Leading International Marathi News Daily                                  शनिवार, २४ जानेवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भावसार व्हिजन संस्थेचा आज पदग्रहण सोहळा
सोलापूर, २३ जानेवारी/प्रतिनिधी

भावसार व्हिजन ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उद्या दि. २४ रोजी

 

होणार आहे.
डफरीन चौकातील आयएमए हॉल येथे उद्या शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता हा पदग्रहण सोहळा व्हिजनचे संस्थापक असलेले अ. भा. भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष नारायणराव तातुस्कर (हुबळी) यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती व्हिजनचे नूतन अध्यक्ष दीपक आकुडे यांनी पत्रकारांना दिली. या पदग्रहण सोहळय़ात व्हिजनचे एरिया १०३ चे नूतन गव्हर्नर गिरीश वायचळ, सोलापूर शाखेचे नूतन अध्यक्ष दीपक आकुडे, पुढील वर्षीचे अध्यक्ष सुहास क्षीरसागर, उपाध्यक्ष अश्विन डोईजोडे, सचिव मीनल भावसार, सहसचिव स्मिता अंबुरे, खजिनदार राजेश झिंगाडे, सहखजिनदार सुनीता पुकाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी पदग्रहण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अधिकारग्रहण समारंभात समाजातील पाच गरजूंना दीपक पिसे व गणेश सुत्रावे यांच्या वतीने पाच शिलाई यंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. व्हिजनच्या वतीने या वर्षांत सुमारे शंभर शिलाई यंत्रांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही आकुडे यांनी सांगितले.
या पदग्रहण समारंभाचे औचित्य साधून उद्या दि. २४ रोजी दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत शिवस्मारक येथे कै. सुरेश रामचंद्र अंबुरे प्रतिष्ठान व भावसार व्हिजनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजिले आहे.
या वेळी रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार असून याशिवाय तीन लकी ड्रॉ काढून भाग्यवान विजेत्यास विविध बक्षिसे देण्यात येणार असल्याचेही वायचळ यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस अतुल भावसार, सुहास क्षीरसागर, मीनल भावसार हे उपस्थित होते.