Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
व्यापार - उद्योग

‘प्लास्टइंडिया २००९’ प्रदर्शनात जगभरातील ३५ देशातील १,४२५ प्रदर्शकांचा सहभाग
व्यापार प्रतिनिधी: प्लास्टिक उद्योगाच्या क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या गेलेल्या ‘प्लास्टइंडिया २००९’ प्रदर्शनात यंदा अभूतपूर्व प्रतिसाद अपेक्षित असून, आठ महिने आधीपासून जगभरातून प्रदर्शनातील स्टॉल्ससाठी आरक्षण केले गेले. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम ‘प्लास्टिक मेळा’ (एसी निल्सन-ओआरजी मार्गच्या मानांकनानुसार) येत्या ४ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात आयोजिला जाणार आहे.

थॉमसन रॉयटर्सच्या शेतकऱ्यांसाठीच्या मोबाईल पीक सेवेत विस्तार
व्यापार प्रतिनिधी: थॉमसन रॉयटर्सने आपली अद्वितीय मोबाईल माहिती सेवा भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी विस्तारत असल्याची घोषणा केली आहे. ‘रॉयटर्स मार्केट लाइट’ या सेवेने वर्षभरापूर्वी शुभारंभ झाल्यापासून १ लाख सदस्य संख्येची मजल मारली आहे. ऑक्टोबर २००७ मध्ये धडाक्यात शुभारंभ केल्यापासून महाराष्ट्र आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना या सेवेतील अचूक, कालबद्ध आणि ग्राहकाभिमुख माहितीचा मोठय़ा प्रमाणावर फायदा झाला आहे.

लॅन्क्सेस नवीन प्रकल्पात ५० दशलक्ष युरो गुंतविणार
व्यापार प्रतिनिधी: लॅन्क्सेस इंडिया प्रा. लिमिटेडने गुजरात सरकारबरोबर सामंजस्य करार केला असून अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘चौथ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समीट मेगा एक्झिबिशन २००९’ दरम्यान या करारावर सह्या करण्यात आल्या.या सामंजस्य करारानुसार लॅन्क्सेस गुजरात येथील जगाडिया येथील नवीन प्रकल्पामध्ये ५० दशलक्ष युरोंची एकूण गुंतवणूक करणार असून त्याद्वारे हा प्रकल्प कंपनीसाठी भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात आधुनिक निर्मिती ठरणारा आहे. या गुंतवणुकीतून २२५ नवीन नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. हा सामंजस्य करार म्हणजे या नवीन प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या संमतीचा एक भाग असून त्याची घोषणा २००८ मध्येच करण्यात आली होती.या नवीन प्रकल्पामध्ये आयन एक्स्चेंज रेझीन प्लान्टचा समावेश असून त्यातून अतिशुद्ध पाण्याच्या निर्मितीसाठी उत्पादने पुरविली जाणार आहे. ही उत्पादने सेमीकंडक्टर आणि फार्मास्युटिकल उद्योग आणि औद्योगिक जलप्रक्रियेसाठी वापरली जातात. त्याचबरोबर, लॅन्क्सेसचा रबर रसायन कारखाना महाराष्ट्रातील ठाणे येथून जगाडिया येथे हलविण्यात येणार आहे. ठाणे येथील निर्मिती हळूहळू बंद करण्यात येणार आहे.

फियाटची नवीन स्टायलिश ‘लिनिया’
व्यापार प्रतिनिधी : ‘लिनिया’ बाजारात आणून फियाट इंडिया ऑटोमोबाइल्स लि.ने भारतात नवीन अध्याय सुरू केला असून यामुळे देशातील गाडय़ांची संख्या वाढण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. जगातील अनेक बाजारपेठांमध्ये यशस्वी घोडदौड केलेल्या या गाडीच्या माध्यमातून ग्राहकांच्या उंचावलेल्या अपेक्षाची पूर्तता होईल, अशी फियाटला आशा आहे. या गाडीने जिंकलेली अनेक पारितोषिके ही बहुसंख्य ग्राहकांना मिळत असलेल्या समाधानाचीच झलक आहे. टय़ूरिन (इटली) येथील फियाट स्टाइल सेंटरने या कारचे डिझाइन केले असून ही गाडी फियाटचे भारतातील प्रमुख उत्पादन बनू पाहत आहे. गाडीचे डिझेल आणि पेट्रोल हे दोन्ही प्रकार बाजारात आणले जातील, अशी घोषणा कंपनीने केली आहे. दर्जा, सुरक्षितता आणि इंजिनीअरिंगशी संबंधित सर्व बाबींमध्ये लिनियाने मोठी झेप घेतली आहे. या गाडीचे डिझाइन, आरामदायी बांधणी, कार्यक्षमता आणि अन्य वैशिष्टय़े यामुळे मध्यम आकाराच्या गाडय़ा आणि लक्झरी गाडय़ा यांच्या मधला नवीन उपविभाग तयार होईल अशी अपेक्षा आहे. लिनिया प्रथम तुर्की येथे बाजारात आणली गेली आणि सध्या युरोप, आशिया, मध्य आणि दक्षिण अमेरिका व आफ्रिकेमधील ५० हून अधिक देशांमध्ये हिची विक्री होत आहे. तुर्कीखेरीज लिनियाचे उत्पादन ब्राझीलमध्ये आणि आता भारतात केले जाते. नजीकच्या भविष्यकाळात रशियातही तिचे उत्पादन केले जाणार आहे. लिनिया बाजारात आल्यामुळे फियाटला आता भारतीय बाजारपेठेत मोठी उडी मारणे शक्य होईल.

पुण्यातील लघु व मध्यम उद्योगांसाठी ‘इंडिया कनेक्ट’चे नेटवर्किंग पोर्टल
व्यापार प्रतिनिधी: इंडिया कनेक्ट्स www.indiakonnects.comया भारतातील पहिल्या बिझनेस नेटवर्किंग पोर्टललारा पुण्यातील लघु व मध्यम (एसएमई) उद्योगांसाठी ऑनलाईन नेटवर्किंग पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमुळे पुण्यातील छोटे आयटी उद्योग व अन्य लघु व मध्यम उद्योगांना एकमेकांशी संपर्क साधण्याचे व संबंध प्रस्थापित करण्याचे उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.ग्लोबसिन समूहाचे संचालक (तंत्रज्ञान) रोमित दासगुप्ता इंडिया कनेक्टच्या वतीने म्हणाले की, पुणे ही एक उद्यमनगरी आहे. येथील लघु व मध्यम उद्योगांसाठी हे पोर्टल खूपच उपयुक्त ठरणार आहे.इंडिया कनेक्टचे सध्या तीन लाखांहून अधिक ग्राहक असून रोज त्यात हजारोंच्या संख्येने भर पडत आहे आणि या वाढणाऱ्या ग्राहकांच्या गरजा पुरवण्यासाठी आम्ही संशोधन व विकासकार्यात गुंतवणूक करू पाहात आहोत.यशस्वी ग्राहकांच्या अनुभवातून ठेव पोर्टलच्या सहाय्याने व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतात हे सिद्ध झाले आहे अशी माहितीसुद्धा दासगुप्ता यांनी दिली आहे.

निवड- नियुक्ती
डॉ. विनोद वासुदेवन ‘फ्लायटेक्स’चे ग्रुप सीईओ
व्यापार प्रतिनिधी: अग्रगण्य मोबाईल मार्केटिंग तंत्रज्ञान कंपनी ‘फ्लायटेक्स’ने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे पूर्व वरिष्ठ उपाध्यक्ष आणि इंटिग्रेटेड सव्‍‌र्हिसेस विभागाचे प्रमुख डॉ. विनोद व्ही. वासुदेवन यांची ‘फ्लायटेक्स’च्या समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्तीची घोषणा केली आहे. कंपनीच्या विस्तारकार्याच्या पुढील टप्प्याला बळकटी देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. टिम विलियम्स हे फ्लायटेक्सच्या वर्ल्डवाईड सेल्स विभागाच्या कार्यकारी उपाध्यक्षपदाचा कार्यभार साभाळतील. आपल्या नवीन भूमिकेमध्ये टिम हे कंपनीच्या विक्रीला बळकटी आणतील आणि जगभरात धोरणात्मक व्यावसायिक संबंध प्रस्थापित करतील. नवीन पदनियुक्ती घोषित करताना फ्लायटेक्सचे अध्यक्ष टिम विलियम्स म्हणाले, ‘‘आमच्या जागतिक विस्ताराला बळकटी देण्यासाठी मुख्य कार्यकारी पदावर अतिशय यशस्वी आणि आदरणीय उद्योग अग्रणी व्यक्ती प्राप्त करण्यात आम्हाला आनंद आहे. डॉ. वासुदेवन यांना मोबाईल ऑपरेटर्ससमोरील आव्हानांबाबत सखोल ज्ञान आहे. त्यामुळे फ्लायटेक्सला आपल्या ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करणे शक्य होईल.’’
आनंद गुप्ता यांची धनलक्ष्मी बँकेवर नियुक्ती
व्यापार प्रतिनिधी: खासगी क्षेत्रातील धनलक्ष्मी बँकेवर अल्टरनेट चॅनल्स विभागाचे प्रमुख म्हणून आनंद कुमार गुप्ता यांची नियुक्ती घोषित केली गेली आहे. एटीएम केंद्रांचा विस्तार, त्याचप्रमाणे इंटरनेट व मोबाईल बँकिंग व्यवसाय विभागाची त्यांच्यावर जबाबदारी राहील. गुप्ता यांची यापूर्वी आयसीआयसीआय बँकेचे मुख्य व्यवस्थापक पदावर सात वर्षांची कारकीर्द राहिली असून, एटीएम व इंटरनेट बँकिंग विभागाचे ते प्रभारी होते. गुप्ता यांनी इन्फ्रासॉफ्ट टेक्नॉलॉजीज या बँकिंग सॉफ्टवेअर कंपनीत तसेच बनारस स्टेट बँकेतही काम केले आहे. कॉम्प्युटर सायन्स इंजिनीयर असलेल्या ३७ वर्षीय गुप्ता यांना बँकिंग तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात एकंदर १३ वर्षे सेवेचा अनुभव आहे.
बलमलकितसिंग ‘बीजीटीए’चे नवे अध्यक्ष
व्यापार प्रतिनिधी: माल वाहतूकदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन (बीजीटीए)’ या संघटनेच्या अलीकडेच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवे अध्यक्ष म्हणून बलमलकितसिंग यांची निवड करण्यात आली. बीजीटीएकडे सुमारे १२०० माल वाहतूकदारांचे सदस्यत्व आहे. अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये मानद महासचिव म्हणून गिरीश अग्रवाल आणि खजिनदारपदी बिंदू कुमार वासा यांची निवड केली गेली आहे.

व्यापार संक्षिप्त
‘सिडबी’द्वारे व्यवसाय विकास सेवा
व्यापार प्रतिनिधी: स्मॉल इंडस्ट्रिज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अर्थात ‘सिडबी’वर भारत सरकारने कुटीर, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी व्यवसाय विकास सेवा (बी.डी.ओ.) कार्यान्वित करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरातील २५ विविध क्लस्टरना रोल मॉडेल म्हणून विकसित करण्यात येणार असून यासाठी वित्त मंत्रालय, जागतिक बँक, डीएफआयडीकेएफडब्ल्यू आणि जीटीझेडकडून अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे. पुण्यातील फळ आणि भाजीपाल्यावर प्रक्रिया करणाऱ्या कुटीर, लघू आणि मध्यम उद्योगांचा फळ आणि भाजीपाल्यावर प्रक्रिया करणाऱ्या क्लस्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे. या क्लस्टरमधील अनेक युनिटना सन २००७ पासूनच विविध सवलती मिळत आहे. बी.डी.एस. डेव्हलपमेंट करण्याच्या या प्रकल्पामध्ये पुण्यातील नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड फूड अ‍ॅनॅलिसिस इन्स्टिटय़ूट कार्यकारी मंडळामध्ये सहभागी असणार आहे. एन.ए.एफ.ए.आय.ची. स्थापना मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे करण्यात आली असून या संस्थेला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रिज मंत्रालयाकडून (जीओआय), सिडबी, नाबार्ड, ‘युनिडो’कडून सन २००२ पासून सहयोग मिळत आहे. संस्था खाद्यान्न उद्योगांना दर्जेदार अ‍ॅनॅलिटीकल सेवा तसेच प्रकल्पासंदर्भात आणि उत्पादनांच्या विकासासाठी सल्ला व प्रशिक्षण देत आहे.अ‍ॅपेक्स क्लस्टर डेव्हलपमेंट सव्‍‌र्हिसेस प्रा. लि. (ए.सी.डी.एस.) या संस्थेची बी.डी.एस. डेव्हलपमेंट प्रकल्पाला पुण्यामध्ये कार्यान्वित करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यूझीलंड क्रिकेट दौऱ्यासाठी न्यूझीलंड पर्यटन केंद्राचे पॅकेज
व्यापार प्रतिनिधी: निसर्ग सौंदर्याने नटलेले आणि खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंडने आता भारत विरुद्ध न्यूझीलंड ‘नॅशनल ब्रँक क्रिकेट मालिका २००९’ साठी खास पॅकेजची योजना भारतीय पर्यटकांसाठी केली आहे. तब्बल सहा वर्षांनंतर हिंदुस्थान संघ हा दौरा करीत असून अत्यंत आव्हानात्मक अशा या दौऱ्याचा आनंद लुटण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने क्रिकेट शौकिनांनाकरिता विमान कंपनी आणि दौरा संयोजकांच्या सहाय्याने काही खास आणि आकर्षक अशा योजना आखल्या असून या योजना ६६६.ल्ली६९ी’ंल्ल.िूे या वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध आहेत. या पॅकेजनुसार चार दिवसांचा दौरा ७०,००० रु. तर सात दिवसांच्या दौऱ्याला १,१०,००० खर्च येणार आहे. यामध्ये क्रिकेटबरोबरच न्यूझीलंडमधील प्रसिद्ध बंदरे ऑकलंड, वेलिंग्टन, उद्यानाचे शहर ख्राइस्टचर्च आणि नेदरलँड रोदुरा आदी ठिकाणांचे सृष्टीसौंदर्य न्याहाळता येणार आहे.
मिस प्लेअर्सची पार्टीवेअर रेंज
व्यापार प्रतिनिधी: मिस प्लअर्सने आकर्षक रंगातील विविध प्रकारच्या पोषाखांची पार्टी वेअर शृंखला सादर केली आहे. कापडांचे निरनिराळे समकालीन प्रकार आणि अगणित रंगांसह तयार करण्यात आल आहेत. सॅटीनचे टॉप्स, ट्राऊजर्स, वेस्ट कोट्स, कॉर्डरॉय, छोटे फॉर्मल जॅकेट्स, स्कर्ट्स, स्वेटर, टय़ुनिक्स, लगिंग्ज आणि पुलओव्हर्स अशा अनेक प्रकारांबरोबर त्यांना साजेशे बेल्ट, स्कार्फ, टोपी आणि सॉक्सदेखील या शृंखलमध्ये सामावल आहेत. हे सर्व पोषाख रु. ५९५ पासून पुढील किमतीत उपलब्ध आहेत.
इंडसइंड बँकेचा तिमाही नफा ४५ कोटी
व्यापार प्रतिनिधी: इंडसइंड बँक लिमिटेडने ३१ डिसेंबर २००८ रोजी समाप्त तृतीय तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यानुसार या तिमाहीत बँकेने गतसालच्या संबंधित तिमाही तुलनेत ८० टक्के वाढीने रु. ४५.०६ कोटी निव्वळ नफा कमावला आहे. गतसाली तृतीय तिमाहीत इंडसइंड बँकेने रु. २५.०४ कोटी निव्वळ नफा कमावला होता. तसेच नऊमाही दरम्यान ६१ टक्के वाढीने रु. ९७.८२ कोटी निव्वळ नफा कमावला आहे. गतसाली बँकेने नऊ माहीत एकूण रु. ६०.६० कोटी निव्वळ नफा कमावला होता. तृतीय तिमाहीत बँकेने ३० टक्के वाढीने रु. ११६.५८ कोटी तर नऊमाहीत ४७ टक्के वाढीने रु. ३१४.७६ कोटी व्याज कमावले आहे, तर ७९ टक्के वाढीने रु. १३३.०७ कोटी तिमाही व्याज उत्पन्न कमावले आहे.
पिरॅमिस किचन सोल्यूशन
व्यापार प्रतिनिधी: स्वयंपाकघराच्या गरजांशी निगडित विविध उत्पादनांची निर्मिती करणारी ग्रीसची अग्रेसर कंपनी पिरॅमिसचे किचन सोल्यूशन्सचे जागतिक ब्रॅण्ड आता भारतात दाखल झालेआहे. पिरॅमिस एस.ए.ची भारतातील उपकंपनी पिरॅमिस मार्केटिंग इंडिया प्रा. लि.ने भारतीय ग्राहकांना किचन व बाथरूम्स सोल्यूशन्स प्रदान करण्याकरिता देशभरात २५ विशेष शोरूम्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. पहिल्या वर्षी विपणन व प्रसिद्धीसाठी कंपनीने १० कोटी रुपयांचे नियोजन आखले आहे. याचे फलित म्हणून पहिल्याच वर्षी १० टक्के बाजारहिस्सा कमावण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.