Leading International Marathi News Daily
रविवार, १ ८ जानेवारी २००९

प्रलोभने टाळा, संधी साधा
शनी-मंगळाचे शुभ परिणाम रविवारच्या बुध-गुरू युतीपासून प्रत्ययास येऊ लागतील. त्यातील कल्पना कृतीमध्ये आणता येतील आणि कर्तृत्व उजळून निघेल. त्यातून यश मिळवता येणार आहे. शनिवारच्या रवी-गुरू युतीपर्यंत व्यापार-राजकारण, कलाप्रांत, बौद्धिक वर्तुळ यामध्ये आगेकूच सुरूच राहणारी आहे. आर्थिक न्यायालयीन प्रकरणही मार्गी लावता येईल. शुक्र-शनी प्रतियोग होत असताना प्रलोभनांनी फसवणूक होणार नाही एवढीच फक्त काळजी घ्या.
दिनांक : १८, १९, २३, २४ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्नाने अपेक्षित यश मिळवता येईल.

अंदाज अचूक ठरतील
चतुर्थात शनी, अष्टमात मंगळ सहजासहजी यश मिळू देत नाहीत. परंतु रविवारच्या बुध-गुरू युतीपासून अंदाज अचूक ठरत राहातील आणि कार्यपथ निर्वेध करून वृषभ व्यक्तींना शनिवारच्या रवी-गुरू युतीपर्यंत प्रतिष्ठा मजबूत करणार. तुमच्या प्रांतात यश मिळेल. कायदा, दुश्मनी, वाद स्पर्धा, असंतोष यामध्ये अवास्तव साहस कटाक्षाने टाळा. शिक्षणातील प्रश्न सुटतील. मंगलकार्य ठरावे. बढती-बदलीचे योग येतील.
दिनांक : २०, २१, २२ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्नाने सफलता मिळवता येईल.

प्रवास सुरू राहील
मिथुन व्यक्तींना शनिवारच्या मंगळ-शनी नवपंचम योगापर्यंत कार्यपथावरील प्रवास मजल दरमजल करत सुरू राहील. तरीही अष्टमात रवी, गुरू, बुध, राहू असे चार ग्रह असेपर्यंत प्रवासातील बारीक-सारीक अडचणींवर लक्ष ठेवूनच कार्यभाग साधावा लागणार आहे. दुसऱ्यांवर विश्वासून वेळापत्रकात कोणतेही बदल करू नका. पैसा आणि आश्वासन यांचा जपून उपयोग करा. शुक्र-मंगळ शुभयोग कला-क्रीडा-विज्ञान प्रांतात प्रभाव प्रस्थापित करण्यास साथ देईल.
दिनांक : १८, १९, २३, २४ शुभकाळ.
महिलांना : निराश होऊ नका, यश मिळेल.

समन्वय साधता येईल
रविवारच्या बुध-गुरू युतीपासून कार्यवर्तुळातील घटना, अपेक्षा, सफलतेचा आनंद देत राहतील. प्रयत्नांचा वेग, अचूक कृती यांचा समन्वय सहज साधता येईल. षष्ठातील मंगळ शत्रूंना पुढे सरकू देणार नाही. परंतु साडेसाती असल्याने अशा शुभकाळाला दिवस कमी मिळतात. त्यामुळे शनिवारच्या रवी-गुरू युतीपर्यंत रात्रीचा दिवस करून महत्त्वाची प्रकरणे मार्गी लावावीत. मिळणारा पैसा पदरात पाडून घ्यावा. नोकरी-व्यवसायात संधी साधण्यास विलंब नको.
दिनांक : २०, २१, २२ अनुकूल काळ.
महिलांना : यश निश्चित मिळेल.

गनिमी कावा शह देईल
शुक्र मंगळाचे सहकार्य आणि मंगळ-हर्षलाचा शुभयोग यांना व्यावहारिक कार्यपद्धतीतून गनिमी काव्याने प्रत्युत्तर दिलेत तर साडेसाती रवी-राहू यांना शह देऊन काही विभागात तरी गाडी पुढे रेटून नेता येईल. त्यामुळे इभ्रत सांभाळता येईल. यावेळी बैठकीत चर्चा, आश्वासन या संबंधात सतर्क राहाणे आवश्यक आहे. शासकीय प्रकरणात दुर्लक्ष नको. बुध-गुरू युती बौद्धिक क्षेत्रात कार्यभाग साधण्यास उपयुक्त ठरेल. व्यापारातूनही पैसा मिळवता येईल.
दिनांक : १८, १९, २३, २४
महिलांना : विचारपूर्वक कृतीच यशस्वी ठरेल.

युक्ती यश मिळवून देईल
साडेसाती आणि चतुर्थात मंगळ यांचा काळ असंतोषाचा, आव्हानाचा असतो. शनिवारच्या शुक्र-शनी प्रतियोगापर्यंत त्याचे काही धक्के बसतील. परंतु रविवारची बुध-गुरू युतीपासून शनिवारच्या रवी-गुरू युतीपर्यंत कन्या व्यक्तींना युक्ती-युक्तीनेच स्थितीमधून बाहेर पडून यश मिळवता येईल. त्यामध्ये व्यापारी प्राप्ती सत्ता केंद्र रखडलेली खरेदी-विक्री चर्चेत असलेल्या मंगलकार्याची प्रकरणे आणि प्रवास यांचा समावेश होऊ शकेल. अचानक लाभाच्या चक्रात मात्र सापडू नका.
दिनांक : १८ ते २२ शुभकाळ.
महिलांना : संयम ठेवा. सफलता मिळेल.

प्रतिमा उजळून निघेल
पराक्रमी मंगळ पंचमात, शुक्र लाभात, शनी यांच्यात शुभ परिणामांनी चतुर्थातील रवी-गुरू राहूची अनिष्ठता नियंत्रणात ठेवून नियमित उपक्रमाचं चक्र फिरवत ठेवू शकाल. शनिवारच्या मंगळ-शनी नवपंचम योगापर्यंत प्रतिमा उजळून काढणारी सफलता मिळवता येईल. त्यामध्ये न्याय-विज्ञान-व्यापार-शिक्षण असे विभाग असतील. प्रापंचिक समस्या, संयम आणि संधीतून पुढे सरकवता येतील किंवा सोडवता येतील.
दिनांक : १९ ते २३ शुभकाळ.
महिलांना : सफाईनेच सफलता मिळेल

प्रसन्न पर्वाचा प्रारंभ
दैव अनंत हस्ते देते या वाक्प्रचारांचा प्रत्यय पराक्रमी गुरू, राहू, दशमांत शनी, चतुर्थात, शुक्र अशाच ग्रहकाळात येत असतो. रविवारच्या बुध-गुरू युतीपासून या प्रसन्न पर्वाचा सुरू होणारा प्रारंभ, व्यापार, राजकारण, कला प्रांत साहित्याचे विषय, शिक्षणप्रांत क्रीडा मैदान अशा अनेक केंद्रातून शनिवारच्या रवी-गुरू युतीजवळ मोठय़ा उत्साहात समारोप करणारा ठरेल. जन्मकुंडली प्रभावी असेल तर प्रत्यय असाच येईल. भक्तिमार्ग चमत्काराचा ठरणारा आहे. विदेश प्रवास, मंगल कार्ये, नवी भारदस्त खरेदी यांचाही समावेश त्यात राहील.
दिनांक : २० ते २४ शुभकाळ.
महिलांना : प्रभाव प्रस्थापित करणारी प्रतिष्ठा मिळेल.

नशीब उजळून निघेल
राशीस्थानी मंगळ, पराक्रमी शुक्र भाग्यात शनी यांच्या प्रतिक्रिया विचारांना वेग व प्रयत्नाला यश देतील. आणि कार्यप्रांतात तर नशीब उजळून काढतील. रविवारच्या बुध-गुरू युतीपासूनच याचा प्रत्यय बहुसंख्य धनु व्यक्तींना येत राहणार आहे. शनिवारच्या मंगळ-शनी नवपंचम योगाच्या आसपास काही प्रांतात यशोत्सवाचा समारंभ होऊ शकेल. त्यात राजकारण, कला, साहित्य, विज्ञान, प्रांत यांचा समावेश व्हावा. नवी व्यापारी केंद्र उभी करता येतील. ग्रहकाळ शुभ आहे; परंतु हलक्या विचारांच्या परिवारांत ऊठबस ठेवू नका. एवढे पथ्य ठेवा.
दिनांक : १८, १९, २३, २४ शुभकाळ.
महिलांना : समीकरणातील सफलता संसारात समाजात सन्मानाची ठरणारी आहे.

प्रयत्नातून यश
श्नि मंगळाचा कडवा विरोध सुरू राहाणार असला तरी रविवारची बुध-गुरू युती श्निवारची रवि-गुरू युती यांच्या मधल्या काळामध्ये प्रयत्नाने यश मिळेल. अशाच ग्रह प्रतिक्रिया मजबूत ठरतील. निर्णय, कृती आणि वेळापत्रक यांच्यामध्ये शक्यतो बदल करू नका. परंतु अवास्तव साहस, अवाजवी खर्च, वाहानांचा वेग असे प्रकार कटाक्षाने टाळा. त्यामुळे शुक्र-श्नि प्रतियोगातील अनिष्ठ प्रतिक्रियांचा त्रास होणाार नाही.
दिनांक: १८ ते २२ शुभकाळ
महिलांना: प्रयत्नाने समस्या सुटतील.

सतर्क राहा; समस्या टाळा
राशीस्थानी शुक्र सप्तमांत, शनि लाभात, मंगळ गुरुवारच्या मंगळ-हर्षल शुभयोग यामधूनच कुंभ व्यक्तींना कार्यपथावरील उपक्रम यशस्वीपणे सुरू ठेवता येतील. शनिवारच्या मंगळ-शनि नवपंचम योगामुळे प्रतिष्ठा वाढेल व सत्ता हाती येईल. आर्थिक स्थिती गंभीर असली, तरी सतर्क राहिल्याने तुमचे प्रष्टद्धr(२२४)्ना सुटतील. व्यापाराची घडी बसेल आणि मंगलकार्र्ये ठरतील. व्ययस्थानी रवी, राहु, गुरू, बुध असल्याने ते उपक्रमांत सतर्क राहतील. परिणामी आपत्ती संभवत नाही.
दिनांक: १९ ते २३ यश मिळेल.
महिलांना: पुढे चालत राहा, यश मिळेल.

लोभापासून दूर राहा
दशमांत मंगळ लाभात रविवारी बुध- गुरू युती होत आहे. शनिवारी सूर्य-गुरू युती आहे. यातूनच कार्याला प्रयत्नांची जोड दिल्यास नेत्रदीपक यश संपादन करता येईल. याचा साक्षात प्रत्यय मीन व्यक्तींना येणार आहे. शुक्र-हर्षल युती आणि शुक्र-श्नि प्रतियोगामुळे कुठल्यातरी लोभाला फसण्याचा संभव आहे. त्यामुळे कुठल्याही लोभाला बळी न पडण्याबाबत सतर्कता पाळा. नोकरी-व्यवसायात संधी साधण्यास विलंब नको. प्रवास कराल.
दिनांक: २० ते २४ यशस्वी काळ
महिलांना: संधी साधा, सफ लता मिळेल.