Leading International Marathi News Daily                                  गुरुवार, १५ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात ‘जोधा अकबर’ने मारली बाजी
मुंबई, १४ जानेवारी / प्रतिनिधी

 
सवरेत्कृष्ट चित्रपट, सवरेत्कृष्ट दिग्दर्शक (आशुतोष गोवारीकर ) आणि सवरेत्कृष्ट अभिनेता (हृतिक रोशन) असे तीन पुरस्कार पटकावत स्टार-स्क्रीन पुरस्कारांमध्ये ‘जोधा अकबर’ चित्रपटाने बाजी मारली. ऐश्वर्या बच्चनला याच चित्रपटासाठी सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीचा आणि ए. आर. रेहमानला सवरेत्कृष्ट पाश्र्वसंगीताचा पुरस्कार मिळाला.
साजिद खान, फराह खान आणि श्रेयस तळपदे यांचे खुमासदार सूत्रसंचालन आणि दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, बिपाशा बासू आणि प्रियांका चोप्रा यांच्या दिलखेचक सादरीकरण यांनी वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात आज १५ व्या स्क्रीन पुरस्कार सोहळा रंगला.
सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठी नीरज पांडे (वेन्सडे) यांनाही गौरविण्यात आले तर सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रियांका चोप्रा (फॅशन) मिळाला. मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘मेड इन चायना’ सवरेत्कृष्ट चित्रपट ठरला. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार अरूण नालवडे (बाई माणूस), सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मकरंद अनासपुरे (दे धक्का) तर सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार शिल्पा नवलकरने (बाई माणूस) पटकाविला. आजच्या सोहळ्यात संजय खान यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. जोधा अकबरप्रमाणेच ‘रॉक ऑन’नेही अनेक विभागांतील स्क्रीन पुरस्कारांवर आपले नाव कोरले. रॉक ऑनच्या संकलनासाठी दीपा भाटिया, कलादिग्दर्शनासाठी शशांक तारे, छायांकनासाठी जेसन वेस्ट, सहाय्यक अभिनेत्री शहाना गोस्वामी, सहाय्यक अभिनेता अर्जुन रामपाल आणि सवरेत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्याचा पुरस्कार फरहान अख्तरला मिळाला.
इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे सवरेत्कृष्ट पाश्र्वगायक - केके (खुदा जाने - बचाना ए हसीनो), , सवरेत्कृष्ट पाश़्र्वगायिका शील्पा राव (खुदा जाने - बचना ए हसीनो), सवरेत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - ए. आर. रेहमान (जाने तू या जाने ना) सवरेत्कृष्ट गीतकार - अन्वीता दत्त गुप्तन (खुदा जाने - बचना ए हसीनो), सवरेत्कृष्ट कथा - नीरज पांडे (वेन्सडे), सवरेत्कृष्ट पटकथा - शिराज अहमद (रेस), सवरेत्कृष्ट संवाद - अशोक मिश्रा (वेलकम टू सज्जनपूर), उदयोन्मुख अभिनेत्री - असीन (गजनी), उदयोन्मुख दिग्दर्शक नीरज पांडे (वेन्सडे), सवरेत्कृष्ट बालकलाकार - पूरब भंडारी (तहान), सवरेत्कृष्ट विनोदी अभिनेता - तुषार कपूर (गोलमाल रिटर्न्स), सवरेत्कृष्ट खलनायक - अक्षय खन्ना (रेस), सवरेत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपट रोडसाईड रोमियो, इंग्रजी भाषेतील सवरेत्कृष्ट भारतीय चित्रपट - द लास्ट लियर, पडद्यावरील सवरेत्कृष्ट जोडी - अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम (दोस्ताना). सवरेत्कृष्ट अ‍ॅक्शन - अ‍ॅलन अमीन (रेस). स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात रामनाथ गोएंका सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार यंदा वेन्सडे चित्रपटाने पटकावला.