Leading International Marathi News Daily                                  बुधवार, २१ जानेवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

चेतना मॅरेथॉन-२००९ मध्ये नीलम कदम व मनोज म्हात्रे सर्वप्रथम
अलिबाग, २० जानेवारी/ प्रतिनिधी

 

चोंढी येथे आयोजित १९ व्या चेतना मॅरेथॉन-२००९ या स्पध्रेत महिलांच्या खुल्या गटात कु. नीलम कदम (उरण-जिमखाना) हिने १० कि.मी. अंतर ३६ मिनिटात तर तर पुरुष खुल्या गटात कु. मनोज म्हात्रे (उरण-चिरनेर कॉलेज) याने २१ कि.मी. हे अंतर १ तास ७ मी़ ५४ से. अशा विक्रमी वेळेत पार करून अजिंक्यपद पटकाविल़े
चेतना क्रीडा मंडळ ही संस्था रायगड जिल्ह्यातील नावाजलेली संस्था असून, गेली १८ वष्रे रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने मॅरेथॉन स्पध्रेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी या स्पध्रेत रायगड जिल्ह्यातून विक्रमी स्पर्धक सहभागी झाले होते. बिसलेरी इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीने स्पर्धा प्रायोजित केली होती. सामाजिक कार्यकर्ते राजन नार्वेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर बिसलेरी प्रा. लि.चे संचालक डरायस कपाडिया यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पध्रेचे उद्घाटन करण्यात आले. स्पध्रेच्या बक्षीस समारंभ किहीम ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय भोईर, बिसलेरी प्रा. लि.चे संचालक डरायस कपाडिया, रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी संस्थेचे खजिनदार विजय भोईर यांची किहीम ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल, मोरा ते गेट-वे हे अंतर विक्रमी वेळेत पोहून पार केल्याबद्दल कु.मानसी ठक्कर, विविध धावण्याच्या स्पर्धेत देशपातळीपर्यंत क्रमांक मिळविल्याबद्दल आगरसुरे येथील नरेंद्र म्हात्रे त्याचप्रमाणे छोटय़ा वयामध्ये वय वष्रे १० ब्लॅक बेल्ट मिळविल्याबद्दल कु़ पूर्वा भोईर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला़ स्पध्रेचे पंच म्हणून सुहास ठाकूर, विश्वनाथ पाटील, प्रदीप ठाकूर, राऊत सर, गे.ना. परदेसी ,अविनाश सावंत यांनी काम पाहिल़े तसेच दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महिला खुला गट प्रथम क्रमांक व पुरुष खुला गट प्रथम क्रमांक यांना गानू ट्रस्टतर्फे बक्षीस देण्यात आले तर प्रत्येक गटातील १ ते ४ क्रमांकांना गे.ना. परदेसी सर यांच्या तर्फे विविध मार्गदर्शनपर पुस्तके देण्यात आली़ ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजन नार्वेकर, राजेंद्र ठाकूर, महेंद्र दळवी, नितीन अधिकारी, युनिलॅंड इस्टेट, पिनाकिन पटेल, गानू ट्रस्ट, पुणे, सुबोध राऊत, डॉ़ व्ही़ एस़ म्हात्रे यांचा मोलाचा हातभार लागला़ बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन जी़ एम़ पाटील यांनी केल़े ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रत्नकांत भगत व इतर सर्व सभासदांनी दिवस-रात्र मेहनत घेतली़
गटनिहाय स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे :- २१ कि.मी. खुला गट पुरुष - प्रथम क्रमांक मनोज बाळाराम म्हात्रे (उरण), द्वितीय क्रमांक चंद्रकांत बाळू पारधी (पाली), तृतीय क्रमांक कमल्या जोमा भगत (पनवेल)़ १० कि.मी. खुला गट महिला :- प्रथम क्रमांक नीलम मारुती कदम (उरण जिमखाना), द्वितीय क्रमांक सोनिया हनुमंत मोकल (हाशिवरे), तृतीय क्रमांक सुप्रिया देविदास पाटील (उरण जिमखाना). १० कि.मी. मुले १७ वर्षांखालील :- प्रथम क्रमांक अभिजीत विजय पाटील (उरण), द्वितीय क्रमांक सुदर्शन चिंतामण पाटील (उरण जिमखाना), तृतीय क्रमांक विकास गोविंद पाटील (धोकवडे)़ ५ कि.मी. मुले १४ वर्षांखालील :- प्रथम क्रमांक रोहीत उमाकांत भोईर (बेणसे पेण), द्वितीय क्रमांक जितेश लक्ष्मण भोईर (बेणसे पेण), तृतीय क्रमांक विशाल प्रभाकर पाटील (बेणसे पेण)़ ३ कि.मी. मुली १४ वर्षांखालील :- प्रथम क्रमांक सविता वसंत पाटील (आंबिवली पेण), द्वितीय क्रमांक समीक्षा सुभाष घरत (धोकवडे), तृतीय क्रमांक मयुरी भरत शिलघणकर (सासवणे)़ २ कि.मी. मुले १० वर्षांखालील :- प्रथम क्रमांक विपुल राजेश जवळे (बेणसे पेण), द्वितीय क्रमांक रोशन पांडुरंग कुथे (बेणसे पेण), तृतीय क्रमांक शिरीश ज्ञानेश्वर ताडकर (बेणसे पेण)़ १ कि.मी. मुली १० वर्षांखालील :- प्रथम क्रमांक प्राची सुरेश म्हात्रे (पेण), द्वितीय क्रमांक निकीता शैलेंद्र शिलघणकर (सासवणे), तृतीय क्रमांक शिवानी विजय बाळा (चोंढी, स.म. वडके)़ ५ कि.मी. प्रौढ पुरूष ४५ वर्षांवरील :- प्रथम क्रमांक संजय शांताराम शिलघणकर (सासवणे), द्वितीय क्रमांक नरेंद्र तुकाराम म्हात्रे (चेतना चोंढी), तृतीय क्रमांक रवींद्र दत्ताराम साळुंखे (किहीम)