Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १ जानेवारी २००९
केजी टू पी. जी

बुद्धिमत्तेची चाचणी
तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची

शिष्यवृत्ती परीक्षा तोंडावर आली असताना विविध सराव परीक्षांची धावपळ सुरू झाली आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कशाप्रकारे सोडवावी याविषयी अनेकांना संभ्रम असतो. हा गोंधळ दूर व्हावा आणि अभ्यासात अधिक स्पष्टता यावी तसेच अल्पावधीत अचूक उत्तरापर्यंत कसे पोहोचावे हे विद्यार्थ्यांना समजावे यासाठी केलेला हा प्रयत्न.
वासंती सुधीर कशेळीकर

आत्मविश्वास वाढविणे हा खरा उपाय
महाराष्ट्राच्या शिक्षण परंपरेतील मानाची ‘शिष्यवृत्ती परीक्षा’ही आता टीकेचे लक्ष्य बनविली जात आहे हे पाहून वैशम्य वाटले. शाळांमध्ये एकंदरीत परीक्षा घेतल्याच जाऊ नयेत, दहावी-बारावीला गुणवत्ता यादी जाहीरच करू नये यासाठी जे मुद्दे मांडले गेले तेच वापरून आता या आघाडीवर प्रसारमाध्यमे शिष्यवृत्ती परीक्षेविरुद्ध उभी ठाकत आहेत. काय आहेत हे मुद्दे?
ल्ल या परीक्षेत ज्ञानाऐवजी गुणांची स्पर्धा लावली जाते, स्मरणशक्ती व कष्ट उपसण्याची क्षमता बुद्धीपेक्षा श्रेष्ठ ठरते, हा पहिला आरोप. आपण कोणत्याही शिक्षकाशी चर्चा करून पाहा- तुम्हाला एकच उत्तर मिळेल- शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्न, शालेय वार्षिक परीक्षेपेक्षा खूपच जास्त विचारप्रवर्तक आणि कठीण असतात. म्हणजे हा आरोप तद्दन खोटा आहे. अर्थात विद्यार्थी कितीही हुशार असला तरी त्याला कष्ट उपसल्याखेरीज यश मिळत नाहीच, पण एडिसनसुद्धा म्हणाला होता- प्रतिभा (जीनियस) म्हणजे एक टक्का बुद्धिमत्ता व ९९ टक्के परिश्रम आहेत. मग कष्ट करावे लागले तर बिघडले कोठे? खरोखर ही परीक्षा बुद्धी आणि कष्ट या दोघा गुणांचे मूल्यमापन करते. खरेतर दहावी / बारावीलासुद्धा बोर्डाने आता साधे व कठीण (‘ए’पासून ‘डी’ ग्रुपपर्यंत) सर्व प्रकारचे प्रश्न सर्व परीक्षांमध्ये विचारणे सुरू केलं आहे, तिथेसुद्धा हा आरोप लागू होत नव्हता.
ल्ल लहान मुलांवर स्पर्धा परीक्षांचा अनावर ताण येतो, पालक त्यांच्यावर बोजा लादतात, अयशस्वी मुलांना नैराश्य व न्यूनगंड येतो वगैरे.
व्यक्तिगत आयुष्यात चढाओढ, ताण, युद्ध, स्पर्धा अनिवार्य आहेत. जीवन शिक्षण जर शालेय जीवनात मिळवायचे असेल तर मुलांना कोषात जपून ठेवणे अयोग्यच होईल. शालेय जीवनातील स्पर्धापेक्षा कितीतरी पटीने मोठे संघर्ष जीवनात करावे लागतात आणि ताण सोसून कष्ट उपसावे लागतात. खरेतर बरेचसे पालक सुजाण असतात व मुलांना धीर देणे, अपयश पचवून पुढे व्हायला शिकविणे ही पालकांची व शिक्षकांची जबाबदारी असते. आपआपल्या मुलामुलींची बलस्थाने, गुण, कला, आवडनिवड ओळखून, त्यांना ज्या क्षेत्रात गती आहे व आवड आहे त्या क्षेत्रात पारंगत करून घेणे व बौद्धिक क्षेत्रात नाही तर इतर अनेक क्षेत्रात त्यांना समर्थ करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हा खरा उपाय आहे. बौद्धिक गुणवत्तेचे मूल्यमापन व कौतुक बंद करून टाकणे हा उपायच नाही.
ल्ल स्पर्धा परीक्षांमुळे क्लासेस, गाइडस्चा बाजार फोफावतो.
गुणवत्ता यादी काढून टाकली तरीही क्लासेसची जाहिरातबाजी किंवा त्यांचे उत्पन्न तसूभरही घटलेले नाही. शेवटी ११ वीत किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धा ही राहणारच आणि त्यासाठी विद्यार्थी हरतऱ्हेने प्रयत्न करणारच आहेत.
सध्या कला, क्रीडा, अभिनय क्षेत्रात यश मिळविणाऱ्या व्यक्ती ‘सेलेब्रिटीज’ व ‘आदर्श’ ठरविले गेले आहेत आणि यामध्ये प्रसारमाध्यमांचा सिंहाचा वाटा आहे. या व्यक्तींना बुद्धिजिवींपेक्षा अत्यंत कमी महत्त्वाचे काम करूनदेखील अनेक पटीने जास्त कमाई व प्रतिष्ठा लाभते. यात भरीस भर म्हणूनच की काय, गुणवत्तेचे कौतुक करणेही बंद पाडले जात आहे.
आपली शैक्षणिक धोरणे ही डॉ. ग. श्री. खैर यांच्यासारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तींनी फार विचारपूर्वकतेने आणि देशोदेशीच्या धोरणांचा तौलनिक अभ्यास करून तयार केलेली आहेत. अशा महत्त्वाच्या विषयामध्ये विचार करण्याची पात्रता व अनुभव असलेल्यांनीच लक्ष घालणे योग्य आहे. हे तज्ज्ञांचे, शिक्षकांचे काम आहे, ‘ओपिनियन पोल’चे नाही. सुधारणा आवश्यक आहेत हे खरेच आहे, पण त्या करणार कोण?
डॉ. आनंद व डॉ. सौ. मेधा भावे- ठाणे

‘शैक्षणिक ड्रिल’ आवश्यकच स्कॉलरशिपला बसवाच..
शिष्यवृत्ती नावाचे ‘शैक्षणिक ड्रिल!’ गुलाम शिष्यवृत्तीचे ‘के. जी. टू. पी.’ची आशिष पेंडसे यांनी मूलभूत शिक्षणाचा वेध घेण्यासाठी सोमवार २२ डिसेंबर ०८ च्या ‘लोकसत्ता’मध्ये लोकांची मते जाणून घेण्यासाठी आवाहन केले आहे. त्यासाठी हा पत्रप्रपंच.
‘यत्न तो देव जाणावा’ थोर संत समर्थ रामदास यांनी दासबोधात एक समास लिहिला आहे. ‘कष्टाविना फल नाही’ चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची वये लक्षात घेता त्या वयातच मन एकाग्र करून स्वयंशिस्तीने कष्ट करण्याची सवय लागणे अति महत्त्वाचे आहे. चंचल, अस्थिर मनाला लगाम घालून, त्यांच्यातील स्पर्धावृत्ती जागृत करणे, याला पर्याय नाही. शिष्यवृत्तीचे विषय- गणित, भाषा, बुद्धिमत्ता व सामान्यज्ञान हे महत्त्वाचे असून, त्याचा भावी आयुष्यात बहुमोल फायदा होतो.
पैशाच्या रूपात शिष्यवृत्ती किती मिळणार? याला पालकांनी व शिक्षकांनी अवास्तव महत्त्व न देता ९ ते १५ वर्षांच्या मुलाला स्वयंशिस्तीने, स्वत:च्या प्रयत्नाने ज्ञान ग्रहण करून, भावी आयुष्यातील ध्येय पूर्तीची मनोभूमिका तयार होण्याचे काय सिद्धीस जाते. शिष्यवृत्ती नावाचे ‘शैक्षणिक ड्रिल!’ अजिबात नसेल तर शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त हे विद्यार्थी दूरचित्रवाणी समोर बसून कोणते उपयुक्त ज्ञान मिळविणार? पाश्चिमात्त्य संस्कृतीच्या चंगळवाद दिवसेंदिवस फोफावत आहे. घातक व्यसने, दारू, धूम्रपान, चरस गांजा यापासून विद्यार्थ्यांना मुक्त ठेवण्यासाठी शिष्यवृत्ती नावाचे ‘शैक्षणिक ड्रिल!’ किंवा तत्सम प्रकल्प आवश्यक नाही का? शिष्यवृत्ती हे विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात आपले ध्येय साध्य करण्यासाठी किती खडतर तपश्चर्या करावी लागते याचे प्रशिक्षणच होय!
विज्ञानयुगात प्रगत देशात सन्मानाने राहण्यासाठी प्रगती करावयासाठी बालवयापासूनच बुद्धिमत्ता अद्ययावत (वस्र्-िं३ी)
ठेवण्यासाठी, बहुगुणी, बहुमोल, ज्ञानप्रकाश देणारे ‘शैक्षणिक ड्रिल!’ आवश्यकच नाही काय? शिक्षकी पेशातील ३० वर्षांच्या अनुभवाने माझे असे ठाम मत झाले आहे.
मधुमालती पुजारे

शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनो,
मी पण तुमच्यासारखीच एक पालक. मुलीच्या चांगल्या शालेयशिक्षणासाठी खूप धडपड करणारी. शिष्यवृत्तीसंदर्भात ‘केजी टू पीजी’च्या माध्यमातून तुमच्याशी संवाद करू इच्छिणारी, अनुभव सांगणारी. ४ थी व ७ वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा म्हणजे घरात एक वेगळेच वातावरण तयार करणाऱ्या परीक्षा. या परीक्षा मुलांच्या पुढील अभ्यासासाठी फारच उपयुक्त ठरतात. याच नव्हे तर इतरही परीक्षा; नवहिंद विद्यापीठ, कढट (गणितासाठी ४ ते ९ वीपर्यंत), होमी भाभा, इ. इ. सर्व परीक्षांच्या तयारीसाठी करतानाचा अभ्यास पुढे स्पर्धात्मक परीक्षांसाठी खूप उपयोगी पडतो. ठरलेल्या वेळातच उत्तरे लिहिण्याचा सराव, साधारणपणे १ मिनिटात गणित वाचून, सोडवून, उत्तर शोधून योग्य पर्याय लिहिणे यासाठी लहानपणापासून केलेला सराव खूप उपयोगी पडतो.
मुलांना टेन्शन नको, स्पर्धा नको या कारणांसाठी शाळेत गुणांप्रमाणे नंबर देणे बंद केले, पण त्यामुळे काय झाले? अभ्यास करणारे करतात, न करणारे नाहीच करत.
पालकहो, १२ वीनंतर प्रत्येक ठिकाणी अ‍ॅडमिशन घेताना प्रत्येक कोर्ससाठी आता एल्ल३१ंल्लूी ळी२३ आहे, त्यामुळे एकेक मार्क महत्त्वाचा आहे आणि याच गोष्टींची जाण मुलांना येण्यासाठी स्कॉलरशिपसारख्या स्पर्धात्मक परीक्षा फार आवश्यक आहेत.
स्कॉलरशिप मिळाली की नाही, हे अजिबात महत्त्वाचे नाही, याचे कारण असे, की सरकार ‘कोटा’ पद्धतीने स्कॉलरशिप देते. म्हणजे काय? तर ४ थीसाठी मुंबई विभागाला ३६४ मुलांना स्कॉलरशिप द्यायची. याचा अर्थ असा की ३६५ व्या मुलाला स्कॉलरशिप नाही, पण या मुलाला तर ग्रामीण भागातील मुलांपेक्षा जास्त मार्क असूनसुद्धा स्कॉलरशिप नाही; कारण ग्रामीण भागातील कोटय़ाप्रमाणे तिकडे नंबर काढणार. त्यामुळेच आपण फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचे.
स्कॉलरशिप मिळविणे हे उद्दिष्ट ठेवून मुलांच्या पाठी लागू नका. गुणवत्ता वाढविण्यासाठी, बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी, अभ्यासात चपलता येण्यासाठी व पुढील स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासाचा पाया भक्कम होण्यासाठी स्कॉलरशिप अभ्यास करा.
आणि म्हणूनच, पालकहो, आपल्या मुलांना स्कॉलरशिपला बसवाच.
डॉ. धनश्री काळे