Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, २० जानेवारी २००९

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पार्किंग व्यवस्थेला पोलीस आयुक्त, तज्ज्ञांचा आक्षेप
* १०० कोटींची तरतूद
* महिन्याभरात निविदा
* गल्लीतील पार्किंगलाही मनाई करणार
* जमिनीखालील पार्किंगच्या सुरक्षिततेचा सवाल
बंधुराज लोणे

वाहनांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि मुंबईतील जागेचा प्रश्न लक्षात घेऊन शहरात पार्किंगची आंतराराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था निर्माण करण्याचा पालिकेचा प्रस्ताव असून दोन ठिकाणी जमिनीखाली; तर सात ठिकाणी जमिनीवर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र या संदर्भात पालिकेने नीट अभ्यास केला नाही, अशी तज्ज्ञांची तक्रार आहे. जमिनीखाली बांधण्यात येणाऱ्या पार्किंग व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. स्वत: मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी एका ठिकाणावर आक्षेप घेतला आहे.

‘लोकसत्ता’, ‘श्री समूह’च्या कार्यशाळेला उदंड प्रतिसाद
प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दिवसेंदिवस मराठी टक्का वाढत आहे. ही समाधानाची बाब आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रचंड स्पर्धा असल्याने आत्मविश्वास आणि मेहनत करण्याची तयारी उमेदवारांनी ठेवली पाहिजे, असे आवाहन पुणे येथील द युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव यांनी केले. ‘लोकसत्ता’ आणि ‘श्री समूह’च्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा २००९ च्या परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांची एक विनामूल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जाधव बोलत होते. वडाळा येथील श्री दत्तगुरू सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पालक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केल्यामुळे सभागृहात बसण्यास जागा अपुरी पडली.

स्पोर्टस्मन स्पिरिट!
सुनील डिंगणकर

पायांनी दगा दिला असला तरी हात अजूनही मजबूत आहेत. मॅरेथॉनमध्ये धावता नाही आले म्हणून काय झाले. त्याने व्हीलचेअरवरून अडीच किलोमीटरचे अंतर पार केले. पायांमध्ये त्राण नसला तरी राजीव विराटचे मन खंबीर आहे. त्या जोरावर आपण काहीही करू शकतो, या आत्मविश्वासाने दिल्लीच्या राजीव विराटने हे अंतर पार केले. बारावीपर्यंत फुटबॉलमध्ये पारंगत असणाऱ्या राजीव विराटच्या आयुष्यातून फुटबॉल या खेळाला नियतीने हद्दपार केले असले तरी त्याचे स्पोर्टस्मन स्पिरीट अजूनही कायम आहे. मिलिंद सोमण ज्या संस्थेसाठी धावला त्या ‘मल्टिपल स्क्लेरॉसिस सोसायटी ऑफ इंडिया’चा प्रतिनिधी म्हणून मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी राजीव विराट खास दिल्लीहून आला होता.

‘टेक फेस्ट’मध्ये येणार परदेशातील रोबो
नीरज पंडित

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘आयआयटी-मुंबईचा टेक फेस्ट’मध्ये यंदा परदेशी रोबोही सहभागी होणार आहे. त्याचबरोबर यंदा चाकांच्या ऐवजी मानवासारखे पाय असणारे ‘लेगेड रोबोट’ आपल्याला पाहावयास मिळणार आहे. येत्या २४ ते २६ जानेवारी या कालावधीत आयआयटी-मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये होणाऱ्या या तंत्रज्ञान महोत्सवाला यंदा परदेशी स्पर्धकांची उपस्थिती लाभणार आहे. जगातील विविध भागातील तंत्रज्ञान आपल्या देशात पाहावयास मिळावे व येथील विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यास करता यावा यासाठी प्रथमच आयआयटीने श्रीलंका, डेनमार्क आणि दुबई येथील विद्यापीठांमध्ये ‘अथ्रोरोबोटस्’च्या स्पर्धा घेतली, असे ‘टेक फेस्ट’चे आयोजक सुशील शिंत्रे यांनी सांगितले.

वर्षांनुवर्षे चालणार टॅक्सींचे मीटर-परिवर्तन
* आणखी १५ वर्षे जाणार
* प्रवाशांची लूट चालूच राहणार
* परिवहन विभागाचे धोरण अनाकलनीय
कैलास कोरडे

साधारणत: वर्षभरापूर्वी राज्य शासनाने राज्यातील टॅक्सींना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निश्चित मुदत उलटून वर्ष होत आले तरी, शहरातील अध्र्याअधिक टॅक्सींना इलेक्ट्रॉनिक मीटर लागलेले नाहीत. सध्या केवळ नव्या टॅक्सींना इलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीचे धोरण परिवहन विभागाने स्वीकारले आहे. त्यानुसार शहरातील सर्व टॅक्सींना इलेक्ट्रॉनिक मीटर लागण्यास आणखी १५ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

हसन अलीचे ‘कारनामे’!
हसन अली गौसुद्दीनअली खान, वय वर्षे ५६, धंदा - व्यवसाय, निवास - व्हेलेन्टिना सोसायटी, टय़ूलिप बिल्डिंग, कोरेगाव पार्क, पुणे. वरळी पोलीस ठाण्यात जबानी देताना हसन अलीने दिलेला हा पत्ता आहे. एव्हाना हा हसनअली कोण हे वाचकांना माहित झाले असेलही. बोगस पासपोर्ट प्रकरणात वरळी पोलिसांनी त्याला अटक केल्याचे निमित्त. सध्या त्याची जामीनावर सुटका झाली आहे. हसनअली खान हे नाव या वरवर क्षुल्लक वाटणाऱ्या गुन्ह्य़ात दाखल झालेले असले तरी त्या निमित्ताने त्याच्याकडील अमाप संपत्ती पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. त्याच्या स्विस बँकेच्या खात्यात आठ अब्ज डॉलर्स सापडले होते.

चित्रकारांच्या नजरेतून युरोपातील कलाकृती
१८८५ साली तो अँटवर्प अकादमीमध्ये मानवाकृतीच्या रेखाटनाचा कोर्स करण्यास गेला. या वेळीच त्याचा भाऊ थिओ हा पॅरिसच्या कलाक्षेत्रांत चित्र खरेदी-विक्रीच्या व्यवसायात काम करीत होता. अँटवर्प येथे व्हॅन गॉगने प्रसिद्ध चित्रकारांची बरीच चित्रे पाहिली व त्याच्या स्वत:च्या चित्रात त्याचा फरक जाणवू लागला. १८८६ च्या वसंत ऋतूत थिओला भेटायला व्हॅन गॉग पॅरिसला गेला. तसे माँतमात्र येथे तो राहू लागला. माँतमात्रचा परिसर चित्रकारांचा परिसर म्हणून ओळखला जाई. इथे आल्यावर व्हॅन गॉगला चित्रकार तुलू लोत्रेक व बर्नार्ड यांच्या सहवासात आधुनिक कलेबद्दल बरीच माहिती मिळाली व त्याबाबत उत्सुकताही निर्माण झाली. त्याच्या स्वत:च्या चित्रांत गडद रंग जाऊन फिक्या रंगछटा दिसू लागल्या व बिंदूवादी शैलीप्रमाणे रंगाचे छोटे छोटे फटकारे तो वापरू लागला. मौतमात्रचा परिसरही त्याला विशेष आवडला. पॅरिसचा देखावा व सिएन नदीचा किनारा ही त्याची निसर्गदृश्ये याच काळातली.

फिल्मी संगीतातील ‘आरडी’एक्स इफेक्ट..
संगीतकार राहुल देव बर्मन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक बंडखोर संगीतकार म्हणून गौरविले जातात. त्यांची शास्त्रीय संगीतावर जेवढी पकड होती तेवढीच हुकूमत पाश्चात्य धर्तीच्या सुरावटींवर..म्हणूनच ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’, ‘आजा आजा मै हूँ प्यार तेरा’, ‘जाना ओ मेरी जाना’, ‘मेहबुबा मेहबुबा’, ‘यम्मा यम्मा’ सारखी गाणी ते करू शकले. त्याच वेळी त्यांच्या ‘आंधी’ आणि ‘अमरप्रेम’मधील चालींचेही कौतुक झाले. त्यांच्या शेवटच्या मानल्या गेलेल्या विधु विनोद चोप्राच्या ‘१९४२-अ लव्ह स्टोरी’ची गाणीही किती सुरेख होती..लहानपणी सचिनदांचे बोट धरून आरडी रेकॉर्डिंग स्टुडियोत जायचा आणि तबल्यावर हात साफ करून घ्यायचा..तबल्याचे त्याचे प्रचंड वेड पाहून बर्मनदा यांनाही अचंबा वाटायचा. ताल रक्तात भिनत गेला तो असा..पण सुरुवातीला पाश्चात्य संगीताचे त्याचे वेड पाहून ते नाराजही व्हायचे.

उम्मीद पे दुनिया कायम है
भारताचा स्वर्ग काश्मीर असे म्हटले जाते. मात्र काश्मीर मध्ये दहशतवादाने थैमान घातले तेव्हापासून तेथील लोकांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त झाले. तिथल्या एका आरिफ नावाच्या लहान मुलाची कहाणी ‘फ्लोटिंग लॅम्प ऑफ द श्ॉडो व्हॅली’ या कार्यक्रमात २४ तारखेला रात्री ९ वाजता डिस्कव्हरी वाहिनीवर पाहता येईल. आरिफचे वडील अमलीपदार्थाच्या आहारी गेले आणि आपल्या कुटुंबाला सोडून गेले. आता आरिफ हाच त्याच्या घराचा एकमेव आधार आहे. तो एकमेव कमावता आहे. त्याची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. सतत परिस्थितीचे चटके खात असलेले आपले कुटुंब आणि आपले राज्य यावर मात करण्याची त्याची दुर्दम्य इच्छा आहे. त्यासाठी तो चिमुरडा झटतोय. आरिफच्या नजरेतून आपण काश्मीरकडे बघतो तेव्हा ‘उम्मीद पे दुनिया कायम है’ ही उक्ती पटेल.

हिंसक कारवायांविषयीच्या चर्चासत्राचे मालाडमध्ये आयोजन
प्रतिनिधी

प्रल्हादराय दालमिया लायन्स महाविद्यालय आणि घनश्यामदास सराफ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालाड (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद रोडवरील दुर्गादेवी सराफ सभागृहात २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ‘हिंसक कारवायांना आवर घालण्यात शिक्षक व विद्यार्थी यांची भूमिका’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर मुंबई विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुरेश खोपडे या समारंभाचे प्रमुख वक्ते आहेत. लायन्स क्लब मालाड-बोरिवली कॉलेज चॅरिटी बोर्डाचे अध्यक्ष विनोद दालमिया हे या समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार असून कन्हैयालाल सराफ या कार्यक्रमाचे समालोचन करणार आहेत. प्राचार्य डॉ. रुकी मीरचंदानी व प्राचार्या सविता आवारे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. धीरेंद्र मेहता करणार आहेत.

राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय संमेलनाचे आयोजन
प्रतिनिधी

राष्ट्रसेविका समितीच्या सांस्कृतिक विभागातर्फे येत्या ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत नागपूरमधील धंतोली भागात अखिल भारतीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात महिला कीर्तनकार, प्रवचनकार, भजनीमंडळातील महिला, पौरहित्य शिकलेल्या व शिकणाऱ्या महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. धंतोली येथील देवी अहल्यामंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे उद्घाटन ३० जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी जयश्री खांडेकर (९३७३२८२२४७) किंवा सुशीला महाजन (९३२२५०४७३७) यांच्याशी संपर्क साधावा.