजावणी अतिशय वाईट होते. फार्मसी मॅनेजमेंट गेल्या एक दशकापासून अस्तित्वात आहे मात्र औषधशास्त्राच्या महाविद्यालयांना अजूनही फार्मसी मॅनेजमेंट कोर्स घेण्याची परवानगी दिली जात नाही.
औषध कंपन्या आणि औषध शास्त्राचे विद्यार्थी यात कुठल्या प्रकारचा समन्वय असावा असे तुम्हाला वाटते?
जर कायद्याच्या चौकटीत राहून खासगीकरणाला प्रोत्साहन दिले तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. कारण उद्योजक त्यांच्या भविष्यातील कर्मचाऱ्यांकऋरता गुंतवणूक करतील. आजही काही औषध कंपन्या आहेत. ज्या
औषध शास्त्राच्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या गरजेनुसार प्रशिक्षण देण्यास तयार आहेत. एवढेच नाही तर अशा प्रशिक्षित विद्यार्थ्यांना आपल्या सेवेत सामावून घ्यायचीही त्यांची तयारी आहे. आय.आय.एम. (ककट) सारख्या संस्थेतही अशाच पद्धतीचा अवलंब केला जातो.
औद्योगिक क्षेत्राचा अनुभव असणारे शिक्षक औषध शास्त्राच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकतात?
शिक्षणात उपयुक्त सरावाला पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त महत्त्व आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधण्याअगोदर सफरचंद खाली पडताना प्रथम पाहण्यात आलं होतं. सरावानंतरच एखाद्या गोष्टीचे
गद्य किंवा पुस्तकी रूपांतर केले जाते, म्हणूनच ज्या व्यक्तीला औषधनिर्मिती क्षेत्रातला प्रत्यक्ष अनुभव आहे तो एक चांगला शिक्षकही बनू शकतो. असा अनुभवी शिक्षक नक्कीच चांगले विद्यार्थी घडवू शकतो.
औषधनिर्मिती क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या संध्यांबद्दल विद्यार्थ्यांनी स्वत:ला कशाप्रकारे जागरूक ठेवावे?
आजकाल बऱ्याच कंपन्या कँपस इंटरव्ह्य़ू घेतात. म्हणून शिकत असलेल्या महाविद्यालयातूनच नवीन नोकरीच्या संध्या कळू शकतात. अनेक संस्थांचा स्वत:चा ‘प्लेसमेंट सेल’ असतो. अशा प्रकारच्या प्लेसमेंट सेलच्या कारभारात सक्रिय राहून विद्यार्थ्यांना नोकरीच्या नवीन जागा समजू शकतात. वर्तमानपत्रातल्या जाहिरातीही सगळ्यात सोपे माध्यम आहे. प्लेसमेंट एजन्सी आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनही नोकरी मिळवण्यास उपयुक्त ठरू शकतात. बऱ्याचदा औषधशास्त्राच्या काही पुस्तकातही जाहिराती असू शकतात. ‘एक्स्प्रेस फार्मा’ आणि यासारखी इतर नियतकालिकेही विद्यार्थ्यांपर्यंत नोकरीच्या संध्या पोहोचवू शकतात.
नोकरीची निवड करताना औषध शास्त्राच्या विद्यार्थ्यांने कुठल्या गोष्टी विचारत घ्यायला हव्यात?
यशस्वी जीवनासाठी आनंद महत्त्वाचा आहे. स्वत:च्या आवडीनुसारच विद्यार्थ्यांने आपले कार्यक्षेत्र निवडावे. ‘बऱ्याच विद्यार्थ्यांची भूमिका ही जे चाललंय त्याच्या मागे जाणे ही असते. अशाप्रकारे या विद्यार्थ्यांना कामाचे मानसिक समाधान मिळणे शक्य नाही. ही गोष्ट कामाच्या दर्जावर परिणाम करतेच पण त्याचबरोबर आपण स्पर्धेतही संगळ्यांच्या मागे राहतो. या गोष्टीचा नकारात्मक परिणाम वैयक्तिक जीवनावरही मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो. सध्याच्या व्यापारीकरणाच्या काळात मात्र असे निर्णय हे मिळणाऱ्या पगारावर अवलंबून असतात.
औषधनिर्मिती क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी तुम्ही औषध शास्त्राच्या विद्यार्थ्यांना कुठला सल्ला द्याल?
खालील गोष्टी विद्यार्थ्यांनी अंगिकाराव्यात-
अ) दुर्दम्य इच्छाशक्ती
ब) आवडी-निवडीचा योग्य विचार
क) लक्ष नेहमी ध्येयावर केंद्रीत असावे
ड) ध्येय साध्य करण्याकरिता कठीण परिश्रम करावेत
इ) अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टी कमीत कमी कराव्यात
फ) मोठय़ा प्रमाणात वाचन करावे
ग) विविध प्रकारच्या व्यावसायिक व्याख्यानांना उपस्थित राहावे.
सचिन जगदाळे
sachin.jagdale28@gmail.com
9869232269.