Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘श्वास’ कार अरुण नलावडे यांच्या आगामी चित्रपटाची अलिबागेत होणार निर्मिती
अलिबाग, २० जानेवारी/ प्रतिनिधी

 

पाच वर्षांपूर्वी अलिबागमध्ये आलो़ अलिबागेतच सज्जनांचा सहवास लाभला़ सांस्कृतिक चळवळ ही जीवनाचे अविभाज्य अंग आहे, हे येथे जोपासताना पाहायला मिळत़े मुंबईसारखी मोठी शहरे आपल्या स्वत:च्या सांस्कृतिक चेहऱ्याकडे पाहतच नाहीत़ ग्रामीण भागानेच सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवली आहे, आणि म्हणूनच ‘श्वास’ नंतर पुढची भरारी घेणारा आगामी चित्रपट याच अलिबागेत, स्थानिक कलाकारांच्या सहभागातून आपण तयार करणार असल्याची घोषणा ‘श्वास’कार अरुण नलावडे यांनी येथे नुकतीच केली आह़े
येथील प्रयास सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या ‘वर्तुळ’ या लघुपटाचे उद्घाटन नलावडे यांच्या हस्ते येथील कर्णिक सभागृहात करण्यात आल़े यावेळी नाटय़निर्माते प्रा़ प्रमोद वेळे, अ़ भा़ नाटय़ परिषदेच्या रायगड शाखेचे अध्यक्ष संदीप गोठिवडेकर, कृषिवलचे संपादक एस.एम. देशमुख, रायगड जिल्हा पत्रकार संघाचे सचिव नागेश कुलकर्णी व प्रयासचे संचालक विजय बारसे आदी मान्यवर उपस्थित होत़े
खरं तर गावागावात कलेचा वारसा आह़े लघुपटातून स्थानिक पातळीवरच त्यास व्यासपीठ उपलब्ध करून देता येऊ शकेल़ सांस्कृतिक भूक आपल्याला लागली पाहिजे, तरच ती भागवणारा तयार होतो़ पैसा हा प्रश्न नाही, इच्छा असली पाहिज़े मार्ग निश्चित सापडतो़ लघुपटाच्या माध्यमातून देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर जाता येऊ शकत़े त्या दृष्टीने सामाजिक विषय ‘वर्तुळ’ या लघुपटात चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल नलावडे यांनी प्रयासचे आवर्जून अभिनंदन केल़े
यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून प्रयासला शुभेच्छा दिल्या़ ‘वर्तुळ’ या लघुपटाचे लेखक, दिग्दर्शक व पटकथाकार विजय बारसे यांनी निर्मितीमागची वाटचाल आपल्या प्रास्ताविकात विशद केली़